Feb 24, 2024
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-३७

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-३७

अस्तित्व एक संघर्ष

भाग-३७


राजीवच्या तुम्ही दोघेही एकदम made for each other वाटत होतात यावर समिधाने त्याला thank you म्हणून smile face smiley टाकली... तसं त्याने तिला पुन्हा एक मेसेज केला.. तुझ्याशी मी थोडं पर्सनल बोललो तर चालेल का..?

समिधा: (थोडा विचार करून) हो चालेल...

राजीव: मला तुझ्याशी प्रतिक आणि प्रेरणा बद्दल बोलायचं आहे...त्या दोघांना पाहून तुला नाही का वाटत त्यांनी एकमेकांबद्दल विचार करायला हवा...!!

समिधा: ते दोघे एकमेकांबद्दल विचार करत तर आहेत... सर तर तिच्यावर खूप प्रेम करतात हे माहीत आहे मला... पण मला प्रेरणाबद्दल खात्री वाटत नाही की ती सरांशी लग्न करण्याबद्दल विचार करेल असं....पण मला असं ही वाटतं की तिने याबद्दल सिरियसली विचार करावा..तिला आवडतात ते...ते येत नाहीत तोपर्यंत तिची नजर त्यांच्या येण्याकडेच लागून राहिली असते...आज तर ते माझ्या आणि मीनाच्या पण लक्षात आलं...

राजीव: ओह... म्हणजे प्रतिकवर तिचं ही प्रेम आहे तर...

समिधा: हो आहे पण तिला मी जितकं ओळखते त्यावरुन तरी हेच वाटतं की ती ते कबूल नाही करणार...

राजीव: (थोडा विचार करून) आपण तशी situation निर्माण केली तर... ज्यामुळे प्रेरणा तिचं प्रतिकवर प्रेम आहे हे कबूल करेल...❤️

समिधा: ते कसं शक्य आहे...

राजीव: माझ्याकडे एक प्लॅन आहे... पण त्याकरता मला तुझी आणि मीनाची हेल्प लागेल...

समिधा: we are ready to help you Sir..

राजीव: thank you so much... पण प्रतिक आणि प्रेरणा या दोघांना ही यातलं काही कळता कामा नये...

समिधा: नो प्रॉब्लेम सर...दोघांना ही यातलं काही कळणार नाही.

राजीव: ग्रेट... मग एक whatsapp वर group create कर...रब ने बना दी जोडी म्हणून.... आणि त्यात मला आणि मीनाला पण ऍड कर...यापुढे आपण त्या ग्रुप वर ठरवत जाऊ काय आणि कसं करायचं ते...मी माझा प्लॅन तुम्हाला तिथेच सांगेन..

समिधा: ओके चालेल सर

राजीव: thank you once again...

समिधा: सर, आम्हाला ही वाटत प्रेरणा आणि प्रतिक सर दोघेही एकत्र यावेत असं...त्यामुळे thank you नका म्हणू...now its our team target...

राजीव: ????done.

राजीवशी चॅट करुन झाल्यावर समिधाने मीनाला राजीवशी झालेलं बोलणं सांगून लगेच group create करुन राजीव आणि मीनाला ऍड केलं.

राजीवने दोघींना काही दिवस प्रेरणा प्रतिक बाबतीत कशी वागते रिऍक्ट होते याकडे लक्ष द्यायला सांगितलं जेणेकरुन त्याचा पुढचा प्लॅन त्याला ठरवता येईल. दोघींनी त्याप्रमाणे करण्याचं कबूल केलं.

 

प्रेरणा रोज प्रतिक ऑफिस मध्ये येईपर्यंत त्याच्या वाटेला डोळे लावून असायची आणि प्रतिक राजीवने सांगितल्या प्रमाणे मनात नसतानाही प्रेरणाला इग्नोर करुन डायरेक्ट केबिनमध्ये जात होता... त्याचं असं तिच्याकडे न बघता जाणं तिला हर्ट करत होतं....ती काही ना काही कारण फाईल वर्क काढून केबिनमध्ये जात होती आणि तो तिच्याकडे न बघताच फाईल तिथेच ठेवायला सांगून नंतर peon कडे पाठवून देऊ लागला. प्रतिकने तिच्याशी पूर्वीसारखंच बोलावं यासाठी ती प्रयत्न करत होती पण तो तिच्याशी पूर्वी सारखा वागत नव्हता. असाच एक आठवडा निघून गेला. समिधा आणि मीनाने ठरल्याप्रमाणे प्रेरणाचं वागणं राजीवला सांगितलं आणि राजीवने रेखाला ही त्याचा प्लॅन सांगितला.

