अस्तित्व एक संघर्ष-भाग-४०

It is a story of a girl who faced such a situation where she totally destroyed and at one point she fight for her identity.

अस्तित्व एक संघर्ष

भाग- ४०


सोनाला समोर असं अचानक बघून प्रतिकच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद असे दोन्ही भाव दिसत होते.

सोना: काही बोलणार आहेस की नाही... मी एवढं सगळं surprise plan केलं so कुछ तो reaction दे भाई...

प्रतिक: (तिच्या गालावर ओठ टेकवत) दीदी...मी शब्दांत सांगू शकत नाही तुला असं अचानक समोर बघून मी किती खुश झालो आहे ते...

सोना: (बेडवर बसत) बस हां बस...माहिती आहे दीदीला किती miss करतोस ते...किती महिने झाले आपण बोलून आठव जरा...

प्रतिक: ते दीदी खूप काम असतं ऑफिसमध्ये... सो वेळ मिळत नाही...

सोना: Dont give me excuses... तुझं खोटं मला चांगलच पकडता येतं हे विसरू नकोस...anyways show me the pic of your love..

प्रतिक: who...

सोना: ओह अशा कितीजणी आहेत... जे who म्हणून विचारतोय... त्याच मुलीचा फोटो दाखव जिला मघाशी तू बघत बसला होतास... wait आठवते थांब मी तिचं नाव...(नाव आठवण्याचा प्रयत्न करत)

प्रतिक: (नकळत बोलतो) प्रेरणा...

सोना: येस हेच नाव...oh my god someone is blushing...(प्रतिकचे गाल ओढत) आता तर मला तिला पहायचंच आहे... चल लवकर दाखव...

तसं प्रतिकने तिला प्रेरणाचे फोटोज दाखवले.

सोना: वाह खूप गोड दिसते प्रेरणा, ओह सॉरी होणारी वहिनी... भले तुझ्यापेक्षा one year का होईना पण मी मोठी आहे ना... सो मी प्रेरणाच म्हणेन... and one more thing नणंद म्हणून कधीतरी मी तिची थट्टा मस्करी ही करेन तेव्हा तू आमच्या मध्ये पडायचं नाहीस... first and last warning...

प्रतिक: (डोक्यावर हात लावून) अग पण ती मला हो नाही म्हणाली आहे जे तू आता पासून इतका सगळा विचार करते आहेस ते...but तुला तिचं नाव कसं माहिती...(प्रतिक विचार करत म्हणाला)

सोना:  प्रतिक आपले बाबा काय म्हणतात आठवत नाही का तुला, मी सेम आजी वर गेली आहे...आणि मला तिच्या सारखंच समोरच्या कडून बरोबर गोष्टी काढून घेता येतात...ते जाऊदे आजीला माहीत आहे का... तुझ्या आणि प्रेरणा बद्दल..? ( प्रतिक काय बोलतोय याकडे तिचे कान टवकारले होते)

प्रतिक: नाही आजीला अजून काही सांगितलं नाही आहे...प्रेरणा हो कुठे म्हणाली अजून जे मी आजीला सांगू इतक्यात...(बोलताना प्रतिकचा मूड थोडा ऑफ होता)

सोना: तिने नाही म्हंटलं तर मग तू दुसऱ्या कोणत्या मुलीशी लग्न करणार आहेस का..? नाही ना...

प्रतिक: नाही करणार मी दुसऱ्या कोणत्या मुली बरोबर...मी एकवेळ असाच राहीन आयुष्यभर...

सोना: आणि तिने कोणा दुसऱ्या मुलाबरोबर केलं तर...

प्रतिक: तसं ती नाही करणार...

सोना: असं का वाटतं तुला...?

प्रतिक: तिच्या नजरेत मला माझ्याबद्दल जाणवत काही तरी सतत...

सोना: अरे मॅड, मग तू काही तुझ्या end ने प्रयत्न नको का करायला...? 

