Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-३५

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-३५
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-३५


आज समिधाची एंगेजमेंट होती. मीना प्रेरणाला डायरेक्ट हॉलमध्ये भेटणार होती. विवेकला सुद्धा बोलावलं असल्यामुळे प्रेरणा आणि तो दोघेही एकत्रच जाणार होते. प्रेरणा मस्तपैकी मरुन कुर्तीवर गोल्डन चुडीदार घालून तयार होऊन स्वतःला एकवार आरशात न्याहाळत होती...खरंच मी चांगली दिसते आहे ना...ती आरशात पाहत स्वतःला विचारत असताना तिला आरशातून प्रतिक तिच्याकडे पाहत हसतो आहे दिसला... तसं ती ही त्याच्याकडे लाजून पाहून हसली..तोच आईने तयारी झाली का विचारण्यासाठी म्हणून बेडरूमचा दार ठकठक केला...

प्रेरणा: (मागे वळून प्रतिक कुठे गेला पाहत...मनात म्हणते, म्हणजे हा भास होता तर...) हो हो आई आले मी...

आई: (प्रेरणाने दरवाजा उघडल्यावर) झाली का तयारी...

प्रेरणा: हो आई... विवेक तयार झाला का..?

आई: हो कधीचाच तयार होऊन तुझीच वाट पाहत बसला आहे बाहेर...(प्रेरणाला पाहत) बाकी आज मला तुझी घरी आल्यावर नजर काढावी लागणार दिसतेय... 

प्रेरणा: काहीही काय आई, नजर तर आज समिधाची काढावी लागणार आहे...

आई: बघ जरा स्वतःला आज आरशात... खरंच माझी मुलगी आज खूप गोड दिसते आहे...

(मागून विवेक येत)

विवेक: हो आई, कोणी मुलगा भेटला तिथेच तर... दिदीचं पण तिथेच लावून देऊया एंगेजमेंट... एक तीर से दो निशान...

प्रेरणा: (विवेकला पाठीवर मारत) एक तीर से दो निशान म्हणे...चल आता... उशीर होईल नाहीतर आपल्याला..

विवेक: बघ आई कोण बोलतंय हे...मघासपासून मी बिचारा बाहेर वाट पाहत बसलो आहे... आणि म्हणे मी उशीर करतोय...

प्रेरणा: गप्प रे आता... किती बोलशील... (सँडल घालत) चल निघतो आम्ही आई...

तसे दोघेही आईला बाय बोलून हॉलवर जायला घरून निघाले.

****

 

मीना तिच्या मि बरोबर हॉलमध्ये नुकतीच पोहचली होती...ती दुसऱ्याच रांगेत बसली होती. थोड्या वेळाने राजीवही पोहचला...राजीव सुप्रसिद्ध advocate असल्याने बरेच जण त्याच्याशी स्वतःहून बोलायला येत होते...राजीव या सगळ्या प्रकाराने थोडा वैतागला होता... तोच त्याला दुरुन मीना दिसली...आणि तो तडक तिच्या दिशेने गेला.

राजीव: (मीनाला आणि तिच्या नवऱ्याला) हाय मी मि प्रतिक यांचा मित्र...

मीना: (आठवून) हो हो, तुम्ही आला होता एकदा दोनदा ऑफिस मध्ये...(नवऱ्याच्या दिशेने हात दाखवत) हे मि अभिजित माझे मिस्टर...

राजीव: ओह हॅलो मि अभिजित...मी राजीव...(पुढे काही बोलणार तितक्यात)

अभिजित: तुम्ही advocate राजीव...सर तुम्हाला कोण ओळखत नाही...

राजीव: सर वगैरे बोलून उगाच मला लाजवू नका...आणि अहो जाहो तर बिलकुल नका करु...फक्त राजीव म्हणा...ते जास्त आवडेल मला...

अभिजित: (हसत) बरं राजीव...

थोड्या वेळाने आशिष, विवेक आणि प्रेरणा ही हॉल मध्ये आले.. प्रेरणाला मीना कुठे दिसेना म्हणून प्रेरणाने तिला कॉल केला. तिचा कॉल आलेला राजीवच्या नजरेतून सुटलं नाही... तो मनात म्हणाला, ग्रेट म्हणजे आज भावी मिसेस प्रतिक पण आलेल्या आहेत तर...आणि काहीतरी विचार करत प्रतिकला मेसेज करुन गालातल्या गालात हसला.

