तेवढ्यात लेडीज टॉयलेट मधून एक मुलगी बाहेर आली . चुडीदार घातलेली , मोकळी केस सोडलेली , केसाची एक बट तिच्या नाजूक बोटानी कानाच्या मागे घेत असलेली , तीच होती श्रावणी ... तिला बघून किरण अगदी स्तब्ध उभा होता . तो तिच्यात हरवूनच गेला होता . एकदम त्याला सिनियर मुलांची आठवण आली . तो म्हणाला .
किरण -" एक्सक्यूज मी .."
हे ऐकताच ती थांबली . किरण खूप घाबरलेला होता . त्याच्या हातातलं गुलाबाचं फुल हातांसोबत थरथरत होत . तिचे सुंदर डोळे त्याला पाहत होते . हातातलं गुलाब तिच्यासमोर धरत म्हणाला .
किरण -" आय लव्ह यू ."
हे म्हणताना त्याचे डोळे बंद होते . श्रावणी चकित झालेली होती .
श्रावणी -" काय ??"
तो तसाच डोळे बंद करून उभा होता .बाजूचे सिनियर मुलं हसायला सुरुवात केले . त्यांना किरणची अवस्था बघून हसू येत होत . श्रावणी गोंधळलेली होती . अचानक तिची नजर सिनियर मुलांकडे गेली . त्यांना बघून श्रावणी सर्वकाही समजून घेतली . कारण तीच याच कॉलेज मधून अकरावी आणि बारावी झालेलं होत . ती समजून गेली कि सिनियर रॅगिंग घेत आहेत . आता पर्यंत कितीही तक्रार केलं तरीही काही फरक पडल नव्हतं . ती समोर पाहिली तर किरणच्या हातात गुलाब अजून तसाच होता . तिला भन्नाट कल्पना सुचली .
ती दोन पाऊल पुढे ठेवली . सिनियर मुलांना वाटलं कि ती आता थोबाडीत देणार . पण ती किरणच्या हातातलं गुलाब घेतली आणि लाजत म्हणाली .
श्रावणी -" आय लव्ह यू टू ."
हे ऐकताच किरण डोळे उघडला आणि चकित होऊन तिच्याकडे पाहू लागला . जे सिनिअरचे मुलं हसत होते , त्यांचं हसू थांबलं आणि चकित होऊन पाहू लागले . ती पुढे गेली आणि गाल ओढू लागली .
श्रावणी -" किती वेळ लावलास ? हे बोलायला ."
किरणला काहीच कळत नव्हतं . त्याच्या पेक्षा जास्त गोंधळात सिनियरचे मुले होते .
श्रावणी -" आता मी जाते ... बाय ."
ती अगदी अदा दाखवत हाताचे बोट हलवत होती . किरणही गोंधळात हात हलवला . त्याच्यासोबत आता काय घडलं याचच विचार करत तो पुढे जाऊ लागला .
त्याच्या दिवसाची सुरुवात वेगळीच झालेली होती . तो त्याच्या वर्गात पोहचला . वर्दळ तशी कमी होती . तासेला अजून सुरु झालेली नव्हती . आत पोहचताच किरणला मागच्या बाकावर श्रावणी बसलेली दिसली . त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच तेज दिसू लागल. तो वेळ न घालवता तिच्या बाजूच्या बाकावर बसला . तीच लक्ष पुस्तकात होत .
किरण तिच्या बाकावर हातानी जरा वाजवला . त्या आवाजाने ती पुस्तकातून डोकं वर काढली . किरणला पाहून ती म्हणाली.
श्रावणी -" तू ?? ..."
किरण -" हा .."
श्रावणी -" एक मिनिट .... तू प्रपोजच्या उत्तरबद्दल सिरीयस तर नाहीस ना ?"
किरण -" नाही .... पण त्याच्याबद्दलच बोलायचं होत ."
श्रावणी -" काय ?"
किरण -" तू असं का म्हणलंस ?"
श्रावणी -" मला कळलं होत कि तुझं रॅगिंग होत आहे . त्यात तुझी चुकी नाही . म्हणून सिनियर मुलांना मानसिक धक्का बसवण्यासाठी मी तस म्हणल ."
किरण -" तस मलाही धक्का बसलाच होता ."
श्रावणी -" तुझ्या चेहऱ्यावरून कळतच होत ."
ती किंचितशी हसली .
श्रावणी -" बाय द वे . मी श्रावणी ."
ती हात पुढे करत म्हणाली .
किरण -" मी किरण ."
तो देखील हात पुढे केला आणि हात मिळवला . तिच्या मऊ हाताच्या स्पर्शाने त्याच पूर्ण अंग शहारलं .
तेवढ्यात प्रोफेसर वर्गात आले व तासाला सुरुवात झाली .या पूर्ण तासात किरणच लक्ष श्रावणीकडेच लागून होती . तिची अदा काहीशी वेगळीच होती . विचार करताना दोन्ही ओठांमध्ये पेनला ठेवणं , नाजुकश्या बोटाने केसाला कानामागे घेणं . त्यातच त्याच लक्ष होत .