****

 

दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकमध्ये समिधाने राजीवच्या प्लॅन प्रमाणे प्रेरणा आणि मीनाला एक मोबाईलमधला फोटो दाखवला. 

मीना: (मोबाईलमधील फोटोमध्ये बघत आणि प्लॅनमध्ये ठरल्या प्रमाणे बोलत) ही कोण आहे जी प्रतिक सरांच्या बाजूला उभी आहे...

प्रतिक सरांचं नाव निघाताक्षणी नकळतपणे प्रेरणाचं ही लक्ष मोबाईलमधल्या फोटोकडे गेलं. त्या मुलीला प्रतिकच्या बाजूला बघून प्रेरणाला ती नक्की कोण आहे हे जाणून घ्यायची इच्छा झाली. ती ही समिधाकडे उत्तर मिळण्याच्या आशेने पाहू लागली.

समिधा: अग ही सरांची फ्रेंड आहे....आणि अजून तरी सरांची फ्रेंड आहे... पण सर तयार झाले तर मिसेस प्रतिक ही होईल कधी ना कधी...

हे ऐकून प्रेरणाला वाईट वाटलं... पण तिच्या मनात लगेच हा ही विचार आला की सर खरंच हिच्याशी लग्न करतील का...? मग माझं काय होईल...मला जमेल त्यांना दुसऱ्या मुलीबरोबर पाहायला... छे प्रेरणा काय तुझ्या मनात असे विचार येत आहेत... थांबव स्वतःला... ती स्वतःच्याच मनाशी भांडत होती... तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून समिधा आणि मीनाने एकमेकांना प्लॅन योग्य मार्गाने जात असल्याचा डोळ्यांनी इशारा केला.

मीना: पण समिधा, हे तुला इतकं कसं माहीत...म्हणजे मला आणि प्रेरणाला याबद्दल काहीच माहिती नाही म्हणून विचारलं...(प्रेरणाकडे पाहून) हो ना प्रेरणा...?

तशी प्रेरणा भानावर आली आणि तिने मानेनेच हो म्हटलं.

समिधा: अग माझ्या एंगेजमेंटचं invitation द्यायला मी राजीव सरांचा नंबर घेतला होता. तर त्यांच्याशी बोलणं होतं माझं अधून मधून... तर तेव्हा ते एकदा प्रतिक सर आणि त्यांच्या मैत्रीबद्दल सांगता सांगता या मुली बद्दल बोलून गेले...you know what... everyone is ready in Pratik Sir's family... फक्त प्रतिक सर तयार नाही आहेत..(समिधा सगळं प्लॅन मध्ये ठरल्याप्रमाणे बोलत होती). प्रेरणा ही गोष्ट जाणून खूप हर्ट झाली आहे हे दोघींच्या पुन्हा लक्षात आलं. तिने जेवण अर्धवटच उरकलं आणि टिफिन बंद करुन ती दोघींना सांगून लेडीज कॉमन रुम मध्ये गेली.

मीना आणि समिधाला प्रेरणा हर्ट होऊन जेवण अर्धवट सोडून गेली याचं वाईट वाटलं.. पण आता तिला समजावणं म्हणजे पण कठीण होतं. मीनाने टिफिन उरकला आणि ती प्रेरणा मागोमाग कॉमन रूम मध्ये गेली. मीना गेल्यावर समिधाने राजीवला कॉल करुन सगळं सांगितलं आणि लगेच प्रतिकला तिने एक मेसेज केला.

 

प्रेरणा कॉमन रूम मध्ये असलेल्या बाकड्यावर बसून प्रतिकचा विचार करून रडत होती...तेवढ्यात डोअर ओपन होण्याच्या आवाजाने तिने पटकन डोळे पुसून घेतले. मीना आत येऊन तिच्या समोरच उभी राहिली. प्रेरणा मात्र डोळे बंद करुन शांतपणे डोकं टेकून होती... जेणेकरून ती नुकतीच रडली आहे हे कोणाला कळता कामा नये. मीनाने तिला हात लावला, तसे प्रेरणाने डोळे उघडले.

