Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-४२

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-४२
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-४२


दुसऱ्या दिवशी मीनाने ऑफिसमध्ये समिधा बरोबर गप्पा मारताना काहीतरी विषय काढून राहुलचा नंबर मागून घेतला. सगळेजण पिकनिक साठी अलिबागला जाणार म्हणून काम ही खूप जोशात करत होते. आशिषने तिथे जाऊन काय काय खेळू शकतो याची लिस्टचं बनवून त्यांच्या ऑफिस ग्रुप मध्ये शेअर केली. त्याची excitement पाहून प्रतिकने ही सगळ्यांना तुम्ही पण तयारीला लागा म्हणून रिप्लाय दिला. पण तयारी नक्की कसली हे फक्त मीनालाच माहीत होतं. तिने ऑफिस मध्ये काम करता करताच साईड बाय साईड pre wedding मध्ये काय काय वेगळं करता येईल हे search केलं. तिला आवडणाऱ्या ideas तिने राजीव आणि अर्थात तिच्या अभिला शेअर केल्या. दोघांनी पण त्यातून त्यांना ज्या गोष्टी आवडल्या त्या तिला सेंड करुन फायनल केल्या. आता फक्त तिच्याकडून एकच काम राहिलं होतं ते म्हणजे शॉपिंगचं... तिने वेगवेगळ्या साईट्स वर जाऊन couple tshirts बघितले...आणि ऑफिसचं काम करता करता excel मध्ये तिने तिला काय काय खरेदी करायचं आहे त्याची लिस्ट बनवली. ऑफिस सुटलं की कधी एकदा शॉपिंगला जाते आहे असं तिचं झालं होतं... ती शॉपिंगसाठी इतकी excited होत होती की जणू तिचं नुकतंच लग्न ठरलं असावं.

***

राजीवने मीनाने राहुलचा नंबर शेअर केल्याबरोबर त्याच्याशी contact करुन त्याला समिधाला द्यायच्या pre wedding surprise ची idea देऊन ठेवली आणि त्याबद्दल तिला काही कळता कामा नये अशी ही खबरदारी घ्यायला सांगितली. संध्याकाळी अभि आणि मीना भेटले. दोघांनी खूप वेगवेगळ्या गोष्टी खरेदी केल्या. Couple tshirts चे ही वेगवेगळे pattern घेतले. राजीवही रेखा बरोबर त्यांच्या pre wedding ची शॉपिंग करत होता. त्याने फोटोशूट करण्यासाठी काही वेगळे पोस्टर आणि काही पोस्टर सामान बनवण्यासाठी सामान ही विकत घेतले. दोन्ही couple ने shopping करता करता त्यांचा एकमेकांबरोबर डिनर ही enjoy केला. मीना अभि तर या निमित्ताने त्यांचं लग्नाआधीच आयुष्य पुन्हा नव्याने अनुभवत होते. राहुल ही समिधाला surprise द्यायचं म्हणून excited होता. समिधा, प्रेरणा या सगळ्यापासून अनभिज्ञ होत्या. त्यांच्यासाठी अलिबागला फक्त आपण पिकनिकला जातो आहोत असा गोड समज झाला होता. सोनाने तर तिला अलिबागच जसं प्रतिक कडून कळलं तसं तिने ती पण त्याच्या जीजूला घेऊन येणार म्हणून हुकूमच सोडला...मग प्रतिकने ही जोपर्यंत तो तिची ओळख प्रेरणाबरोबर करून देणार नाही तोपर्यंत तिने ही काही तिला कळू द्यायचं नाही म्हणून प्रॉमिस मागून घेतलं. प्रतिकला कल्पना ही नव्हती असं काहीतरी सोना आणि राजीवच्या डोक्यात चाललं होतं.

मधल्या काही दिवसात जो तो आपापल्यासाठी पिकनिकला जे जे काही हवं आहे ते शॉपिंग करत होता...प्रेरणा तर प्रतिक बरोबर टीम सोबत का होईना पण काही क्षण ऑफिस व्यतिरिक्त घालवता येणार म्हणून खुश होती. या कालावधीत तिने मीनाला तिच्या मनात प्रतिक बद्दल चाललेले विचार ही सांगितले...मीना तिला प्रतिक सरांना तुझ्या मनात काय चाललं आहे ते सांग म्हणून सतत मागे लागली होती...पण प्रेरणाच्या बाबतीत घडलेल्या घटनेमुळे तिचं मन प्रतिकशी बोलायला धजत नव्हत....आणि नाही तिला प्रतिकबद्दलच्या तिच्या भावना बदलता येत होत्या.

