Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-४६

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-४६
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-४६


राजीवने बॉटल गोल फिरवली. पहिल्याच राउंडला बॉटल राहुलकडे थांबली. राहुलने dare चा option choose केला. त्याने बॉक्स मधून एक चिट्टी काढली. चिट्टीवर लिहिलं होतं show your best dance move... वाचून त्याला हसायला आलं.

समिधा: काय झालं... का हसतोय...? 

तशी त्याने चिट्टी तिला हळूच वाचून दाखवली. ते ऐकून ती ही हसू लागली.

रेखा: अरे दोघेच हसत आहात... आम्हाला पण सांगा का हसत आहात ते...

समिधा: (हसणं थांबवत) राहुलला नाचता येत नाही...

हे ऐकून सगळेच हसू लागले.

राजीव: (हसणं थांबवत) तू वाचून नसतं दाखवलं तर तू truth select करू शकला असता पण तुला आता तो option नाही आहे... त्यामुळे dance तर करावाच लागेल... पण एक help मी करू शकतो तुला....

राहुल: कोणती

राजीव: (त्याच्या कानात हळूच बोलतो) तू समिधा बरोबर couple dance करू शकतो... ऐसा मौका छोड मत...(त्याने त्याच्या खांद्यावर हात थोपटला आणि तो त्याच्या जागेवर येऊन बसला)

सगळे: Rahul... Rahul....We are waiting for your dance.

राहुलने मोबाईल वर Rustom movie मधलं तेरे संग यारा... गाणं सुरू करू केलं आणि समिधाकडे जाऊन तिचा हात हातात घेतला तशी ती जागेवरुन उठली. त्याने गाण्यात दाखवल्या प्रमाणे समिधाच्या हातावर किस केलं आणि swirl dance step करत तिच्या बरोबर त्याच गाण्यावर couple dance केला...

सगळ्यांनी त्यांच्या dance वर टाळ्या वाजवून कौतुक केलं तसं दोघांनी वाकून सगळ्यांना thank you म्हंटलं आणि आपापल्या जागेवर बसले. पुन्हा राजीवने बॉटल गोल फिरवली.

आता बॉटल येऊन प्रेरणा पाशी थांबली...तिने सुद्धा dare चा option choose केला. तिने बॉक्स मधून चिट्टी निवडली. चिट्टीवर लिहिलं होतं... ग्रुपमधल्या तुमच्या आवडीच्या व्यक्तीला propose करा. चिट्टी वाचून ती प्रतिककडे पाहून लाजून हसली.

मीना: अग काय आलं आहे चिट्टी मध्ये...?

प्रेरणाने चिट्टी मीनाकडे दिली. मीनाने लगेच चिट्टी सगळ्यांना मोठ्या आवाजात वाचून दाखवली. सगळे प्रेरणा प्रेरणा करुन ओरडू लागले. प्रेरणाने दीर्घ श्वास घेतला आणि प्रतिक जवळ आली. तसा प्रतिक त्याच्या जागेवरुन उठून उभा राहिला. प्रेरणाने त्याच्या डोळ्यात बघत त्याचा हात हातात घेत गुडघ्यावर बसून म्हणाली,

अकेले रहू मैं तो, आपका साथ चाहीए....

भीड में भी आप ही का साथ चाहीए...

बंद आँखे खोलू तो भी आप साथ चाहीए ...

जिंदगी जीने के लिए भी आप ही का साथ चाहीए...

तिच्या या शायरीने propose करण्याच्या स्टाईलवर सगळ्यांनी टाळया वाजवल्या. प्रतिकने तर तिला आनंदाने कपाळावर किस करत मिठीत घेतलं.

