अस्तित्व एक संघर्ष-भाग-३४

It is a story of a girl who faced such a situation where she was totally destroyed... and at one point she fights for her identity...

अस्तित्व एक संघर्ष

भाग-३४


समिधाने कॉल उचलला...ती काही बोलणार तितक्यात पलिकडून प्रेरणाची चौकशी करण्यात आली... ती सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊन मग म्हणाली, सर मला प्रेरणा संदर्भात बोलायचं आहे... म्हणजे एरवी मी हे तुम्हाला नसतं सांगितलं पण ही गोष्ट मला तुम्हाला सांगावी अशी वाटते आहे.

प्रतिक: हो बोल समिधा, काय सांगायचं आहे...?

असं म्हटल्यावर समिधाने प्रेरणाचं तिच्याशी झालेलं बोलणं सांगितलं.

समिधा: सर, प्रेरणाला पण तुम्ही आवडतात...

प्रतिक: तुला म्हणाली का ती असं...?

समिधा: नाही सर...पण तुमच्या बद्दल बोलत असताना तिच्या डोळ्यांत जाणवतं होतं मला...आणि सर, तुम्ही तिला इग्नोर करत आहात त्यामुळे तिला त्रास ही होतो आहे.

प्रतिक: (मनात विचार करत, राजीव म्हणाला होता तसंच घडतं आहे... प्रेरणाला त्रास होतो आहे माझ्या इग्नोर करण्यामुळे)

समिधा: (प्रतिक काही बोलत नाही आहे हे जाणवून समिधाला वाटलं त्याला ट्रेनच्या आवाजात काही ऐकू गेलं नाही) हॅलो सर, हॅलो....हॅलो...तुम्हाला ऐकू येतो आहे का माझा आवाज...

प्रतिक: हो समिधा...माझं एक काम करशील का...थोडं पर्सनल आहे म्हणून विचारतोय...?

समिधा: हो बोला ना सर...काय काम होतं...

प्रतिक: तू काही दिवस प्रेरणाकडे लक्ष देशील का...मला माहित आहे तिला माझ्यामुळे त्रास होतो आहे....पण तिला तिच्या फिलिंग समजून घेण्यासाठी मला तिला इग्नोर करावंच लागेल..

समिधा: हो सर...नक्की लक्ष देईन मी तिच्याकडे... आणि तसंच काहीसं सांगावं असं वाटलं तर तुम्हाला कळवेनही...

प्रतिक: thank you so much Samidha...

समिधा: welcome sir... आणि सर मला ही वाटतं की प्रेरणाला तुमच्या पेक्षा चांगला जोडीदार मिळूच शकत नाही..

प्रतिक: नाही समिधा, मला प्रेरणापेक्षा चांगला जोडीदार मिळू शकत नाही...आणि तिच्याशिवाय मी दुसऱ्या कोणत्या मुलीचा विचार ही करु शकत नाही...

समिधा मनात विचार करते... दोघेही एकमेकांवर किती प्रेम करतात... पण प्रेरणा तिच्या बाबतीत जे काही घडलं म्हणूनच अशी वागत असावी...मी माझ्या परीने या दोघांना एकत्र आणण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करणार आहे...

ती काहीच बोलत नाही आहे हे लक्षात आल्यावर प्रतिक म्हणाला, हॅलो समिधा... समिधा...देशील ना लक्ष प्रेरणाकडे...

समिधा: (भानावर येत) हो सर, आणि मी माझ्याकडून तुम्हाला जी मदत होईल ती करेन...

प्रतिक: thank you once again...आणि प्रेरणाला यातलं काही कळता कामा नये याची काळजी घे...

समिधा: हो सर, नक्की...तिला यातलं काही कळणार नाही...

प्रतिक: चालेल चल मी कॉल ठेवतो..

समिधा: ओके सर.

समिधाशी बोलणं झाल्यावर प्रतिक मोबाईल मधून प्रेरणाचा फोटो काढून तिच्या फोटोकडे पाहत म्हणाला, मी वाट पाहेन तुझ्या होकाराची...

