Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-५०

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-५०
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-५०


किचनमध्ये आल्यावर आई कसं सांगू आजीला या विचारात पुन्हा कामाला लागली.

मावशी: ताई बोललात का प्रतिक दादांशी...? 

आई: ( काम करता करता) हो

तेवढयात प्रतिकचे बाबा किचनमध्ये आले.

बाबा: (आईकडे पाहून) नंदा, कसल्या एवढ्या विचारात आहेस..?

आई: ते आई जेवणार नाहीत म्हणाल्या ना... आणि प्रतिकला हे सांगायला गेले तर प्रतिक म्हणाला, तो ही जेवणार नाही आहे...

बाबा: हे काय आणखीन नवीन... (हसत हसत) पण काहीही म्हण हा... प्रतिकने हट्टीपणा त्याच्या आजीचाच घेतला आहे.

आई: अहो हसताय काय...? इथे दोघेही जेवायला तयार नाहीत.. प्रतिक तर म्हणतो, आजीला जाऊन सांग की, ती जेवणार नाही म्हणून तो ही जेवणार नाही आहे.

बाबा: असं आहे तर... मग सांगना जाऊन आईला...

आई: मी काय म्हणते, तुम्हीच का नाही जाऊन सांगत आईंना...?

बाबा: नंदा, तुला माहीत आहे ना आईचा राग...

आई: हो माहीत आहे ना, आणि तुम्ही मला त्यांच्या रागाचा बळी होऊ देत आहात...

बाबा: अग तसं काही नाही ग... पण कोणीतरी सांगायलाच हवं ना... थांब मी विचार करतो...

मावशी: (इतका वेळ त्यांचं बोलणं ऐकून झाल्यावर) ताई, आजी तापामुळे जेवायला तयार नाहीत आणि प्रतिक दादा आजी जेवत नाही म्हणून जेवायला तयार होत नाहीत.. तुमची हरकत नसेल तर मी आजींना हे सांगू का...? की प्रतिक दादा जेवायला तयार नाहीत ते..?

मावशींना आजी नक्की कोणत्या कारणामुळे जेवायला तयार नाही याबद्दल काहीही कल्पना नव्हती. त्यांना वाटत होतं आजी तापामुळे जेवायला तयार नाहीत. आईबाबा दोघेही मावशींना हो बोलावं की नाही बोलावं याचाच विचार करत होते. प्रतिक लहान असल्यापासून मावशी त्यांच्या घरात काम करत असल्यामुळे त्या त्यांना घरच्या सारख्याच होत्या. पण आज विषय थोडा वेगळा होता आणि तो मावशींना सांगावं असा ही नव्हता.

मावशी: (त्या दोघांना असं विचार करताना पाहून) ताई, नका काळजी करू मी आजींना कळणार पण नाही अशा पद्धतीने आजींना प्रतिक दादा जेवायला तयार नसल्याचं सांगते.

बाबा: (आई काही बोलायच्या आधीच) हो चालेल..

तशा मावशी आजीच्या रुमच्या दिशेने निघून गेल्या.

आई: अहो तुम्ही असं का केलं... आई मावशींवर रागावल्या तर...?

बाबा: जस्ट रिलॅक्स... अस काहीही होणार नाही आहे..

आई मावशींवर नाही ओरडणार...

आई: हं... असं म्हणत आई पुन्हा कामात गुंतून गेली... आणि बाबा ही तिला कामात मदत करु लागले.

मावशी हातात केरसुणी घेऊन आजींच्या रुममध्ये गेल्या...आणि कचरा काढू लागल्या. आजींना कसला तरी विचार करत असलेला पाहून मावशी म्हणाल्या, आजी आता तुमची तब्येत कशी आहे... मला मघाशी ताई म्हणाल्या तुम्हाला ताप आला होता. 

आजी: हं, ताप आता उतरला आहे पण थोडी कणकण जाणवतेय... आणि आता काय ही हाडं जून झाली... आता अशा माणसांची अडगळ होते घरात...!!

मावशी: हं बाकी घरांचं माहीत नाही पण तुमच्या घरात सगळ्यांच खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि काळजी आहे तुमची...

आजी: वसु, उगाच या म्हातारीला बरं वाटावं म्हणून काहीही बोलू नकोस..

मावशी: मी कशाला खोटं बोलू... तुम्ही जेवणार नाही हे कळल्यापासून प्रतिक दादा पण जेवायला तयार नाहीत... तुमच्या नातवाचा जीव आहे आजी तुमच्यावर...म्हणून तर तो पण जेवायला तयार नाही... आणि ताईंचं पण कामात लक्ष नाही आहे... 

आजी: प्रतिक जेवायला तयार नाही...? तुला कसं माहीत...?

मावशी: ताई म्हणत होत्या मघाशी...

आजी यावर काहीच बोलली नाही. मावशी पण त्यांचं आजीच्या रूममधलं काम आटपून किचनमध्ये गेल्या.

मावशी: (किचनमध्ये आल्यावर) ताई अजून काही काम बाकी आहे..?

नंदा: नाही... (काळजीने) तुम्ही सांगितलं आईंना...?

मावशी: हो सांगितलं ना...!!

नंदा: मग आई काय म्हणाल्या...? त्या रागावल्या तर नाहीत ना तुमच्यावर..?

मावशी: नाही हो ताई... पण प्रतिक दादा जेवायला तयार नाहीत हे कळलं तसं त्या शांत झाल्या काही पुढे बोलल्याच नाहीत पण मला असं वाटतं त्या येतील जेवायला...!! प्रतिक दादा जेवायला तयार नाहीत म्हटल्यावर...

नंदा: हो तसंच होउदे...!!

मावशी: ताई, मग मी निघू का आता...?

नंदा: हो चालेल...

तसं मावशी घरुन निघाल्या.

***

 

मावशी गेल्यावर काही वेळाने आजी लिविंग रुममध्ये येऊन सोफ्यावर येऊन बसल्या. आई मटार सोलत होती आणि बाबा तिला मदत करत होते. खरं तर मदत कमी खातच जास्त होते. 

दोघेही कामात इतके मग्न होते की त्यांचं आजी बाहेर येऊन सोफ्यावर बसली आहे हे ही कळलं नाही. शेवटी आजीनेच स्वतःहून बोलयचं ठरवलं.

आजी: नंदा, मी काय म्हणते....

आजींचा आवाज ऐकून आईबाबांनी दचकून आवाजाच्या दिशेने पाहिलं.

आजी: अरे, दोघे असे दचकलात कशाला...?

मिलिंद: अग आई ते आम्ही दोघेही मटार सोलण्यात बिझी होतो ते तू आल्याचं लक्षातच आलं नाही. त्यामुळे दचकलो आम्ही...

आजी: मिलिंद मी नंदाचं एक वेळ समजू शकते ती खरंच मटार सोलत होती पण तू कुठे मटार सोलत होतास... मी मघासपासून बघतेय, तू मटार सोलतोय कमी आणि खातोच जास्त आहे....म्हणत आजी हसू लागली.

आजीला हसताना बघून आईबाबा दोघेही हसू लागले. दोघांच्या मनात विचार आला, आईचा मूड finally change झाला.

आजी: मी काय म्हणते नंदा... मी ठरवलं आहे की मी माझी न जेवण्याची अट मागे घ्यायचं ठरवलं आहे.

नंदा: (आनंदित होऊन) आई खरंच...

मिलिंद: आई,म्हणजे तू प्रतिकच्या प्रेरणाबरोबर लग्न करायच्या decision ला accept केलंस. 

आजी: (काहीसं रागात मिलिंदकडे पाहत) मी माझ्या मतावर अजूनही ठाम आहे आणि मी फक्त जेवणासाठी हो म्हणाले आहे... प्रेरणाला नातसून करायला हो नाही म्हणाले.... मी जेवायला फक्त प्रतिकने जेवणावर राग काढू नये म्हणून तयार झाले आहे. माझा नातू माझ्यामुळे उपाशी राहता कामा नये एवढंच माझं म्हणणं आहे. मिलिंद, प्रतिकला सांग जेवणावर राग काढू नकोस... असं म्हणत आजी पुन्हा तिच्या रुममध्ये निघून गेली.

मिलिंद: (नंदा कडे पाहून) नंदा, आईला आता असं वागताना पाहून एक मी नक्की म्हणू शकतो, आईचा तिच्या दोन्ही नातवांवर खूप जीव आहे.

नंदा: हो ते तर आहे, फक्त आई आता प्रेरणासाठी सुद्धा हो म्हणायला हव्यात बस...

मिलिंदने त्यावर काहीही न बोलता फक्त नंदाच्या हातावर हात ठेवून डोळ्यांनीच तिला सगळं ठीक होईल असं आश्वासन दिलं.

***

 

रात्री आईने टेबलवर जेवण आणून ठेवलं आणि आजीला जेवणासाठी बोलावलं. थोड्याच वेळात आजी डायनिंग टेबलकडे आल्या.

आजी: (प्रतिकला न पाहून) प्रतिक कुठे आहे...?

मिलिंद: आई, तो येतोय... ऑफिसमधून एक कॉल आला होता तो अटेंड करुन येतोय.

नंदा: आई, तुम्ही तोपर्यंत जेवायला सुरवात करा, तो येईलच...

आजी: येउदे त्याला मग करते सुरवात... आणि नंदा तुझं ताट कुठे आहे... 

नंदा: आई, तुमचं सगळ्याचं झालं की मग जेवेन...

आजी: नंदा, तुला माहीत आहे ना... मला हे असं कोणी मागे राहून एकट्याने जेवावं पटत नाही... आजपर्यंत आपण एकत्र जेवत होतो... आणि आज अचानक काय झालं...? (आजीला अचानक काहीतरी आठवलं) नंदा, मी प्रेरणाबद्दलचा जो निर्णय सांगितला त्यामुळे तर नाही ना असं वागत आहेस...? बोलताना आजी नंदाचे डोळे वाचायचा प्रयत्न करत होत्या.

नंदा: तसं नाही आहे काही आई...

आजी: नाही आहे ना तसं काही मग बस बरं आमच्याबरोबर....असं म्हणत आजीने तिला जबरदस्तीने बसवलं. तोपर्यंत प्रतिक डायनिंग टेबलवर आला. आईने त्याच्या ताटात जेवण वाढलं. सगळेजण शांतपणे कोणाशीही न बोलता जेवत होते. आजी अधून मधून प्रतिककडे तो नीट जेवतो आहे की नाही हे पाहत होती. अचानक त्याला जेवता जेवता ठसका लागला. कोणी पाणी द्यायच्या आधीच आजीने पाण्याचा ग्लास त्याच्यापुढे केला. तो काहीही न बोलता पाणी प्यायला.

आजी: (मिलिंदला बोलत होती तरी ते तिला प्रतिकला बोलायचं होतं) मी काय म्हणते मिलिंद, माणसाने सावकाश जेवावं... उगाच घाईने जेवायला गेलो की मग ठसका लागतो...

मिलिंद: (आईच्या बोलण्यातला रोख प्रतिकला आहे हे लक्षात येऊन) हो आई, सावकाश जेवेन...

पुन्हा चौघे शांतपणे जेवू लागले. सगळ्यांच जेवण आटोपलं तसं प्रतिक एकटाच टेरेसवर राउंड मारायला गेला. खरंतर राउंड हे कारण होतं त्याला सोना दीदीला घडलेलं सगळं सांगायचं होतं. 

त्याने सोनाला कॉल करुन घरी झालेली सगळी हकीकत सांगितली.

सोना: हे बघ शांत हो... टेंशन नको घेऊस... मी येईन तेव्हा बघू काय करायचं ते... उद्या रविवार आहे तर थोडा आराम कर... पिकनिकमुळे आणि फोटोग्राफी मुळे खूप धावपळ झाली तुझी आणि राजीवची....चल आता घरी जा आणि शांत झोप... and one more thing... dont share all this things with Prerna... चल गुड नाईट म्हणत तिने कॉल ठेवला. प्रतिक घरी आला आणि दोन दिवसांच्या धावपळीमुळे शांत झोपी गेला.

***

 

दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी नाश्ता, जेवण कोणीही एकमेकांशी न बोलताच उरकलं. संध्याकाळी थोडे पाय मोकळे करावेत म्हणून प्रतिक गार्डनमध्ये गेला. तिथे त्याचे फ्रेंड्स असलेले आजी आजोबा भेटले. तो त्यांच्या बाजूला जाऊन बसला.

आजोबा: प्रतिक, बरेच दिवस झाले तू दिसलास नाही...

प्रतिक: हो आजोबा... ऑफिसमध्ये खूप काम होतं आणि घरी येऊन पण ते करावं लागतं होतं.... आणि त्यानंतर दोन दिवस ऑफिसच्या टीमबरोबर अलिबागला पिकनिकला गेलो होतो.

आजी: (काहीसं आठवून) सगळी टीम गेलेलात..? 

प्रतिक: हो...

आजी: (चष्मा काहीशी वर करून प्रतिककडे पाहत) मग ती पण असेल ना....

प्रतिक: हो आजी, ती सुद्धा होती...

आजी: मग पुन्हा विचारलं की नाही....?

प्रतिक: हो विचारलं.... आणि तिने होकार ही दिला..

दोघे: (खूश होऊन) वाह वाह खूप छान झालं... आता लवकर लग्न करा...

आजोबा: (प्रतिकच्या उदास चेहऱ्याकडे पाहून) काय रे काय झालं. तसं प्रतिकने आजीचा नकार असल्याचं त्यांना सांगितलं.

आजी: तिला थोडा वेळ दे... ती बदलेल तिचा निर्णय..

प्रतिक: हो आजी... मी त्याच दिवसाची वाट पाहतो आहे...

आजोबा: (घड्याळात पाहत) अग वाजले बघ किती...चल निघूया म्हणत आजोबांनी आजीला हात देत उठवलं.

प्रतिक: चला मी सोडतो तुम्हा दोघांना.... आणि तुम्हाला सोडून पुढे मी घरी जातो.

प्रतिकने आजोबा आणि आजीला सांभाळून बिल्डिंगमध्ये सोडलं.

आजी: (प्रतिकला बाय करत) हे बघ काळजी नको करुस सगळं होईल ठीक...

तो दोघांना बाय बाय म्हणून तिथून घरी जायला निघाला.

 

क्रमशः

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...