Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष भाग-४३

Read Later
अस्तित्व एक संघर्ष भाग-४३
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-४३


आली रे आली आता अलिबागला जायची वेळ जवळ आली...
I know माझ्यासकट तुम्ही सगळ्यांनी या भागाची वाट पाहिली असेल...तर finally आज जाणून घेऊया प्रतिक आणि प्रेरणा यांचं अलिबागला फोटोशूट होतंय की एक नवीन गोंधळ होतो आहे ते..

प्रतिकने त्याच्या विरार, नाशिक आणि पुणे टीमची ऑनलाइन मीटिंग अरेंज केली..आणि टीम मधल्या 3 जणांना 2 दिवसांसाठी त्यांचं डिपार्टमेंट हँडल करायची responsibility दिली. ठरल्या प्रमाणे त्या तिघांनी आदल्या दिवशी येऊन प्रतिकला रिपोर्ट केलं. काम सगळं सेमच असल्याने समिधा, मीना आणि प्रेरणाला त्या तिघांना फक्त drive access बद्दल सांगावं लागलं. अजून काही doubt असल्यास त्यांनी पिकनिक मध्ये असलो तरी कॉल करायला सांगितलं. तसं त्या तिघांनी ही हो म्हंटलं आणि सगळे पुन्हा कामाला लागले.

***

 

अलिबागला जाण्यासाठी प्रतिकने मिनी बस बुक केली होती. सगळ्यांच भेटायचं ठिकाण अर्थात दादर ठरवण्यात आलं होतं. सगळेजण ठरलेल्या ठिकाणी भेटले. प्रतिक सरांच्या बाजूला बसायला लागेल म्हणून आशिष आणि विवेक सगळ्यांच्या आधी एकाच सीटवर जाऊन बसले. मीना अर्थात तिच्या अभिच्या बाजूला जाऊन बसली. समिधा राहुलच्या बाजूला बसली. प्रतिक बसमध्ये चढला तर फक्त मागची एक सीट आणि पुढे असलेली एक सीट उरलेली असते. तो आता पुुुढे बसेेेल असं सगळयांना वाटतंच होतं तोच प्रतिक मागच्या सीटवर बसायला गेला. मागोमाग प्रेरणा ही बसमध्ये चढली आणि पुढच्या सीटवर बसली. प्रतिक मागे बसणार तेवढ्यात ड्रायव्हरच लक्ष प्रतिककडे गेला. तो त्याला म्हणाला, सर तुम्हाला सांगायचं विसरलो, तुम्ही तिथे मागे बसू नका... त्या सीट चा जरा प्रॉब्लेम आहे....( मग प्रेरणाच्या सीटकडे हात करुन म्हणाला) सर ही सीट खाली आहे... इथे बसू शकता तुम्ही...तसा प्रतिक पुढे प्रेरणाच्या सीटकडे येऊन म्हणाला, प्रेरणा तुझी हरकत नसेल तर मी इथे बसलो तर चालेल ना...?

सगळ्यांचे कान प्रेरणा काय बोलतेय याकडे टवकारले होते. आशिष आणि विवेकला तर वेगळंच टेंशन होतं... जर प्रेरणाने नाही म्हंटलं आणि आपल्याला सरांच्या बाजूला बसावं लागलं तर बॉसच्या बाजूला कसली मज्जा करणार आपण...तशी प्रेरणा म्हणाली, सर माझी कसली हरकत...बसा ना सर...तुम्हाला विंडो सीट नको ना पण...?? हे ऐकून प्रतिकला हसू आवरेना...तो हसत हसत म्हणाला, नाही नाही मला window seat नको...मी बसतो इथेच..असं म्हणत तो तिच्या बाजूला बसला. सगळे बसलेले पाहून ड्रायव्हर ने गणपती बाप्पा मोरया म्हणत बस सुरू केली. बसने हळूहळू वेग घेतला तसं सगळ्यांनी अंताक्षरी खेळायचं ठरवलं.. अर्थात सीट मेंबर प्रमाणे टीम पाडण्यात आल्या. विवेक-आशिष एक टीम, समिधा-राहुल एक टीम, मीना-अभि एक टीम आणि प्रतिक-प्रेरणा एक टीम. आशिष full on ready होऊन आल्याने त्याने गेमचे नियम त्यांना explain केले. डायरीवर त्याने टीमची नावे लिहिली. गेमच्या पहिल्या राऊंड मध्ये शेवटच्या अक्षरावरुन गाणं म्हणायचं होतं.. गाण्यासाठी भाषेचं बंधन ठेवलं नव्हतं...गाण्याची सुरुवात मीना पासून सुरु करण्यात आली. मीनाने अभिकडे पाहून गाणं गायला सुरवात केली, 

