मन उधाण वाऱ्याचे भाग -8

kiran celebrates shravni’s birthday .

     तोही त्या जागेला पाहत म्हणाला . अखेर तिने केक कापला . किरण तिला विश केला . तिला केक भरवला . तिनेही त्याला केक भरवलं . एक केक चा तुकडा वृणालीच्या जागेवर ठेवली . . 

श्रावणी त्या जागेला पाहत म्हणाली .

श्रावणी -" थँक यू वृणाली ."

    दोघे आता खुश होते . पण किरणच काम अजून झालेलं नव्हतं . वाढदिवस अजून साजरा झालेला नव्हता .

किरण -" आता जायचं ?"

श्रावणी -" हा .."

    ती शेवटचं त्या जागेला पाहिली आणि तिथून निघाली . बाहेर गाडी बघताच म्हणाली .

श्रावणी -" गाडी कुणाची आहे ?"

किरण -" आज खास माझ्या मित्राकडून आणलीय . "

श्रावणी -" का ?"

किरण -" आज तुझा वाढदिवस ना .."

श्रावणी -" म्हणजे आज मला फिरवणार आहेस तर ?"

ती चेष्टेत म्हणाली .

किरण -" तू सांग कुठं जायचं ?"

श्रावणी -" तूच चल म्हणाला . घेऊन चल ."

किरण -" ठीक आहे ."

तो हसत म्हणाला .

   किरण गाडी वळवला . मागच्या सीटवर श्रावणी बसली . किरण गाडी चालवत होता . 

   खूप वेळ किरण गाडी चालवत होता . गाडी चालवत ते दोघे पुण्याच्या बाहेर आले होते . 

श्रावणी -" आपण कुठे चालोय ?"

ती किरणच्या कानाजवळ येऊन म्हणाली . 

किरण -" तुला कळेलच लवकर ."

    तो फक्त तेवढंच उत्तर दिला . श्रावणीला वाट पाहण्या व्यतिरिक्त दुसरं उपाय नव्हता . थोड्यावेळाने तो गाडी कच्च्या रस्त्यावरून घेतला . गाडी चालवताना श्रावणीला त्रास होत होता . अचानक कुठूनतरी पाण्याचा आवाज येऊ लागला होता .

श्रावणी -" अरे किरण . हळू ..." 

    इतक्यात तो गाडी थांबवला . श्रावणी पुढे पाहिली , तर तिचे डोळे चमकू लागले . 

किरण -" आता उतरणार आहेस का ? गाडीवरूनच बघणार आहेस ?"

    श्रावणी हे ऐकून गाडीवरून उतरली . ती काही पाऊले पुढे झाली . 

किरण -" हळू ... "

     पुढचा नजारा खूपच सुंदर होता . पुढे डोंगरांचे रांगा होत्या . पावसाळ्याचे दिवस होते . म्हणून सगळीकडे हिरवळच हिरवळ पसरलेला होता . त्यांच्या पुढे धुक्याचा चादर पसरलेला होता . ते दोघे एका दरीच्या टोकाला उभे होते . त्यांच्या बाजूनेच धबधबा खाली कोसळत होता . श्रावणी खाली पाहत होती . 

किरण -" अग हळू ."

ती किरणला म्हणाली .

श्रावणी -" किरण मला धबधब्याच्या खाली जायचं आहे ." 

    किरणला पाण्याच्या आवाजाने ऐकू येत नव्हतं . तो कानाला हात लावत म्हणाला . 

किरण -" काय ?"

ती मोठ्या आवाजात म्हणाली .

श्रावणी -" मला खाली जायचं आहे ."

किरण -" मग चल तर ."

     तो हात पुढे केला . त्याच्या हातामध्ये ती हात दिली . तो हात घेऊन घाटीच्या खाली उतरू लागला . खाली जाण्यासाठी छोटीशी पायवाट होती . पण उतार असल्याने हळू जावं लागत होत .जसजसे ते खाली जाऊ लागले , तसतसा पाण्याच्या आवाज वाढू लागला . 

    काहीवेळाने ते खाली आले . खालून धबधबा अजून सुंदर दिसत होत . वेळ न घालवता श्रावणी धबधब्याच्या खाली गेली . मनसोक्त भिजू लागली . ती भिजत असताना किरण तिला पाहतच राहिला . तिच्या चेहऱ्यावरील आनंदाचे थेंब खाली पडत होती . ती इशाऱ्याने किरणला भिजायला बोलावू लागली . पण तो मान कळवत नको म्हणत होता . हे पाहून ती धबधब्याच्या बाहेर आली आणि किरणला ओढत धबधब्याच्या खाली आणली . दोघेही आता भिजत होते . तिला आनंदी पाहून किरणला समाधान वाटत होत . 

खुपवेळ भिजून ते बाहेर आले . 

श्रावणी -" किती मस्त धबधबा आहे ! फोटो काढला असता तर ."