प्रतिक: हा मी प्रयत्न तर करतो आहे...राजीव जसा सांगतो आहे तसाच वागतो आहे.. पण ती मला आज सकाळ पासून खूप इग्नोर करत होती...(पुन्हा प्रतिक मूड ऑफ करत बोलला)

सोना: just a second, राजीव सांगतो तसा म्हणजे... ओह प्लॅन कुछ तो चल रहा है तुम दोन्हो का...? लाव त्या राजीवला कॉल...मला बोलायचं आहे त्याच्याशी...

प्रतिकच्या लक्षात आलं आपण बोलता बोलता काय बोलून गेलो ते...मनात विचार करु लागला खरंच दीदीला बरोबर माहिती काढून घेता येते बोलता बोलता समोरच्या कडून..हिला डॉक्टर नाही पोलीस असायला हवं होतं. हिच्या सारखाच मी असतो तर...प्रेरणाच्या मनात काय चाललं आहे ते मला पण बरोबर कळलं असतं. 

सोना: (प्रतिक काही कॉल लावत नाही आहे हे पाहून) ए हिरो... कॉल लावणार आहेस की नाही राजीवला...

प्रतिक: (भानावर येऊन विषय बदलण्याच्या हेतूने) दीदी जिजू कुठे आहेत...?

सोना: ते आमच्या घरी गेले आहेत...म्हणजे सासू सासऱ्यांना आणि त्यांच्या भावाच्या फॅमिलीला भेटायला... मला तुला surprise द्यायचं होतं म्हणून मी इथे आले...पण अभी आकर देखा तो मेरा भाई फुल्ल ऑन मजनू बन गया है... ते जाऊदे तू आधी राजीवला कॉल कर...की मी करू...?

आता दीदी समोर काही चालणार नाही हे लक्षात येऊन प्रतिकने राजीवला कॉल केला. प्रतिकचा कॉल बघून राजीवने लगेचच कॉल उचलला.

राजीव: हां बोल प्रतिक...

प्रतिक: अरे दीदी आली आहे सो तिला तुझ्याशी बोलायचं आहे..थांब देतो तिला...असं म्हणत प्रतिकने तिला मोबाईल दिला.

सोना: hey Rajiv, how are you buddy...

राजीव: I am fine...di... what about you... I am happy after hearing your voice. are you free tomorrow....we can meet...?

सोना: I am also fine...oh thank you buddy... चलो कोई तो है जो मेरी आवाज सुनकर खुश हुआ...नहीं तो कुछ लोग यहा मजनू बनके बैठे है...(प्रतिकला कळतं की दीदी आपल्याला टोमणा मारते आहे ते) yes we can meet tomorrow... at our regular cafe...

राजीव: yes दीदी... मला कोणा बरोबर तरी तुझी ओळख पण करुन द्यायची आहे...

सोना: ओह रिअली...मी पण खुप excited आहे... तिला भेटायला...

राजीव: वाह तू एकदम शार्प आहेस... तुला कसं कळलं की मी एका मुली बरोबरच तुझी ओळख करून देणार आहे ते...?

सोना: (हसत म्हणते) I know रे...चल बाय and inform me timing for tomorrow...

राजीव: शुअर दी... बाय गुड नाईट असं म्हणत तो कॉल ठेवतो.

सोनाने राजीवचा कॉल ठेवल्यावर मोबाईल प्रतिकच्या हातात दिला आणि हसत हसत त्याच्या रूम मधून बाहेर पडली.

दुसऱ्या दिवशी सोना, तिचे मिस्टर, राजीव आणि रेखा सगळे त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी भेटले. राजीवने रेखाची ओळख दोघांबरोबर करुन दिली...रेखाला भेटून सोना खूप खुश झाली. बराच वेळ त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. मध्येच सोनाने प्रतिकचा विषय काढला आणि राजीवला त्याचा आणि प्रतिकचा काय प्लॅन चालला आहे ते विचारलं. राजीवला पण सोनाचा स्वभाव माहीत असल्याने आणि प्रतिक नक्कीच बोलून गेला असणार हे लक्षात आल्याने राजीवने त्याचा प्रतिकला माहीत नसलेला ही प्लॅन सोनाला सांगून टाकला.