राजीव: (त्याला मस्करीमध्ये) प्रतिक मी तुझा आनंद समजू शकतो पण वेळ जागा जरा बघून काय ते करा...तसे प्रतिक प्रेरणा दोघेही लाजून एकमेकांच्या मिठीतून दूर झाले आणि पटकन आपापल्या जागेवर बसले. असाच गेम रंगात आला होता. आता शेवटी फक्त आशिष आणि विवेक उरले होते.  राजीवने पुन्हा बॉटल गोल फिरवली...बॉटल विवेकच्या दिशेने थांबली. विवेकने truth option choose केला. त्याने बॉक्स मधून चिट्टी काढली. चिट्टी वाचून त्याला क्षणभर काही कळेना. तो काहीच बोलत नाही आहे हे पाहून राजीव त्याला म्हणाला, तुला truth च्या जागी dare option choose करायचा असेल तर तू बिनधास्त बदलू शकतो. याक्षणी विवेकला राजीवने या गेम साठी truth or dare option जो बदलण्याचा पर्याय ठेवला होता तो योग्य वाटत होता. त्याने truth ची चिट्टी पुन्हा त्या बॉक्समध्ये टाकली. आणि dare च्या बॉक्स मधून चिट्टी काढली. चिट्टीवर लिहिलं होतं..तुझ्या बॉसचा एक negative आणि positive point कोणता...? चिट्टी वाचून विवेकने डोक्याला हात लावला.

प्रतिक: काय झालं...? असं काय लिहिलं आहे त्यात..?

राजीव त्याच्याकडे उठून गेला. त्याने चिट्टी मनात वाचली आणि जोरजोरात हसू लागला.

विवेक: राजीव सर, नका ना हसू...आधीच मला टेन्शन आलं आहे

प्रतिक: राजीव, असं काय लिहिलं आहे त्या चिट्टी मध्ये..?

राजीव: (हसणं control करत) बॉसचा एक negative and positive point कोणता...?

मीना: (हसत हसत) विवेकचा बॉस म्हणजे प्रतिक सर...?

प्रतिक: (विवेकची भीती घालवण्याच्या उद्देशाने) विवेक न घाबरता सांग... हे बघ मी तुझा बॉस ऑफिस मध्ये.. इथे आपण फ्रेंड्स आहोत...(प्रेरणाकडे पाहुन तिचा हात हातात घेत) आणि लवकरच जिजू मेहुणा पण होऊ... सो नको घाबरुस...

प्रेरणा: (लाजून प्रतिककडे पाहुन हात सोडवत) विवेक सांग तू...नको घाबरुस... सर काही नाही करणार तुला...

तशी विवेकच्या मनातली भीती काहीशी गेली. त्याने थोडा विचार केला...काय बरं असू शकतो negative and positive point...?

प्रतिकला आणि सगळ्यांनाच विवेक काय बोलतोय याची उत्सुकता लागून राहिली होती.

विवेक: सरांचा positive point जो आहे तोच त्यांचा कधी कधी negative point सुद्धा होतो...सरांमध्ये खूप patience आहेत... पण कधी कधी इतके patience ठेवणं योग्य ही नाही.

प्रतिक: (टाळ्या वाजवून) विवेक, मला तुझं observation आवडलं.

विवेक: thank you sir

राजीव: (आशिषला उभं करुन त्याचा एक हात वरती करुन) तर मग आपल्या गेमचा winner आहे...मि आशिष... टाळ्या...

तसे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

***

 

सगळे आपापल्या रूमवर आले. प्रतिक सोना दीदी आणि जीजू बरोबर गप्पा मारायला त्यांच्या रुममध्ये गेला. प्रेरणा फ्रेश व्हायला गेली असताना समिधाला राहुलचा कॉल आला.

समिधा: हां बोल ना...

राहुल: ऐकना मला बाहेर पार्कमध्ये येऊन भेट...मी तुझी वाट पाहतो आहे...

समिधा: आता या वेळेला...?

राहुल: हं surprise आहे.... तुझ्यासाठी....ये ना प्लीज...

समिधा: ओके बाबा येते मी..तसा दोघांनी कॉल ठेवला आणि समिधा प्रेरणाला मेसेज सेंड करुन रूममधून बाहेर पडली. राहुल प्रतिकला मेसेज करुन आधीच पार्कमध्ये गेला होता.

***

 

प्रतिक त्याच्या सोना दीदी आणि जिजू बरोबर त्यांच्या रुममध्ये गप्पा मारत बसला होता. 

सोना: प्रतिक मग घरी कधी सांगतोय...?

