मन उधाण वाऱ्याचे भाग -4

kiran asks the help to shivani . shravni get settled to shivani’s House .

किरण -" हॅलो ... शिवानी "

शिवानी -" हॅलो .."

किरण बोलताना  अडखळत होता .

किरण -" हॅलो .."

शिवानी -" कितीवेळा हॅलो बोलशील ? कशाला कॉल केलास ?"

किरण -" तू कुठे आहेस ?"

शिवानी -" फ्लॅटवर . का ?"

किरण -" एक काम होत ."

शिवानी -" काय ?"

किरण -" मी तिथेच येतो . थांब ."

शिवानी -" अरे ...."

      शिवानी पुढे बोलणारच होती कि त्याने फोन कट झाला .' असं कुठल काम असेल कि तो इथे येत आहे .' असं विचार शिवानी करू लागली . 

     किरण उठला तशी श्रावणीही उठली आणि किरण श्रावणीकडे पाहत म्हणाला .

किरण -" चल ."

श्रावणी -" कुठे ?"

किरण -" आता कोणताही प्रश्न तू विचारायचा नाहीस . चल "

      हे ऐकून ती शांत झाली आणि त्याच्या मागे जाऊ लागली .किरणने गाडी काढली आणि श्रावणी मागच्या सीटवर बसली .त्याने गाडी चालवायला सुरुवात केला . थोड्यावेळाने तो एका बिल्डिंगच्या खाली गाडी थांबवला . गाडी थांबताच श्रावणी मागच्या सीटवरून उतरली . 

किरण खिशातून फोन काढला आणि फोन लावला .

शिवानी -" हॅलो ."

किरण -" हॅलो शिवानी . मी अपार्टमेंटच्या खाली आलोय . प्लिज खाली ये ना . महत्वाचं काम आहे ."

     किरण विनंती करत होता. हे बघून तिलाही वाईट वाटलं , शेवटी तो तिचा प्रेम होता . शेवटी ती सोफ्यावरून उठली . दार बंद करून खाली आली . किरण आणि श्रावणी गाडीजवळ उभे होते . शिवानी पायर्यांवरून खाली आली . मॉडर्न ड्रेस , जीन्सची शॉर्ट घातलेली शिवानी हाताची घडी घालून उभी होती .

शिवानी -" काय काम आहे ?"

     किरण मागे वळून पाहिला . शिवानी गाडीच्या थोडी दूर उभी होती . किरण श्रावणीला तिथेच थांबायला सांगितला आणि शिवानी जवळ गेला .

किरण -" कशी आहेस ?"

शिवानी -" काम काय होत ?"

ती फक्त त्याच्या प्रेमापोटी आलेली होती . 

किरण -" माझ्या गाडीजवळ एक जण उभी आहे . पाहत आहेस का ?"

     ती गाडी जवळ पाहिली . श्रावणी त्या दोघांनाच पाहत होती .तिचे मळलेले कपडे , तिच्या कोपऱ्याला आणि कपाळावर लागलेला बँडेज , तरीही तीच रूप आकर्षित वाटत होत .

शिवानी -" हा मग ,तीच काय ?"

किरण -" तीच एक प्रॉब्लेम आहे ."

शिवानी -" पहिला ती कोण आहे सांग ?"

तो तिच्यावर प्रेम करत असला तरीही तो दुसर्यांना सांगण्यासाठी मैत्रीण म्हणून सांगत होता .

किरण -" मैत्रीण आहे ."

शिवानी -" बर ... बोल ."

      किरण श्रावणी सोबत काय काय झालं हे सगळ सांगितला . तिच्यासोबत घडलेली घटना ऐकून शिवानी आता थोडी शांत झाली . 

शिवानी -" माझ्याकडून काय हवं आहे ?"

किरण -" हि तर इथेच राहते म्हणते आणि तू एकटीच फ्लॅटमध्ये राहतेस . तू तिला राहू देतेस ? तुझं काय रेंट ते मी देतो ."

शिवानी थोडं विचार करू लागली . 

शिवानी -" ठीक आहे . पण ती परत नाही का जाणार ?"

किरण -" 1 महिना राहूंदेत . मीच तिला समजावतो . नंतर जाईल ती ."

शिवानी -" बर .. घेऊन ये तिला .."

    असं म्हणताच किरण गाडीजवळ गेला आणि श्रावणीला घेऊन शिवनीजवळ आला .

किरण -" श्रावणी ... हि शिवानी ..."

    श्रावणी चेहऱ्यावर स्मित पसरवत ' हॅलो ' म्हणाली . शिवानीही ' हॅलो ' म्हणत स्मित केली. 

किरण -" तू आज पासून हिच्या फ्लॅटवर राहायचंस ."

श्रावणी -" खरच ?"

ती आश्चर्याने विचारली .शिवानी स्वतःहून तिला म्हणाली .

शिवानी -" हो ... आता इथेच थांबणार आहे का घरी येणार आहे ?"

किरण -" येणार कि .."

     शिवानी पुढे झाली . किरण आणि श्रावणी तिच्या मागे जाऊ लागले . तिसऱ्या मजल्यावर तिच घर होत . शिवानी दार उघडली . तसे तिघेही आत आले . घर तस चांगलं सजवलं होत . सजावटीचे खूप सारे वस्तू होते . त्याच्यांनीच घर आकर्षित वाटत होत . 

शिवानी -" बसा . मी आलेच ."

        श्रावणी आणि किरण दोघेही घर पाहत सोफ्यावर बसले . थोड्यावेळाने शिवानी हातात दोन ग्लास घेऊन आली .

शिवानी -" हे घ्या ."

    दोघेही तिच्या हातातलं ग्लास घेतले . किरण त्या ग्लासमधील एक घोट घेतला . 

किरण -" हे तर कोल्डड्रिंक आहे ."

शिवानी -" मला चहा बनवता येत नाही आणि कामवाली बाई सुद्धा गेलीय ."

     ती जरा जोरातच ओरडली . त्या वरून किरणला कळाल कि शिवानी चिढलीय . तो जरा शांत झाला .

श्रावणी -" हरकत नसेल तर मी चहा बनवू का ?"

    ती जरा अडखळतच म्हणाली .शिवानी अचानकच तिच्याकडे पाहिली .

शिवानी -" ओके ."

     श्रावणी उठली आणि किचनमध्ये गेली . तिथे गेल्यावर चहाला लागणारी सगळ सामान शोधली आणि चहा करायला सुरुवात केली . काहीवेळाने चहाचा खमंग वास पसरला . शिवानी वास घेताच उठली आणि किचनमध्ये गेली . तिला चहा म्हणजे अगदी प्रिय पेय . 

शिवानी -" मस्त वास आहे . "

श्रावणी फक्त हसली . 

शिवानी डोळे बंद करून चहाचा वास घेऊ लागली .

शिवानी -" मला लवकरात लवकर चहा हवाय ."

श्रावणी -" दोन मिनिटात मिळेल ."

     थोड्यावेळाने श्रावणी तीन कपांमध्ये चहा घेऊन आली . शिवानी उत्साहाने चहाचा कप घेतली आणि आस्वाद घेऊ लागली .

शिवानी -" अगदी मस्त झालाय चहा ..."

श्रावणी -" थँक यु ."

ती हसत म्हणाली .

किरण -" मस्त झालाय ."

शिवानी -" हे एक मस्त झाल . रोज चांगला चहा मिळेल ."

     ती चहाचा आस्वाद घेत म्हणाली . चहा संपल्यावर तिघेही नुकतेच बसले होते . शिवानीच लक्ष श्रावणीच्या कपड्यावर गेलं . तिचे कपडे मळलेले होते . हे बघताच शिवानी म्हणाली .

शिवानी -" तुझे तर कपडे मळलेले आहेत ."

श्रावणी -" हो . थोडस मळलेल आहे ."

किरण -" आणि हि सोबत कपडे नाही आणली ."

शिवानी -" ह्म ."

शिवानी विचार करू लागली आणि म्हणाली .

शिवानी -" चल . शॉपिंग करायला ."

श्रावणी -" अग पण कशाला ? माझ्याकडे पैसेही नाहीत ."

किरण -" मी देईन कि ."

श्रावणी -" अरे पण कशाला ?.."

   ती वाक्य पूर्ण करणारच होती कि शिवानी तिला सोफ्यावरून उठवली .

शिवानी -" चल शॉप्पिंगला .."

    शेवटी तिने खरेदी करायला होकार दिली  . तिघेही फ्लॅटवरून निघाले . शिवणीकडे स्वतःची गाडी होती . ती गाडीवर बसली आणि हे दोघे किरणच्या गाडीवर बसले .

   थोड्यावेळात ते मॉलच्या ठिकाणी पोहचले . मॉल मध्ये वर्दळ तर होती . पण त्या प्रशस्त मॉल मध्ये ते वर्दळ काहीच वाटत नव्हतं . शिवानी श्रावणीला घेऊन महिलांच्या कपड्यांच्या दुकानात गेली आणि तिच्यासाठी कपडे घेतली . तिला दररोजच्या लागणारे सामानही खरेदी केली . किरण सगळे पैसे भरला . 

     तिघे मग आईस क्रीम चा स्वाद घेतले . तेवढ्यात संध्याकाळ होत आलेली होती . अखेर ते तिघे घराकडे निघाले .घरी येईपर्यंत सूर्य मावळतीला आला होता . फ्लॅटवर येताच शिवानी आणि श्रावणी खरेदी केलेल कपडे बघू लागले . तेवढ्यात किरण म्हणाला .

किरण -" मला आता निघावं लागणार ."

श्रावणी -" थोडावेळ थांब कि ."

किरण -" मी येईन उद्या ."

श्रावणी -" सांभाळून जा आणि उद्या नक्की ये . नाश्ता इथूनच करून जा म्हणे ."

किरण -" हो ..."

किरण थोडा थांबला आणि म्हणाला .

किरण -" शिवानी ... थोडं बाहेर येशील ."

शिवानी -" हो .."

  

    दोघेही बाहेर आले . 

किरण -" शिवानी ... श्रावणीला संभाळशील ना ?"

ती एकदा फ्लॅटच्या दाराकडे  पाहिली .

शिवानी -" हो ... तू काळजी करू नकोस ."

हे ऐकताच किरण पुढे आला आणि शिवानीला मिठीत घेतला . 

किरण -" थँक यू ..यार . थँक यू सो मच."

    ती स्तब्ध उभी होती . त्याला कळतच नव्हतं कि काय बोलावं . ती शांतपणे त्या क्षणात बांधली गेली होती . किरण लगेच तिला सोडला .

शिवानी -" इट्स ओके ."

तिच्या तोंडून एवढंच निघालं .

किरण -" मग येऊ मी ?"

ती फक्त मान हलवली .

तो पायऱ्या उतरत खाली उतरू लागला . तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती पाहत होती . ती का करत होती हे सगळं ? कदाचित त्याच्या प्रेमापोटी करत होती .

*******************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच . हा भाग कसा वाटलं हे सांगायला विसरू नका . आवडलं तर नक्की शेअर करा . धन्यवाद 

🎭 Series Post

View all