Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-४१

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-४१
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-४१


संध्याकाळी घरी प्रतिकला असं बँडेज लावून आलेलं पाहून घरातले सगळे घाबरले.

आजी: (घाबरुन त्याच्या जवळ जात) प्रतिक, काय झालं...?

प्रतिक: अग आजी उगाच काळजी नको करुस... इतकं काही झालं नाही आहे...

आई: असं कसं म्हणतोस, हाताला पायाला बँडेज बघून काळजी वाटणार नाही तर काय होणार..?

बाबा: तुम्ही त्याला शांत बसू तरी देणार आहात की नाही... प्रतिक तू शांतपणे बस थोडा वेळ...आणि मग रिलॅक्स झालास की सांग...तसा प्रतिक सोफ्यावर बसतो. आई त्याला प्यायला पाणी आणून देते.

प्रतिक: (सोना कुठे दिसत नाही हे पाहून) आई दीदी कुठे आहे..? दिसत नाही आहे कुठे ती...!!

आई: अरे सासरच्या घरी गेली ती तिच्या...पुढच्या रविवारी येते म्हणाली.

प्रतिक: बरं मी फ्रेश होऊन येतो..

बाबा: जमेल ना तुला...की धरू मी तुला...

प्रतिक: बाबा नॉर्मल खरचटलं आहे..fracture नाही आहे जे तुम्ही सगळे असं रिऍक्ट करत आहात ते.. आणि दीदीला यातलं काही सांगू नका..असं म्हणत तो फ्रेश व्हायला निघून जातो. तो येईपर्यंत आजी आणि आईबाबा त्याचीच वाट बघत थांबतात.

प्रतिक: (फ्रेश होऊन लिविंग रूममध्ये येत) तुम्ही अजूनही सगळेजण टेन्शन मध्ये का आहात... इतकं काही नाही झालं आहे... असं म्हणत तो रस्त्यावर झालेला सगळा प्रकार सांगतो. तेव्हा सगळ्यांच्या जीवात जीव येतो. रात्री झोपताना सहज म्हणून तो whatsapp चेक करतो तर त्यात प्रेरणाचा मेसेज आलेला असतो...सर, आता तब्येत कशी आहे... मेडिसिन आठवणीने घ्या.. रात्री जेवून झाल्यावर एकच घ्यायची आहे...आणि दुपारी दोन... तुम्हाला उद्या आराम करायचं असेल तर डोन्ट वरी सर आम्ही सगळं इथे नीट हँडल करु... तिचा मेसेज वाचून तो तिचं last seen बघतो before 1 hour म्हणजे आता झोपली असावी. मग हसून तिच्या मेसेजचा रिप्लाय देतो...हो आता तब्येत ठीक आहे....मेडिसिन ही घेतल्या....and thank you for staying with me in hospital... आणि मोबाईल बाजूला ठेवून बेडवर पडतो....झोपावं म्हणावं तर झोप येत कुठे होती त्याला...त्याच्या डोळ्यासमोर सकाळी

रस्त्यावर पडल्यानंतरच तिचं वागण...हॉस्पिटलमध्ये तिचं हातात हात घेऊन त्याच्या बाजूला बसून राहणं...सगळं एकामागोमाग एक येत होतं...प्रेरणाची अवस्था पण फार काही वेगळी नव्हती...प्रतिक सरांनी रिप्लाय दिल्यावर जर ऑनलाइन असतील तर काय बोलू आपण त्यांच्याशी...म्हणून तिने नेट बंद केला होता पण मोबाईल वर ती त्याचेच फोटोज पाहत होती...फोटोतला प्रतिक तिच्याचकडे पाहून हसतोय की काय असा तिला भास होत होता...हॉस्पिटलमध्ये तिचं बैचेन झालेलं मन...प्रतिकची काळजी...सगळं काही आठवू लागलं होतं. आज तिचं मन तिचं काही ऐकायलाच तयार नव्हतं...नकळत तिच्या ओठांवर शब्द आले...मिसेस प्रतिक राजाध्यक्ष... तिला तिच्याच शब्दांनी गुदगुल्या झाल्या...तिला मुंबई पुणे मुंबई मूवी मधलं गाणं आठवू लागलं....

 

का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे...

उमलती कशा धुंद भावना, अल्लद वाटे कसे...

 

आज माझी अवस्था या गाण्यासारखीच झाली आहे, तिने मनात विचार केला आणि गाण्याचे शब्द आठवत लाजून पुन्हा प्रतिकच्या फोटोकडे पाहिलं...आणि तसंच लाजत तिने बेडवर पडत डोळे मिटून घेतले. 

***

 

दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये सकाळीच खूप कस्टमर आले होते. तिघीही इतक्या बिझी होत्या की त्यांना प्रतिक आल्याचं ही लक्षात आलं नाही. प्रतिक ही  उगाच त्यांना कामात व्यत्यय नको म्हणून सरळ केबिन मध्ये गुड मॉर्निंग न बोलता निघून गेला... आणि आदल्या दिवसाच्या पेंडिंग कामाला लागला. लंच ब्रेक मध्ये त्याला राजीवचा कॉल आला.