****

राजीवने सांगितल्याप्रमाणे प्रतिक हल्ली प्रेरणाला सतत इग्नोर करु लागला होता...आणि प्रेरणाला ही या गोष्टीचा त्रास सतत होऊ लागला होता...समिधाही प्रेरणाला सांभाळून घेत होती.. दुसऱ्या दिवशी समिधाचा साखरपुडा असल्याने आज समिधा सुट्टीवर होती.. आज शनिवार असल्याने कस्टमरची फार गर्दी नव्हती.  त्यात हाफ डे असल्याने त्यांना पण समिधाच्या साखरपुड्याच्या तयारीसाठी वेळ मिळणार होता...दोघी ऑफिसची कामे आटपून प्रतिकला सांगून घरी जायला निघणार.. तोच प्रतिकने प्रेरणाला कॉल करुन केबिनमध्ये बोलावलं. 

प्रेरणा: मे आय कम इन सर...

प्रतिक: (तिच्याकडे न पाहताच) येस कम इन मिस प्रेरणा...

प्रेरणा: सर तुम्ही बोलावलं होतं...

प्रतिक: ( रागाचा आव आणत) तू जी फाईल सेंड केली ती नीट चेक केली नाही वाटतं... असा निष्काळजीपणा मला तुझ्याकडून अपेक्षित नव्हता...

प्रेरणा: सॉरी सर, मी आता लगेच correction करुन तुम्हाला सेंड करते परत.. 

प्रतिक: अशा चुका पुन्हा होणार नाही याची काळजी घे...आणि मीनाला काम झालं असेल तर घरी जायला सांगा...

प्रेरणा: हो सर...असं म्हणून तिने डेस्कवर जाऊन मीना ला सरांचा निरोप दिला.

मीना: मी तुझं काम होईपर्यंत थांबू का...?

प्रेरणा: नको ग... तू जा ग घरी... मला चेंजेस करायला फार वेळ नाही लागणार... आणि उद्याची पण तयारी करायची आहे तुला... सो तू निघ ग...तसे ही सर खूप भडकले आहेत माझ्यावर... उगाच माझा राग तुझ्यावर निघता कामा नये...

मीना: ओके बाई... निघते मी... पण तू पण लवकर निघ...

प्रेरणा: हो निघते मी आटपून लवकर... उद्या भेटू मग हॉलमध्ये...

मीना: (पर्स खांद्याला लावत) हो हो चालेल... चल बाय..आणि घरी पोहचलीस की मेसेज कर...

प्रेरणा: हो ग नक्की.. बाय बाय...असं म्हणून तिने फाईल्सच काम करायला घेतलं..थोड्या वेळाने तिला प्रतिकचा कॉल आला.

प्रतिक: फाईल वर्क झालं का...?

प्रेरणा: हो सर...

प्रतिक: ओके मग लॅपटॉप घेऊन केबिनमध्ये ये...मला एकदा फाईल चेक करु दे...

प्रेरणा: ओके सर... मी येते...

(प्रेरणाकडून यापूर्वी कधीच काही चूक झाली नसल्यामुळे ती थोडी टेन्शनमध्ये होती... त्यात प्रतिकचं बोलणं ही तिच्या मनाला लागलं होतं...ती लॅपटॉप घेऊन प्रतिकच्या केबिन मध्ये गेली)

प्रेरणा: मे आय कम इन सर...

प्रतिक: येस कम इन...

प्रेरणा आत आल्यावर प्रतिकने तिला हातानेच समोरच्या चेअरवर बसायला सांगितले...प्रेरणाने चेअरवर बसून घेत लॅपटॉप मधील फाईल ओपन केली...ती काम करत असताना प्रतिक तिच्याकडेच पाहत होता...तिच्या पापण्यांची होणारी उघडझाप प्रतिकच्या हृदयाचे ठोके वाढवत होती...तेवढ्यात तिने प्रतिकला आवाज दिला...सर, तुम्हाला फाईल चेक करायची आहे ना...मी ओपन केली आहे... तसा प्रतिक भानावर आला... आणि तिच्या चेअरकडे गेला. तो तिच्या लॅपटॉपमध्ये फाईल बघू लागला...त्याला स्वतःच्या इतकं जवळ पाहून प्रेरणा त्याच्याकडेच बेधुंद होऊन पाहत होती...तोच प्रतिकने काही चेंजेस सांगण्यासाठी तिच्याकडे पाहिलं... तिला त्याच्याकडे एकटक पाहताना बघून त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं... तो मनाशीच म्हणाला, प्रेम तर तुझं ही आहे पण तुला ते मान्य करवत नाही आहे...हवेने तिच्या केसांची उडणारी बट पाहून प्रतिकला तिला बाजूला करण्याचं मन होऊ लागलं... तसं त्याने स्वतःला सावरलं आणि तिच्या लॅपटॉप पासून लांब होत त्याने तिला आवाज दिला....मिस प्रेरणा....तशी प्रेरणा भानावर येत म्हणाली, काय सर...? फाईल सेंड करु का...?