आदि आणि अनूच्या मुलीचं आज बारसं होतं...प्रतिकला चार दिवस आधीच आग्रहाने मालगुडे काकूंनी आमंत्रण दिलं होतं...कारण आज त्यांच्यामध्ये जो काही चांगला बदल झाला होता ते सर्वस्वी प्रतिकमुळे झालं होतं. त्यानेही मग त्यांचा आग्रह न मोडता संध्याकाळी येण्याचं कबूल केलं. प्रेरणा बाळाची आत्या म्हणून नाव ठेवणार असल्यामुळे तिला आदि आणि अनूने सुट्टीच घ्यायला लावली होती. सकाळपासून ती आई बाबांसोबत मालगुुडे कुटुंबाला कामात मदत करत होती. आदि जेे जे सामान लागेल ते घेऊन येत होता. संध्याकाळी ५.०० झाले तसे सगळेजण हॉलमध्ये जायला रवाना झाले. 

हॉल मध्ये हळूहळू पाहुणे येऊ लागले. अनू आणि आदिचे आई बाबा सगळ्यांची अधून मधून विचारपूस करत होते. ६.०० वाजले तसं बारशाच्या कार्यक्रमाला सुरवात झाली. रिवाजाप्रमाणे अनूची ओटी भरण्यात आली. बायकांनी मग कोणी गोविंद घ्या... कोणी गोपाळ घ्या... म्हणत बाळाला पाळण्यात ठेवलं...तसं प्रेरणाने हळूच बाळाच्या कानात नाव सांगितलं..ओवी... नाव ऐकून बाळ तिच्याकडे पाहून हसलं... जणू बाळाला नाव आवडलं असावं...तसं प्रेरणाच्या मागे असणाऱ्या सगळया बायकांनी नाव मोठ्याने सांगायला सांगितलं. तिनेही मग बाळाचं नाव ओवी ठेवलं असं सगळ्यांना सांगितलं. लगेच अनूच्या भावाने नावावरचा पडदा बाजूला केला....ज्यांनी नाव ऐकलं आणि ज्यांनी नाव नाही ऐकलं अशा सगळ्यांनी ओवी हे नाव पाहून टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवणाऱ्या त्या गर्दीत प्रतिकही होता.. तू दुरुन प्रेरणाला न्याहाळत होता. मोती रंगाच्या साडीत प्रेरणा खूप सुंदर दिसत होती... त्याची नजर तिच्यावरून हटत ही नव्हती. प्रतिकला अनोळखी लोकांमध्ये एकटं वाटता कामा नये म्हणून विवेकही त्याच्या बरोबरच होता. सगळ्यांना प्लेट्स आणि कोल्डड्रिंक वाटायला आले तेव्हा प्रतिकने विवेकला आपण आदि आणि त्याच्या घरातील सदस्यांना जाऊन भेटूया का म्हणून विचारलं... जेणेकरून त्याला त्यांचा निरोप घेऊन लगेच घरी निघता आलं असतं. त्यावर विवेक त्याला आदिकडे घेऊन गेला. आदि त्याच्याशी बोलत असतानाच मालगुडे काकी काका प्रतिकच्या जवळ आले.

मा. काका: तुम्ही आलात हे पाहून आम्हा दोघांना खूप छान वाटलं..

काकी: तुम्ही आमच्या ओवीला पाहिलं का..? या मी तुम्हाला दाखवते असं म्हणत त्या प्रतिकला ओवीकडे घेऊन गेल्या. त्यांनी ओवीला पाळण्यातून उचलून त्याच्या हातात दिलं... तो तिला सांभाळून घेत तिच्याशी बोलू लागला... तशी ओवी ही तिच्या इवल्या हातांची हालचाल करत हसू लागली. त्याला असं बोलताना पाहून मालगुडे काकूंच्या मनात काय आलं काय माहित... त्या अचानक त्याला म्हणाल्या, आमच्या प्रेरणाला ही तुमच्या सारखाच समजूतदार जोडीदार मिळायला हवा... त्यांचं हे बोलणं ऐकून प्रतिक त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागला. त्याच्या डोळ्यातले भाव जणू काकूंना कळले... त्यांनी विवेकला काहीतरी काम देऊन दुसरीकडे पाठवलं...आणि प्रेरणाला त्यांच्याकडे बोलावलं म्हणून त्याला तिला सांगायला सांगितलं.