मीना: (कॉल उचलत) अग कुठे आहात तुम्ही... दिसत नाही आहात...आम्ही कधीची वाट पाहत आहोत..

प्रेरणा: अग आलो आम्ही... पण तुम्ही कुठे दिसत नाहीत

मीना: (उभी राहून प्रेरणाला बघून हात दाखवत) हे बघ सेकंड लाईन मध्ये...

तसे विवेक, प्रेरणा आणि आशिष सगळे मीनाच्या इथे पोहचले. त्यावेळी राजीव रेखा बरोबर कॉल वर होता.

मीना: (प्रेरणाला पाहून) वाह आज एकदम मस्त दिसते आहेस...

प्रेरणा: thank you.. तू पण छान दिसते आहेस... पण साडी नेसणार होतीस ना...

मीना: अग लग्नात नेसेन... आणि by the way तेव्हा तुला पण नेसावी लागेल माझ्या बरोबर...

प्रेरणा: हं (हसत) तेव्हाच तेव्हा बघू...समिधा कुठे दिसत नाही...

मीना: आम्ही आलो तेव्हा त्यांचा ओटी वगैरे भरण्याचा अर्धा कार्यक्रम झाला होता... आणि आता चेंज करायला गेले आहे ती...मग  आल्यावर एंगेजमेंट होईल...

प्रेरणा: (अभिजितला पाहून) हॅलो जीजू कसे आहात...आणि थांबा तुम्हाला ओळख करुन देते... असं म्हणत तिने विवेक आणि आशिषशी त्याची ओळख करून दिली....तोपर्यंत राजीवने ही कॉल ठेवला असल्याने प्रेरणाने त्याची पण त्या दोघांना ओळख करून दिली.. राजीव त्या सगळ्यांना काही ना काही किस्से सांगून हसवत होता... पण प्रेरणाच लक्ष मात्र दरवाजाकडेच लागून होतं... तिच्या मनाला प्रतिक कधी येईल याची आतुरता लागून राहिली होती...राजीवच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही... त्याने हॉल मध्ये लवकर येऊ नकोस म्हणून आधीच प्रतिकला मेसेज केलेला तो किती योग्य होता हे आठवून त्याचं त्यालाच कौतुक वाटत होतं... थोड्याच वेळात राहूल आणि समिधा स्टेजवर आले. फोटोग्राफर त्यांचे एन्ट्रीचे फोटोज घेत असतानाच प्रेरणाला घरुन कॉल आला..हॉलमध्ये ऐकू येणार नाही म्हणून ती विवेकला सांगून कॉल वर बोलण्यासाठी म्हणून बाहेर गेली..तिचं बोलणं झालं आणि ती हॉलमध्ये पुन्हा जाणार तेवढ्यात तिला कोणाचा तरी जोरात धक्का लागला. त्या धक्क्याने ती आता खाली पडणार तेवढ्यात तिला कोणीतरी अलगद कमरेला पकडलं... त्या स्पर्शाने तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते... भीतीने बंद केलेले डोळे तिने अलगद उघडले... प्रतिकला समोर पाहून तिची नजर आपसूकच त्याच्या नजरेला भिडली...दोघेही एकमेकांमध्ये गुंतलेले असताना प्रतिकला कॉल करण्यासाठी म्हणून बाहेर आलेल्या राजीवने दोघांना असं पाहून त्याच्या मोबाईल कॅमेरामध्ये त्यांचा फोटो काढला आणि त्याने हॉलमध्ये जाऊनच प्रतिकला मिसकॉल दिला. मोबाईलच्या रिंगने दोघेही भानावर आले. तसं प्रेरणाने स्वतःला सावरलं आणि ती प्रतिककडे न पाहताच हॉलमध्ये निघून गेली. तसा लपून राहिलेला राजीव बाहेर येत प्रतिककडे पाहून हसला... प्रतिक ही मग काही घडलंच नाही असं दाखवत राजीवला म्हणाला, जाऊया का आता आत मध्ये...!!!

