मन उधाण वाऱ्याचे भाग -5

The past of Kiran said to the subhash and Aniket while doing dinner .

किरण -" मग येऊ मी ?"

ती फक्त मान हलवली .

       तो पायऱ्या उतरत खाली उतरू लागला . तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती पाहत होती . ती का करत होती हे सगळं ? कदाचित त्याच्या प्रेमापोटी करत होती . 

     काहीवेळ ती त्याच्या आठवणीत हरवली . मग दार उघडून घरात गेली . श्रावणी खरेदी केलेल्या कपड्यांना घड्या घालत होती . शिवानीला बघताच ती स्मित करत म्हणाली .

श्रावणी -" आता काय खाणार ?"

      ती गप्प होती. ती जुन्या आठवणीत हरवून गेली होती .श्रावणी शिवानीला हलवत म्हणाली .

श्रावणी -" अग शिवानी ....."

शिवानी -" हा .."

तीच लक्ष विचलित झालं .

श्रावणी -" कुठं लक्ष आहे ?"

शिवानी -" कुठं नाही . तू काही तर बोलत होतीस ना ?"

श्रावणी -" मी म्हणत होते कि आता काय खाणार ?"

शिवानी -" मला भूक नाहीये ."

श्रावणी -" खरच ?"

शिवानी -" म्हणजे तस खास भूक नाहीये ."

श्रावणी -" पण थोडं आहे ना ?"

शिवानी -" हा आहे थोडस ."

श्रावणी -" थांब मी करते काहीतरी ."

शिवानी - " अग बाहेरून मागवू ना ."

श्रावणी -"अग माझ्या हातच एकदा खाऊन बघ ."

      एवढं बोलून ती किचनमध्ये गेली आणि सामानाची शोधाशोध करू लागली . काहीवेळाने छानस वास शिवानीला येऊ लागलं . वास येताच शिवानी किचनमध्ये गेली . 

शिवानी -" काय खमंग वास सुटलाय . काय बनवत आहेस ?"

      श्रावणी थालीपीठ बनवत होती . खमंग वासाने शिवानीला थालीपीठ कधी खावं असं झालेलं होत . 

शिवानी -" मला खायचं आहे ."

     तिच्या तोंडातून पाणी येत होत . श्रावणी एक प्लेट घेतली त्यात दही आणि गरमागरम थालीपीठ घालून दिली . शिवानी त्याच्यावर तुटून पडली . 

शिवानी -" खूप मस्त झालाय ."

श्रावणी -" मग अजून घे ."

ती अजून एक थालीपीठ ताटात ठेवली . 

शिवानी -" हा दे ."

श्रावणी -" भूक होती ना ? सांगायचं ना तस ."

     शिवानी खाण्यात व्यस्त होती . 

     दोघांचे खाऊन झाल्यावर ते सोफ्यावर बसून गप्पा मारू लागले . शिवानी तशी मॉडर्न होती आणि याच्या उलट श्रावणी अगदी सुंदर , सुशील मुलगी होती . तरीसुद्धा या दोघींमध्ये वेगळीच मैत्री निर्माण होऊ लागली होती .

------------------------------------------------------

       किरण नुकताच घरी पोहचला . दार उघडला तर अनिकेत आधीच आला होता . इअरफोन घालून तो मोबाइलमध्ये काहीतरी पाहत होता . किरणला पाहताच तो कानातलं इअरफोन काढला .

अनिकेत -" अरे आलास ?"

किरण -" काय वाटतंय तुला ?"

अनिकेत -" आलायस ."

किरण -" मग विचारतो कशाला ?"

अनिकेत -" अरे म्हणजे उशीर झाला तुला आज ."

किरण -" हो ."

अनिकेत -" काम होत का खूप ऑफिसमध्ये ?"

किरण -" मी ऑफिसला गेलो नाही ."

   अनिकेतला नवल वाटलं . काम पहिला म्हणणारा आज ऑफिसला गेला नाही यावर विश्वास बसायला त्याला वेळ लागणार होत .

अनिकेत -" मग कुठे होतास ?"

किरण -"शिवानीच्या घरी .”

अनिकेत थोडं आठवत म्हणाला .

अनिकेत -" हि तीच आहे ना जीने तुला प्रपोज केली होती ."

किरण आवरत म्हणाला .

किरण -" हो .."

अनिकेत -" मग अचानक तिच्या घरी ?? काय भानगड आहे ?"

तो किरणला चिडवत म्हणाला .

किरण -" अन्या .. जरा शांत बसतोस का ? तुला खाणावळला जाताना सांगतो . मला फ्रेश होऊदेत ."

अनिकेत -" बर .. पण लवकर चल . आधीच उशीर झालाय आपल्याला ."

तो बाथरूमकडे जात म्हणाला .

     काहीवेळाने दोघेही खाणावळला जेवण्यासाठी निघाले . खानावळ जवळच असल्या कारणाने ते चालत जात होते . त्यांचं ठरलं होत कि रोजच्या रात्रीच जेवणासाठी चालत जायचं . थोड्यावेळाने ते खानावळीच्या खाली ते आलेले होते . तिथे सुभाष आधीच होता . 

अनिकेत -" काय डॉक्टर साहेब . कस चालाय ?"

सुभाष -" मस्त . ते जाऊदेत . किरण तू सांग आज क्लीनिकला कोणाबरोबर आला होतास ?"

