अस्तित्व एक संघर्ष-भाग-४४

It is a story of a girl who faced such a situation where she totally destroyed and at one point she fights for her identity.

अस्तित्व एक संघर्ष

भाग-४४


Lunch ला बसले असताना राजीव अधून मधून रेखाचं त्याच्याकडे लक्ष जावं म्हणून तिचा पाय समजून सोनाच्या सँडलवर पाय मारत होता... शेवटी नक्की कोण पाय मारत आहे हे सोनाने टेबलखाली वाकून बघितलं... राजीवचा चाललेला प्रकार तिच्या लक्षात आला तशी ती त्याला हसत हसत म्हणाली, राजीव तुला नाही का वाटत तू तुझी कार wrong direction मध्ये वळवली ? तसं सोना दीदीच्या बोलण्याचा अर्थ काय तो त्याला समजला आणि त्याने त्याचा कान पकडून तिला सॉरी म्हटलं. त्यांच्या बोलण्यातला विषय नक्की काय हे मात्र त्या दोघांशिवाय कोणालाही कळलं नाही. सगळ्यांच जेवण आटपल्यावर मीनाने तिच्याकडे असलेले समिधा आणि प्रेरणाला घेतलेले pre wedding चे कपडे प्रतिकच्या रुममध्ये जाऊन प्रतिक आणि राहुलला दिले. 
प्रतिक: मीना, माझं अजून एक काम करशील का...?
मीना: हां सांगा ना सर...
प्रतिक: प्रेरणाला सांग मी तिला ऑफिसच्या एका important कामा मुळे बोलावलं आहे म्हणून...
मीना: ओके सर...असं म्हणत ती प्रतिकच्या रूममधून प्रेरणा आणि समिधाच्या कॉमन रूममध्ये गेली. मीना जाताक्षणी प्रतिकने राहुलला त्याला पुढे काय करायचं आहे ते सांगितलं.. तसा राहुल ही रूममधून बाहेर पडला. थोड्या वेळाने प्रतिकच्या रूममध्ये प्रेरणा आली.
प्रेरणा: प्रतिक सर, कुठे आहात... तुम्ही मीनाकडे निरोप दिला होता ना... ऑफिसच खूप important काम होतं म्हणून... ती प्रतिकला आवाज देऊ लागली. तोच प्रतिक मागून येऊन तिच्या डोळ्यावर हात ठेवत तिच्या कानाजवळ येऊन म्हणाला, हा काय मी तुझ्या जवळच आहे.. त्याच्या आवाजाने तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. ती काही बोलत नाही हे पाहून त्याने तिला स्वतःकडे वळवलं. त्याला स्वतःच्या इतक्या जवळ पाहून ती freeze झाली होती. तो अलगद तिच्या केसांवरुन हात फिरवत म्हणाला, प्रेरणा काही बोलणार नाहीस...की असंच मला बघत राहणार आहेस...? ती काही बोलण्याचा प्रयत्न करु पाहत होती पण घशातून आवाज निघेल तर शप्पथ...त्याने तिला डोळ्यांनी काहीतरी बोल म्हणून इशारा केला...तसं तिने कशीबशी शब्दांची जुळवाजुळव केली, सर ते मीनाने काहीतरी काम आहे म्हणून सांगितलं...? प्रतिक पुन्हा तिच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, काम तर आहे माझं तुझ्याकडे पण ऑफिसच नाही...तुला एक surprise द्यायचं आहे... असं म्हणत त्याने तिच्या हातात तिच्यासाठी pre wedding साठी केलेली shopping bag ठेवली.
प्रेरणा: सर यात काय आहे...?