सोना: राजीव मानलं बाबा तुला... तू तर माझ्या दोन पावलं पुढे निघाला..

राजीव: (हसत हसत) प्रतिकसाठी काय पण दीदी..

सोना: correct...(राजीव च्या हातावर टाळी देत) आजपासून आम्ही दोघं पण तुझ्या प्रतिकला माहीत नसलेल्या प्लॅन मध्ये सामील...

***

प्रतिक ऑफिस मध्ये पोहचला. पण आदल्या दिवसा प्रमाणे आज ही प्रेरणा डेस्कवर नव्हती. प्रतिक तसाच केबिन मध्ये निघून गेला आणि थोडं रागातच त्याने कामाला सुरुवात केली. आज त्याची एका client बरोबर खूप important meeting ही होती. त्याच्या बरोबर त्याचे सर ही येणार होते. त्याने presentation एकदा चेक केलं. थोड्या वेळाने सरांनी त्याला कॉल करुन direct meeting ला भेटू म्हणून सांगितलं. त्याने पुन्हा एकदा सगळं चेक केलं आणि तो meeting ला जाण्यासाठी केबिनमधून बाहेर पडला. प्रेरणा आता डेस्कवर काम करत होती. तिच्या अशा इग्नोर करण्याने तो हर्ट ही झाला होता आणि त्याला दीदी जे त्याला बोलली होती त्यामुळे राग ही खूप येत होता. तो तिच्या डेस्ककडे गेला. त्याने तिला दुसऱ्या एका client च presentation ready करुन ठेवायला सांगितलं.

प्रतिक: त्या client च्या ऑफिसमध्ये तुला presentation द्यायचं आहे. सो मी ही first meeting complete करुन होईपर्यंत तू हे presentation ready ठेव. मी कॉल करेन तेव्हा तुझा लॅपटॉप घेऊन ऑफिसच्या खाली ये... मग second meeting ला जाऊ.

प्रेरणा: सर मी presentation ready करते पण meeting ला तुम्ही समिधा किंवा मग मीनाला घेऊन जावा...कारण माझं आपल्या santacruz च्या client च बरंच काम बाकी आहे.

प्रतिकला तिचं न येण्यासाठी चाललेला खेळ लक्षात आला... त्याने स्वतःवर control ठेवला आणि म्हणाला, मिस प्रेरणा dont give me excuses...santacruz च्या client च काम समिधा किंवा मीना ही करु शकते...आणि presentation कोणी द्यावं हे मी ठरवणार आहे तुम्ही नाही... so be ready... असं म्हणत तो त्याची लॅपटॉप बॅग घेऊन फर्स्ट मीटिंगला थोडं रागातच ऑफिसमधून निघाला. समिधा आणि मीनाला ही कळेना प्रतिक असा कसा रिऍक्ट झाला ते...दोघी तिला म्हणाल्या तू presentation करायला घे आम्ही बघतो santacruz च्या client च काम...प्रेरणा नकळत बोलून गेली, ते काम कधीच झालं आहे... तिच्या जसं आपण काय बोललो आहे हे लक्षात आलं तसं तिने डोकं presentation मध्ये घुसवलं. समिधा आणि मीना दोघींना कळतं होतं कुछ तो बहुत चल रहा है इन दोनो के दिमाग में... समिधाने मीनाला याबाबत राजीवला सांगायचं का म्हणून मेसेज केला... तिने हो म्हणताक्षणी समिधाने राजीवला त्यांच्या ग्रुप मध्ये या दोघांचं जे बोलणं झालं ते मेसेज करुन सांगितलं.  राजीवने दोघींना फक्त शांत राहून जे चाललं आहे इतकंच पहा असं सांगितलं...तुम्हाला पण कळेल लवकरच त्या दोघांच्या मनात काय चाललं आहे ते...त्याने ग्रुप मध्ये सोना दीदी आणि जीजू ना पण ऍड केलं आणि त्या दोघींना त्यांच्याबद्दल सांगून ठेवलं.

