Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-३२

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-३२
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-३२


दुसऱ्या दिवशी प्रेरणा आणि समिधा ऑफिसमध्ये पोहचले. Security guard ने दोघींना गुड मॉर्निंग म्हंटल. 
दोघी: good morning.
समिधा: अरे प्रेरणा मॅडम का बुके किधर है ?
Guard: नहीं मॅडम, आज कोई बुके नही आया.?
समिधा: अरे, ऐसे कैसे...आप नहीं थे क्या जगह पे थोडी देर के लिए...?
Guard: मॅडम, मै इधर ही हूं कही नहीं गया.
प्रेरणा: (वैतागून) जाऊदे नको तो बुके...चल तू डेस्कवर.
तशा दोघी पण डेस्कवर गेल्या.
समिधा: तू एवढं का वैतागलेली आहेस..?
प्रेरणा: काही नाही ग.
समिधा: (काहीसं आठवून) येस येस तुला कालच्या बुकेवर असा मेसेज आला होता ना की तुला लवकरच कळेल कोण आहे ते...!! म्हणजे कळलं का कोण आहे ते...??
प्रेरणा: सोड ना...मला नाही पडायचं कशात.
समिधा: म्हणजे तुला कळलं आहे तर कोण आहे ते?? ठीक आहे नको सांगू..मी नाही तुला फोर्स करणार. पण तुला असं बुके पाठवण्या मागे त्या व्यक्तीचा चुकीचा हेतू तर नव्हता ना. तसं असेल तर आपण एकदा सरांच्या कानावर घालूया.
प्रेरणा: नाही...नको...त्यांना नको...सांगूस.
समिधा: ओके ग नाही सांगत पण मला उगाच कसली रिस्क नको म्हणून सरांना सांगितलेलं बरं असं वाटतं होतं...
प्रेरणा: (काहीसा विचार करून) ठीक आहे मी बोलते आज सरांशी.
समिधा: अग आज नको उद्या सांग...आज सर येणार नाही आहेत ना..त्यांची तब्येत ठीक नाही आहे..कालच मेसेज केला त्यांनी तसा..तुला पण केला असेल बघ.
प्रेरणा: हं केला असेल, मी नाही बघितला ग मोबाईल रात्री..
तेवढ्यात मीना आली तसं दोघींनी तो विषय थांबवला. पण प्रेरणाच्या डोक्यात विचार चालूच होते, सरांनी मला का नाही मेसेज केला..ते माझ्या बोलण्याने खरंच खूप hurt नाही ना झाले असतील...काय झालं असेल नक्की त्यांना...तब्येत ठीक नाही म्हणून सांगितलं ते... मी कॉल करु का त्यांना...उचलतील का ते...नको नको मेसेजच करते...कॉल करुन मी काय बोलू ते ही कळत नाही आहे मला.

