Oct 24, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-२७

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-२७

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

अस्तित्व एक संघर्ष
भाग-२७


प्रतिक ऑफिसमध्ये पोहचतो न पोहचतो तोच राजीवने त्याला कॉल करुन प्रेरणाच्या केसचा निकाल लागला असून आता तो  कोर्टातून घरी जात असल्याचं सांगितलं. राजीवला कोर्टातून बाहेर आलेलं पाहून सगळ्या मीडियाने त्याला घोळका घातला तसा राजीवने प्रतिकचा कॉल ठेवला आणि प्रतिकने प्रेरणाच्या बाबांना कॉल करुन निकाल लागल्याचं कळवलं. बाबा ही बातमी ऐकून खूप खुश झाले पण प्रेरणाला ही बातमी सांगावी की नाही या संभ्रमात ते पडले असतानाच प्रतिकने ही गोष्ट प्रेरणाला सध्या सांगू नये असं सांगितलं. बाबांना पण प्रतिकचं म्हणणं पटलं आणि त्यांनी ते तसंच करायचं ठरवून प्रतिकचा कॉल ठेवला.

प्रतिकने केबिनमध्ये गेल्यावर डॉ स्नेहा यांना प्रेरणाच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी हे विचारुन आणि समजून घेतलं. डॉ शी बोलणं झालं तसं त्याने HR ला कॉल करुन त्याच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. त्याने HR ला प्रेरणा ऑफिस जॉईन करणार असल्याचं सांगून तिला काही गोष्टी लक्षात आणून दिल्या आणि त्याप्रमाणे काळजी घेण्या संदर्भात त्याने तिला सांगून ठेवलं. तसं  HR ला ही त्याचं म्हणणं पटलं. तिने प्रेरणाला कोणताही त्रास होणार नाही याची खात्री त्याला दिली आणि ती तिच्या डेस्कवर ठरवलेल्या गोष्टी करण्यासाठी निघून गेली. HR निघून गेल्यावर प्रतिकने समिधा आणि मीना ला केबिनमध्ये बोलावून प्रेरणा ऑफिस जॉईन करत असून डॉ शी झालेलं बोलणं त्या दोघींना सांगितलं. तसं त्या दोघीनी सुध्दा तिला कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊ म्हणून सांगितलं आणि दोघीही आपापल्या डेस्कवर काम करायला निघून गेल्या. थोड्या वेळाने प्रतिकला प्रेरणाचा मेसेज आला.
प्रेरणा: मी ऑफिस जॉईन कधी करु शकते...? आणि काही प्रोसेस करावी लागेल का मला...?
प्रतिक: तू उद्या ही जॉईन केलंस तरी चालेल....आणि कोणत्याही प्रोसेस ची गरज नाही आहे...
प्रेरणा: ओके सर, मी उद्या पासून जॉईन करेन मग...
प्रतिक: प्रेरणा उद्या जॉईन होते आहे हे समजल्या पासून प्रतिक खूप खुश झाला..त्याने मनाशी काहीतरी ठरवलं आणि तो पुन्हा कामाला लागला.