अनिकेत -" क्लीनिक ? तू तर म्हणाला कि शिवानीच्या घरी होतो म्हणून ."

किरण -" अरे सांगतो . बसा आधी ."

     ते जेवण्याच्या टेबल जवळ गेले आणि खुर्चीवर बसले . किरण सांगायला सूरूवात केला . तो सांगत असताना दोघांचे चेहऱ्यावरचे भावना बदलत होते . 

सुभाष -" म्हणून ते जखमा झाल्या होत्या तर .."

अनिकेत -" शिवानी मनानी चांगली निघाली यार ."

किरण -" चांगली निघाली म्हणजे ? ती चांगलीच आहे ."

अनिकेत -" मग तिचा प्रपोज रिजेक्ट का केलास ?"

किरण -" अरे मनामध्ये तिच्याबद्दल प्रेमाची भावना कधी आलीच नाही ."

अनिकेत -" का ?"

सुभाष -" त्याच मन श्रावणीत अडकलाय म्हणून ."

किरण चकित होऊन सुभाषकडे पाहत होता . 

सुभाष -" असं का बघायला ? तुला चांगलाच ओळखतो मी ."

किरण गप्प होता . त्याच शांत वातावरणात ते जेवण करू  लागले . 

सुभाष -" एक विचारू किरण ?"

किरण -" काय ?"

सुभाष -" तू तिला कॉलेज मधूनच प्रेम करत होता ना ?"

किरण -" हो ."

सुभाष -" मग तू तिच्या प्रेमात कधी पडलास?”

     किरणच्या चेहऱ्यावर आता छोटीसी स्मित पसरली होती .अनिकेत किरणला पाहत होता .

अनिकेत -" आता सांगणार आहेस ना ? आम्ही दोघे वाट पाहतोय ."

किरण -" कॉलेजमध्ये माझा पहिलाच दिवस होता . आधीच मला कॉलेज जॉईन होण्यासाठी उशीर झालेला होता . नवीन शहर होत म्हणून थोडासा बावरलेला होतो .....

--------------------------------------------------------

भूतकाळात -

        कॉलेजच्या प्रशस्त इमारत पाहून किरण त्यातच हरवला होता . खांद्यावर बॅग अडकवला होता . सगळीकडे नवीन चेहरे , नवीन वातावरण , नवीन अनुभव हे विचार करून त्याला वेगळीच भावना येत होत्या . घाबरत हि होता आणि उत्सुकही होता . तो इथे येताच पूर्ण कॉलेज फिरून काढत होता . तो कॉलेज पुण्यातील प्रसिद्ध कॉलेजपैकी एक होत . किरण खूप कष्ट करून इथे तो पुढील शिक्षण घेण्यासाठी आलेला होता . स्वतःच्या मेहनतीवर तो शिकण्यासाठी आला होता . 

        एका ठिकाणी काही मुले उभे होते . त्यातला एकजण किरणला हातवारे करून बोलवला . किरण उत्सुकतेने तिकडे गेला .

तो -" तू कोण आहेस ?"

किरण -" मी किरण . प्रथम वर्षाचा विद्यार्थी ."

तो बाजूंच्या मुलांकडे पाहत म्हणाला .

तो -" आपला शिकार सापडला रे ."

किरण -" आपण कोण ?"

बाजूलाच उभा असलेला मुलगा म्हणाला ," सिनिअरला प्रश्न विचारतो का रे ?"

किरण -" सॉरी ..."

तो -" आता आला आहेस तर एक काम कर ."

किरण -" काय ?"

तो -" ते पुढे लेडीज टॉयलेट दिसतोय का  ?"

किरण -" हो ."

तो -" तिथून पहिली कोण बाहेर  येईल त्याला प्रपोज करायचं ."

किरण -" का ??? नको .."

तो -" तू सिनिअरला नको म्हणत आहेस ?"

किरण -" हे बघा . रॅगिंग गुन्हा आहे . "

बाजूचे हसू लागले . किरण घाबरला होता . 

किरण -" मी जर हे केलं नाही तर ?"

     ते एकदमच हसण्याचं बंद झाले आणि एकदमच सगळे किरणच्या जवळ आले . किरण घाबरत म्हणाला .

किरण -" ठीक आहे . करतो ."

     त्यातला एक मुलगा गुलाबाचं फुल किरणला दिला . किरण घाबरत लेडीज टॉयलेट जवळ जाऊ लागला . तिथे जाऊन तो बाहेर थांबला . दुरून सिनियरचे मुलं त्याला पाहत होते .

    तेवढ्यात लेडीज टॉयलेट मधून एक मुलगी बाहेर आली . चुडीदार घातलेली , मोकळी केस सोडलेली , केसाची एक बट तिच्या नाजूक बोटानी कानाच्या मागे घेत असलेली , तीच होती श्रावणी ... तिला बघून किरण अगदी स्तब्ध उभा होता . तो तिच्यात हरवूनच गेला होता . एकदम त्याला सिनियर मुलांची आठवण आली . तो म्हणाला .

किरण -" एक्सक्यूज मी .."

हे ऐकताच ती थांबली .

*********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच . हा भाग कसा वाटला नक्की सांगा . फेसबुकच्या पोस्टवर प्लिज कंमेंट करून सांगा . तुमच्या कंमेंटनी मला कथा लिहिण्यासाठी स्फूर्ती भेटते . आवडल्यास नक्की शेअर करा . धन्यवाद 

         

🎭 Series Post

View all