प्रतिक: बघ बॅग उघडून...तो ती कशी रिऍक्ट होते आहे हे पाहण्यासाठी आतूर झाला होता. प्रेरणाने बॅग उघडली आत मध्ये वेगवेगळे ड्रेस, काही couple tshirts होते...तिने tshirt open केलं...एका tshirt वर मेसेज होता...wife is always right... मेसेज वाचून तिच्या चेहऱ्यावर खुदकन हसू आलं..
प्रतिक: आवडलं...?
प्रेरणा: हो सर, खूप खूप छान आहे... मला वाटलं नव्हतं मला असं काही तरी surprise gift द्याल ते...!!
प्रतिक: (तिला जवळ ओढुन घेतं) आधी ते सर सर म्हणणं बंद कर... सर मी ऑफिसमध्ये... इथे नाही...(तिच्या डोळ्यांत पाहत तो म्हणाला)
प्रेरणा: ओके सर...
प्रतिक: (त्याने तिच्यावरची पकड घट्ट केली) पुन्हा सर...say only Pratik...(तिच्या चेहऱ्याजवळ जात तो म्हणाला)
प्रेरणा: प्रतिक, प्लीज सोडा ना मला...(ती हळूच म्हणाली)
प्रतिक: (हसत तिच्या कपाळावर ओठ टेकवून) माझी इच्छा तर नाही आहे... पण सोडावं तर लागेलच ना मला तुला... त्याशिवाय थोडी ना आपलं pre wedding फोटोशूट होईल...? (त्याने तिच्या गालावरून हात फिरवला आणि तिच्या पासून दूर झाला...त्याच्या स्पर्शाने ती शहारली)
प्रेरणा: फोटोशूट...(प्रेरणाला ऐकून सुखद धक्काच बसला)
प्रतिक: हो फोटोशूट तुझं नि माझं... pre wedding photoshoot..आवडेल ना तुला...(तो पुन्हा तिच्या जवळ जात म्हणाला)
प्रेरणाच्या डोळ्यांतून नकळत पाणी आलं...
प्रतिक: (तिचे डोळे पुसत) ए वेडाबाई... आता रडायला काय झालं...?
प्रेरणा: प्रतिक, मी खूप लकी आहे जे तुम्ही माझ्या आयुष्यात आलात... नाहीतर माझ्या सारख्या मुलीला life partner म्हणून कोणीच कधी accept केलं नसतं...
प्रतिक: (तिला मिठीत घेत) पुन्हा असं काही बोलू नकोस प्रेरणा, तू आहेस म्हणून मी आहे... तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचाच विचार कधी केला नाही आणि नाही करु शकत... आणि लकी मी आहे जी तू माझ्या आयुष्यात आलीस...
दोघे कितीतरी वेळ असेच एकमेकांच्या मिठीत होते. तेवढ्यात प्रतिकच्या मेसेजची रिंगटोन वाजली. तसे ते दोघे एकमेकांच्या मिठीतून वेगळे झाले.
प्रतिक: (बॅग हातात देत) चला मिसेस राजाध्यक्ष तयारीला लागा...आणि आधी काय wear करणार ते सांग मला... नाहीतर आपलं भलतंच कॉम्बिनेशन होईल...तसे दोघेही हसू लागले.
प्रेरणा: हो सांगते...
प्रतिक: (तिचा हात हातात घेऊन) अशीच नेहमी हसत रहा... तुझ्या डोळ्यात पाणी मी बघू नाही शकत...सो या चेहऱ्यावर फक्त मला smile दिसायला हवी... तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला. चल आता लवकर तयार हो...
प्रेरणा: हो सर...(जीभ चावत) सॉरी प्रतिक...असं म्हणत निघता निघता पुन्हा मागे वळते.
प्रतिक: काय झालं...? 
प्रेरणा: प्रतिक, माझे आणि तुमचे आईबाबा आपल्या लग्नाला तयार होतील ना...?
तिचा प्रश्न ऐकून प्रतिकला हसू आलं पण आपलं हसू थांबवत तो म्हणाला, मी आहे ना...? मग कशाला काळजी करते...
तशी ती त्याच्या गालावर किस करुन लाजून रूममधून बाहेर पळाली. प्रतिक तिच्या अशा अनपेक्षित वागण्याने गालातल्या गालात हसला.
***