प्रेरणाने घरी ती ऑफिस उद्या जॉईन करत असल्याचं सांगितलं.
बाबा: मी येऊ का बरोबर तुझ्या...?
प्रेरणा: बाबा, जाईन मी...!!
बाबा: अग मी स्टेशनवर तरी सोडेन...
आई: हो ग बाबा बरोबर बोलत आहेत...!!
प्रेरणा: (डॉ कडे जाताना ऑटो च्या वेळी झालेला प्रकार आठवत...काहीसा विचार करून) हां चालेल बाबा....पण संध्याकाळी मी येईन विवेक बरोबर....
बाबा: ठरलं तर मग...मी तुला स्टेशनला सोडायला येईन...
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. आईने दार उघडलं तर अनू कोथिंबिरीच्या वड्या घेऊन आली होती... आईने तिला आत घेत तिला बसायला सांगितलं.
आई: बस हां अनू, मी प्रेरणाला बोलावते...अग प्रेरणा, ही बघ अनू आली आहे..
(तिच्याकडच्या कोथिंबीर च्या वड्या घेऊन आई किचनमध्ये जाते..तोपर्यंत प्रेरणा बाहेर लिविंगरुम मध्ये येते)
प्रेरणा: (अनूच्या बाजूला बसत) मला तुला काही सांगायचं आहे....
अनू: हां सांग ना...
प्रेरणा: मी उद्या पासून ऑफिस जॉईन करते आहे....
अनू: ( प्रेरणाचा हात हातात घेऊन) वाह एकदम भारी न्यूज दिलीस....ऐकलं का बाळा तुझी आत्या उद्यापासून ऑफिसला जाणार आहे...
प्रेरणा: (हसत) बाळ थोडीच ऐकणार आहे....
अनू: (हसू नकोस) लहान मुलं आपलं बोलणं ऐकत असतात....जाऊदे तुला हे आता नाही समजणार....तेरा भी टाइम आयेगा...तब देख....ते सोड जाणार कशी आहेस....तू म्हणाली होतीस की तुला भीती वाटते म्हणून प्रवासाची...
प्रेरणा: कधी ना कधी सुरु तर करावंच लागेल ना मला....आणि मी आता डॉ ने सांगितल्या प्रमाणे मेडिटेशन सेंटर पण जॉईन करणार आहे सकाळचं...त्यांनी दिलेल्या नंबर वर कॉल करून सांगितलं मी आल्या आल्या...उद्या सकाळी तिथे जाणार आहे....
अनू: ओह ग्रेट, चांगलं असतं मेडिटेशन....मी करत होते ना....सहा महिने...आमच्या त्या घरी...तिथे एक लेडी होती शिकवायला तिच्याकडे जायचे...नंतर इथे येणं झालं आणि आता काही होत नाही माझ्याने...कधीतरी करते मी....मूड होईल तसा...
प्रेरणा: म्हणजे चांगलं आहे तर...मला खूप भीती वाटते ग....प्रवासाची म्हणण्यापेक्षा ऑटो मधून प्रवास करायची खूप भीती वाटते...आणि त्यात ही सतत असं वाटत राहतं की लोक माझ्याशी बोलतील की नाही...म्हणजे मला सतत असं वाटत की मी एकटी पडेन बाहेरच्या जगात...घरी आईबाबा, विवेक असतात त्यामुळे मनात असं येत नाही...त्यावेळी पण बाहेर पडायचा विचार करते तेव्हा सतत मनात हीच भीती असते माझ्या...
अनू: हे बघ आता जॉईन करते आहेस ना ....मग हळूहळू तुझ्या मनात असलेली भीती होईल कमी... काळजी करु नकोस... आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव, मनात जे असे विचार येतात ना ते कोणाशी तरी शेअर करत जा...आणि माझ्याशी शेअर करावं असं वाटलं तर I am any time ready to help you...चल all the best उद्यासाठी...आई वाट पाहत असतील माझी जेवणासाठी...
प्रेरणा: म्हणजे अजून बनवायचं आहे का...?
अनू: छे ग, आम्ही तिघे एकत्र जेवतो... आईबाबा आणि मी... आणि रात्री आदी असतो आमच्या बरोबर...
प्रेरणा: ओह असं होय... थांब मी येते तुला सोडायला...!!
अनू: अग शेजारी तर राहते मी...!!
प्रेरणा: तरी सुध्दा ग...
असं म्हणून प्रेरणा अनूला घरी सोडून आली. घरी आल्यावर अनूने मालगुडे काकी काकांना प्रेरणा ऑफिस जॉईन करत असल्याचं सांगितलं..
मि मालगुडे: वाह फायनली प्रेरणा ऑफिस मध्ये जायला सुरवात करणार...!!
मिसेस मालगुडे: पण तिला जमेल ना...? म्हणजे तिची अवस्था बघता काळजी वाटते तिची... आणि अनू पण आता म्हणाली ना की तिला ऑटोमध्ये बसायला भिती वाटते म्हणून...
मि मालगुडे: तुला काय वाटतं आदीची आई, माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे...!
मिसेस मालगुडे: सांगा बरं...
मि मालगुडे: आपली scooty काही दिवस प्रेरणाला स्टेशनला सोडण्यासाठी प्रेरणाच्या बाबांना दिली तर... आपला आदी तसा ही scooty स्टेशनला पार्क करतो आणि संध्याकाळी घेऊन येतो. त्याला आपण काही दिवस ऑटोने जायला सांगू...म्हणजे जोपर्यंत प्रेरणाच्या मनातली भिती निघून जात नाही तोपर्यंत... कसं वाटतं तुला...?
मिसेस मालगुडे: माझी काही हरकत नाही... अनू तुला काय वाटतं....?
अनू: मला पण काही प्रॉब्लेम नाही... उलट खूप मस्त सुचलं बाबांना...!!
मि मालगुडे: (हसून) आता आदी येईल ना संध्याकाळी तेव्हा त्याला पण विचारतो म्हणजे एकमताने आपण हा निर्णय घेऊ...!!
त्यावर अनू आणि मिसेस मालगुडे दोघीही हसल्या. संध्याकाळी जेव्हा आदी घरी आला आणि फ्रेश होऊन लिविंग रुम मध्ये बसला होता तेव्हा बाबांनी त्याला त्यांचं दुपारी झालेलं बोलणं सांगितलं. तसा आदी म्हणाला, हो चालेल बाबा मला...आणि तुम्हाला तुमच्या मुलावर विश्वास नाही का...मी या गोष्टीला कधीच नाही म्हणणार नाही. त्याचं हे बोलणं ऐकून बाबांना एकदम छान वाटलं. आदीने लगेच scooty ची चावी बाबांकडे दिली आणि म्हणाला, बाबा ही चावी तुम्ही काकांना आताच देऊन या..म्हणजे बरं पडेल त्यांना पण... आणि त्यांच्याकडेच राहू दे सध्या scooty... आदीच बोलणं ऐकून बाबा चावी घेऊन ते प्रेरणाच्या घरी गेले. 

