मन उधाण वाऱ्याचे भाग -7

Why shravni didn't celebrate her birthday?

    तो तयार झाला . नवीन कपडे , स्वतःवर परफ्युम मारला आणि कॉलेजला निघाला . कॉलेज पोहचताच तो सर्वात आधी वर्गात गेला . तिथे श्रावणी नव्हती . गार्डेनमध्ये पाहिला तर तिथेही ती नव्हती . शेवटी तो फोन काढला आणि श्रावणीला फोन लावला . फोन स्विच ऑफ दाखवत होता . किरणला आता चिंता वाटू लागली . तिला काही तर झालं नसेल ना ? हा विचार त्याच्या मनात गोंधळ निर्माण करत होती . 

      तो खूप चिंतेत होता . वर्गात तासालाही लक्ष लागत नव्हतं . अचानक त्याच्या खिशात असलेला फोन वाजला . त्याचा फोन सायलेंट मध्ये होता म्हणून इतरांना त्याचा आवाज आला नाही .बाकाच्याखालून तो फोन पाहिला , तर त्यावर श्रावणी अस नाव झळकत होत . त्याला फोन उचलू वाटत होत . पण तास चालू असताना घेता येत नव्हतं . 

तो उठला .

किरण -" सर ... "

प्रोफेसर किरणकडे पाहू लागले .

किरण -" सर मला बर वाटत नाहीये ."

त्याला काहीतरी करून बाहेर जायचं होत . म्हणून कारण सांगू लागला .

प्रोफेसर -" काय होत आहे ?"

किरण -" सर मळमळ होत आहे आणि उलटीही  होऊ शकते ." 

तो उलटी करण्याचा नाटक करू लागला .

प्रोफेसर -" आधी बाहेर जा ."

     किरण नाटक करत बॅग घेऊन बाहेर पडला . वर्गाच्या बाहेर पडताच खिशातून फोन काढला आणि श्रावणीला फोन लावला . काही रिंग वाजल्यावर श्रावणी फोन उचलली . 

श्रावणी -" हॅलो .."

किरण -" हॅलो . अग श्रावणी कुठे आहेस ? कॉलेजला का आली नाहीस ? तब्येत तर ठीक आहे ना ?"

ती शांतपणाने म्हणाली .

श्रावणी -" एका वेळेस किती प्रश्न विचारशील ?"

किरण शांत झाला . 

किरण -" तू कुठे आहेस ?"

श्रावणी -" स्मशानात ..."

किरण -" चेष्टा करत नाहीये मी ... खर सांग ."

श्रावणी गंभीर आवाजात म्हणाली .

श्रावणी -" मी खरच बोलत आहे ."

किरण -" काय करत आहे तिथे ?"

श्रावणी -" तुला इथे आल्यावर कळेल ?"

    किरण गोंधळात पडला . वेळ न घालवता तो स्मशानाकडे निघाला .

       काहीवेळात तो स्मशानाच्या बाहेर पोहचला . स्मशानाच्या गेटवरच त्याला श्रावणी उभी असलेली दिसली . ती स्मशानाच्या आत पाहत होती . तिची नजर एकीकडे लागून होती . मागून किरण आलेला सुद्धा तिला कळालं नाही . कित्येकदा हाक ऐकल्यावर ती शुद्धीवर आली . 

किरण -" तू इथे काय करायला आलीस ?"

श्रावणी -" तुला माहिती का आज काय आहे ?"

किरण -" हो . तुझा वाढदिवस ."

श्रावणी -" वृणालीचा अंत्यविधी .."

ती अजूनही गंभीर आवाजात बोलत होती .

किरण -" वृणाली कोण ?"

श्रावणी -" माझी मैत्रीण होती . शाळेपासून आम्ही दोघी मैत्रीण ... एकमेकांच्या घरी खेळायला असो किंवा अभ्यास करण्यासाठी असोत , आम्ही दोघी एकत्रच करत होतो . अकरावी व बारावी दोघीने एकत्रच केलं .  कॉलेजमध्येही आम्ही एकमकांशिवाय राहत नव्हतो . पण अचानक ती आजारी पडली . का कुणास ठाऊक ? पण तिला अगोदरपासून काहींना काही आजार होताच . हॉस्पिटलमध्ये नेल्यावर कळलं कि तिला ब्लड कॅन्सर आहे . मी तर पूर्ण हादरूनच गेले . मला काहीच कळत नव्हतं ."

किरण गप्प ऐकत होता . बोलत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले होते . 

किरण -" मग ?"