मीना: एकदा बोलून का देत नाही...

प्रेरणा: अं कशाबद्दल म्हणतेय तू...?

मीना: ज्याच्या साठी तू इतकी रडली आहेस...ज्याच्यावर इतकं प्रेम करते आहेस त्या बद्दल बोलतेय मी वेडी...

प्रेरणा: प्रेम...(थोडं चमूकन तिच्याकडे पाहत) आणि मी... आणि तुला असं का वाटत आहे...?

मीना: मॅडम, तुम्ही विसरलात वाटत... माझं love marriage आहे... सो आज जसे तुझे डोळे कोणासाठी रडले आहेत तसे एकेकाळी माझे पण रडले होते... तूझ्या जिजूसाठी...(तिच्या बाजूला बसून तिच्या खांद्यावर हात ठेवून)

प्रेरणा: पण तुला वाटतं तसं काही नाही आहे ग...

मीना: कोणाला फसवते आहेस...मला की स्वतःला...? तेवढ्यात पुन्हा डोअर उघडण्याचा आवाज आला. समोर समिधाला बघून दोघी गप्प झाल्या.

समिधा: (दोघींना पाहत) आज काम नाही करायचं आहे का...? पाऊण तास झाला..आपण लंच ब्रेक ला येऊन...

मीना आणि प्रेरणा बाकड्यावरून उठल्या.

मीना: अग प्रेरणाचं थोडं डोकं दुखत होतं म्हणून मी थांबले तिच्याबरोबर...हो ना प्रेरणा...

प्रेरणा: हो...

समिधा: आता ठीक आहेस ना...की प्रतिक सरांना सांगून येऊ का...म्हणजे तू हाफ डे ना घरी जाऊन आराम करशील..?

प्रेरणा: अग एवढं पण नाही दुखत आहे... मी करेन काम...

समिधा: चला मग जाऊया डेस्कवर...

तशा दोघीही समिधाच्या मागोमाग डेस्कवर गेल्या.

 

प्रतिकचं ही नुकतंच जेवून झालं होतं... त्याने मेसेज चेक करायचा म्हणून मोबाईल हातात घेतला. समिधाचा मेसेज पाहून त्याने तो ओपन केला.

समिधा: सर, आज प्रेरणा कसल्या तरी विचारात आहे त्यामुळे ती नीट जेवली ही नाही आहे...

प्रतिकने तिच्या मेसेजचा रिप्लाय दिला, ठीक आहे मी बघतो काय करता येईल ते...आणि thank you समिधा, प्रेरणाबद्दल सांगितल्या बद्दल..aleast तू तरी मला समजून घेतलंस...????

 

समिधा डेस्कवर आली तसा तिने तिचा मोबाईल वरचा प्रतिकचा मेसेज वाचला... तिने प्रेरणाकडे पाहिलं. तिचं तिच्याकडे लक्ष नाही हे पाहून तिने लगेच प्रतिकला रिप्लाय दिला... सर, मला खूप आवडेल प्रेरणा आणि तुम्ही एकत्र आलात तर...आणि मी माझ्या एन्ड ने तुम्हाला यासाठी मला जमेल तेवढी नक्कीच मदत करेन.???? 

मेसेज करुन तिने लगेच मोबाईल बाजूला ठेवला आणि कामाला लागली. थोड्या वेळाने प्रतिकने कॉल करुन सगळ्यांना केबिन मध्ये बोलावलं. 

 

प्रतिकने प्रेरणाला पाहिलं आणि तो तिच्या जवळ गेला. तिची मान खालीच होती.

प्रतिक: (प्रेरणाची मान वर करुन) आज जेवलीस का नाही नीट... तुला फरक नसेल पडत, पण मला तुझ्या अशा वागण्याने त्रास होतो...

प्रेरणा: मला फरक पडत नाही... असं कसं बोलतात तुम्ही...तुम्ही मला सतत इग्नोर करतात...याचा मला ही त्रास होतो...तुम्हाला एकदा पाहण्यासाठी मी क्षुल्लक कारण काढून किती वेळा तुमच्या केबिन मध्ये आले आहे... पण तुम्हाला माझ्या असण्या नसण्याने काही फरक पडत नाही...