तास संपला , तशी ती उठली आणि बाहेर जाऊ लागली . तिच्या मागे तोही जाऊ लागला .
किरण -" हे श्रावणी ."
ती नाव ऐकताच मागे पाहिली .
श्रावणी -" काय ?"
किरण -" तुला काय तरी सांगायचं होत ?"
श्रावणी -" आय लव्ह यू ?"
तो किंचितसा हसला .
किरण -" नाही ... अक्चुअली थँक यू ."
श्रावणी -" मी असं थँक यु घेत नाही ."
किरण -" मग ?"
श्रावणी -" काहीतरी खाऊ घालावं लागेल ."
किरण त्यासाठी तर एका पायावर तयार होता .
श्रावणी -" ह्म ..."
ती विचार करू लागली .
श्रावणी -" काहीतरी चटपटा खाऊ वाटत आहे ."
किरण - " मग चल कॅन्टीनला .."
श्रावणी -" कॅन्टीन मध्ये नको . बाहेर जाऊयात ."
किरण -" चल मग ."
दोघेही कॉलेजच्या बाहेर आले . बाहेर येताच समोर त्यांना पाणीपुरीच्या गाड्यांचे रांग लागलेली होती .
श्रावणी -" चल तिथे .."
ते दोघे एका गाड्याजवळ गेले आणि पाणीपुरीची ऑर्डर दिले . पाणीपुरीचे प्लेट आले . ती पाणीपुरीवर ताव मारू लागली . तिच्या खाताना अदा पाहताच किरण स्तब्ध उभा राहिला . तो फक्त तिच्याच जगात हरवून गेला . आजूबाजूच्या आवाजाने त्याच लक्ष विचलित झालं . दोन पाणीपुरीचे प्लेट खाऊन झाल्यावर श्रावणी म्हणाली .
श्रावणी -" आता बस झालं . "
किरण -" अरे खा ना अजून ."
श्रावणी -"नाही ... परत कधीतर... मला आता जावं लागणार ."
किरण -" ओके आणि थँक यू ."
श्रावणी -" वेलकम अँड बाय ."
ती हात हलवली आणि घरी जाण्यासाठी लागली . तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो पाहत होता . ती रिक्षा मध्ये बसली आणि निघून गेली .
दिवस मजेत जाऊ लागले . त्या दोघांमध्ये चांगलीच मैत्री जमलेली होती . दररोज लेक्चरला सोबत बसणे , कधी तर लेक्चर सोडून बाहेर फिरत असे . लिखाणाचं काम असताना दोघेही एकाच बाकावर बसत असत आणि दोघे एकाच इअरफोननी गाणे ऐकत लिखाण करत असत . किरणला खाणावळच जेवण आवडत नसे , म्हणून श्रावणी घरून अधिकचा डब्बा आणत असे आणि जेवणाच्यावेळी एकत्र जेवत असे . कॉलेजमध्ये ते दोघे प्रेमाचा जोडाच आहे , असं समझ झालेलं होत . किरणच्या मनातील प्रेमाची भावना वाढतच चालली होती . ती जेवढी सुशील होती , तेवढीच ती मोकळ्या मनाची होती . असाच एक दिवस बसलेला असताना तो विचारला .
किरण -" तुझे जास्त मैत्रीण का नाहीत ?"
श्रावणी -" मी जास्त मित्र नाही बनवत ."
किरण -" का ?"
श्रावणी -" सहजच .."
तो गप्प झाला . त्याच उत्तर परत कधीतरी भेटेल यामुळे तो गप्प झाला .
दिवस होता 7 सप्टेंबर . आज श्रावणीच्या वाढदिवस . काहीतरी वेगळं करायच म्हणून किरण तयार होत होता . आजचा दिवस त्याला श्रावणीसाठी ठेवलेला होता . आज कोणताही तास नाही , कोणताही अभ्यास नाही . फक्त वाढदिवसाचा दिवस सोबत घालवायचा .
तो तयार झाला . नवीन कपडे , स्वतःवर परफ्युम मारला आणि कॉलेजला निघाला . कॉलेज पोहचताच तो सर्वात आधी वर्गात गेला . तिथे श्रावणी नव्हती . गार्डेनमध्ये पाहिला तर तिथेही ती नव्हती . शेवटी तो फोन काढला आणि श्रावणीला फोन लावला . फोन स्विच ऑफ दाखवत होता . किरणला आता चिंता वाटू लागली . तिला काही तर झालं नसेल ना ? हा विचार त्याच्या मनात गोंधळ निर्माण करत होती .
*****************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
पुढील भाग लवकरच . हा भाग कस वाटलं हे नक्की सांगा . कंमेंट करा . आवडल्यास नक्की शेअर करा . धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा