अस्तित्व एक संघर्ष
भाग-३६
प्रतिकने गालातल्या गालात हसत whatsapp वर राजीवने पाठवलेला हॉलच्या बाहेरचा प्रेरणा आणि त्याचा एकमेकांच्या डोळ्यात पाहत असलेला फोटो whatsapp ला वॉलपेपर म्हणून ठेवला... आणि कितीतरी वेळ तो फोटो पाहत बसला होता... प्रतिकच्या मनात विचार आला, आज किती गोड दिसत होती प्रेरणा...तिच्याकडे सतत पाहतच रहावं असं वाटत होतं...खरं तर बरंच झालं राजीवने फोटो डिलिट नाही केला ते...खूप सुंदर क्षण होता माझ्या आयुष्यातला...❤️ जेव्हा ती माझ्या इतक्या जवळ होती...तो क्षण तिथेच थांबावा असं वाटत होतं मला...(पुन्हा फोटोमध्ये प्रेरणाला पाहत) खूप मिस करतो मी तुला...मला तुझ्याही डोळ्यांत जाणवत माझ्याबद्दलच प्रेम...सांग ना, कधी कळणार तुला माझ्या मनातल्या भावना... फोटोकडे पाहता पाहता प्रतिक तिच्या आठवणींत झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी ऑफिससाठी तयार होऊन आरशात एकदा स्वतःला पाहताना प्रेरणाला पुन्हा प्रतिक तिच्याकडे पाहुन हसत असल्याचा भास झाला. तिने मागे वळून पाहिलं...पण तिथे कोणीच नव्हतं...ती स्वतःशीच म्हणाली, काय होत आहे तुला प्रेरणा, तुला प्रतिक सर का दिसत आहेत सतत... का होत आहे हे असं... जाऊदे सोडतो विषय... जास्त विचार करत बसले तर उशीर होईल ऑफिस मध्ये जायला... (आईला बाय करत) आई येते मी...आणि प्रेरणा ऑफिस मध्ये जायला घरुन निघाली.
***
ऑफिसमध्ये ती आणि समिधा नेहमीप्रमाणे एकत्र आले... समिधा तिला भेटल्यापासून ऑफिसमध्ये येईपर्यंत एंगेजमेंटचे किस्सेच सांगत होती...आणि प्रेरणा मात्र त्यावेळी प्रतिकचाच विचार करत होती... कसं त्याने तिला पडत असताना सावरलेलं...त्यांचं त्याक्षणी एकमेकांमध्ये हरवून जाणं...तिचं त्याच्याकडे लपून छपून बघणं... ती प्रतिकच्या विचारात असताना अधून मधून ब्लशही करत होती... आणि बिचाऱ्या समिधाला वाटत होतं... ही आपलं ऐकते आहे... तिचं बोलणं चालू असतानाच मीना ही ऑफिस मध्ये आली...आणि समिधा प्रेरणाला काहींना काही सांगते आहे हे पाहून ती पण त्यांच्यात सामील झाली.
मीना: (पर्स ड्रॉवर मध्ये ठेवत) ओह समिधा मॅडम... फक्त गप्पाच मारणार आहात की तुमच्या दोघांचे फोटो पण दाखवणार आहात...? (प्रेरणाकडे पाहून) बरोबर बोलते आहे ना मी प्रेरणा...
प्रेरणा: (भानावर येत...उगाच हो म्हणत) हो हो बरोबर बोलतेय...
समिधा: बरं बाई... थांब दाखवते तुम्हाला फोटोज आमच्या दोघांचे...(असं म्हणत तिने फोटोज दाखवले)
प्रेरणा आणि मीना दोघी समिधाच्या मोबाईलमध्ये त्या दोघांचे फोटोज बघत तारीफ करत होत्या.
मीना: आपला ग्रुप फोटो नसेल ना तुझ्याकडे...?
समिधा: अरे का नसणार... मला माहीतच होतं की तू मला हे नक्की विचारशील....!! म्हणून मी आधीच माझ्या cousin ला तुम्ही स्टेजवर आल्यावर तिच्या मोबाईल मध्ये फोटो काढ म्हणून सांगितलं होतं...(पुन्हा मोबाईल मध्ये फोटो शोधत) हा बघ आपल्या ग्रुपचा फोटो...