तेरे बिना जिया जाए ना...

तेरे बिना जिया जाए ना...

बिन तेरे तेरे बिन साजना

साँस में साँस आए ना

तेरे बिना...

गाणं चालू असताना प्रेरणा अधून मधून प्रतिकच्या नकळत त्याला पाहत होती...

मीनाचं गाणं झालं त्यानंतर समिधा आशिष यांचं गाणं झालं... मग प अक्षर आलं प्रेरणा आणि प्रतिक वर...तसं प्रतिकने गाणं गायला सुरुवात केली...

पहला पहला प्यार है, पहली पहली बार है

जानके भी अनजाना, कैसा मेरा यार है

 

पुढचे शब्द बोलताना तो प्रेरणाकडे पाहू लागला..

उसकी नजर, पलकों की चिलमन से मुझे देखती

उसकी हया, अपनी चाहत का राज खोलती

छुप के करे जो वफा, ऐसा मेरा यार है

 

त्याला असं स्वतःकडे पाहून गाताना प्रेरणाच्या मनाची चलबिचल होऊ लागली... तिने मग दुसरीकडे लक्ष वळवलं तसं प्रतिकला ही आपण बसमध्ये सगळ्यांबरोबर असल्याचं लक्षात आलं आणि त्याने ही त्याचं लक्ष दुसरीकडे वळवत गाणं पूर्ण केलं.. अंताक्षरीचे सगळे राउंड संपले तोपर्यंत ड्रायव्हर ही एका धाब्यावर पोहचला. तसं प्रतिकने सगळ्यांना चला काही खायचं असेल तर उतरा पटकन म्हणून आवाज दिला. सगळ्यांनी मनसोक्त नाश्ता केला आणि बस पुन्हा अलिबागच्या दिशेने निघाली. बसमध्ये आता सगळेजण आपापल्या विश्वात रमले होते. विवेक आणि आशिष अधून मधून सगळ्यांचे फोटोज काढत होते. प्रतिक आणि प्रेरणाला हवेने नकळत झोप लागली.. आणि झोपेत तिने तिचं डोकं प्रतिकच्या खांद्यावर ठेवलं...मीना आणि समिधाचं त्या दोघांकडे लक्ष गेलं तसं तिने आशिषला त्यांचा तसा एक फोटो काढायला लावलं...मग आशिषने ही हसत त्यांचा फोटो काढला...आणि दोघींना दाखवला.couple-in-bus