(प्रेरणा तिच्या आणि समिधाच्या रुममध्ये येण्यापूर्वीचा प्रसंग)
प्रेरणा रुममधून प्रतिकच्या रूममध्ये जाताक्षणी राहूलने समिधाच्या रूमचा डोअर knock केला. समिधाला वाटलं प्रेरणाचं असावी म्हणून तिने लगेच door ओपन केला.
समिधा: (राहुलला समोर पाहून) राहुल तुम्ही...?
राहुल: मी आत येऊ ना...?
समिधा: अं... हो ना या...!! (सोफ्यावर बसायला सांगत) काही बोलायचं होतं का...?
राहुल: हो... थोडं महत्वाचंच होतं... म्हणून आलो...
समिधा: everything is alright... घरी सगळे ठीक आहेत ना..?
राहुल: अग त्या संदर्भांत नाही ग बोलायचं आहे मला...माझ्या प्रश्नांची तू अगदी प्रमाणिकपणे उत्तरं देशील..?
समिधा: (वैतागून) राहुल, हे काय आता नवीन...सांगा ना काय ते..?
राहुल: (समिधाचा हात हातात घेऊन) तू आपल्या लग्नाने खूश आहेस ना...?
समिधा: हो राहुल... मी पसंत करते तुम्हाला अगदी मनापासून...
राहुल: सो सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्या झाल्या ना आतापर्यंत...? म्हणजे आपलं भेटणं, आपलं एकमेकांना वेळ देणं... आपली एंगेजमेंट...?
समिधा: हो..सगळं माझ्या मनासारखं झालं आहे..
राहुल: एक विचारु...
समिधा: हां विचारा ना...
राहुल: तुझी खूप इच्छा होती ना...pre wedding photoshoot करायची..?
समिधा: हां होती... पण आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असं नसतं ना...? आणि आधीच लग्न साखरपुडा यासाठी आपल्याला एकूण किती खर्च होईल याचा अंदाज ही नाही आहे...आणि मला मुळात कर्ज वगैरे काढून लग्न करणं हे बिलकुल पटत नाही..
राहुल: पण लग्न आयुष्यात एकदाच करतो ना...मग आपण आपल्या हौस मौज करायला हव्या ना...? राहुलच्या या प्रश्नावर समिधा कडे  काहीच उत्तर नसतं. ती सोफ्यावरुन उठून खिडकीकडे जाते. तसा राहुल ही तिच्याजवळ जाऊन तिचा चेहरा त्याच्या हातात घेऊन म्हणाला, समिधा तू म्हणतेस ना...मी तुझा जीन आहे म्हणून... तू मागशील ती गोष्ट मी तुला देतो...मग ही गोष्ट पण दिली तर...?
समिधा: राहुल, पुरे ना तो विषय...नको बोलूया आपण त्या विषयावर पुन्हा...
राहुल: समिधा...तुझ्यासाठी एक surprise आहे...पण हात पुढे करुन डोळे मिट बघू...
समिधा: हे काय आता...?
राहुल: सांगितलं ना...डोळे मिट..
तसं समिधाने राहुलने सांगितल्या प्रमाणे केलं. राहुलने लगेच शॉपिंग बॅग तिच्या हातात ठेवली.
राहुल: हां आता उघड डोळे...
समिधा: (डोळे उघडून बॅग बघत) यात काय आहे...?
राहुल: उघडून तर बघ
समिधा बॅगमधील सगळे ड्रेसेस tshirts काढते...
समिधा: हे सगळे कपडे कशाला...?
राहुल: (सोफ्यावर बसत) कशाला म्हणजे...अग आपलं आज pre weddding photoshoot आहे...
समिधा: (एकदम सुखद धक्का लागून जोरात ओरडते) काय...?
राहुल: (जोरात हसून) आई ग...किती मोठ्याने react झाली...तुला समिधा माईकची गरजच नाही...
समिधा: (सोफ्यावर राहुलच्या बाजूला बसून त्याचा चेहरा स्वतः कडे वळवत) खरं सांगा ना...तुम्ही माझी मस्करी करत आहात ना...?
राहुल: (तिला मिठीत घेऊन) तुझी इच्छा होती ना...मग ती पूर्ण नको व्हायला...हे ऐकून समिधाच्या डोळ्यांत पाणी येते.
समिधा: पण राहुल... खर्च खूप होईल ना...? 
राहुल: (तिचे डोळे पुसत) बिलकुल नाही...
समिधा: ते कसं काय...?
राहुल: ते पण एक surprise आहे...
समिधा: आणखी एक surprise...!!
राहुल: हो आणखी एक surprise...!! चल तू आता पटकन ready हो...
समिधा: तुमच्या समोर....??
राहुल: (हसत) माझी तरी काही हरकत नाही...!!
समिधा: (त्याला सोफ्यावरून उठवत) हो का...? आणि काय...? चला जावा तुम्ही पण ready व्हा...पण तुमच्या रूममध्ये... आणि मी इथे होईन...
राहुलने तिच्या कमरेला हात लावून तिला स्वतः जवळ ओढलं आणि तिच्या जवळ जाऊन म्हणाला, लवकर तयार हो...आणि तो one piece पहिल्यांदा घाल...मला जास्त वाट पाहायला लावू नकोस... असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर किस केलं. 
राहुल: चल बाय...लवकर तयार हो...मी वाट पाहेन तुझी... असं म्हणत तो तिच्या रूममधून बाहेर पडला.


क्रमशः

🎭 Series Post

View all