प्रतिक: आईबाबांना तर आधीच माहीत आहे...आजीला कसं सांगू समजत नाही आहे...

सोना: just chill आजी आहे ती आपली...नक्की ऐकेल...!

प्रतिक: (सोनाचा हात हातात घेऊन) दीदी नक्की ऐकेल ना...

सोना: अरे हो रे...आणि नाही ऐकली तर तुझे जिजू आहेत ना ते बोलतील आजी बरोबर...आणि नातजावयाचा शब्द कसा मोडणार आजी...(हसून म्हणाली)

जीजू: (दोघांच्या हातावर हात ठेवून) हो बोलेन मी नक्की...

तसा प्रतिक सोना आणि जिजू दोघांना good night बोलून त्यांच्या रूममधून त्याच्या रूमकडे जायला निघाला.

***

 

प्रेरणा फ्रेश होऊन आली. समिधा कुठे दिसेना म्हणून तिने कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतला. समिधाचा मी राहुल बरोबर पार्क मध्ये आहे, उशीर झाला तर तू झोपून घे फक्त डोअर आतून लॉक नको करुस. मेसेज वाचून तिने ओके रिप्लाय दिला आणि मोबाईल मधले प्रतिकचे फोटोज पाहत बसली. काही वेळ गेला असेल नसेल हवेने पडदे हलत होते. वातावरण एकदम शांत झालं होतं. आता तिला वाऱ्याने हलणाऱ्या पडद्याची ही भीती वाटू लागली. काहीतरी विचित्र घडतंय असं सतत वाटू लागलं. पडद्याच्या आवाजाने सुद्धा ती प्रचंड घाबरली होती. तिच्या हृदयाची धडधड, श्वासांची गती वाढली होती. तिने तिचे दोन्ही पाय जवळ करून चेहरा त्यात लपवून घाबरुन डोळे मिटून घेतले.

***

 

रुममध्ये येऊन प्रतिकने फ्रेश होऊन मोबाईल हातात घेतला. राहुलने तो समिधा बरोबर पार्कमध्ये असल्याचा मेसेज त्याला केला होता. त्याने ओके म्हणून त्यावर रिप्लाय दिला आणि असाच गॅलरीत पाहत राहिला. त्याच्या डोळ्यासमोर सकाळपासूनचा सगळा दिवस भरभर येऊन गेला. त्याच क्षणी त्याला डॉक्टरांनी send केलेला मेसेज आठवला. तो लगेच प्रेरणाच्या रुममध्ये धावला. प्रेरणा, प्रेरणा म्हणत त्याने डोअर knock केला. प्रेरणा इतकी घाबरली होती की तिला डोअर कोणी वाजवत आहे हे ही लक्षात आलं नाही. प्रतिकने एकदा डोअरचा लॉक फिरवून बघितला...प्रेरणाने आतून Lock केला नसल्याने डोअर उघडला. प्रतिकने आत पाहिलं... प्रेरणाने घाबरुन चेहरा दोन्ही पाय जवळ घेऊन हाताने झाकला होता. प्रतिक तिच्याजवळ गेला.

प्रतिक: (तिच्या चेहऱ्यावरचा हात बाजूला करत) प्रेरणा घाबरू नकोस... मी आहे बघ इथे... मी प्रतिक... तुझा प्रतिक.... तिने हळूहळू डोळे उघडले. तिला बोलायचं होतं पण भीतीने फक्त तिच्या थरथरत्या ओठांची हालचाल झाली. तिने लगेच स्वतःला त्याच्या मिठीत झोकून घेतलं. भीतीने जोरात होणारी तिच्या हृदयाची धडधड प्रतिकला जाणवली. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्या मनात असलेली भीती घालवली. ती थोडी रिलॅक्स झाली तसं त्याने तिला झोपायला सांगितलं. ती त्याचा एक हात पकडून बेडवर डोळे मिटून पडून राहिली. प्रतिक दुसऱ्या हाताने तिच्या केसांमधून हात फिरवत तिला झोपवायचा प्रयत्न करू लागला. तिला थोड्याच वेळात शांत झोप लागली. प्रतिकचा ही बाजूला बसल्या जागी डोळा लागला. थोड्या वेळाने समिधाने प्रेरणा कदाचित झोपली असेल या विचाराने तिच्याकडे असलेल्या key ने डोअर उघडला. डोअर च्या आवाजाने प्रतिकला जाग आली.

