अस्तित्व एक संघर्ष-भाग-३९

It is a story of a girl who faced such a situation where she totally destroyed.... and at one point she fights for her identity.

अस्तित्व एक संघर्ष

भाग-३९


घरी आल्यापासून प्रेरणा सतत ऑफिस मध्ये जे झालं त्याचाच विचार करत होती. जेवताना ही तिचं कोण काय बोलत आहे त्याकडे लक्ष नव्हतं. एकदा दोनदा विवेकने तिला हात लावून विचारलं तेव्हा तिने काही नाही थोडं डोकं दुखत आहे असं कारण पुढे केलं. आईने तिचं डोकं दुखत आहे म्हणून जेवून तिला सरळ झोपायला जा म्हणून सांगितलं. विवेकला मात्र का कोण जाणे यामागे काहीतरी वेगळं कारण असावं असं सतत वाटत होतं... तो हळूच रूमच्या दिशेने गेला...रूमचा दरवाजा उघडाच होता..प्रेरणा पाठमोरी असल्याने तिला विवेक आल्याचं लक्षात नाही आलं..त्याने पाहिलं प्रेरणा मोबाईलमध्ये काहीतरी बघून रडत होती...नक्की कोणत्या गोष्टी मुळे दीदी रडत असेल...कसं कळेल मला...तो विचार करत अजून थोडा पुढे गेला...प्रेरणा स्वतःमध्येच इतकी हरवून गेली होती की मागे विवेक उभा आहे हे तिला लक्षात ही आलं नाही.. विवेकने तिचा मोबाइल बघितला..आणि ती मोबाईलमध्ये बघून का रडत आहे हे त्याच्या काहीसं लक्षात आलं... पण आता त्याला असंख्य प्रश्न पडले होते ज्यांची उत्तरे त्याला कोण देईल हे त्याला समजत नव्हतं. तो तसाच आल्या पावली मागे गेला...आणि त्याने याबद्दल समिधाशी बोलायचं असं ठरवलं. त्याने समिधाला whatsapp वर मेसेज केला, हॅलो समिधा मॅडम, सॉरी मी खूप उशीरा मेसेज केला आहे पण माझं खरंच खूप महत्त्वाचं काम होतं...त्याचा मेसेज वाचून समिधाला थोडं आश्चर्य वाटलं कारण विवेक कधी इतक्या उशिरा तिला मेसेज करत नसे...काय बोलायचं असेल याला तिने मनात विचार केला. तिने मेसेज वाचून ही रिप्लाय न दिल्यामुळे विवेकने पुन्हा तिला मेसेज केला...माझं खरंच खूप महत्त्वाचं काम आहे मला दिदी बद्दल बोलायचं आहे...

समिधा: (मेसेज वाचून झाल्यावर) सॉरी मी तुला रिप्लाय द्यायला विसरले..बोल ना काय बोलायचं होतं...? की मी कॉल करू तुला...? जर मेसेज करणं शक्य नसेल तर...

विवेकने विचार केला, हां बाहेर जाऊन कॉल करणं जास्त योग्य होईल त्याने लगेच तिला मी 5 मिनिटात कॉल करतो म्हणून मेसेज केला... आणि तो बाबांना मी पाय मोकळे करुन येतो असं सांगून टेरेसवर आला. त्याने लगेच समिधाला कॉल केला.

समिधा: हां बोल विवेक...काय बोलायचं होतं तुला...?

विवेक: ते मला दिदी बद्दल बोलायचं होतं मॅडम...

समिधा: हे बघ, पहिली गोष्ट मी तुझी मॅडम ऑफिस मध्ये... ऑफिसच्या बाहेर मी तुझ्यासाठी तुझी दीदीच आहे...

विवेक: सॉरी मॅ...अं नाही...दीदी... ते मी याकरता कॉल केला होता की दीदी संध्याकाळी घरी आल्यापासून खूप डिस्टर्ब आहे... तिचं जेवताना पण लक्ष नव्हतं कोणाकडे...आणि मी रूममध्ये तिला विचारण्यासाठी म्हणून गेलो...पुढे काही बोलावं की नाही हे त्याला कळेना..

समिधा: विवेक, काय झालं नक्की सांगशील का..?

विवेक: हं... मला वाटतं दीदीला प्रतिक सर खूप आवडतात...

समिधा: तुला असं का वाटतं आहे...?

विवेक: कारण मी तिला सरांचा फोटो मोबाईल मध्ये बघत रडताना पाहिलं...सगळं काही ठीक आहे ना...म्हणजे कदाचित ती तुझ्याशी या विषयावर बोलली असेल म्हणून मी तुला कॉल केला...