मीनाचा फोटो बघून झाल्यावर तिने मोबाईल प्रेरणाकडे दिला..
प्रेरणा फोटो मध्ये पाहून मनात विचार करु लागली... किती जवळ उभी होते मी प्रतिक सरांच्या...!!❤️ (पुन्हा मनातले विचार झटकत) काय विचार करते आहे मी असा त्यांच्याबद्दल...शेवटी काहीही झालं तरी मी असा विचार मनात नको आणायला...तिने लगेच मोबाईल समिधाकडे दिला. समिधाला तिच्या मनात नक्की काहीतरी चाललं आहे हे जाणवलं.
समिधा: (फोटो पाहून तिच्या लक्षात आलं) मी काय म्हणते, आपल्या टीमचा ग्रुप आहे ना तिथे मी तुम्हाला whatsapp करते म्हणजे मला सगळ्यांना वेगळवेगळ सेंड करायची गरज पडणार नाही...(असं म्हणत तिने लगेच फोटो ग्रुपवर सेंड केला आणि प्रेरणाकडे पाहू लागली)
प्रेरणा: (विषय बदलण्याच्या हेतूने) चल आपण गप्पाच मारत बसणार आहोत का...? काम पेंडिंग राहील तसंच नाहीतर आपलं... तिचं हे बोलणं ऐकून तिच्याबरोबर त्या दोघीनी पण काम सुरु केलं.
एव्हाना प्रतिकच्या येण्याची वेळ झाली होती. प्रेरणाचे डोळे त्याच्या येण्याकडेच लागून राहिले होते... ती काम करता करता अधून मधून घड्याळ पाहत होती. तिच हे ही लक्षात आलं नव्हतं की तिचं हे वागणं समिधा आणि मीनाला कळलं आहे ते...समिधाने मीनाला आपण दोघी नंतर याबद्दल बोलू म्हणू तिला इशाऱ्याने सांगितलं. मीनाने ही इशाऱ्याने हो म्हणून सांगितलं. दोघी काम करता करता कोणाला कळणार नाही असं प्रेरणाचं निरीक्षण करत होत्या...अचानक प्रेरणाच्या चेहऱ्यावर आलेल्या स्माईलने त्यांचं लक्ष प्रेरणा कुठे पाहत आहे तिथे गेलं....प्रतिकने नुकतीच ऑफिसमध्ये एन्ट्री केली होती...त्या दोघींना जे कळायला हवं होतं ते यातून बरोबर कळून गेलं. प्रतिक त्यांच्या डेस्कपाशी येऊन पोहचणार त्या आधीच प्रेरणाने तिचं डोकं फाईलमध्ये घुसवलं...जणू हे दाखवायला की तिला प्रतिक कधी आला हे कळलंच नाही. प्रतिकने तिच्याकडे पाहिलं... आणि मग मीना आणि समिधाला पाहून त्याने गुड मॉर्निंग म्हंटलं. त्या दोघीनी पण त्याला गुड मॉर्निंग म्हटलं. तसं प्रेरणाने आताच आपण प्रतिकला पाहत असल्यासारखं दाखवत गुड मॉर्निंग सर म्हटलं...
प्रतिकने तिच्याकडे पाहत तिला ही very good morning म्हटलं आणि तो तिच्या चेहऱ्यावर आलेली स्माईल पाहत त्याच्या केबिनमध्ये गेला.
त्या दोघांच्या एकमेकांना पाहण्याच्या चक्करमध्ये त्यांच्या हे ही लक्षात आलं नाही की समिधा आणि मीनाला त्या दोघांचं काय चाललं आहे लक्षात आलं आहे.
प्रतिक केबिनमध्ये गेला आणि त्याच्या चेअरवर बसला. त्याच्या डोळ्यासमोर प्रेरणाचा मघासचा हसतानाचा चेहरा येत होता. काहीतरी वेगळं वाटत होतं आज तिच्या स्माईल मध्ये मला...आणि आज तिच्या चेहरा ही खूप ग्लो करत होता...त्याचा मनात विचार चालू असतानाच त्याच्या मोबाईलवर राजीवचा कॉल आला.