एक दोन तासानंतर प्रतिक त्याची मीटिंग पूर्ण करुन ऑफिसच्या खाली आला आणि त्याने प्रेरणाला मीटिंग साठी बोलावलं. प्रेरणा तिची laptop bag घेऊन खाली उतरली. कारमध्ये कोणीही कोणाशी बोलत नव्हतं. दोघेही client च्या ऑफिस मध्ये पोहचले. प्रेरणाने खूप मेहनतीने बनवलेलं presentation client ला खूप आवडलं आणि client ने त्यांच्या कंपनी बरोबर deal पक्की केली. Client चे documents घेऊन दोघेही त्यांच्या ऑफिसमधून निघाले. दोघेही कारमधून निघाले खरे पण प्रतिकचं मन प्रेरणाच्या वागण्याने खूप डिस्टर्ब झालं होतं. त्याने कार थोडा वेळ साईडला पार्क केली..आणि तसाच बाहेर विचार करत थांबला. त्याच काहीतरी बिनसलं आहे हे प्रेरणाच्या लक्षात आलं पण तिने मनाशीच प्रतिकशी कामा पुरतच बोलायचं असं ठरवलं होतं त्यामुळे ती कारमध्येच बसून राहिली. प्रतिकला सरांचा मीटिंग कशी झाली हे विचारण्यासाठी कॉल आला. प्रतिकने त्यांचा कॉल उचलून मीटिंग बद्दल सगळी information दिली आणि कॉल ठेवला. तो कारमध्ये बसणार तोच त्याला एक छोटी 7 8 वर्षाची मुलगी आजूबाजूला न बघता क्रॉस करताना दिसली त्याने समोर पाहिलं तर एक कार तिच्याच दिशेने येत होती. तो धावत तिच्याजवळ गेला आणि त्याने तिला उचलून बाजूला jump केली. ती कार भरधाव वेगात असल्याने ती मुलगी ही खूप घाबरुन गेली होती. ती मुलगी सुखरुप होती पण प्रतिकला बऱ्यापैकी हातापायाला खरचटून थोडं रक्त येऊ लागलं. सगळी लोकं हळूहळू गोळा झाली. प्रतिक कुठे दिसेना म्हणून प्रेरणा लगेच कार मधून खाली उतरली. आजूबाजूला गोळा झालेली माणसं पाहून आणि त्याला असं लागलेलं पाहून तिला धक्का लागून क्षणभर काय करावं कळेना. तिने प्रतिकला उठवायचा प्रयत्न केला.. पण तिच्या सकाळच्या वागण्यामुळे प्रतिक हर्ट झाल्यामुळे त्याने तिची मदत नाकारली. त्याला इतर दोन माणसांनी मदत करुन उठवलं. त्यांनी प्रतिकला कार मध्ये मागच्या seat वर बसवलं. प्रेरणा ही त्याच्याच बरोबर त्या छोट्या मुलीला बरोबर घेऊन बसली. प्रतिक डोळे मिटून बसून होता. तर प्रेरणा त्याच्याकडेच पाहत होती..आज प्रतिकला असं पाहून ती आतून खूप हादरली होती. आपण सरांशी आज ऑफिस मध्ये खूप चुकीचं वागलो याचा तिला खूप राग येत होता आणि प्रतिकची काळजी ही वाटत होती. तिने हळूच त्याचा हात स्वतःच्या हातात घेतला. तिच्या डोळ्यांतलं पाणी त्याच्या हातांवर पडलं.... तसं त्याने तिला न बघतच स्वतःचा हात तिच्या हातातून सोडवून घेतला आणि पुन्हा स्वतःचे डोळे मिटून राहिला. तिने स्वतःचे डोळे पुसले...आणि त्या छोट्या मुलीशी कारच्या काचेतून काहींना काही दाखवत बोलण्याचा प्रयत्न करु लागली. त्या माणसांतील एका माणसाने प्रतिकची कार सुरु करून दोघांना हॉस्पिटलमध्ये सोडलं. प्रेरणाने त्यांचे आभार मानले तसं ते काही मदत हवी असेल तर contact करा म्हणत स्वतःचा नंबर देऊन आणि कारची चावी देऊन तिचा निरोप घेऊन निघाले. प्रेरणाने ऑफिसमध्ये समिधाला कॉल करून सगळं सांगितलं. समिधाने ही तिला सरांबरोबर तिथेच थांबायला सांगितलं. प्रेरणाने मनात विचार केला, तसं ही मी प्रतिक सरांना असं एकटं नाही सोडू शकत....आज नाही आणि यापुढे कधीही नाही...तिच्या मनात आलेल्या विचारांनी ती पूर्ण गांगरून गेली होती. डॉक्टरांनी प्रतिकला चेक केलं. थोडसच खरचटल्यामुळे आणि fracture नसल्याने काही टेेेन्शन घ्यायची गरज नसल्याचं प्रेेरणाला सांगितलं. त्यांनी हातापायाला लागलेल्या ठिकाणी बँडेज केलं. डॉक्टरांनी त्या छोट्या मुलीला ही काही लागलं नाही ना हे सिस्टर कडून चेक करून घेतलं...ती मुलगी खूप घाबरलेली होती तिला ती सेफ असल्याचा विश्वास देऊन प्रेरणा, डॉक्टर आणि सिस्टरने तिच्या मनातली भिती काढून टाकली. तसं त्या मुलीने कसं तिची आणि तिच्या आईची चुकामुक झाली आणि प्रतिकने तिला कसं कारपासून वाचवलं ते सगळं सांगितलं. डॉक्टरांनी तिला चॉकलेट देत पोलिस काका तुझ्या आईला नक्की शोधून काढतील असा विश्वास तिला दिला. ती खुश होऊन चॉकलेट खायला लागली. तिला आता हसताना पाहून प्रेरणा बाजूूला असलेल्या प्रतिकच्या बेडकडे गेली. डॉक्टरांनी त्याचा bp थोडा low झाल्यामुळे त्याला थोडा वेळ तसंच झोपून रहायला सांगितलं होतं. ती त्याच्याच बाजूला बसून होती. प्रतिकला असं पाहून ती पुन्हा नकळत रडू लागली...तिला आज पुरतं कळून चुकलं होतं की तिच्यासाठी प्रतिक फक्त बॉस नव्हता...तिला आता त्याला गमवायची भिती वाटत होती.. तिने तिचे डोळे पुसले आणि पुन्हा त्याचा हात हातात घेतला... मनातल्या मनात ती प्रतिकला आज अचानक पाहून तिची अवस्था काय झाली हे सांगत होती...त्याला अचानक जाग आली.. ती मनात काय बोलली हे बहुतेक प्रतिकला ही कळलं असावं. ती डोळे मिटून त्याचा हात तिच्या हातात घेऊन शांत बसून होती. तिला असं पाहून प्रतिकचा मघासचा राग निघून गेला.. तो मनात म्हणाला, हा हात पुन्हा कधी सोडून जाऊ नकोस प्रेरणा...आणि पुन्हा तो डोळे मिटून झोपून राहिला.