प्रतिक: नको... त्यात तुला काही चेंजेस करावे लागतील जास्त नाही फक्त एक दोन...असं म्हणून त्याने तिला कोणते चेंजेस करावे लागतील ते सांगितलं... 

प्रेरणा: ओके सर, मी जाऊ डेस्कवर...

प्रतिक: नको, एक काम करा इथेच चेंजेस करा म्हणजे मी लगेच चेक करेन आणि मेल सेंड करता येईल...

प्रेरणा: ओके सर...असं म्हणत प्रेरणाने पुन्हा तिचं काम करायला घेतलं...आणि प्रतिक तिला त्याच्या लॅपटॉपच्या आडून न्याहाळत राहिला...

प्रतिक मनात म्हणू लागला, आज files mistakes च्या निमित्ताने का होईना...प्रेरणाला आज मन भरुन पाहता येत आहे...तिची उडणारी बट जणू त्याच्या हृदयाचा ठाव घेत होती... प्रेरणाने चेंजेस केले आणि प्रतिककडे पाहणार तोच प्रतिकने डोकं त्याच्या लॅपटॉप मध्ये घुसवलं...

प्रेरणा: सर, तुम्ही सांगितलेले चेंजेस झाले...

प्रतिक: ओके लॅपटॉप बघू दे...

प्रेरणा: (लॅपटॉप प्रतिककडे वळवत) हो सर...

प्रतिक: (फाईल चेक करून) हां आता बरोबर आहे...मला सेंड कर लगेच आणि बाकीच्यांना पण cc मध्ये ठेव...

प्रेरणा: ओके सर...असं म्हणून तिने मेल प्रतिकला सेंड केला.

प्रतिक: yes received your mail...

प्रेरणा: सर, अजून काही काम होत का..?

प्रतिक: नाही मिस प्रेरणा...

प्रेरणा: ओके सर मी निघू का मग..?

प्रतिक: तू बॅग पॅक कर... मी सोडतो तुला...!!

प्रेरणा: नको सर मी जाईन घरी...

प्रतिक: मिस प्रेरणा, मी विचारलं नाही आहे...सांगतोय... मी सोडतोय घरी तुला...

प्रेरणा: ओके सर...असं म्हणून तिने लॅपटॉप बंद करुन ड्रॉवर मध्ये ठेवला आणि बॅग पॅक केली तोपर्यंत प्रतिक ही तिच्या डेस्क जवळ आला.

प्रतिक: निघायचं...

प्रेरणा: हो सर...

तसे दोघेही ऑफिसमधून निघाले... लिफ्टमध्ये कोणीही कोणाशी बोलत नव्हतं... दोघांना एकमेकांशी बोलायची इच्छा  तर खूप होती पण कसं बोलावं तेच कळत नव्हतं. लिफ्ट parking floor ला आली तसे दोघेही लिफ्टमधून बाहेर पडले. प्रतिकने कारचा front door open करुन प्रेरणाला बसायला सांगितलं....प्रेरणाला पुढे बसायचं नव्हतं पण प्रतिकला सांगायची हिंमत ही तिच्यामध्ये होईना..ती त्याच्या बाजूच्या सीट वर बसली तसं प्रतिकने कारचा दरवाजा लावून तो ही ड्राइविंग सीटवर बसला आणि कार सुरु केली.

दोघेही एकमेकांना एकमेकांच्या नकळत आरशा मधून पाहत होते...कार मधली शांतता दोघांना ही नकोशी झाली होती... शेवटी न राहवून प्रतिकने Radio FM स्टार्ट केलं... FM वर RHTDM movie मधलं गाणं सुरु होतं...

दिल को तुमसे प्यार हुआ

पहली बार हुआ

तुमसे प्यार हुआ

मैं भी आशिक यार हुआ

पहली बार हुआ

तुमसे प्यार हुआ

छाई है, बेताबी

मेरी जां कहो मैं क्या करूँ

दिल को तुमसे प्यार हुआ...