फोटो एकदम perfect आला होता. हवेने प्रेरणाचे केस काहीसे तिच्या डोळ्यांवर आले होते. झोपेत तिचा हात प्रतिकच्या हातावर होता...मीनाने त्या फोटोला app मध्ये बॉर्डर आणि tagline ऍड केली... क्षणभर विश्रांती.. आणि बाजूला couple emoji ऍड केले...मग आशिष कडे मोबाईल देत म्हणाली, now its perfect फोटो... मला आणि समिधाला दोन्ही pic सेंड कर नंतर... आणि सगळेजण आपापल्या जागेवर बसायला गेले. थोड्या वेळाने प्रतिकला जाग आली..प्रेरणाचं डोकं त्याच्या खांद्यावर पाहून तो नकळत हसला..तिच्या चेहऱ्यावर आलेले केस त्याने तिच्या चेहऱ्याला हात न लावता हळुवारपणे बाजूला केले. काही वेळाने तिला जाग आली. प्रतिक त्यावेळी मोबाईलवर गाणं ऐकत होता. ती जागी झालेली पाहून प्रतिकने कानातून हेडफोन काढले. प्रतिकच्या खांद्यावर डोकं ठेवून आपण झोपलो होतो हे पाहून ती त्याला सॉरी म्हणत बाजूला सरकली. त्याने काही हरकत नाही...झोपेत बसमध्ये होतं असं...so no need to say sorry...मी पण असा झोपायचो कधी कधी...असं म्हणत त्याने तिच्या मनात आलेलं guilt काढलं. तशी ती ही मनमोकळेपणाने हसत खिडकीतून बाहेर पाहू लागली. थोड्या वेळाने सगळेजण अलिबागला पोहचले आणि त्यांच्या बुक केलेल्या हॉटेलमध्ये उतरले. प्रतिकने reception counter वर जाऊन त्यांच्या room च्या keys collect केल्या. अभि आणि मीना च्या रूमची key त्याने त्यांना दिली. समिधा-प्रेरणा, राहुल-प्रतिक आणि विवेक-आशिष असे दोघे दोघे रूम शेअर करणार असल्याने प्रतिकने त्यांच्या keys समिधा आणि विवेकला दिल्या आणि तो आणि राहुल त्यांच्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेले. 

 

सगळे फ्रेश होऊन हॉटेलच्या लंच टेबलवर भेटले. प्रेरणाने पाहिलं, प्रतिक सोडून सगळे टेबलवर आले होते. त्याला न पाहून तिची नजर त्यालाच शोधत होती. तिने आजूबाजूला पाहिलं तर प्रतिक तिला एका couple शी बोलताना दिसला. ती त्याच्याकडेच पाहत असताना राजीव त्यांच्या टेबलकडे येऊन सगळ्यांना जोरात म्हणाला, Hello everyone...त्याला समोर पाहून सगळयांना आश्चर्याचा धक्का बसला...(अर्थात धक्का फक्त प्रेरणालाच बसला...बाकी सगळे प्लॅन केल्याप्रमाणे shocked होते.

 

आता तुम्हा सगळयांना प्रश्न पडला असेल कोणता प्लॅन... हा तोच अलिबाग प्लॅन नंबर 1 जो राजीव, समिधा, मीना आणि सोना दिदीने मिळून केला होता आणि नंतर समिधाने आशिष आणि विवेकला ही या प्लॅनची आयडिया देऊन ठेवली होती. )

अभि: राजीव, तू पण आला आहेस...? Wow that's great...!!

राजीव: फक्त मी नाही आम्ही आलो आहोत...त्याचं हे बोलणं ऐकून प्रेरणा अजून कोण म्हणून राजीवच्या मागून आलेल्या व्यक्तीकडे पाहू लागली आणि समोर तिला पाहून तिला खूप धक्का बसला... ती मनात म्हणाली, ही तीच आहे जी त्या दिवशी प्रतिक सरांना भेटायला आली होती... तिला समोर पाहून प्रेरणाचा चेहरा उतरला. तिचा उतरलेला चेहरा राजीव, समिधा आणि मीनाच्या लक्षात आला... राजीव तिला असं पाहून मनात म्हणाला, चला आपला प्लॅन बरोबर वर्क होतो आहे. तसे ते दोघेही प्रेरणा ज्या टेबलवर बसली होती त्याच टेबलवर बसले आणि प्लॅन प्रमाणे त्यांचे संवाद सुरू झाले.

ती: राजीव, तुला काय वाटतं, मला इथे पाहून प्रतिक खुश होईल ना...?

राजीव: (प्रेरणाची reaction पाहत) अग का नाही होणार...? मी उलट म्हणतो, आजचा चांगला चान्स आहे... असा चान्स परत मिळणार नाही... तू आजच त्याला तुझ्या मनात काय आहे ते सांगून टाक... आणि तुझ्यासारखी चांगली मुलगी त्याला शोधूनही सापडणार नाही...हो ना ग प्रेरणा...?