राजीव: (मोबाईल मधील फोटो दाखवत) जाऊया जाऊया...घाई काय आहे... आधी हे तर बघ...

प्रतिक: (फोटोकडे पाहत) हा कधी काढलास तू...??

राजीव: (हसून) जेव्हा हिरोईनला हिरोने पडण्यापासून वाचवलं होतं...

प्रतिक: डिलीट कर बघू आधी तो...

राजीव: नक्की का...? मग नंतर बोलू नकोस का डिलिट केला ते...घे केला डिलिट...

प्रतिक: (मूड ऑफ होत) खरच केलास...

राजीव: (जोरजोरात हसत) तो फोटो डिलिट करण्यासाठी थोडी ना काढला राव मी... चल आता जाऊ...ज्या कार्यक्रमासाठी आलो तो कार्यक्रम अटेंड करु... तसे दोघेही हॉलमध्ये गेले.

 

राजीव आणि प्रतिक सगळे जिथे सेकंड लाईन मध्ये होते तिथे पोहचले. प्रेरणा आणि प्रतिक एकमेकांना कळणार नाही असं एकमेकांकडे पाहत होते... आणि राजीव गालातल्या गालात हसत त्या दोघांची चाललेली आंधळी कोशिंबीर पाहत होता. थोड्या वेळाने मीनाने प्रेरणाला हात लावत आता एंगेजमेंट स्टार्ट होईल म्हणून सांगितलं.. तसं दोघीही समिधा आणि राहुलकडे पाहू लागल्या. स्टेजवर समिधा आणि राहुलला घरच्यांनी रिंग दिल्या... दोघांनी त्या एकमेकांना घालताक्षणी  party crackers त्यांच्यावर उडवण्यात आले आणि सगळयांनी टाळ्या वाजवल्या. दोघांनी एकमेकांना स्वीट्स भरवून मग केक कापला...photograpaher त्यांचे वेगवेगळ्या angle ने फोटोज घेत होता आणि मध्ये मध्ये त्यांना स्टेजवर शुभेच्छा आलेल्या लोकांचे आणि इतर लोकांचे ही फोटो घेत होता. दोघांचे ही आईबाबा सगळ्यांना आठवणीने जेवून जा म्हणून सांगत होते. मीना, प्रेरणा आणि बाकी सगळेही आता दोघांना शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर आले. समिधाने सगळ्यांची ओळख राहुल बरोबर करुन दिली. फोटोग्राफरने फोटो काढताना फोटोची अरेंजमेंट करताना नेमकं प्रतिकला प्रेरणाच्या बाजूला उभं राहायला सांगितलं....प्रतिकचा क्षणभरासाठी हाताला चुकून झालेला स्पर्शही प्रेरणाच्या हृदयाचे ठोके वाढवत होता...फोटो काढून झाला तसे समिधाने सगळ्यांना जेवून घ्या म्हणून सांगितले.... मागोमाग समिधाच्या बाबांनी ही त्यांना जेवून घ्या म्हणून सांगितले. प्रेरणा आणि प्रतिक एकमेकांना पाहत जेवत होते... दोघेही एकमेकांना पाहत आहेत हे आता मीनाच्या ही लक्षात आलं होतं...आणि त्या दोघांना पुन्हा असं पाहून राजीवच्या मनात एक वेगळाच प्लॅन शिजत होता. सगळ्यांच जेवून झालं तसं त्यांनी समिधा आणि राहूलबरोबर सेल्फी काढून त्यांना परत एकदा अभिनंदन करून निरोप घेतला. मीना सगळ्यांना बाय बोलून तिच्या मि बरोबर बाईकने घरी गेली. विवेक ola बुक करायला जाणार तेवढ्यात राजीव प्रतिकला म्हणाला, प्रतिक तुला घाई नसेल तर तू तिघांना सोडशील का...? 

तसा प्रतिक म्हणाला, हो चालेल...

विवेक: सर आम्ही जाऊ तुम्ही कशाला त्रास घेत आहात... येईल थोड्या वेळात ola.. बुक केल्यावर लगेच...

