Feb 24, 2024
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-३१

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-३१

अस्तित्व एक संघर्ष

भाग-३१


प्रेरणाला कोण असतील ते फ्रेंड्स...याच कुतूहल वाटत होतं. कधी एकदा गार्डनमध्ये पोहचते असं तिला वाटू लागलं. दोघेही गार्डनमध्ये पोहचले. प्रतिकने कार साईडला पार्क केली. तोपर्यंत प्रेरणा कोणी दिसत आहे का ते आजूबाजूला पाहू लागली.
प्रतिक: काय झालं...कोणाला शोधते आहेस..?
प्रेरणा: सर ते तुमचे फ्रेंड्स...?
प्रतिक:(हसून) अग ते इथे थोडीच थांबले असणार...आत मध्ये तर जाऊ...
प्रेरणा: (हसून) हां सर...माझ्या लक्षात नाही आलं ते...
तशी ती प्रतिकच्या मागे मागे चालत एका बाकड्यापर्यंत पोहचली...तसं प्रतिक तिथे थांबून म्हणाला, हे आहेत माझे खास फ्रेंड्स...प्रेरणाने त्यांना पाहिलं तर ते आजी आजोबा होते.
प्रेरणा: हे तर आजी आजोबा आहेत...!!
प्रतिक: हां हेच माझे फ्रेंड्स आहेत...ज्यांच्या बरोबर भेट घडवून आणायला मी तुला इथे घेऊन आलो...
आजी: मग आवडेल का तुला आमच्याशी मैत्री करायला...?
प्रेरणा: (हसून म्हणाली) हो का नाही...खूप आवडेल तुमच्याशी मैत्री करायला...!!
आजोबा: आणि या म्हाताऱ्याशी...?
प्रेरणा: हो तुमच्या बरोबर पण आजोबा...माझं नाव प्रेरणा...मी प्रतिकसरांच्या म्हणजे तुमच्या फ्रेंडच्या ऑफिसमध्येच जॉबला आहे त्यांना रिपोर्ट करते....
आजी: बरं...मी काय म्हणते पुन्हा कधी तरी येशील आम्हाला भेटायला...(प्रतिककडे पाहून) आमच्या या फ्रेंड बरोबर...आता यांची अपॉइंटमेंट आहे ना मग आम्हाला तिथे जावं लागणार आहे...त्यामुळे आता आम्हाला निघावं लागेल...
आजोबा: अपॉइंटमेंट कोणती अपॉइंटमेंट...
आजी: हे बघ...हे असे विसरतात...चला मी तुम्हाला सांगते रस्त्यात आधीच उशीर झाला आहे तुमची सुनबाई वाट पाहत असेल आपली...असं म्हणून आजीने आजोबाना हात देत उठवलं...
प्रेरणा: आम्ही पण निघतो मग...तुम्हाला सोडतो घरी...
आजी: अग नको...आम्ही जाऊ इथेच तर राहतो समोरच्या बिल्डिंगमध्ये....पुढच्या वेळेस ये सोडायला...आज आलीच आहेस तर आमचं म्हातारा म्हातारीचं आवडत फिरायचं ठिकाण बघून घे...
प्रेरणा: बरं आजी....असं म्हणून प्रेरणा आजी आजोबांच्या पाया पडली....(तसं आजोबा आजीने प्रतिककडे पाहून ऑल द बेस्ट केलं...तसा प्रतिक समजून गेला आणि त्यांच्याकडे पाहून हसला.) 
आजोबा: अग फ्रेंड म्हणते आणि पाया पडते आहेस...उठ...बाळा...
आजी: (प्रेरणा उठून उभी राहिल्यावर) आमच्याशी मैत्री करायची असेल तर हे असं चालणार नाही हा...
प्रेरणा: सॉरी चुकलं माझं....हां...नेक्स्ट टाइम पासून नाही करणार असं...
आजी: हं, ये हा पण नक्की...भेटायला आम्हाला पुन्हा....आणि प्रतिक, हिला आमचं गार्डन दाखव...असाच निघून गेलात तर याद राख...
प्रतिक: हो आजी, नक्की दाखवेन...
प्रेरणा: हो आजी...नक्की येईन मी पुढच्या वेळेला सरांबरोबर...असं म्हणून प्रेरणा आणि प्रतिकने आजी आजोबांना बाय केलं.