त्याने मुद्दामून प्रेरणाला असा प्रश्न केला. प्रेरणाने फक्त हं म्हटलं... लगेच राजीव म्हणाला, तो बघ प्रतिक तिथे बोलत उभा आहे त्या couple बरोबर... तर तो बोलून इकडे येईलच मग त्याला तू तुझ्या मनातलं आज आता ताबडतोब सांग. पुढे त्यांचं बोलणं प्रेरणा ऐकण्यासाठी थांबलीच नाही...ती तडक तिच्या रूममध्ये निघून गेली. तिला रडत जाताना पाहून प्रतिक त्याच बोलणं थांबवत लगेच तिच्या मागे गेला. प्रेरणा अशी निघून गेल्याचं पाहून राजीव आणि फोटोमधल्या तिने प्लॅन successful झाला म्हणून हात मिळवला.

***

 

प्रेरणा रडतच तिच्या रूममध्ये आली...तिच्या मागोमाग प्रतिक ही आला. प्रेरणाने दरवाजा लॉक केला नसल्याने त्याने तो दरवाजा उघडला. समोर प्रेरणा त्याला रडताना दिसली...तिच्याजवळ जाऊन प्रतिक तिच्या बाजूला बसून म्हणाला, प्रेरणा काय झालं....? तू का रडते आहेस...?

प्रेरणा रडतच वर पाहत थरथरत म्हणाली, सर तुम्ही इथे असायला नको...? तुमची कोणीतरी आतुरतेने वाट पाहत आहे...तुम्हाला तिथे असायला हवं इथे नाही...

प्रतिक तिचा चेहरा वर करत म्हणाला, मला याक्षणी तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काही वाटत नाही आहे...त्याने तिचे डोळे पुसण्यासाठी हात चेहऱ्याकडे नेले तशी ती त्याच्या पासून दूर होत म्हणाली, सर प्लीज, तुम्ही माझ्या जवळ येऊ नका... खूप कठीण होईल मला तुमच्यापासून वेगळं व्हायला... सर ती खरंच तुमच्यासाठी योग्य आहे मी नाही... प्रेरणाचे शब्द त्याच्या डोक्यात फिरु लागले... ही नक्की कोणाबद्दल बोलते आहे....?