प्रतिक: (कॉल उचलून) हां बोल राजीव...एकदम आज सकाळी सकाळी कॉल...
राजीव: अभी मुझे मेरे दोस्त को कॉल करने से पहले टाईम भी देखना पडेगा...
प्रतिक: (सारवासारव करण्याच्या हेतूने) अरे तसं नाही... ते मी...
राजीव: (जोरात हसत) अरे मस्करी केली मी तुझी... आणि मी तुझा besti आहे सो मी केव्हाही कॉल करेन अगदी तू तुझ्या प्रेरणा बरोबर असताना सुद्धा..
प्रेरणाचं नाव ऐकताक्षणी प्रतिक गोड हसला.
राजीव: आयला माझा मित्र चक्क लाजून हसला...काय मग तू प्लॅन follow करतोय की नाही माझा... तिला इग्नोर करायचा...
प्रतिक: आज जमलं नाही मला तिला इग्नोर करायला...पण तुला खरं सांगू... आज ती मला खूप वेगळी भासली...तिची स्माईल मला खूप हवी हवी अशी वाटत होती... तिचा चेहरा आज खूप ग्लो करत होता... you know what आता पण तुझ्याशी बोलतोय पण तीच माझ्या डोळ्यासमोर येते आहे रे... माझे heartbeats वाढले आहेत रे तिला आज पाहिल्या पासून....❤️
राजीव: कंट्रोल मजनू कंट्रोल... स्वतःच्या मनावर आवर घाल मित्रा... हे जे तू feel करतोय ना तेच तिला वाटलं पाहिजे आणि ते इतकं वाटलं पाहिजे की ती स्वप्नात सुद्धा तुला सोडून जायचा विचार करणार नाही.
प्रतिक: खरंच होईल ना हे असं...मला तिच्यावर कोणतं नातं लादायच नाही आहे पण मला हवी आहे रे तिची साथ...
राजीव: cool down dude... मैं हूं ना...आता फक्त तुला मी सांगतोय तसंच वागायचं आहे हे लक्षात ठेव... and by the way..तू जे आज सांगितलं त्यावरुन मला वाटतं आहे ती पण तुझ्याबद्दल feel करायला लागली आहे... उलट मी म्हणेन...ती आधी पासूनच feel करत असणार पण आज तिला ते लपवता आलं नाही आहे...
प्रतिक: तू हे कसं सांगू शकतोस...?
राजीव:(हसत म्हणाला) काल तुमच्या दोघांचं काय चाललं होतं आंधळी कोशिंबीर ती काय दिसली नाही का मला...? कधी तू तिला बघतोय... कधी ती तुला बघतेय...आणि तू येत नव्हतास तोपर्यंत तिचं लक्ष सतत हॉलच्या डोअरकडेच होतं... इसको प्यार नहीं तो और क्या बोलते है मेरे दोस्त...(मोबाईल कडे पाहत) ऐक मला रेखा कॉल करते आहे नंतर बोलतो चल बाय... पण माझं लक्षात ठेव... तुला तिला इग्नोर करायचं आहे अगदी जितकं जमेल तितकं...
प्रतिक: हो बाबा हो...मी प्रयत्न करेन.. तू कर कॉल रेखाला... नाहीतर तुझं काही खरं नाही...!! चल बाय...
राजीवने पण बाय बोलून कॉल ठेवला आणि रेखाला लगेच कॉल केला. अर्थात कॉल बराच वेळ वेटिंग वर राहिल्या मुळे मॅडम भडकल्याच होत्या...तसं राजीवने तिला भेटून त्यामागचं कारण सांगण्याच कबूल केल्यावर तिचा राग शांत झाला.