आजी आजोबा तिथून गेल्यावर प्रतिक प्रेरणाला म्हणाला, तुझी हरकत नसेल तर तुला हे गार्डन दाखवतो.
प्रेरणा: हं चालेल
प्रतिक:( उजवीकडे हात दाखवून) चल मग इथून सुरवात करु...
प्रेरणा: चालेल सर...
तसे दोघेही फिरु लागले..प्रतिक अधून मधून तिला काही ना काही सांगत होता...एका गुलमोहराच्या झाडाखाली असलेल्या बाकड्यावर दोघेजण पोहचले तशी प्रेरणा म्हणाली, सर...आपण थोडा वेळ बसूया का...?
प्रतिक: हो चालेल...
तसे दोघेही बाकड्यावर बसले. थोडा वेळ कोणीही कोणाशी बोलत नव्हत.
प्रेरणा: (गुलमोहराच्या फुलांकडे पाहत) किती छान वाटतात ना ही फुलं...
प्रतिक: हो ..प्रेरणा, तुझी हरकत नसेल तर मला तुझ्याशी काही बोलायचं आहे...(तोच गुलमोहराचं फूल प्रतिकच्या खांद्यावर पडलं... त्याने ते हातात घेऊन मनात म्हटलं, बहुतेक याला पण वाटतं मी प्रेरणाला लवकर विचारावं)
प्रेरणा: सर, बोला ना...
प्रतिक: प्रेरणा, तुला रोज सकाळी ऑफिस मध्ये बुके येतो... तुला जाणून घ्यायचं आहे का तो बुके कोण पाठवत ते...
प्रेरणा: (थोडं आश्चर्य वाटतं) हो सर, पण तुम्हाला माहित आहे का ती व्यक्ती..?
प्रतिक: ( प्रेरणा समोर गुडघ्यावर वाकून म्हणाला) ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही मी च आहे प्रेरणा...
प्रेरणाच्या डोक्यात समिधाने म्हटलेलं प्रोपोज करायचं वाक्य फिरू लागलं... तोच प्रतिक प्रेरणाचा हात हातात घेऊन म्हणाला, Prerna, I love you...and I want to marry you. तो पुढे काही म्हणणार तोच तिने तिचा हात त्याच्या हातातून काढून घेतला.
प्रेरणा: (त्याच्या कडे पाहत) सर, तुम्ही काय बोलताय हे...?
प्रतिक: (उठून उभा राहून) खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे... आणि मला तू माझ्या आयुष्यात माझी life partner म्हणून हवी आहे...
प्रेरणा: (त्याच्या कडे पाहत).. You are nice boss and person too... आणि खरं सांगू तर तुम्ही मला हे सगळं सहानुभूती पोटी बोलत आहात... (बाकड्यावरून उठत) सर, मी निघते...(डोळ्यातले अश्रू लपवत) मला नको आहे हे सगळं....
प्रतिक: थांब प्रेरणा... (स्वतःला सावरत) मी सोडतो तुला...
प्रेरणा: नको सर, जाईन मी, मला अजून कोणतीही सहानुभूती नको आहे....
प्रतिक: प्रेरणा, थांब...तू मला आताच म्हणाली ना मी एक चांगला बॉस आहे म्हणून...so..its my order....मी तुला घरी सोडतो आहे....
प्रेरणा: (स्वतःला पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करत) ओके सर..

प्रेरणाच्या मागोमाग प्रतिक कारच्या दिशेने गेला. त्याने तिला कारमध्ये बसायला सांगून कार सुरु केली. प्रेरणाच घर येईपर्यंत कोणीही एकमेकांशी काहीही बोललं नाही. प्रतिकची कार तिच्या घरापाशी पोहचली तसं त्याने कार थांबवली. प्रेरणा कार मधून उतरत प्रतिकला thank you sir म्हणून lift च्या दिशेने निघून गेली. प्रेरणा एकदा तरी मागे वळून पाहिलं म्हणून प्रतिक तिच्याकडे पाहत होता. पण प्रेरणाने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. ती दिसेनाशी झाली तसं प्रतिकने समिधाला प्रेरणाला घरी सोडल्याचा मेसेज केला आणि त्याने कार राजीवच्या घरच्या दिशेने वळवली.

प्रेरणा घरी पोहचली तोच तिला समिधाचा घरी पोहचली का म्हणून मेसेज आला. तिने तिच्या मेसेज चा रिप्लाय देऊन नेट बंद केलं आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. तिथे तिने थांबवलेल्या अश्रूंना मोकळी वाट करुन दिली. बराच वेळ प्रेरणा बाहेर आली नाही म्हणून आईने तिला आवाज दिला. तशी प्रेरणा डोळे पुसून चेहऱ्यावर पाणी मारून काही झालंच नाही अशा आविर्भावात बाहेर आली.
आई: काय ग इतका वेळ का लागला....
प्रेरणा: काही नाही ग आई, ते मी अंघोळ करत होते... खूप काम होतं ना आज ऑफिसमध्ये...सो अंघोळ करुन थोडं फ्रेश वाटलं.
आई: हं, जेवण वाढायला घेते मी... ये पटकन जेवायला...
प्रेरणा: हो आई आलेच मी....एक काम आठवलं मला, ते लगेच करुन आले...असं म्हणून ती बेडरूममध्ये निघून गेली.

प्रतिक राजीवच्या घरी पोहचला. प्रतिकला असं अचानक आलेलं पाहून राजीवला आणि त्याच्या आईबाबांना काही कळेना. आईने प्रतिकला बसायला सांगून पाणी दिलं.
राजीव: काय झालं प्रतिक, काही काम होतं का...? एकदम अचानक आलास...
प्रतिकला काही महत्त्वाचं बोलायचं असेल हे लक्षात आल्याने राजीवचे बाबा राजीवला म्हणाले, अरे एक काम कर तुम्ही दोघे निवांत तुझ्या रुममध्ये बोलत बसा..
राजीव: हो बाबा...
तसे दोघेही राजीवच्या रूममध्ये गेले. प्रतिक काही बोलत नाही आहे हे पाहून राजीव प्रतिकच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, सांगशील आता, तुझा चेहरा एवढा का उतरला आहे ते...
प्रतिक: (दुसरीकडे पाहून बोलत) छे छे कुठे काय, मी असाच आलो रे...
राजीव: हे बघ खोटं तू इतर कोणासमोर बोल हां... मी तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो...सो सांग आता काय झालं ते...
तसं प्रतिकने राजीवला सगळी गोष्ट सांगितली.
राजीव: तुला रडावं असं वाटत आहे का...? तसं असेल तर मोकळा हो...त्रास होईल तुला नाहीतर कुठेतरी...आणि असं बिलकुल समजू नकोस की मुलं कुठे रडत असतात...भावना या प्रत्येकाला असतात.
प्रतिक: (राजीवला मिठी मारून रडत) माझं खरंच प्रेम आहे रे प्रेरणावर...तिला माझं प्रेम म्हणजे सहानुभूती वाटते...
राजीव: हे बघ शांत हो....मी आलोच तुझ्यासाठी कॉफी घेऊन... आपण बोलू यावर थांब जरा... असं म्हणून राजीव कॉफी आणायला गेला. आई कॉफी तयार करून राजीवच्या रूममध्ये येतच होती, तोच राजीव किचनमध्ये पोहचला.
आई: अरे, मी आता तुझ्याच रूममध्ये येत होते.
राजीव: मी नेतो.... तू आणि बाबा जेवून घ्या...मला जेवायला उशीर होईल...मी आणि प्रतिक एकसाथच जेवू....आणि जमलं तर प्रतिकच्या बाबांना सांगशील का, प्रतिक आज आपल्याकडेच राहणार आहे ते...?
आई: हं चालेल... काही टेन्शन नाही ना...म्हणजे तो मघाशी तसा वाटला...?
राजीव: आई, आपण बोलू यावर नंतर कधीतरी...आता मी जातो, तुम्ही जेवून घ्या. असं म्हणून तो कॉफी घेऊन रूममध्ये आला. प्रतिक शांत बसून होता. त्याने कॉफीचा एक कप प्रतिकच्या हातात दिला.
प्रतिक: नको आहे मला...
राजीव: मी विचारत नाही आहे तुला देतो आहे...आणि घरी तुझ्या कळवलं आहे आज तू इथेच राहणार आहेस ते...
प्रतिक: हं...
राजीव: तुला प्रेरणा तुझ्या आयुष्यात हवी आहे ना...?
मग मी सांगशील ते ऐकशील?
प्रतिक: हो ऐकेन मी...
राजीव: उद्या ऑफिसला जाऊ नकोस मग...आणि समिधा आणि दुसरी कोण ती...(आठवून) मीनाला याबाबत फक्त कळवून ठेव. 
आणि कारण पण हेच दे की तुझी तब्येत ठीक नाही आहे.
प्रतिक: आणि प्रेरणा?
राजीव: तिला याबद्दल काही कळवायचं नाही आहे...
प्रतिक: असं का पण...
राजीव: तुला सांगतोय ना तेवढं ऐक माझं. आणि तिने मेसेज केला तरी read करायचा नाही आहेस.त्यापेक्षा एक काम कर तू नेटच बंद ठेव.
प्रतिक: हं ठीक आहे मी read नाही करणार तिचे मेसेज...
राजीव: हं, आणि सगळं आता माझ्यावर सोड...चल आता पटकन दोघींना मेसेज करुन ठेव. तसा प्रतिकने दोघींना मेसेज केला. दोघींनी त्याला थोड्या वेळाने take care sir म्हणून रिप्लाय दिला. 

दुसऱ्या दिवशीची सकाळ प्रेरणाच्या आयुष्यात एक नवीन गोष्ट घडवणार होती.

 

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ujwala Desai

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...

//