अस्तित्व एक संघर्ष-भाग-४७

It is a story of a girl who faced such a situation where she totally destroyed and at one point she fights for her identity.

अस्तित्व एक संघर्ष

भाग-४७


सगळे फ्रेश होऊन नाश्त्यासाठी टेबलवर आले. राजीव रेखाची मस्करी करत होता तर रेखा सोना दीदीकडे त्याची complaint करत होती. 
सोना: रेखा, काय त्याच्या मस्करीने एवढी वैतागते आहेस..
तू पण बिनधास्त कर त्याची मस्करी... वकील तो कोर्टात; इथे नाही... असं म्हणत तिने राजीवचे एक एक किस्से सांगायला सुरुवात केली. तसं रेखा सकट सगळेजण हसू लागले.
राजीव: सोना दीदी... तू पार्टी चेंज केलीस...this is not fair..
तू आतापासून रेखाच्या पार्टीमध्ये गेलीस... ( जीजूकडे पाहून) जीजू तुम्ही तरी मला आणि प्रतिकला निराश करू नका...दीदी तर रेखा आणि प्रेरणाची बाजू घेणार असंच दिसतंय... मग तुम्ही पण या की आमच्या team मध्ये...
जीजू: हा आहे मी तुमच्या पाठीशी... तुम्ही लढा...
सोना: हां लढा आणि आडवे तिडवे पडा... तसे परत सगळे खो खो करून हसू लागले. प्रतिक आणि प्रेरणा मात्र एकमेकांच्या कडे पाहण्यातच दंग होऊन गेले होते.
राजीव: (त्या दोघांना पाहून) आँखो ही आँखो में इशारा हो गया... तसं सगळ्यांच्या लक्षात आलं... प्रतिक आणि प्रेरणा आपल्यात असूनही नसल्या सारखे आहेत. सगळे आपल्याला च पाहत आहेत हे प्रेरणाला जाणवलं तसं तिने लाजून मान दुसरीकडे वळवली.
प्रतिक: (काही घडलंच नाही असं दाखवायचा प्रयत्न करत) कुठे काय झालं...? असे का बघत आहात सगळे...? चला आपण काहीतरी मस्त गेम खेळूया...what say...?
राजीव: आम्ही खेळायला तयार आहोत रे...पण तिथे तुम्ही दोघेही खेळणार आहात ना... की असंच एकमेकांना पाहत बसणार आहात जसं आता पाहत होतात..
प्रतिक: (आपण पकडले गेलोत हे जाणवून राजीवच्या कानात हळूच) पुरे कर आता किती छळणार आहेस...!!
राजीव: (हसत) चला आपण volleyball खेळू...
तसे सगळे लगेच तयार झाले. मस्तपैकी 2-3 तास खेळून झाल्यावर काहीजण असेच पाण्यात खेळू लागले...तर कोणी sand castle करु लागलं. इतका वेळ खेळल्यावर सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडू लागले. फ्रेश होऊन non veg जेवणावर सगळ्यांनी ताव मारला. 
आशिष: राजीव सर, आमचे फोटोज कधी मिळणार..?
राजीव: देईन मी 2-3 दिवसांत... 
जीजू: आता जेवून लगेच निघायचं आहे की कसं...?
सोना: 4 पर्यंत निघू...म्हणजे घरी गेल्यावर थोडा आराम ही करता येईल.. 
मीना: हां right...
सगळ्यांना 4 वाजता निघायचं हा प्लॅन पटला.. जेवून झालं तसं प्रत्येक जण आपापल्या रुममध्ये packing करायला निघून गेले.
ठरल्या प्रमाणे 4 वाजता सगळेजण भेटले.
प्रतिक: तुम्ही चौघे कसे जाणार आहात..?
राजीव: माझ्या कारने आम्ही चौघे ही आलो होतो... कारनेच मग जाऊ... 
प्रतिक: दीदी, तू आता घरी येणार आहेस की...?
सोना: नाही रे, आता आमच्या घरी जाणार आहोत... मी येईन 2-3 दिवसांनी... त्याच्या आधी तू आजीला तुझ्या आणि प्रेरणा बद्दल सांग.
प्रतिक: हो चालेल दीदी...म्हणत प्रतिकने सोना आणि जीजूना hug केलं. तसं सोना ने ही प्रेरणाला hug करुन बाकी सगळ्यांना बाय म्हटलं. 
रेखा: (प्रेरणाला) I am sorry once again dear, मी तुला जो काही त्रास दिला त्यासाठी...
प्रेरणा: (hug करुन) its ok... तुझ्या रुपात मला एक खूप छान फ्रेंड मिळाली.
रेखा: हो मला ही...
राजीव: चला निघूया का आता...??
तसे राजीव, रेखा, सोना आणि जीजू सगळ्यांना बाय म्हणत त्याच्या कार मधून घरी जायला निघाले. ते निघाले तसे त्यांच्या मागोमाग प्रतिक आणि सगळेजण येताना जसे बसमध्ये बसले होते तसेच पुन्हा एकमेकांच्या शेजारी बसून घरी यायला निघाले. यावेळचा प्रवास प्रेरणा प्रतिक एकमेकांच्या साथीने एन्जॉय करत होते. प्रतिकला मात्र घरी गेल्यावर पुढे काय घडणार याची जरा ही कल्पना नव्हती.

क्रमशः