समिधा: (समोर प्रतिकला पाहून हळू आवाजात) सर तुम्ही इथे..? 

प्रतिकने हळू आवाजात तिला सगळा प्रकार सांगितला.

समिधा: सॉरी सर, मला यातलं काहीच माहीत नव्हतं नाहीतर मी गेले नसते...

प्रतिक: its ok Samidha...dont blame yourself..

समिधा: (प्रेरणाला पाहून तिच्या डोळ्यांत पाणी आलं) सर, मी आहे प्रेरणा बरोबर... तुम्ही पण जाऊन झोपा आता....

प्रतिक: प्लीज समिधा नको रडूस, तुझी नाही आहे यात काही चूक.. मी जातो पण काही लागलंच तर मला कितीही उशीर झाला तरी कॉल कर...

समिधा: हो चालेल सर...

प्रतिकने तिच्या हातातला त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न केला पण प्रेरणाने हात घाबरुन इतका घट्ट पकडला होता की हात सोडवताना ती उठली असती...आणि त्याला असं करुन तिला उठवायचं नव्हतं. समिधाच्या ही गोष्ट लक्षात आली.

 

समिधा: सर, मी सोफ्यावर बसते... तुमची हरकत नसेल तर तुम्ही झोपा इथे प्रेरणा बरोबर...असं म्हणत तिने प्रतिकला बेडवर टेकून बसण्यासाठी pillow दिल्या. प्रतिकने pillow पाठीमागे लावून घेतल्या.

प्रतिक रुममध्ये नाही बघून राहुलने त्याला कॉल केला. प्रतिकने त्याचा कॉल बघून लगेच उचलला.

प्रतिक: हॅलो, हां राहुल, बोल ना...

राहुल: अरे कुठे आहेस...?

प्रतिक: अरे मी प्रेरणाच्या रुममध्ये आहे असं म्हणत त्याने घडलेला प्रकार सांगितला.

राहुल: थांब मी आलो लगेच...प्रतिक पुढे काही बोलणार त्याच्या आधीच राहुलने कॉल ठेवला आणि तो तडक प्रेरणाच्या रुममध्ये आला.

समिधा: (राहुलला पाहून तिच्या डोळ्यांत पाणी आलं) माझ्या मुळे झालं हे सगळं...मला माहित नव्हतं रे...

राहुल: खरं तर माझंच चुकलं मी इतक्या लेट तुला बोलवायला नको होतं... ना मी बोलवलं असतं... ना हे असं झालं असतं.

राहुलने तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला शांत केलं.

प्रतिक: समिधा-राहुल प्लीज नका स्वतःला blame करु... तुम्हाला जसं माहीत नव्हतं तसं मला ही आधी माहीत नव्हतं... मला डॉ चा मेसेज आला होता त्यामुळे मला माहित झालं... आणि प्रेरणा एकटीच आहे हे लक्षात येताच मी तडक इकडे आलो. आणि its a phobia so हळूहळू ट्रीटमेंट ने तिच्या मध्ये फरक पडेल. (समिधाला बिथरलेलं पाहून) राहुल, माझं एक काम करशील का..?

राहुल: हां बोल ना...

प्रतिक: समिधाला आपल्या रुममध्ये झोपायला सांग... ती प्रेरणाच्या बाबतीत जे घडलं आता ते पाहून स्वतःच खूप घाबरली आहे.

समिधा: सर नको मी थांबते इथे तुमच्या बरोबर...

प्रतिक: समिधा, आता मी आहे ना...नको काळजी करुस... याक्षणी तू ही स्वतः खूप घाबरली आहेस...आणि उद्या प्रेरणा ठीक झाली की तू असणारच ना सोबत तिच्या... सो आता शांत झोप...

राहुल: (प्रतिकच्या खांद्यावर हात ठेवून) ठीक आहे प्रतिक, मी समिधाला घेऊन जातो...पण काही हवं असेल तर लगेच कॉल कर मला...