प्रतिक: हां राजीव बोल ना...

राजीव: अरे मी याकरता कॉल केला होता की तू सांगितलं का तुझ्या टीमला आपलं जे ठरलं आहे ते..?

प्रतिक: नाही रे काल सांगणार होतो पण राहून गेलं..

राजीव: राहून गेलं म्हणजे...अरे फक्त तुला सांगायचं होतं...अरेंजमेंट उद्याच नव्हती करायची...

प्रतिक: अरे मी कालच सांगणार होतो पण ते हॉस्पिटलमध्ये होतो सो तिथून डायरेक्ट घरी गेलो...मग सांगायचं राहून गेलं...

राजीव: हॉस्पिटलमध्ये..? कशासाठी..?

तसं प्रतिकने त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला..

राजीव: आता दुखत नाही ना तुला पण ...

प्रतिक: नाही रे थोडं खरचटून रक्त आलं...ते पण भरेल काही दिवसात...

राजीव: बरं... पण एक सांगू या निमित्ताने प्रेरणाच्या मनात काय आहे हे तुझ्या लक्षात आलं...

प्रतिक: (खुश होत) हो...खरं बोललास एकदम...बस तू बोलतोस त्याप्रमाणे तिला माझं प्रेम जाणवलं पाहिजे बस...

राजीव: हो 100% प्लॅन आपला वर्क होणार डोन्ट वरी...पण आजच सांग...सगळ्यांना...

प्रतिक: हो हो, नक्की सांगतो आणि तुला कळवतो...चल ठेवतो मी कॉल आता...जेवून घेतो...

राजीव: ओके बाय बाय... बोलू संध्याकाळी... असं म्हणत दोघांनी कॉल ठेवला.

 

संध्याकाळी चार वाजता प्रतिकने टीम मधल्या सगळ्यांना केबिनमध्ये बोलावलं. आज work load मुळे कोणालाच त्याच्या बरोबर बोलता न आल्यामुळे प्रेरणा सकट सगळया जणांनी त्याच्या तब्येतीची चौकशी केली.

प्रतिक: मी ठीक आहे आता...मी तुम्हा सगळ्यांना इथे एक गोष्ट सांगायला बोलावलं आहे...

आशिष: कोणती सर...?

प्रतिक: आपल्या टीमच टार्गेट over achieved झाल्यामुळे यावेळी आपण सगळे अलिबागला 2 days पिकनिकला जाणार आहोत...

विवेक: wow सर... मी अजून कधी गेलो नाही तिथे...(मनात काहीतरी नकळत त्याच्या विचार येतो आणि तो पुढे काही बोलतच नाही)

प्रतिक: मग यावेळी नक्की यायचं आहे... and one more thing...

मीना: कोणती सर...

प्रतिक: मीना यावेळी तू तुझ्या मि बरोबर ही येऊ शकते पिकनिकला... आणि हा खर्च कंपनी करणार आहे.

मीना: क्या बात है सर...काश समिधाचं साखरपुडा नाही तर डायरेक्ट लग्न झालं असतं तर ती पण राहुल बरोबर आली असती ना...!! 

प्रतिक: हां you are right...मी काय म्हणतो कंपनी त्याचा खर्च नाही देणार मान्य... but त्याला आपण बोलवू शकत नाही असं थोडीच आहे.

समिधा: म्हणजे सर...?

प्रतिक: म्हणजे समिधा, तू त्याला सुट्टी घ्यायला सांग..

आणि आपण सगळी टीम एकत्र असणार आहोत म्हणजे तुमच्या दोघांच्या घरुन पण तुम्हाला allow करतील...लग्ना आधी picnic ला जायला...!!

हे ऐकून मीना समिधाला कोपर मारते... आणि कानात म्हणते, मज्जा आहे एका मुलीची...लग्नाआधी पिकनिकला जायचा चान्स मिळतोय मॅडमना...तशी ती लाजते. त्या दोघींचं बोलणं चालू असताना प्रतिक प्रेरणाला पाहतो...ती त्याच्याच कडे पाहत होती. आज तिची नजर त्याला वेगळीच जाणवत होती..जणू ती नजर त्याच्याकडे पाहत त्याच्या हृदयाचा ठाव घेत होती...तशी त्याने त्याची नजर दुसरीकडे वळवली आणि सगळयांना म्हणाला, सो आपण नेक्स्ट saturday and sunday ला जात आहोत. So now start planning for our team picnic....म्हणजे तिथे जाऊन काय गेम खेळायचे वगैरे सगळं ठरवा... आपलं बुकिंग झालं की मी तुम्हाला कळवतो...ok now go back to your work... तसे सगळेजण एकदम खुश होत केबिनमधून बाहेर पडले.

