मन उधाण वाऱ्याचे भाग -9

shravni has very luck that she got friends like kiran and shivani

     दोघेही शांत झाले . एक वेगळीच शांतता पसरली होती . दोघांच्या हृदय जोरात धडकत होत . हळू हळू श्रावणी पुढे आली आणि किरणच्या मिठीत गेली . किरणला सुखदः धक्का बसला . त्याच्या शरीरात वेगळीच वीज निर्माण झाली .

श्रावणी -" थँक यू सो मच किरण . "

       ती अजूनही मिठीत होती . दोघ वेगळ्याच जगात हरवून गेले होते . एका गाडीचा आवाज आल्याने दोघे खऱ्या जगात आले . हे लक्षात येताच श्रावणी मिठीतुन बाहेर आली . दोघेही आता लाजू लागले . लाजेने शब्दच निघत नव्हते . शेवटी श्रावणी म्हणाली .

श्रावणी -" आता मी जाते . बाय ."

ती हात हलवत म्हणाली . 

किरण -" थांब मला काहीतरी सांगायचं आहे ."

श्रावणी -" काय ?"

     किरणच्या डोक्यात अचानक विचारांचे रेल्वे धावू लागले . एक विचार सांगत होत कि ' प्रेमाची कबुली दे '. दुसरं विचार सांगत होत कि ' जर तिला तुझ्यावर प्रेम नसेल तर तू एका मैत्रिणीला हरवून बसशील . वृणाली या जगात नसताना ती अजून मैत्री जपून आहे . असल्या अनमोल मैत्रिणीला तू हरवून बसशील.' या विचाराने तो गोंधळात पडला . शेवटी तो म्हणाला .

किरण -" काय नाही . उद्या कॉलेजमध्ये भेटू .बाय . गुड नाईट ."

श्रावणी -" गुड नाईट .."

    ती मागे फिरली आणि घराकडे निघाली . रस्त्याच्या दिवेमधून ती नाहीशी झाली . तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत किरण गाडीवर बसला . प्रेमाची कबुली देण्याचं विचार तो सोडून दिला . तो तिच्या अनमोल मैत्रीला जपून घेणार होता . 

-------------------------------------------------------

वर्तमानकाळात -

    सुभाष , अनिकेत आणि किरण तिघेही जेवून खाणावळीतून बाहेर आले होते . 

किरण -" म्हणून मी तिला प्रपोज केलो नाही ."

सुभाष त्याची सगळी गोष्ट ऐकला . ऐकूनही तो शांत होता .

किरण -" मी बरोबर केलं का रे ?"

सुभाष -" तू परिस्तिथीशी निगडून वागलास . बरोबर केलास ."

अनिकेत -" पण मला चुकीचं वाटतंय ."

किरण -" का ?"

अनिकेत -" तू तेंव्हा प्रपोज केला असता आणि तिने तुझ्या प्रेमाचं स्वीकार केली असती तर तिच्यावर हि वेळ आली नसती ."

किरण विचारात पडला . त्याला त्याच म्हणणं पटत होत . 

सुभाष -" जर ती स्वीकार केली नसती तर ?"

सुभाषने प्रश्न विचारला .

अनिकेत -" तो अजून प्रयत्न केला असता . तिच्या मनात स्थान निर्माण केला असता ."

सुभाष -" मैत्री तुटली असती तर ?"

अनिकेत -" नंतर कसतरी मनवल असत ."

    एकाच दोन असं करत दोघात वाद सुरु झालं . किरणमध्ये पडला .

किरण -" अरे तुम्ही कशाला भांडताय . झालं ते झालं . ती आता इथे आहे . तिला सावराव लागेल ."

त्याच हे बोलणं ऐकून दोघे गप्प झाले .

किरण -" चला . उशीर होतोय . झोपायला लागेल . उद्या लवकर उठायचं आहे ."

अनिकेत -" तिच्याकडे जायचं असेल ना ."

तो चिडवत म्हणाला .

सुभाष -" मैत्री निभवायचं आहे ना  अजून ."

दोघे त्याचे खेचत होते .

किरण वैतागून म्हणाला .

किरण -" बस करा . खेचायचं आणि चला ."

   तिघेही आता मोकळ्या गल्लीच्या रस्त्यावरून जाऊ लागले . रात्र खूप झालेली होती . किरण आणि अनिकेत रूममध्ये पोहचले . वेळ न घालवता झोपी गेले .

---------------------------------------------------

        शिवानी आपल्या बेडवर शांत झोपलेली होती . इतक्यात श्रावणी शिवानीच्या खोलीत आली . ती नुकताच अंघोळ करून आलेली होती . तिने केसांभोवती टॉवेल गुंडाळलेली होती . दोघेही रात्रभर गप्पा मारत होते . त्यामुळे शिवानी अजून झोपलेली होती . श्रावणी खिडकी उघडली तशी बाहेरून पक्ष्यांचे किलबिलाट ऐकू येऊ लागलं . त्याबरोबर कोवळी ऊन हि आत आलं . श्रावणी शिवनीजवळ गेली आणि तिला उठवायचं प्रयत्न करू लागली .