प्रेरणा रडायचं काही केल्या थांबत नव्हती... ती प्रतिकपासून आज आपण कायमचे दुरावणार यामुळे सैरभैर झाली होती. प्रतिकला तिची अशी अवस्था पाहवेना.. तो तिच्या जवळ गेला आणि तिचे हात स्वतःच्या हातात घेऊन त्याने तिला बेडवरुन उठवत उभं केलं.. सर...मला सोडा... मी नाही अजून काही सहन करु शकत... ती रडत रडतच प्रतिककडे पाहून बोलली.
प्रतिक: (तिच्या डोळ्यांत पाहत) प्रेरणा, खरंच तुला इथे एकटं सोडून जाऊ मी...
प्रतिकचं बोलणं ऐकून प्रेरणाचा स्वतः वरचा कंट्रोल सुटला नि ती रडतच प्रतिकच्या मिठीत जात म्हणाली, सर मला नाही होता येत आहे तुमच्या पासून दूर... खूप प्रयत्न केला मी...स्वतःला तुमच्यापासून दूर ठेवायला... आणि आज जेव्हा ती वेळ जवळ आली आहे तुमच्यापासून वेगळं व्हायची तेव्हा मला खरंच खूप भीती वाटते आहे... सर मी नाही जगू शकत तुमच्या शिवाय...
तिचं बोलणं ऐकून प्रतिक त्याचा हात तिच्या डोक्यावरून फिरवत तिला शांत करु लागला...कितीतरी वेळ ती त्याच्या मिठीत होती.
काही वेळाने ती जेव्हा शांत झाली तेव्हा आपण काय बोलून बसलो हे तिच्या लक्षात आलं. ती स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवत म्हणाली, सर ते मी काहीतरी वेड्यासारखं बडबडले..तुम्ही लक्ष नका देऊ त्याकडे... सॉरी माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला... मी ठीक आहे आता... तुमची कोणीतरी वाट पाहत आहे सर... त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे... आणि त्या तुम्हाला खूप सुखात ठेवतील. ती असं म्हणत त्याच्या पासून दूर झाली... प्रतिकला तिच्या अशा बोलण्याचा राग आला... त्याने तिला रागातच स्वतः जवळ ओढलं आणि तिला भिंतीला टेकवत म्हणाला, तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे तर....जे तू मला असं म्हणते आहेस ते...?
तिची प्रतिककडे पाहायची हिंमत होईना...तो तिची मान वर करत म्हणाला, look into my eyes...Miss Prerna..and tell me... you don't love me...?
ती काहीही बोलेना हे पाहून प्रतिकला अजून राग आला त्याने रागात जोरात भिंतीवर हात मारून घेतला.. प्रेरणाने लगेच त्याचा हात हातात घेतला... आणि त्याच्या हातावर चोळत ती म्हणाली, सर काय करताय तुम्ही असं...? प्रतिक त्याचा हात तिच्या हातातून खेचून घेत म्हणाला, तुला काहीच वाटत नाही ना माझ्याबद्दल... मग कशाला माझी काळजी करतेस... मी जगलो काय आणि मेलो काय तुला काय फरक पडतोय...? त्याचं हे बोलणं ऐकून तिने तिचा हात लगेच त्याच्या ओठांवर ठेवला आणि म्हणाली, सर प्लीज पुन्हा असं कधी बोलू नका... मी नाही जगू शकत तुमच्या शिवाय...असं म्हणत ती त्याला बिलगली. तसं प्रतिक ही तिला शांत करत म्हणाला, नाही बोलणार मी परत असं कधी...पण मला आता सांगशील का, तू मघासपासून का अशी रडते आहेस आणि कोणत्या मुलीबद्दल बोलते आहेस ते...? प्रेरणा पुढे काही बोलणार इतक्यात इतका वेळ बाहेर थांबून ऐकत असलेले राजीव, समिधा आणि सगळेचजण आत आले. त्यांना समोर पाहून प्रतिक म्हणाला, तुम्ही सगळे इथे...?
राजीव: ते मी प्रेरणा कोणा बद्दल म्हणते आहे त्या बद्दल सांगायला आलो...!!
प्रतिक: म्हणजे तुला माहीत आहे... प्रेरणा कोणत्या मुलीबद्दल बोलते आहे ते...
राजीवने प्रेरणा म्हणत असलेल्या मुलीला पुढे बोलावलं आणि प्रतिकला म्हणाला, प्रेरणा हिच्या बद्दल म्हणते आहे...
प्रतिक: ही तर रेखा आहे...तुझी होणारी बायको...
हे ऐकून प्रेरणा सगळ्यांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. तिला नक्की काय झालं ते काही कळेना. तिला असं पाहून राजीव प्रतिकला म्हणाला, wait प्रतिक मी सगळं explain करतो तुला...असं म्हणत त्याने सगळ्यांना घेऊन कसा प्लॅन केला ते त्याला सांगितलं. त्याचं सगळं ऐकून प्रेरणा आणि प्रतिक दोघांना ही आश्चर्याचा धक्का बसला. 
प्रतिक: (थोडं रागात) अरे पण हे सगळं का केलंस तू...?
राजीव: वाह रे मेरे यार...आज जो तुम दोनो एक हो गये हो वो इसी प्लॅन के वजह से...आणि आम्हाला सगळ्यांना thank you बोलायचं सोडून तू माझ्यावरच भडकतो आहेस...त्याच बोलणं ऐकून प्रेरणाने लाजून मान खाली नेली. तिला असं लाजताना पाहून राजीवच बोलणं प्रतिकला ही पटलं आणि त्याने राजीवला मिठी मारली.
राजीव: मग प्रतिक, आज दिन भी अच्छा है....मौका भी है...तो लगा दे ना चौका... हम तुम्हारे साथ है...
राजीवला नक्की काय म्हणायचं आहे ते प्रतिकच्या लक्षात आलं. प्रेरणा प्रतिककडे आणि राजीवकडे काहीही न कळल्याच्या आविर्भावात पाहू लागली. त्याने प्रेरणा समोर खाली वाकून तिचा हात हातात घेतला आणि सगळ्यांच्या समोर म्हणाला,
 
"In the presence of our friends,
I want to ask you Miss Prerna...
Would you like to convert your name from 
Miss Prerna to Mrs Pratik...?
I want to hold your hand
in every phase of our life...
I want you to be mine forever...
will you be mine...?"