समिधा: हो तिने माझ्या बरोबर काही गोष्टी शेअर केल्या आहेत...तिला प्रतिक सरांनी लग्नासाठी मागणी घातली होती...

विवेक: मग... दीदी हो म्हणाली ना... कारण आज तिला त्यांचा फोटो बघून रडताना मला राहून राहून वाटतं आहे तिचं सरांवर खूप प्रेम आहे...

समिधा: हो दोघांचं ही एकमेकांना पसंत करतात...सर तिच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीचाही विचार करणार नाही स्वप्नात सुद्धा...पण प्रेरणाला तिचं सरांवर प्रेम आहे हे मान्यच करायचं नाही आहे...ती स्वतःला लांब ठेवते आहे सतत...

विवेक: दीदी मला माहीत आहे सरांना प्रेरणा दीदी पसंत आहे हे... मला आई म्हणाली होती, मालगुडे काकू खूप काही बडबडून गेल्यानंतर सरांनी दीदी त्यांना पसंत असल्याचं आईला सांगितलं होतं ते...समिधा दीदी, दीदीला आपण समजावू नाही शकत पण आपण तिला तिच्या प्रेमाची जाणीव तर करुन देऊ शकतो ना...?

समिधा: हो विवेक... आपण तिला नक्कीच जाणीव करून देऊ...एक सांगू विवेक, तू खरंच खूप समंजस झाला आहेस आता...तुला तुझी जबाबदारी समजू लागली आहे... एक मोठा भाऊ जसा आपल्या लहान बहिणीला समजून घेतो तसा तू लहान असूनही प्रेरणाला समजून घ्यायला लागला आहेस...I am proud of you Vivek...

विवेक: thank you दीदी... पण आपण नक्की काय करु शकतो दीदीला तिचं प्रेम जाणवण्यासाठी...?

समिधा: ते सगळं तू माझ्यावर सोड... फक्त प्रेरणा घरी कशी वागते हे तू मला सांगत जा...बस...आणि मला तुझी काही मदत लागलीच तर मी नक्की तुला सांगेन डोन्ट वरी...

विवेक: Thank you दीदी...पण आता दीदी रडते आहे त्याच काय...?

समिधा: कारण तिला तिचं अजून मन समजत नाही आहे आणि तिला ते जेव्हा समजेल तेव्हा ती असं वागणं बंद करेल...

विवेक: खरंच असं होईल..? 

समिधा: 100% होईल..आता तू काळजी नको करुस आणि काहीही बोलावं असं वाटलं की बिनधास्त कॉल कर तुझ्या समिधा दीदीला...चल आता शांत झोप... बाय गुड नाईट... उद्या भेटू ऑफिस मध्ये...

तसं विवेकने ही तिला गुड नाईट म्हणून कॉल ठेवला.

दुसऱ्या दिवशी प्रेरणाने स्वतःच्या मनाला खूप सावरलं होतं. तिने मनाशीच ठरवलं होतं की काहीही झालं तरी ती प्रतिक पासून लांब राहिलं... तेच तिच्यासाठी योग्य आहे. ऑफिस मध्ये आल्यावर प्रतिकने नेहमी प्रमाणे प्रेरणाच्या डेस्ककडे बघितलं...पण ती प्रतिक ज्या वेळी ऑफिसला येत असे त्याचवेळी डेस्कवर थांबायचं नाही असं मनाशी ठरवून ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये चहा प्यायला म्हणून एकटीच निघून गेली.. तिचं असं वागणं समिधा आणि मीनाला ही खटकलं पण ती जोपर्यंत त्यांच्या बरोबर मोकळी होऊन बोलू शकत नव्हती तोपर्यंत त्या काहीच करु शकत नव्हत्या. तिला डेस्कवर न बघून प्रतिकचा थोडा मूड ऑफ झाला...त्याने केबिन मध्ये जाऊन लगेच समिधाला कॉल करून प्रेरणा कुठे आहे असं विचारलं.

समिधा: सर ती कॅन्टीन मध्ये चहा प्यायला जाते म्हणून सांगून गेली आहे.