प्रेरणाच्या डोक्यात विचार चालू असतानाच मीनाने तिला कामासाठी आवाज दिला... प्रेरणा...तिचं लक्ष नाही आहे ते पाहून मीना तिच्या डेस्ककडे आली.
मीना: (प्रेरणाला हात लावून) काय ग कसला एवढा विचार करतेय... मघाचपासून तुला आवाज देते आहे तुझं लक्ष कुठे आहे... तब्येत ठीक नाही आहे का तूझी...?
प्रेरणा:(भानावर येत) नाही ग ते माझं ऑफीसच काम डोक्यात चालू होतं....
मीना: हं नक्की ना.
प्रेरणा: हो ग...बोल काय काम होतं...? तसं मीना ने तिला तिचं असलेलं ऑफीसच काम सांगितलं. तसं प्रेरणाने तिला हवं असलेलं काम करून दिलं...आणि तिने स्वतःला ऑफिस च्या कामात झोकून दिलं... पण प्रतिकचा विचार मनातून तिच्या काही जाईना. तिने न राहवून त्याला मेसेज केला. पुन्हा आफ्टर लंच ब्रेक तिने त्याचा रिप्लाय आला आहे का बघितला पण राजीवने सांगितल्या प्रमाणे प्रतिकने तिचा मेसेज वाचला नाही...प्रेरणाने पुन्हा त्याला whatsapp वर मेसेज केला...प्रतिकचा रिप्लाय न आल्यामुळे ती खूप बैचेन होत होती.  तिला अस का वाटत आहे हे तिचं तिला ही कळत नव्हतं. कसाबसा ऑफीसचा दिवस भरुन ती घरी आली... तिने पुन्हा मोबाईल चेक केला... प्रतिकचा काही रिप्लाय आला नव्हता...शेवटी न राहवून तिने त्याला कॉल करायचं ठरवलं. प्रेरणाचा कॉल आलेला पाहून प्रतिकला कळेना, कॉल उचलू की नको ते... त्याने राजीवकडे पाहिलं... तसा राजीवने प्रेरणाचा कॉल उचलला. 
प्रेरणा: हॅलो सर, तुमची तब्येत कशी आहे..?
राजीव: हॅलो...मी प्रतिक नाही...मी राजीव बोलतो आहे...प्रतिकची तब्येत ठीक नाही त्यामुळे तो झोपला आहे...काही महत्त्वाचं काम होतं का...असेल तर उठवतो मी त्याला...
प्रेरणा: नाही नाही काही महत्त्वाचं काम नव्हतं..फक्त त्यांची तब्येत विचारायला कॉल केला होता... सर डॉ कडे जाऊन आले का...? काय म्हणाले डॉ...?
राजीव: हो जाऊन आलो डॉ कडे...ते म्हणाले, कोणती तरी गोष्ट त्याच्या मनाला खूप लागली आहे... आणि त्याच गोष्टीमुळे त्याची तब्येत बिघडली आहे..ऑफिसमध्ये काही झालं होतं का...?
प्रेरणा: (प्रेरणाला समजेना यावर काय बोलू ते) अं...नाही ऑफिसमध्ये तसं काही झालं नाही... सर मी नंतर बोलू का...आई बोलावते आहे मला... असं म्हणून तिने कॉल ठेवला.
तिने असा कॉल ठेवल्यावर राजीव हसला आणि मनात म्हणाला, इसका मतलब प्लॅन मेरा काम कर रहा है...
प्रतिक: राजीव, काय बोलली प्रेरणा...?
राजीव: काही नाही..
प्रतिक: काही नाही म्हणजे..
राजीव: as expected जे बोलेल असं वाटलं होतं तशीच बोलली...तुझ्या तब्येतीबद्दल विचारलं... डॉ कडे गेलास का विचारलं... डॉ काय म्हणाले विचारलं...
प्रतिक: मी मेसेज करु का तिला आता..?
राजीव: नाही बिलकुल नाही....उद्या तू ऑफिसचं काम करतोय पण वर्क फ्रॉम होम समजलं... आणि तसा ही उद्या शनिवार आहे...म्हणजे तुला डायरेक्ट सोमवारी जायचं आहे ऑफिसला...आणि आपला नेक्स्ट प्लॅन सोमवार पासून सुरु करू...समजतं आहे का तुला काही...
प्रतिक: हं... मला असं नाही वागायचं आहे रे तिच्याशी... तिला खूप वाईट वाटलं असणार...
राजीव:(खांद्यावर हात ठेवून) तुला हवी आहे ना ती आयुष्यात तुझ्या... मग मी म्हणतो तसं ऐकावंच लागेल...
प्रतिक: बरं... आता मला सांग मी तिच्या मेसेजचा रिप्लाय देऊ की नको..
राजीव: तुला हवं तर चेक कर पण रिप्लाय नको देऊस...
प्रतिक: असं का पण...तिला वाईट वाटेल रे...
राजीव: आपलं ठरलं आहे ना...तू मी सांगितलेलं ऐकणार आहे म्हणून...
प्रतिक: हो पण..
राजीव: पण बिन काही नाही... by the way तुझ्या ऑफिसमधल्या समिधाचा मला काल कॉल आला होता दुपारी... तिच्या साखरपुड्याचं आमंत्रण द्यायला...
प्रतिक: हो नेक्स्ट वीक ला आहे...संडे ला...
राजीव: बरं... आता एक काम कर उद्या तू घरून काम करतोय हे प्रेरणा सोडून बाकी दोघींना सांग...जसं काल सांगितलं तसंच...
प्रतिक: मला पटत नाही आहे असं वागणं पण तू ऐकणार नाही काही माझं...(समिधा आणि मीनाला मेसेज करतो) घे केला मेसेज दोघींना फक्त..
राजीव: ओके...आगे आगे सिर्फ देख होता है क्या...
त्याच्या या वाक्यावर प्रतिक त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत राहतो.

दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये सतत प्रेरणाची नजर प्रतिक कधी येईल याकडे लागून राहिली असते...10 वाजून गेले तरी प्रतिक नाही आला हे पाहून ती समिधाला म्हणाली, बहुतेक सर आजपण येणार नाही आहेत.
समिधा: अग तू whatsapp बघतेस की नाही कालच तर त्यांनी मेसेज केला ना की आज ते वर्क फ्रॉम होम करणार आहेत म्हणून...
प्रेरणा: (मनात विचार करते मला तर कोणता मेसेज नाही केला) अग मी बघितलं नाही whatsapp...
समिधा: बरं... ते राहूदे by the way माझ्या साखरपुड्याला यायचं आहे नक्की तुम्ही दोघींनी... बरोबर ७ दिवस बाकी राहिले.
प्रेरणा, मीना: हो ग येऊ आम्ही..
मीना: चल आता काम कर लवकर.. आज तसाही half day आहे आपला...उगाच काही पेंडिंग राहिलं तर थांबावं लागेल.
समिधा: हं येस बॉस.
प्रेरणाच्या मनात file work करता करता सतत प्रतिकचाच विचार चालू होता..माझ्यामुळेच सरांची तब्येत बिघडली आहे... पण मी तरी काय करु... मी लायक नाही आहे त्यांच्यासाठी... ते खूप चांगले आहेत पण मी त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेणं योग्य नाही... आज ना उद्या त्यांच्या मनातून माझा विचार निघून जाईल मग सगळं ठीक होईल..असा विचार करत असतानाच तिने तिचा मोबाईल चेक केला...आणि प्रतिकला मेसेज केला, सर, तुमची तब्येत आता कशी आहे...?

तिच्या मेसेजचं नोटिफिकेशन आल्यावर प्रतिकने पुन्हा ठरल्या प्रमाणे मेसेज बघितला नाही...आणि मनात म्हणू लागला, प्रेरणा इतकं माझ्यावर प्रेम करतेस तरी तू नकार का दिला मला... कसं पटवून सांगू मी तुला, मला सहानुभूती नाही ग तुझ्याबद्दल...माझं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर...

ऑफिसचा half day झाला तसं प्रेरणाने निघता निघता पुन्हा एकदा मोबाईल चेक केला. प्रतिकने तिचा मेसेज read च नव्हता केला. तिला ते पाहून खूप वाईट वाटलं आणि समिधाला काही कळता कामा नये म्हणून तिने मोबाईल बॅगेत ठेऊन दिला.

घरी गेल्यावर ही ती प्रतिकच्या मेसेजची वाट पाहत होती पण त्याने काहीच रिप्लाय दिला नाही. संध्याकाळी अचानक मालगुडे काका प्रेरणाच्या घरी आले आणि त्यांनी अनूची डिलिव्हरी होऊन मुलगी झाल्याचं सांगितलं. त्यांची ही बातमी ऐकून प्रेरणा सकट घरातले सगळेजण खूप खुश झाले. त्यांनी मालगुडे काकांचं अभिनंदन केलं. तसे मालगुडे काका सगळ्यांना thank you म्हणून घरी गेले.

दुसऱ्या दिवशी प्रेरणा आई बरोबर अनूला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली. त्यांना आलेलं पाहून मालगुडे काकूंनी त्यांना बसायला जागा करुन दिली.
प्रेरणा : अनू कशी आहेस, जास्त त्रास नाही ना होत आहे...
आई: त्रास डिलीव्हरी मध्ये होतोच ग...पण जेव्हा आपण बाळाला पाहतो तेव्हा सगळा त्रास कुठच्या कुठे निघून जातो...
मालगुडे काकू: (बाळाला हातातून आणत) अगदी बरोबर बोललात प्रेरणाची आई...(बाळाला देत) ही बघा नात आपली...
आई: (बाळाला पकडत) हं कशी मस्त शांत झोपली आहे... ए बाळा उठ... बघ तुझी आत्या आणि दुसरी आजी आली आहे तुला भेटायला...
प्रेरणा: आई मला पण घेऊ दे ना ग...
आई: (बाळाला देत) घट्ट पकड...सांभाळून घे.
प्रेरणा: (बाळाचे हात हातात घेऊन) उठ ना.. किती झोपशील...मी खास तुला भेटायला आले आहे. तसं बाळाने डोळे उघडले आणि ते आळस देत प्रेरणाकडे पाहू लागलं.
अनू: ओह हो, झोप पूर्ण झाली तर आमच्या राणीची...की आत्या आणि आजीला बघायला उठलात तुम्ही?
प्रेरणा: (बाळाकडे पाहून) सांग मम्मीला, हो आम्हालाच बघायला उठलीस तू म्हणून.
काकू: प्रेरणा, तू थांबशील का इथे थोडा वेळ... मी घरी जाऊन आंघोळ करुन आणि अनू साठी काही हवं असेल नसेल तर घेऊन येते...
प्रेरणा: हो चालेल काकू, मी थांबते इथे..
आई: मी पण निघते प्रेरणा...अनू काळजी घे तुझी आणि बाळाची पण. असं म्हणून आई आणि काकू दोघी घरी यायला निघाल्या.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...