त्याच बोलणं ऐकून तिने मानेनेच होकार दिला... तसं प्रतिकने त्याच्या खिशातून एक गुलाबाचं artifical फूल काढलं...आणि ते ओपन करुन तिच्या समोर धरलं... त्या फुलामध्ये रिंग पाहून प्रेरणाने चकित होऊन तोंडावर हात ठेवला..तसं प्रतिकने पुन्हा तिचा हात तिला पुढे करायला सांगून सगळ्यांच्या समोर त्याने तिला ती रिंग घातली..त्यावर सगळ्यांनी जोरजोरात टाळ्या वाजवून दोघांना ही congratulate केलं.


राजीव: चला आता, बराच वेळ घेतला तुम्ही दोघांनी आमचा... खूप भूक लागली राव...
प्रतिक: (चिडवण्याच्या मूड मध्ये) इथे माझी भूक पळवून तुला भूक लागली म्हणे...
राजीव: (प्रतिकला hug करत) Everything is fair in love and war मेरे यार...और देख तो प्रेरणा को...अभी खुद के दिल की बात सुनने के बाद वो कितनी खुश है... (प्रेरणाकडे पाहून) सॉरी प्रेरणा... I know तुला थोडा त्रास झाला माझ्या प्लॅनमुळे पण काय करु जिथे मला तू ही प्रतिकवर प्रेम करते आहे हे दिसत होतं तिथे मी कसा माझ्या मित्राला देवदास बनू दिलं असतं...तशी प्रेरणा प्रतिककडे पाहून हसली. प्रतिकने तिला जवळ घेऊन कपाळावर किस केलं. राजीव मागोमाग समिधा रेखा आणि मीनाने ही दोघांना सॉरी म्हटलं... मग काय प्रेरणा सगळ्यांना म्हणाली, प्लीज यार... सॉरी नका म्हणू कोणीही.. तुम्ही सगळ्यांनी मला काय वाटतं हेच मला जाणवून देण्यासाठी केलं ना...!! आणि मी म्हणेन मी खूप lucky आहे की मला तुमच्या सारखे friends मिळाले आणि सर life partner म्हणून मिळाले.
प्रतिक: प्रेरणा... मला तुझी कोणाबरोबर तरी ओळख करून द्यायची आहे..ही व्यक्ती माझ्या आयुष्यात नेहमीच खास होती आणि आहे. असं म्हणत प्रतिकने दोघांना प्रेरणा समोर यायला सांगितलं. प्रेरणा ही आश्चऱ्याने त्या दोघांना पाहू लागली.
प्रेरणा: सर, तुम्ही यांच्याशीच मघाशी बोलत होतात ना...?
प्रतिक: हो...ही माझी सोना दीदी आणि जीजू आहेत...
सोना: (प्रेरणाला hug करत) तुला भेटायला किती excited झाले होते मी... finally भेटलो आपण...प्रतिक आवडली हां मला तुझी चॉईस...आणि मला पण आवडली बरं तुझी चॉईस... प्रतिकचे जीजू त्याला hug करत म्हणाले.
राजीव: (रेखाला घेऊन त्या दोघांच्या समोर येऊन म्हणाला) दिदी आणि माझ्या चॉईस बद्दल काही बोलणार नाही का...?
सोना: राजीव...पुन्हा सुरु झाला तू...तसे रेखा सकट सगळे जोरजोरात हसू लागले.
राजीव: चला यार...तुमचं सगळयांचं हसून पोट भरलं असेल तर तसं सांगा रे... मी एकटा तरी जाऊन जेवतो...
सोना: (राजीवच्या पाठीवर बुक्की देत) चल भुक्कड... जाऊया आपण सगळे जेवायला...
तसे सगळेच रुमममधून लंच टेबलवर जायला निघाले.

 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...