श्रावणी -" शिवानी ... अग शिवानी उठ सकाळ झाली ."

शिवानी -" अग थोडं वेळच झोपू देत ."

ती कूस बदलत म्हणाली .

श्रावणी -" परत तुलाच उशीर होईल कामाला ."

नाईलाजाने ती उठली . डोळे चोळत म्हणाली .

शिवानी -" मला कॉफी हवीय ."

श्रावणी -" बाहेर डाईनिंग टेबलवर बस . मी आणते ."

     शिवानी डोळे चोळतच बाहेर आली आणि टेबलजवळच्या खुर्चीवर बसली . श्रावणी टेबलावर कॉफीने भरलेली कप ठेवली . श्रावणीही समोरच्या खुर्चीवर बसली .शिवानी झोपेतच कप उचलली आणि एक घोट पिली .

शिवानी -" वा ... खूप छान झालाय कॉफी ."

    इतक्यात तिची नजर श्रावणीकडे गेली . पिवळ्या रंगाची चुडीदार घातलेली , केसांभोवती टॉवेल गुंडाळलेली , तिचे चमकणारे डोळे , तिचे गुलाबी ओठ तिने कॉफीच्या कपला लावलेली . त्यात ती खूप सुंदर दिसत होती . 

शिवानी -" श्रावणी .."

श्रावणी घोट घेत म्हणाली .

श्रावणी -" काय ?"

शिवानी -" जरा उठशील ?"

श्रावणी -" का ?"

शिवानी -" उठ तरी ."

ती तिलाच पाहत म्हणत होती .श्रावणी खुर्चीवरून उठली .

शिवानी -" काय दिसतेस श्रावणी ! अगदी सुरेख दिसायलीस . मी जर मुलगा असते ना तुझ्यावर पार फ्लॅट झाले असते ."

    श्रावणी थोडीशी लाजली , पण ती चेहऱ्यावर दाखवून दिली नाही .

श्रावणी -" काहीही काय तुझं ?"

     इतक्यात दाराची बेल वाजली . शिवानी दाराजवळ गेली आणि उघडली . समोर किरण खांद्यावर बॅग अडकवलेला उभा होता .

किरण -" गुड मॉर्निंग ."

शिवानी -" गुड ... मॉर्निंग ."

ती जरा अडखळत म्हणाली . 

किरण -" आत येऊ ?"

शिवानी -" हा ये ."

    ती जागा देत म्हणाली . किरण आतमध्ये आला . श्रावणी त्याला बघत म्हणाली .

श्रावणी -" अरे किरण ये बस .. तुला कॉफी आणते ."

किरण -" हो नक्की आणि खायला काहीतरी आण ."

श्रावणी -" हो आताच आणते ."

     थोड्यावेळाने पोहेचा खमंग वास बाहेर येऊ लागलं . शिवानी वास घेत म्हणाली .

शिवानी -" अग पोहे लवकर आण . खूप भूक लागलाय ."

     श्रावणी ट्रेमध्ये तीन प्लेट घेऊन आली . तिघेही नाश्तेचा आस्वाद घेऊ लागले . 

श्रावणी -" किरण .."

तो पोहे खात म्हणाला .

किरण -" काय ?"

श्रावणी -" मला जॉब करायचं आहे ."

किरण -" पण तुझे डॉक्युमेंट ?"

शिवानी मधेच म्हणाली . 

शिवानी -" ते मागवू आपण .. टेन्शन नॉट."

किरण -" मग जॉब मिळेल ."

शिवानी -" मग आपण दोघे इथेच राहू . धमाल करू . वीकेंडला फिरायला जाऊ . मस्ती करू . तू तुझं नवीन जीवन आनंदीत  जगशील . " 

किरण -" आणि मग ट्रेकिंगला जाऊ ."

   हे ऐकताच श्रावणीला रडू कोसळलं . ती खाली बघून रडत होती. तिला रडताना पाहताच दोघेही उठले आणि तिच्याजवळ गेले . 

शिवानी -" अग काय झालं ?"

किरण -" काय झालं ?"

श्रावणी वर पाहत म्हणाली .

श्रावणी -" थँक यू यार ... मला नवीन जीवन दिल्याबद्दल ... तुम्हीच आता जग आहात माझ्यासाठी ..."

शिवानी -" वेडी आहेस का ?"

    असं म्हणत ती श्रावणीला मिठीत घेतली . किरणही मिठीत घेतला . श्रावणी दोघांच्या खांद्यावर हात घालत रडत होती . तिला आता कुठलीच चिंता नव्हती.

********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच येईल . हा भाग कसा वाटला हे  नक्की सांगा . आवडल्यास शेअर करा . सपोर्ट करा . धन्यवाद 

🎭 Series Post

View all