श्रावणी -" मग काय ? डॉक्टर म्हणाले कि तिच्याकडे मोजून 2 आठवडे आहेत आणि तिला ऍडमिट करून घेतले .मग मी ठरवलं कि या दोन आठवड्यात तिला खुश ठेवायचं . तिच्यासमोर मी कधीच दुःखी होणार नाही असं ठरवलं . दररोज सकाळचा नाश्ता , दुपारचा जेवण आणि रात्रीचा जेवण मीच तिला खाऊ घालत होते .आमच्या एवढ्या वर्षाचं मैत्री असं संपेल असं वाटत नव्हतं . अजून तिच्या जवळ एक आठवडा शिल्लक होता . तेवढ्यात माझं वाढदिवस आलं . ती हॉस्पिटलमध्येच माझा वाढदिवस साजरा करायचा असं हट्ट धरली होती . शेवटच्या काही दिवस उरलेल्या माणसाचं एवढंसं इच्छा तर पूर्ण करावं लागत . मग हॉस्पिटलमध्ये सगळी व्यवस्था करण्यात आली . केक , फुगे याच बंदोबस्त करण्यात आल . माझे आईवडील , तिचे आईवडील सगळे आनंदात होते . सर्वात जास्त ती आनंदात होती . मी केक कट केले . तिला भरवले , बाकी सर्वाना भरवले . पण अचानक वृणालीला धक्के बसू लागले . ते धक्के वाढतच होते . डॉक्टरांना बोलवण्यात आलं . ऑपेरेशन थेटरमध्ये तिला घेऊन जाण्यात आलं . काही तास उलटून गेले . डॉक्टर बाहेर आले आणि म्हणले कि तिच्या डोक्यात रक्ताची गाठ झाली होती ."

किरण मध्येच विचारला .

किरण -" होती म्हणजे ."

श्रावणी -" ती जग सोडून गेली होती . सगळे जोरात रडू लागले . एक आठवड्या पूर्वी ती मला सोडून गेली . माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ती सोडून गेली होती . शेवटचं बाय हि मी म्हणू शकले नाही . मला स्मशानमध्ये घुसूच दिले नाही ."

किरणला आता थोडं कळू लागलं होत .

किरण -" म्हणून तू जास्त मित्र बनवत नाहीस ?"

ती मान हलवली .

किरण -" आणि म्हणून तू वाढदिवसही साजरा करत नाहीस ?"

ती परत मान हलवली .तिच्या गालावरून अजून अश्रू वाहत होते . किरणला काही करावं लागणार होत .

किरण -" श्रावणी एक मिनिट हं . मी आलोच ."

ती लक्ष न देता परत स्मशानाकडे पाहत होती. किरण गाडी काढला .

      काहीवेळाने तो परत आला . त्याच्या हातात एक बॉक्स होत . तो श्रावणीजवळ गेला आणि तीच हात पकडला .

किरण -" चल ."

श्रावणी -" कुठे ?"

किरण -" तू फक्त चल बघू ."

     किरण तिला ओढत स्मशानाच्या गेटजवळ गेला . आत कुणीही नाही याची खात्री केला आणि गेट उघडला .

किरण -" चल ."

ते दोघेही आत गेले .

किरण -" तुला माहिती का वृणालीच अंत्यसंस्कार कुठं झालं होत ?"

     ती बोटानी जागा दाखवली .किरण तिला ओढत त्या जागेजवळ गेला आणि तिला त्या जागेजवळ बसवला . तो हातातला बॉक्स खाली ठेवला आणि बॉक्स उघडला . त्यात केक होता .

श्रावणी -" हे काय आहे ?"

किरण -" केक .."

श्रावणी -" पण कशाला ? मी नाही साजरा करत ."

किरण -" हे बघ श्रावणी . वृणाली तुला कुठेच सोडून गेली नाही . ती तुझी मैत्रीण होती . तिला कस वाटणार कि आज श्रावणीचा वाढदिवस आहे , पण ती साजराच करत नाही . ते पण तिच्यामुळे . तिला वाईट वाटणार ना . ती तुझी मैत्रीण होती नाही . ती आहे . आपल्या जवळ ."

    श्रावणी त्या जागेला पाहत होती . तिचे अश्रू गालावरून खाली येत होते . 

किरण -" आता चल . मी आणि वृणाली वाट पाहतोय तू केक कधी कापणार याची . होय का नाही ग वृणाली ?"

    तोही त्या जागेला पाहत म्हणाला . अखेर तिने केक कापला . किरण तिला विश केला . तिला केक भरवला . तिनेही त्याला केक भरवलं . एक केक चा तुकडा वृणालीच्या जागेवर ठेवले . 

श्रावणी त्या जागेला पाहत म्हणाली .

श्रावणी -" थँक यू वृणाली ."

दोघे आता खुश होते .

******************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच . हा भाग कसा वाटला नक्की सांगा . कंमेंट करा . आवडल्यास शेअर करा आणि मला फॉलो करा . धन्यवाद 

🎭 Series Post

View all