थोड्या वेळाने पोलिस आणि एक लेडी हॉस्पिटलमध्ये आले. डॉक्टरांनी त्यांना प्रतिक आणि ती लहान मुलगी असलेल्या वॉर्डमध्ये नेलं. समोर त्या लेडीला पाहून ती मुलगी मम्मा मम्मा म्हणत तिच्याकडे धावत गेली. डॉक्टर आणि पोलिस सगळ्यांची ती मुलगी त्यांचीच असल्याची खात्री झाली...डॉक्टरांनी नुकतंच जाग्या झालेल्या प्रतिकची त्यांच्या बरोबर ओळख करून दिली. प्रतिककडे बघून ती छोटी मुलगी आपल्या मम्माला म्हणाली, मम्मा हे अंकल होते म्हणून मी वाचले... यांनी सुपरमॅन सारखी jump केली... नाहीतर मी आज तुला भेटले नसते...तिला असं बोलताना पाहून तिची आई तिला गालावर किस करत म्हणाली, बेटा असं बोलायचं नसतं...आणि पुन्हा मम्मा चा हात सोडून कुठे जायचं नाही. पोलिसांनी प्रतिकला कारबद्दल माहिती विचारली. प्रतिकने कारचा नंबर बघितला नसल्याचं सांगितलं. प्रतिक बरोबर हात मिळवून पोलिस त्या लेडीला म्हणाले, तुम्हाला काही प्रोसेस complete करायला आता स्टेशनला यावं लागेल. 