खो गया मैं खयालों में

अब नींद भी नहीं आँखों में

करवटें बस बदलता हूँ

अब जागता हूँ मैं रातों में

अब दूरी ना सहनी

हर लम्हां कहता है

ना जाने हाल मेरा

ऐसा क्यों रहता है

मैं दीवाना तेरा बन गया जाने जाना

मैं फसाना तेरा बन गया जाने जाना

हसीना गोरी-गोरी, चुराए चोरी-चोरी

चुराए दिल चोरी चोरी चोरी चोरी चोरी

दिल को तुमसे प्यार हुआ...

आरज़ू है मेरे सपनों की

बैठा रहूँ तेरी बाहों में

सिर्फ तू मुझे चाहे अब

इतना असर हो मेरी आहों में

तू कह दे हँस के तो

तोड़ दूँ मैं रस्मों को

मर के भी ना भूलूँ

मैं तेरी कस्मों को

मैं तो आया हूँ यहाँ पे बस तेरे लिए

तेरा तन-मन सब है मेरे लिए

क्या हसीं नजारा, समा है प्यारा-प्यारा

गले लगा ले यारा यारा यारा यारा यारा

मैं भी आशिक यार हुआ...

गाणं सुरु असताना दोघांचा पुन्हा एकमेकांना लपून छपून बघण्याचा खेळ चालू झाला. प्रतिक मनात विचार करु लागला हे गाणं आपल्यासाठी किती परफेक्ट आहे...आज माझ्या मनात कितीही प्रेरणाला सांगायची इच्छा असली तरी मी माझं तिच्यावरच प्रेम व्यक्त करु शकत नाही आहे. खूप त्रास झाला होता मला जेव्हा तिने माझ्या प्रेमाला सहानुभूतीचं नाव दिलं होतं... त्याचा मनात विचार चालू असतानाच Radio FM वरचं गाणं संपलं... आणि RJ मलिष्का म्हणाली, अभी आपने जो गाना सुना वो हर एक शक्स का फेव्हरेट सॉंग है... इस मूवी के बहुत सारे dialogue famous है... एक चीज तो मै खुद अक्सर करती हूं... जब भी आप confuse हो जाते हो तो अपनी आँखे बंद करलो... और आपको आपके सवाल का जवाब मिल जाएगा... पुढचे मलिष्काचे शब्द प्रेरणाच्या कानावर गेलेच नाहीत... तिने नकळत डोळे बंद करून विचार केला... की अशी कोणती व्यक्ती आहे जी तिला फॅमिली इतकीच प्रिय आहे...डोळे झाकल्यावर तिला लिफ्टमधून उचलून कारमध्ये बसवणारा...तिच्या बरोबर गार्डन मध्ये फेऱ्या मारणारा...तिच्या जवळ उभा राहून लॅपटॉप मध्ये फाईल बघणारा प्रतिक दिसला...त्याला पाहून तिने झटकन डोळे उघडले... सर मला का दिसले... नक्की का घडलं हे असं... तिला आता प्रतिककडे पहायची ही भीती वाटत होती... सरांना कळणार नाही ना मी आता काय विचार केला ते... ती खिडकीतून बाहेर पाहू लागली... तोच प्रतिकने कार थांबवली...कार थांबलेली पाहून तिने प्रतिककडे पाहिलं..

प्रतिक: काय घरी नाही जायचं आहे का..?

प्रेरणा: म्हणजे...?

प्रतिक: अग घर आलं तुझं...कुठे लक्ष आहे तुझं..?

प्रेरणा: (भानावर येत कार मधून उतरत) ओह सॉरी सर...आणि thank you sir...तुम्ही घरी सोडायला आलात त्याबद्दल...असं म्हणून ती जायला निघणार तेवढ्यात प्रतिकने तिला थांबायला सांगितलं.

प्रतिक: प्रेरणा एक मिनिट थांब..

प्रेरणा: (थांबत) हां सर...

प्रतिक: आज मी तुला खूप जास्त बोललो त्याबद्दल मनापासून सॉरी...

प्रेरणा: its ok sir... माझी mistake होती म्हणूनच तुम्ही मला ओरडलात ना...तुम्ही केलं ते योग्य केलं सर...

प्रतिक: तरी सुद्धा... sorry...

प्रेरणा: its ok sir....(विषय बदलत) सर तुम्ही उद्या येणार आहात ना समिधाच्या एंगेजमेंटला...?

प्रतिक: yes of course... its my team member's engagement.... सो भेटू उद्या हॉलमध्ये मग...बाय अँड टेक केअर... असं म्हणत प्रतिक तिला बाय बोलून त्याच्या घरी जायला निघाला.

क्रमशः

🎭 Series Post

View all