प्रतिक: हो नक्की...आणि प्लीज तुम्हा दोघांमुळे असं झालं हा विचार आधी मनातून काढून टाका...

राहुल: हो प्रतिक... चल येतो आम्ही असं म्हणत तो समिधाला त्यांच्या रुममध्ये घेऊन गेला.

ते दोघे गेल्यावर प्रतिकने प्रेरणाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मागे उशीवर डोकं ठेवून तसाच डोळे बंद करून बसून राहिला.

***

 

सकाळी 6-6.30 च्या आसपास प्रेरणाला जाग आली. तिने बाजूला पाहिलं तिने प्रतिकचा हात पकडून ठेवला होता. प्रतिक बाजूला बसल्या जागी झोपला होता. तिला रात्रीचं सगळं आठवून मनात विचार आला, किती त्रास झाला सरांना माझ्यामुळे... मला उठवावं लागता कामा नये म्हणून ते असेच बसून होते. तिने तिचा हात त्याच्या हातातून सोडवला आणि झोपेतून उठली. पण असं करताना प्रतिकला जाग आली. त्याने तिच्याकडे पाहिलं.

प्रतिक: प्रेरणा, तुला आता ठीक वाटतं आहे ना..?

प्रेरणा: हो सर...मी ठीक आहे आता... सॉरी माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला.

प्रतिकने तिचं वाक्य ऐकून तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला, सर मी ऑफिस मध्ये... ऑफिस बाहेर मी तुझा फक्त प्रतिक आहे... आणि आपल्या माणसांसाठी कराव्या लागणाऱ्या गोष्टींना त्रास म्हणत नाही...

प्रतिकच्या अचानक ओठांवर बोट ठेवल्याने प्रेरणाच्या हृदयाची धडधड वाढली होती.

प्रतिक: प्रेरणा मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं आहे...? देशील ना..?

प्रेरणा: कसलं प्रॉमिस प्रतिक...?

प्रतिक: ( हात पुढे करून) आधी प्रॉमिस दे मग सांगतो..

प्रेरणा: (त्याच्या हातावर हात ठेवून) प्रॉमिस... आता तरी सांगा...

प्रतिक: यापुढे तू कधी ही कुठे ही एकटी असलीस की मला कॉल करायचा... चालेल ना...

प्रेरणाने मानेने हो म्हटलं. तसं प्रतिकने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तोच डोअर knock करण्याचा आवाज आला. प्रतिकने उठून डोअर उघडला. दरवाजावर समिधा आणि राहुल होते.

समिधा: सर प्रेरणा कशी आहे आता...?

प्रतिक: अरे आत या ना..!!

तसे दोघेही आत आले. प्रेरणाला उठलेलं पाहून समिधाने धावत जाऊन तिला रडत मिठी मारली.

प्रेरणा: (समिधाच्या पाठीवरुन हात फिरवत) अग रडततेस कशाला..? शांत हो बघू आधी...

समिधा: सॉरी प्रेरणा, काल झालं ते सगळ माझ्यामुळे झालं. मी नसते गेले तर असं घडलंच नसतं...

प्रतिक: प्रेरणा, आता तूच या दोघांना समजावून सांग...दोघेही तुझ्या कालच्या अवस्थेला स्वतः ला जबाबदार धरुन चालले आहेत. मी खूप समजावलं पण त्यांना अजून ही तसंच वाटत आहे.

प्रेरणा: (समिधाचा हात हातात घेऊन) हे बघ यात तुम्हा कोणाची ही चूक नाही आहे... मी जर तुम्हाला कधी या बद्दल काही सांगितलंच नाही तर मग तुम्हाला कसं कळणार होतं....?

सो राहुल आणि समिधा तुम्ही दोघांनी ही गोष्ट मनातून काढा.

तशी समिधा पुन्हा प्रेरणाला बिलगली.

चला आम्ही दोघे येतो...असं म्हणत राहुल आणि प्रतिकने दोघींना बाय केलं आणि त्यांच्या रुमच्या दिशेने गेले.

 

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...