पोलिस:  (प्रतिक बरोबर पुन्हा हात मिळवून) ओके मि राजाध्यक्ष... टेक केअर...

लेडी: (प्रतिकला) thank you बोलणं पण कमी आहे... तुम्हाला कल्पना नाही पण ही अचानक गायब झाली तेव्हा मी किती सैरभैर झाले होते... तुम्ही माझ्या मुलीला वाचवून खूप उपकार केले आहेत माझ्यावर....तिला असं रडताना पाहून प्रेरणाने तिच्या खांद्यावर हात ठेवून थोपटलं आणि शांत केलं. प्रतिकने ही तिला आता तुम्ही स्वतःला सावरा नाहीतर छोटी पुन्हा मम्मा का रडते आहे म्हणून घाबरेल असं सांगितलं.

प्रतिक: (छोट्या मुलीकडे बघत) मम्माला पुन्हा त्रास द्यायचा नाही.. तुझ्या सुपरमॅन अंकल ला बाय बाय नाही बोलणार का...? तशी ती मम्माचा हात सोडून प्रतिकला बिलगली...त्याच्या हाताला पाहत म्हणाली, माझ्यामुळे लागलं ना अंकल तुला...? I am sorry....हे डॉक्टर खूप चांगले आहेत ते तुला लवकर ठीक करतील...तू इंजेक्शन घेताना रडू नकोस हां पण...असं म्हणत तिने प्रतिकला गालावर पापा दिला.. चल सुपरमॅन अंकल मी आता येते...तसा प्रतिक ही तिला असं बोलताना पाहून हसला आणि त्याने सुद्धा तिला बाय म्हटलं. त्या दोघांचं बोलणं चालू असताना त्या छोट्या मुलीची आई प्रेरणाला म्हणाली, thank you मिसेस राजाध्यक्ष तुम्हा दोघांमुळे मला माझी मुलगी मिळाली आहे... मिसेस राजाध्यक्ष असं म्हटल्यावर प्रेरणाच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल आली... तिच्याकडून नंबर घेत त्या लेडीने तिचं नाव ही मिसेस राजाध्यक्ष म्हणून सेव्ह केलं... प्रेरणाला मी मिसेस राजाध्यक्ष नाही हे जरी सांगायचं होतं तरी तिला त्यांनी मिसेस राजाध्यक्ष असं म्हटल्यामुळे खूप छान वाटलं होतं...तिचं तिला ही कळत नव्हतं की असं का वाटतं आहे. तिने प्रतिककडे पाहिलं तो त्या छोट्या मुलीशीच काही ना काही बोलत होता. तिने त्याला बाय म्हटलं आणि ती प्रेरणाकडे येऊन म्हणाली, आंटी प्लिज टेक केअर माय सुपरमॅन अंकल. प्रेरणाने तिला मानेनेच हो म्हटलं. तसं दोघीही मायलेकी त्या दोघाना बाय म्हणून पोलिस ऑफिसर बरोबर बाकीची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी हॉस्पिटल मधून निघाल्या.

क्रमशः

🎭 Series Post

View all