किरण -" एक मिनट ..."

तो बॅगजवळ गेला आणि बॅगेतून कॅमेरा बाहेर काढला .

श्रावणी -" तू कॅमेरा आणलास ?"

किरण -" हो . तुझ्या वाढदिवसाला हाच प्लॅन होता ."

श्रावणी -" अगदी मस्त . चल माझं फोटो काढ ."

     ती धावत धबधब्याच्या समोर गेली . किरण कॅमेरातून तिचे सुंदर फोटो काढू लागला . ती फोटोत अजून सुंदर दिसत होती . ती वेगवेगळी पोज देत होती . ती धबधब्याच्या भिजायला गेली . भिजत असताना किरण फोटो काढू लागला . तिची त्या नैसर्गिक स्मितवर किरण पार पिघळला . तिच्या त्या स्मित करणारी चेहऱ्याला कॅमेरात कैद करू लागला . 

      संध्याकाळ होत आलेली होती .काहीवेळ तिथेच थांबून ते वर आले आणि निघाले . त्यांचं अंग पार भिजून गेलेलं होत. भिजून त्यांना मज्जा तर आली होती . पण भूकही तितकीच लागलेली होती . 

श्रावणी -" किरण ..."

तो गाडी चालवत म्हणाला .

किरण -" काय ?"

श्रावणी -" मला भूक लागलीय ."

किरण -" हा . मला पण ."

   गाडीवर जात असताना किरणला रस्त्याच्या कडेला काही ठेले दिसले . किरण गाडी रस्त्याच्या कडेला थांबवला . 

किरण -" चल ."

श्रावणी किरणच्या मागे निघाली . तिला थंडी वाजत होती . 

किरण -" भैया ..दोन प्लेट गरमागरम वडापाव द्या ."

    ऑर्डर दिल्यानंतर ठेलेवाल्याने कढईत गरमागरम वडा सोडला . त्याचा वास सर्वत्र पसरला . काहीवेळात वडापाव दोघांच्या हातात होते . खूप भूक लागल्याने श्रावणी गडबडीत वडापाव खाऊ लागली . गडबडीत खाल्याने तिच तोंड जळालं . कशीबशी ती पहिल घास गिळली . 

श्रावणी -" खूप गरम आहे ."

    किरण खाताना फक्त ' हो ' म्हणाला .ती पुढील घास फुकून खाऊ लागली . त्या संध्याकाळच्या वातावरणात वडापाव खाताना त्यांना वेगळीच समाधान भेटत होत . खाल्यानंतर त्यांचं पोट आता शांत झालं . थोड्यावेळात अंधार होणार होता . पोट शांत झाल्यावर ते आता निघण्याची तयारी करू लागले . 

       किरण गाडी काढला . श्रावणी मागच्या सीटवर बसली . आजचा दिवस तिला आठवण राहणार होती . किती वर्षांनी तिने वाढदिवस साजरा केली होती . तेही वृणाली आणि किरणसोबत .... किरणने घेऊन गेलेल ठिकाण तर तीच उत्तम गिफ्ट होत . खूप काही विचार श्रावणीच्या मनात चाललेलं होत . अचानक गाडी थांबली . गाडीच्या धक्केने ती विचार करायचं थांबली . 

श्रावणी -" का थांबवलास ?"

किरण -" तुझं राहणार घर आलं . "

    तिथून तीच घर जवळच होत . रात्र झालेली होती . अंगात ओलेपणा अजूनही होती . रस्त्यावरचे दिवे उजाळा देत होते . रस्त्यावर वर्दळ कमी होती . नव्हतीच म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही . 

     श्रावणी गाडीवरून उतरली . उतरल्यावर ती किरणच्या समोर आली . किरणही गाडी स्टॅण्डवर लावून उतरला . 

श्रावणी -" किरण ... थँक यू . माझा दिवस चांगला बनवण्यासाठी ..."

किरण -" तुझं आज वाढदिवस होता .इतना तो बनता है ."

श्रावणी -" तुझं गिफ्टही छान होत ."

किरण -" ते तर होणारच ना ."

श्रावणी -" आणि धबधब्याचे ते फोटो मला दे हं ."

किरण -" हो .."

     दोघेही शांत झाले . एक वेगळीच शांतता पसरली होती . दोघांच्या हृदय जोरात धडकत होत . हळू हळू श्रावणी पुढे आली आणि किरणच्या मिठीत गेली . किरणला सुखदः धक्का बसला . त्याच्या शरीरात वेगळीच वीज निर्माण झाली .

श्रावणी -" थँक यू सो मच किरण . "

ती अजूनही मिठीत होती . 

********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती  

पुढील भाग लवकरच येईल . हा भाग कस वाटलं नक्की सांगा . या कथेत पुढे काय होईल तेही कंमेंट करून सांगा . आवडल्यास शेअर करा . धन्यवाद 

🎭 Series Post

View all