राजीव: (विवेकच्या खांद्यावर हात ठेवून) अरे सोडतोय म्हणतोय ना तो...आणि विवेक मला तुझा नंबर देऊन ठेव...मघाशी आशिषचा घेतला..तुझा घेणार होतो तेवढ्यात एंगेजमेंट सुरु झाली आणि मग राहूनच गेलं...

विवेक: ओके सर मी तुम्हाला whatsapp करतो...तुमचा नंबर मी मघाशी सेव्ह केला आहे.

प्रतिक: (राजीवला उद्देशून) तुझं झालं असेल तर निघू का आम्ही...? आशिष तू कुठे राहतोस... म्हणजे त्या directiom ने drive करायला बरं...

आशिष: सर, मी विरुद्ध बाजूला राहतो...मी जाईन....फार दूर नाही या हॉलपासून...माझं घर...

राजीव: (प्रतिकला) एक काम कर तू प्रेरणा आणि विवेकला सोड... मी बाईकने आशिषला सोडतो...

प्रतिक: ओके चालेल... then bye...(आशिषकडे पाहून) बाय आशिष...

प्रेरणा, विवेक: बाय राजीव सर...बाय आशिष...असं म्हणत दोघेही प्रतिकच्या मागोमाग त्याच्या कारपाशी गेले. प्रतिकच्या बाजूला विवेक बसला तर प्रेरणा मागच्या सीटवर जाऊन बसली तशी प्रतिकने कार सुरु केली...प्रतिक विवेकला काही ना काही त्याच्या कॉलेज संदर्भात विचारत होता...प्रेरणा त्यांचं फक्त बोलणं ऐकत प्रतिकला पाहत होती...प्रतिक अधून मधून त्याला काही ना काही नवीन गोष्टी सांगत होता... ज्या त्याला त्याच्या शिक्षणामध्ये उपयोगी पडू शकणाऱ्या होत्या...प्रेरणाला आज त्या निमित्ताने प्रतिक एक उत्तम मार्गदर्शक म्हणून ही पाहायला मिळाला. मध्येच प्रतिकने कार थांबवली तसं तिने बाहेर पाहिलं तर ते त्यांच्या बिल्डिंगच्या खाली पोहचले होते. विवेक आणि प्रतिक कार मधून खाली उतरले, तशी प्रेरणा ही उतरली.

विवेक: Thank you sir... तुम्ही आम्हाला घरी सोडायला आलात म्हणून...

प्रतिक: No need to say thanks Vivek...हे बघ तू माझ्या जागी असतास आणि आज जसा आपल्याला उशीर झाला असता तर तू ही सोडलंच असतं ना...तुझ्या फ़्रेंड किंवा टीम मेंबरला...?

विवेक: हो सर...

प्रतिक: मग पुन्हा Thank you बोलू नकोस... (प्रेरणाकडे पाहत) anyways चल good night... to both of you...

विवेक: गुड नाईट सर...

प्रतिक त्याच्याकडे पाहून हसला आणि बाय बोलून कारमध्ये बसून त्याने ती त्याच्या रस्त्याला वळवली.

प्रेरणाच्या मनाला मात्र प्रतिकचं इग्नोर करणं पुन्हा एकदा लागलं होतं.. ती त्याच्या जाणाऱ्या कारकडे पाहत तशीच उभी होती. तिला पाहून विवेक म्हणाला, दीदी चलायचं ना घरी...?

प्रेरणा: हो चल... असं म्हणून ती विवेक बरोबर घरी गेली.

****

 

प्रेरणा आणि प्रतिक दोघेही आपापल्या घरी पोहचले खरे... पण मनाने ते एकमेकांकडेच होते... दोघांच्या ही डोळ्यासमोर सतत तो हॉलच्या बाहेर प्रेरणा पडत असताना पकडलेला प्रसंग आठवत होता... प्रेरणा झोपण्याचा खूप प्रयत्न करत होती पण तिच्या डोळ्यासमोरून प्रतिकचा चेहरा जातच नव्हता..

प्रतिक ही whatsapp वर तिचा dp बघत बसला होता.. तोच त्याच्या whatsapp वर एक मेसेज आला...तो मेसेज पाहून त्याच्या चेहऱ्यावर छानसं हसू आलं..

 

क्रमशः

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...