 

घरी आल्यावर समिधाने राहुलला picnic बद्दल कळवलं. त्याला शनिवार रविवार ऑफिसमधून सुट्टीच असल्यामुळे अनायसे त्याचा होकारच होता... फक्त त्याने घरी एकदा बोलून घेतो असं तिला सांगितलं...तिला ही त्याचं म्हणणं पटलं..तिनेही तिच्या आईबाबांना सांगते म्हणून त्याला सांगितलं. टीम मधल्या सगळ्यांनी आपापल्या घरी अलिबागच्या पिकनिक बद्दल कळवलं...मीनाला नवरा पण येणार हे ऐकून आकाश ठेंगणच झालं होतं...बरेच दिवस झाले कुठे जाणं झालंच नव्हतं आणि आज ऑफीस पिकनिक मुळे तिला तो चान्स मिळाला होता.

 

प्रतिकने रात्री राजीवला कॉल करुन टीमला त्याने पिकनिकचं सांगितलं असल्याचं कळवलं....ते ऐकून राजीव खुश झाला आणि त्याने प्रतिकला पुढचं मी प्लॅन करतो असं सांगत कॉल ठेवला. प्रतिकने ही त्याच्या घरी नेक्स्ट saturday and sunday अलिबागला जात असल्याचं सांगितलं आणि तो असाच बाल्कनी मध्ये गेला. मोबाईलमधला प्रेरणाचा फोटो पाहत असताना त्याच्या मनात विचार आला... टार्गेट over achieve झालं हे पण किती योग्य वेळेत झालं...नाहीतर समिधा आणि राहुलच्या pre wedding फोटोशूट साठी काय केलं असतं आपण...आणि राजीव सांगतो त्याप्रमाणे प्रेरणाला कसं मी तिला माझ्याबद्दल काय वाटतं हे कसं जाणवून देऊ शकलो असतो...आजी म्हणते ते खरंच आहे...देव आपल्याला नेहमी मार्ग दाखवत असतो फक्त तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. तो त्याच्या विचारात हरवला असताना आजी कधी त्याच्या हातात असलेला मोबाईल मधला प्रेरणाचा फोटो बघून गेली हे त्याला कळलं ही नाही.

***

 

राजीवने प्रतिकचा कॉल झाल्यावर राहुलचा नंबर मीनाला समिधाच्या नकळत तिच्या मोबाईल मधून घे असा मेसेज केला आणि त्याचा आणि प्रतिकचा झालेला समिधा आणि राहुलचा pre wedding फोटोशूट चा प्लॅन तिला सांगितला...त्याने समिधा ती आणि प्रेरणासाठी काही फोटोशूटसाठी आवडलं तर shopping करुन घे आणि झालेलं बिल मला सांग म्हणून सांगितलं..

मीना: सर पण माझ्यासाठी कशाला शॉपिंग म्हणजे माझं तर लग्न झालं आहे...

राजीव: ओह म्हणजे सगळे मस्त फोटोशूट करताना तू आणि अभि एका कोपऱ्यात बसणार आहात का..??

राजीवचा मेसेज वाचून मीनाने जीभ चावली... खरं तर तिची पण खूप इच्छा होतीच फोटोशूट करायची... पण बोलणार कसं होती ती... तिचा काही रिप्लाय नाही आलेला पाहून राजीवने तिला डायरेक्ट कॉल केला. तिला कॉल लाऊडस्पीकर वर ठेवायला सांगून तिच्याशी आणि अभिशी तो फोटोशूटबद्दल बोलला.

राजीव: प्रतिक आणि माझ्याकडून हा समिधासाठी surprise प्लॅन आहे... आणि अजून एक प्लॅन मी प्रतिक आणि प्रेरणासाठी ठरवला आहे.

मीना: (डोक्याला हात लावत) सर अजून एक प्लॅन...

राजीव: (हसत) हा शेवटचा प्लॅन असेल माझा...यानंतर पुन्हा प्लॅन करायची गरज पडणार नाही... असं म्हणत त्याने मीनाला आणि अभिला त्याचा प्रतिकला माहीत नसलेला प्लॅन सांगितला.

अभि: राजीव तू तर वकील नाही love गुरु आहेस... तुस्सी तो छा गये गुरु... हा प्लॅन 100% successful होईल.

राजीव: (पुन्हा हसत) यासाठी मला तुमची पण साथ लागणार आहे... by the way photographer कोण आहे हे विचारलंच नाही तुम्ही दोघांनी...

मीना: कोण आहे सर...?

राजीव: मी आणि तुमचे सर प्रतिक...!!

मीना: (चकित होत) तुम्ही दोघे...?

राजीव: हो आम्ही दोघे...तुमच्या बॉसला आणि मला कॉलेजच्या वेळेपासून फोटोग्राफीचा शॉक होता.. या निमित्ताने तुम्हाला सुद्धा आमची फोटोग्राफी कळेल...

अभि: भारी प्लॅन केला आहेस राजीव तू....मानलं पाहिजे तुला...

राजीव त्यावर हसतो आणि त्या दोघांना गुड नाईट म्हणत कॉल ठेवतो.

 

राजीवचा कॉल ठेवून झाल्यावर अभि मीनाच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला, काय मग मिसेस ...उद्या पासून आपल्या post wedding photoshoot ची शॉपिंग करायला सुरुवात करायची ना...!! तशी मीना ही त्याला लाजून hug करत म्हणाली, हो husband...

 

 

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...