प्रेरणा: (आधी प्रतिकला मग नंतर काकूंना पाहून) काकू तुम्ही मला बोलावलं..? काही काम होतं..?

काकूंनी तोपर्यंत ओवीला प्रतिकच्या हातातून घेतलं होतं.

काकू: अग तुझे सर आले आहेत... विवेकला मी कामासाठी दुसरीकडे पाठवलं... यांच्या बरोबर बस जरा... एकटेच कंटाळतील ते...आणि हां त्यांना जेवल्याशिवाय पाठवायचं नाही आहे...हवं तर तू ही त्यांच्या बरोबर जेवून घे...काकूंच असं बोलणं ऐकून प्रेरणाला काय बोलावं ते कळेना... पण ती ठामपणे नकार ही देऊ शकत नव्हती. ती मानेनेच हो म्हणत प्रतिकला स्टेजवरुन खाली बसण्याच्या ठिकाणी घेऊन गेली...त्यांच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत मालगुडे काकू मनात म्हणाल्या, दोघांचा जोडा अगदी लक्ष्मी नारायणाचा वाटतो... मग ओवीला पाळण्यात ठेवून पाळणा हलवत हळूच तिच्याजवळ जात म्हणाल्या, ओवी बाळा... तुझ्या प्रेरणा आतूचं प्रतिक मामाबरोबर लग्न करुन द्यायचं का आपण... तसं ओवीने ही हसत मोठ्याने आवाज काढत हुंकार दिला....जणू तिला ही तिच्या आजीचं म्हणणं पटलं असावं...

प्रेरणा आणि प्रतिक जरी एकमेकांच्या बाजूला बसले होते तरी बोलावं तर काय बोलावं हेच दोघांना ही समजत नव्हतं. शेवटी प्रतिकने शांततेचा भंग केला.

प्रतिक: बारशाची खूप छान अरेजमेंट केली आहे...

प्रेरणा: हो...ही सगळी आदि दादाची आयडिया होती.

प्रतिक: ओके...तू नाव मस्त ठेवलं... ओवी... ऐकायला खूप गोड वाटतं...(तिच्याकडे पाहत मनात म्हणाला, अगदी तुझ्यासारखंच गोड)

प्रेरणा: thank you sir... पुन्हा दोघेही थोडा वेळ इकडे तिकडे पाहू लागले.

प्रतिक: (पुन्हा तिच्याकडे पाहत) अलिबागच्या पिकनिकची shopping झाली तुझी...

प्रेरणा: तसं तर फार काही घेतलं नाही आहे मी...(विषय बदलत) सर, आपण जेवायला जाऊया का...तुम्हाला घरी जायला उशीर होईल नाहीतर...

प्रतिक: (तिच्या डोळ्यांत पाहत बोलला) तू पण माझ्या बरोबर जेवायला येणार आहेस ना...

प्रेरणा त्याच्या डोळ्यात स्वतःला हरवून गेली...त्याच्याकडेच पाहत तिने नकळत मान हलवून हो म्हटलं..

प्रतिक: चल मग तर...

तसं प्रतिक बरोबर ती ही जेवणाची जिथे अरेजमेंट होती तिथे गेली. जेवणाची सोय बुफे पद्धतीने केली असल्याने प्रेरणाने प्रतिकला जेवण घेण्यासाठी थाळी दिली आणि तिने स्वतःला ही घेतली...प्रतिकला काय घेणार म्हणून विचारत ती रांगेत पुढे जाणार... तेवढ्यात तिचा अचानक साडीमध्ये पाय अडकून तोल गेला...आणि ती पडणार तेवढ्यात प्रतिकने त्याची थाळी टेबलवर ठेवत तिला एका हाताने पकडलं...घाबरुन तिने डोळे मिटून घेतले होते...हवेने तिचे केस उडत होते. तो तिच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहत होता...तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला करण्याचा मोह त्याला होऊ लागला. तोच तिने डोळे उघडले... प्रतिकने आपल्याला पकडलं आहे हे पाहून तिने स्वतःला सावरलं.. तसं प्रतिक ही तिला comfortable वाटण्यासाठी तिच्याकडे लक्ष न देता बाजूला ठेवलेली त्याची थाळी हातात पकडत म्हणाला, चल जाऊया ना...जेवण घ्यायला...?