दारावरची बेल वाजलेली ऐकून प्रेरणाच्या बाबांनी दार उघडलं... समोर मि मालगुडेंना पाहून त्यांनी त्यांना आत येऊन बसायला सांगितलं. तसे मि मालगुडे आत आले आणि दोघेही सोफ्यावर बसले.
मि मालगुडे: मला आमच्या अनूकडून कळलं की प्रेरणा उद्या पासून ऑफिस जॉईन करते आहे ते....!!
प्रेरणाचे बाबा: हो हो, ती उद्या पासून ऑफिस जॉईन करते आहे मी म्हणालो तिला मी सोडतो तुला ऑफिसपर्यंत... पण ऐकायलाच तयार नाही...शेवटी मी म्हणालो स्टेशनला तरी सोडत जाईन. काळजी वाटते तिची खूप.
मि मालगुडे: हो आम्हाला पण काळजी वाटते म्हणूनच आम्ही घरी काही निर्णय घेतला आणि त्याचसाठी मी आता तुमच्याकडे आलो.
बाबा: कसला निर्णय..?
मि मालगुडे: (बाबांच्या हातात चावी देत) ही आमच्या आदीच्या scooty ची चावी...तुम्ही ही तुमच्याकडेच ठेवा....आणि हीच घेऊन तुम्ही प्रेरणाला स्टेशनला सोडत जा.
बाबा: अहो राहूदे, नको नको...मी सोडेन प्रेरणाला...
मि मालगुडे: हे बघा मि प्रधान, माझी खूप इच्छा होती की आम्हाला पण एक मुलगी असावी...आणि मी प्रेरणाला माझी मुलगीच मानतो...आणि आदी तिला बहीण मानतो मग प्रेरणासाठी आम्ही एवढं पण करु शकत नाही का..? आणि एकदा का प्रेरणा मध्ये आत्मविश्वास निर्माण झाला एकट्याने प्रवास करायचा मग ती स्वतःहून प्रवास करु लागेल...तर मग तिच्यासाठी तरी नाही म्हणू नका...
बाबा: (बाबांना काय बोलावं ते सुचेना...तसं त्यांनी sccoty ने सोडायचं कबूल केलं)
प्रेरणाचे बाबा तयार झालेले पाहून मि मालगुडे खूष झाले. तोच प्रेरणा समिधाशी बोलणं संपवून त्या रूममध्ये आली.
मि मालगुडे: प्रेरणा, उद्या ऑफिसमध्ये जाते आहेस ना म्हणून मी आलो तुला भेटायला....
प्रेरणा: हो काका...बाबा स्टेशनला सोडणार मग मी पुढे ट्रेनने जाईन...तशी ऑफिसमध्ये एक फ्रेंड आहे ती भेटणार आहे सो दोघी एकत्र जाऊ ट्रेनने...
मि मालगुडे: अच्छा, पण संध्याकाळी पण तिच्याबरोबरच ये...आणि ऑफिसमधून निघालीस की घरी कॉल करुन सांग...
प्रेरणा: हो काका, नक्की कॉल करेन...
मि मालगुडे: चल बेटा येतो मी... सांभाळून जा..असं म्हणून मालगुडे प्रेरणा आणि बाबांचा निरोप घेऊन त्यांच्या घरी गेले. तसं बाबांनी प्रेरणाला त्यांचं घरी येण्यामागच खरं कारण सांगितलं.

दुसऱ्या दिवशी प्रेरणा सकाळी लवकर उठून कॉलेजमध्ये जायला निघालेल्या विवेक बरोबरच घरातून निघत मेडिटेशन सेंटरला गेली. तिचा तो पहिलाच दिवस असल्याने त्यांचं अर्ध्या तासाने सेशन संपलं तशी प्रेरणा घर जवळच असल्याने घरी चालतच आली. घरी आल्यावर तिने आईबाबांबरोबर नाश्ता केला आणि बाबांबरोबर ऑफिसमध्ये जाण्यासाठी आईला बाय बोलून निघाली.

क्रमशः

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...