प्रतिक: (प्रेरणाच्या जवळ जात) माझ्या डोळ्यात बघून सांग, खरंच मला काही फरक पडत नाही...

प्रेरणाच्या डोळ्यात त्याच्याकडे पाहत अश्रू आले... त्याने ते पुसले, आणि तिला मिठीत घेत म्हणाला, पुन्हा असं काही बोलायचं नाहीस... तिने मानेनेच हो म्हंटलं...तोच door knock च्या आवाजाने तो भानावर आला...May I come in Sir, समिधा आणि टीम मधले सगळे आत येण्याची परमिशन मागत होते... ओह म्हणजे, मघाशी जे झालं तो भास होता तर...तो मनात विचार करून हसला आणि त्याने सगळ्यांना आत यायला सांगितलं.

 

समिधा: सर, तुम्ही आम्हाला सगळ्यांना बोलावलं होतं... काही महत्त्वाचं सांगायचं होतं का...?

समिधासकट सगळेजण प्रतिक काय बोलतोय ते ऐकायला उत्सुक होते. प्रेरणा त्याच्याकडे न पाहत इकडे तिकडे बाकीच्यांना पाहत होती...तसा प्रतिक तिच्याकडे पाहत म्हणाला, हो तसं important सांगायचं होतं म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलावलं.

मीना: ओके सर...

प्रतिक: तुम्ही सगळ्यांनी घरी कॉल करुन कळवा की आज टीम डिनर आहे ते...त्यामुळे थोडा उशीर होईल.

आशिष, विवेक: सर, टीम डिनर...?

प्रतिक: हो टीम डिनर...तुम्ही दोघे नवीन आहात त्यामुळे तुमच्या साठी हे सेलिब्रिशन फर्स्ट टाइम आहे. जेव्हा जेव्हा आपण company चं target complete करतो तेव्हा तेव्हा आपण असं celebrate करतो...मग कधी ते डिनर असेल किंवा मग लंच किंवा मग आपण over achieve केलं तर एखादी picnic सुद्धा...

आशिष: वाह मस्त आहे सर हे...म्हणजे आम्हाला आपोआप टार्गेट complete करण्याची इच्छा होणार...हे ऐकून सगळे हसायला लागले...

प्रतिक: (हसून) हो म्हणूनच company असं काही ना काही अरेंज करत असते...anyways just inform to your family about our dinner...so they will not wait for you...(प्रेरणाकडे पाहत) ok any doubts...and if no doubts... go back to your work... and finish it as early as you can...असं म्हणत तो सगळ्यांकडे पाहून हसला.

तो प्रेरणाकडे पाहून बोलत होता पण ती खाली मान घालूनच सगळं ऐकत होती.. तिला आज त्याच्याकडे पहायची ही हिंमत होत नव्हती.

सगळेजण हसत हसतच केबिनमधून बाहेर पडले... आणि त्यांच्या मागोमाग प्रेरणा पण केबिनमधून बाहेर पडली. प्रतिकची तिच्या बरोबर बोलायची खूप इच्छा होत होती पण तो काही बोलू नाही शकला. सगळे केबिनमधून डेस्कवर गेले, तसं प्रतिक ही प्रेरणाचा विचार करत कामात बिझी झाला. समिधाच्या मात्र आजचा डिनरचा प्लॅन प्रेरणा नीट जेवली नसल्यामुळेच सरांनी अरेंज केला असल्याचं लक्षात आलं. सर पर्सनल लाइफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं ठेवून प्रेरणाची तिला कळणार नाही अशा प्रकारे कशी काळजी घेत आहेत हे पाहून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. आनंदात तिने घरी रात्री जेवायला नसणार हे कॉलवर सांगून लगेच राजीवला पर्सनल मेसेज करत सरांचा डिनर प्लॅन सांगून टाकला आणि पुन्हा कामाला लागली. राजीवही तिचा मेसेज वाचून खूप खुश झाला. त्याला प्रतिकचं प्रेरणाला नकळत तिची काळजी घेणे खूप भावलं आणि आता प्लॅन मध्ये पुढे काय करायचं हे लगेच त्याच्या सुपीक डोक्यात आलं. तो प्लॅनचा विचार करत करत पुन्हा ऑफिसच्या कामाला लागला.

 

क्रमशः

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ujwala Desai

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...

//