प्रेरणाने मानेनेच हो म्हटलं आणि दोघांनी त्यांच्या थाळीत जेवण घेतलं. प्रेरणा कुठे खुर्ची खाली दिसते का पाहू लागली.. तोच तिला एका दिशेला 3 खुर्च्या खाली दिसल्या. तिने प्रतिकला तिकडे हात दाखवत खुणेनेच बसायला जाऊया म्हणून सांगितलं. तसे दोघेही तिकडे जाऊन बसले. जेवता जेवता दोघांच्या एकमेकांशी मनसोक्त इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या.. दोघेही बोलण्यात इतके गुंग झाले होते की बाजूलाच विवेक येऊन बसला आहे हे त्यांच्या लक्षात ही आलं नाही... जेवण झालं तरी दोघे जागेवरुन उठत नाही आहेत हे पाहून शेवटी त्याने प्रेरणाला हात लावला.

प्रेरणा: अरे तू कधी आलास..?

विवेक: तुझ्या बाजूलाच तर बसलो होतो... तू गप्पांमध्ये इतकी बिझी होतीस की तुला कळलंच नाही...तसं प्रेरणाचं आणि प्रतिकचं ही त्यांच्या खाली झालेल्या थाळी कडे लक्ष गेलं...प्रतिक सारवासारव करत म्हणाला, अरे चल मला घरी जायला उशीर होतो आहे.. त्याला असं बोलताना पाहून विवेक त्याचं हसू कसंबसं लपवत म्हणाला, मी आलोच हां जरा..आणि तो तिथून निघून गेला. तो गेलेला पाहून दोघेही एकमेकांना पाहून हसत उठले.

प्रतिक: (प्रेरणाकडे पाहत) खरंच तुझ्याशी बोलताना मला लक्षातच आलं नाही..

प्रेरणाही मनात म्हणाली, माझं ही तेच झालं सर...

प्रतिक: चल मी निघतो आता...घरी सगळे वाट पाहत असतील.

प्रेरणा: सर निघताना काका- काकूंना आणि आदि दादाला भेटून जावा...

प्रतिक: हो हो त्यांना भेटूनच जाणार आहे...

तसं प्रतिकने प्रेरणा बरोबर जाऊन सगळ्यांचा निरोप घेतला.. आणि जेव्हा त्या दोघांची एकमेकांना बाय बोलायची वेळ आली तेव्हा त्या दोघांना ही काय बोलावं हे सुचेना...तेवढ्यात पुन्हा विवेक तिथे हजर झाला.

विवेक: सर तुम्ही निघालात...?

प्रतिक: (प्रेरणाकडून विवेकला पाहत) अरे हो, हे काय निघतच होतो...तूच कुठे दिसतोय का हे आम्ही दोघे बघत होतो...हो ना प्रेरणा...?

प्रेरणा: (सारवासारव करत) हो ना...!!

विवेक: (त्याच्या लक्षात सगळं आलं आणि मनोमन हसत) सर मी तुम्हाला येतो कारपर्यंत सोडायला...!!

प्रतिक: हं चालेल... ओके प्रेरणा बाय...

प्रेरणा: बाय सर..

तसा प्रतिक विवेक बरोबर हॉलमधून निघाला.

***

रात्री झोपण्यासाठी डोळे बंद केले आणि प्रेरणाच्या डोळ्यासमोर प्रतिक बरोबर घालवलेला आजचा कार्यक्रमातील वेळ भरभर समोर येऊ लागला... त्याचा मनात विचार येऊन तिने मोबाईल मधला त्याचा फोटो बघितला....त्याला पाहून तिच्या गालावर खुदकन हसू आलं... आणि जणू तो फोटोतून तिलाच पाहत असल्या सारखं तिने लाजून तिचा चेहरा उशीत लपवून घेतला.

 

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...