संध्याकाळी राजीवने रेखाला पार्कमध्ये भेटून प्रतिक आणि प्रेरणा बद्दल सगळं सांगितलं...त्यावर रेखाने त्याला तिच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीशी तिचं मन जाणून घेण्याचा सल्ला दिला...जेणेकरून ते दोघे एकत्र यायला मदत होईल. राजीव रेखाचा सल्ला ऐकून इतका खुश झाला की त्याने आनंदाच्या भरात तिला मिठीच मारली... तो भानावर आला तसे दोघेही लाजून एकमेकांना पाहून गोड हसले....तुला माहीत नाही, रेखा तू माझं किती मोठं काम केलं आहे ते... प्रतिक माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि त्याला असं हताश झालेलं बघवत नाही मला...आणि प्रेरणा आहे ना तिला पण तो आवडतो...पण ती का तयार होत नाही हेच कळत नाही आहे मला...राजीव म्हणाला. तसं रेखाने राजीवचा हातात हात घेऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, आपण आहोत ना...आपण तिला तिच्या प्रेमाची जाणीव करून देऊ.....रेखाच्या या बोलण्याने आज राजीव पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडला होता. बराच वेळ ते दोघे एकमेकांच्या हातात हात घेऊन असेच बसून होते.
***
ऑफिसमधून घरी गेल्यावर समिधाला मीनाने सकाळी जे प्रेरणा आणि प्रतिक यांचं चाललेलं त्याबद्दल मेसेज केला.. समिधाने पण मग तिला प्रेरणा हॉस्पिटलमध्ये असल्यापासून अगदी प्रतिकने तिला propose केल्यापर्यंतच सगळं चॅटमध्ये सांगितलं.
मीना: मला वाटतं समिधा, आपण काहीतरी केलं पाहिजे... या दोघांना एकत्र आणण्यासाठी...
समिधा: मला ही तसंच वाटत आहे...पण तुला माहीत आहे ना प्रेरणा कशी आहे ती...ती कबूल नाही करणार कधीच की ती ही सरांना पसंत करते...
मीना: हां ते पण आहे... बघू आपण काय करु शकतो यात... पण मला आज जाणवलं दोघांच्या डोळ्यात खूप काही एकमेकांबद्दल...म्हणजे तुला तर माहीत आहे ना माझं लव मॅरेज आहे ते... सो जसं मला माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात दिसतं माझ्याबद्दल प्रेम तसंच मला प्रतिक सरांच्या डोळ्यात प्रेरणाबद्दल प्रेम जाणवत होतं...
समिधा: आणि प्रेरणा च्या डोळ्यात प्रतिक सरांच्या बद्दल प्रेम...right...!!
मीना: एकदम right... विचार करु आपण यावर काहीतरी लवकरच... चल बाय...!! आता थोडं पोटात ढकलायला काहीतरी बनवते...
समिधा: बनव बनव जेवण बनव नाहीतर माझ्या जीजूना उपाशीच रहावं लागेल...
मीना: तसं होणार नाही... तो मी येईपर्यंत कूकर लावून मोकळा होतो...मला फक्त चपाती भाजी करायची असते...
समिधा: वाह यार...कर तू काम...बोलू आपण नंतर...
तशी मीना कामाला लागली.
घरी आल्यावर राजीवने त्याचं whatsapp चेक केलं. त्याला समिधाचा मेसेज आलेला पाहून आश्चर्य वाटलं. त्याने मेसेज ओपन केला...तर तिने तिच्या एंगेजमेंटचा राजीव, प्रतिक आणि त्याच्या टीम बरोबरचा फोटो त्याला पाठवला होता...फोटो पाहत असताना त्याच्या लक्षात आलं, प्रेरणा आणि प्रतिक फोटो काढत असताना एकमेकांच्या बाजूला उभे होते... म्हणजे फोटोग्राफरनेच तिला त्याच्या बाजूला उभं रहायला सांगितलं होतं... त्याच्या मनात तो प्रसंग आठवून आपोआप हसू आलं आणि अचानक त्याला रेखाच मघासचं बोलणं आठवलं...त्याने लगेच समिधाला काहीतरी विचार करून मेसेज केला...त्याचा मेसेज वाचून समिधाच्या चेहऱ्यावर मस्त स्माईल आली.
क्रमशः