प्रतिक: ओके तिला नंतर ते loan च्या फाईल्स घेऊन यायला सांग...(प्रतिकने मनात विचार केला त्या निमित्ताने तरी तिला पाहता येईल मला)

प्रेरणा डेस्कवर आल्यावर समिधाने तिला प्रतिकचा निरोप दिला. ती विचार करु लागली की सर म्हणून मला त्यांचं फाईल घेऊन ये हे ऐकावं तर नक्कीच लागेल. पण मला त्यांच्या पासून लांब राहायचं आहे कारण पुन्हा मी त्यांच्या समोर जाणार पुन्हा मी स्वतःला त्यांच्या मध्ये गुंतणार...तिने peon ला फाईल घेऊन प्रतिकच्या केबिन मध्ये जायला सांगितलं आणि त्याला म्हणाली, की एक customer query solve करायची आहे त्यामुळे मला वेळ लागू शकतो आणि सरांना या फाईल्स खूप अर्जंट हव्या आहेत...तसं peon ने ही मानेने हो म्हटलं आणि फाईल्स घेऊन केबिन मध्ये गेला. फाईल्स घेऊन peon केबिन मध्ये गेला आणि त्याने प्रेरणा customer query solve करत असल्यामुळे माझ्या कडे फाईल्स दिल्या असल्याचं सांगितलं... प्रतिकने फक्त ओके असं म्हणत त्याला फाईल्स ठेवून जायला सांगितलं. ही अशी का वागते आहे प्रतिकला राहून राहून हा प्रश्न पडला होता. तो त्याच विचारात काम करत असताना राजीवने त्याला कॉल केला..त्याचा कॉल बघून प्रतिकने लगेच कॉल उचलला.

प्रतिक: हां बोल राजीव... 

राजीव: तुझा आवाज असा का येतोय...सगळं ठीक आहे ना...?

प्रतिक: मला ही कळत नाही आहे ती अशी का वागते आहे माझ्याशी ते...

राजीवला तिच्या वागण्यामागच कारण काय असू शकतं याचा अंदाज आला पण प्रतिक कडून त्याला नक्की तिने काय केलं हे जाणून घ्यायचं होतं...

राजीव: मला नीट सांगशील काय झालं ते...?

प्रतिकने त्याला जे काही झालं ते सांगितलं... मी समिधाला कॉल करुन विचारलं तेव्हा मला कळलं की ती चहा प्यायला गेली आहे ते...पण मला राहून राहून असंच वाटतं आहे की दोन्ही वेळेला ती स्वतःला माझ्यापासून दूर ठेवायला बघते आहे..

राजीव: तू टेंशन नको घेऊस... होईल सगळं ठीक...trust me..

प्रतिक: तुला खरं सांगू राजीव मला ना प्रेरणा आणि माझं pre wedding photoshoot करायचं आहे... एकदम असं समुद किनारी वगैरे...

राजीव: तथास्तु... बाळा तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल...

प्रतिकला तोच समिधाचं आणि त्याचं बोलणं आठवलं तसा तो राजीवला म्हणाला, ऐकना मला तुझी एका गोष्टी बाबतीत मदत हवी होती... असं म्हणत त्याने रेस्टॉरंट मधलं pre wedding बद्दलचं सगळं बोलणं सांगितलं.

राजीव: मला वाटतं समिधाचीही खूप इच्छा असावी photoshoot ची...

प्रतिक: मला ही तेच वाटतं... मला तिला मदत करायची आहे पण कशी करु समजत नाही आहे म्हणजे तिचा कुठेतरी स्वाभिमान मला दुखवायचा ही नाही आहे...

राजीव: ओह अच्छा... माझ्याकडे एक idea आहे बघ तुला कशी वाटते ते असं म्हणत राजीवने प्रतिकला एक प्लॅन सांगितला.. प्रतिकला पण त्याचा प्लॅन खूप आवडला..

प्रतिक: भारी डोकं चालत रे तुझं...

राजीव: (मनात म्हणतो, तुला अजून मी पुढे काय करणार हे तर मी सांगितलंच नाही आहे) मग काय माझं डोकं नेहमीच खूप पुढे धावतं...असं म्हणत तो हसू लागला आणि प्रतिक ही हसू लागला. 

प्रतिक: चल आता ऑफिसचं काम करतो...बोलतो तुझ्याशी संध्याकाळी.

राजीव: हो चालेल बाय.... असं म्हणत त्याने कॉल ठेवला.

संध्याकाळी घरी आल्यावर प्रतिक फ्रेश होऊन नुकताच त्याच्या बेडरूममध्ये मोबाईलवर प्रेरणाचे फोटोज पाहत बसला होता तोच त्याचे डोळे कोणीतरी मागून येऊन बंद केले...तिच्या हातांना प्रतिकने हात लावला.....तो तिला ओळखायचा प्रयत्न करत होता... आणि त्याने आपल्याला ओळखलं नाही म्हणून ती भलतीच खूश होती...तोच प्रतिकने तिला मागून ओढून घेतलं...तसं ती दिलखुलास हसत त्याला म्हणाली, अजूनही तुझी सवय गेली नाही आहे तर...तसा तो ही तिच्या हसण्यात सामील झाला...आणि ती हसता हसता रडत त्याला बिलगली.

क्रमशः

🎭 Series Post

View all