मन उधाण वाऱ्याचे भाग -3

the real reason behind the wound of shravni is revealed .

तिच्या डोळ्यातून अश्रुंचे पाणी खाली पडू लागले . 

किरण -" तू शेवटचं कॉल केली होतीस . तुला जे करायला सांगितलं होत , ते तू केली नाहीस . म्हणून तर हि अवस्था झाली नाही ना ?"

     आता ती मोठ्याने रडू लागली . किरण तिला सावरायला पुढे आला . तिच्या समोर बसून दोन्ही हात हातात घेऊन म्हणाला .

किरण -" श्रावणी . काय झालं सांग ? प्लीज ."

ती थोडी सावरली आणि सांगू लागली .

श्रावणी -" माझ्या आयुष्याच वाटोळ झालाय ."

किरण -" अग नेमक झाल तरी काय ?"

श्रावणी -" तुला माहिती आहे का ? आपण कॉलेज संपल्यावर फक्त व्हाट्स अँप वर किंवा कधीकधी कॉल वर बोलायचो आणि मी तुला एकदा कॉल केले होते कि मला एक स्थळ बघून गेलाय म्हणून ."

किरण खाली चेहरा करून म्हणाला .

किरण -" हो ."

    त्याला तेंव्हाही वाईट वाटलं होत आणि आताही वाटत असल्याच त्याच्या चेहऱ्यावरून कळत होत  .

श्रावणी -" मी तुला सांगितले होते कि मुलगा पसंद आहे म्हणून . पण तू म्हणालास कि एका भेटीमध्ये माणसाला ओळखता येत नाही . तरीसुद्धा मी ऐकले नाही . इथेच मी चुकले ."

किरण -" तरी तुला मी म्हणालो होतो. आयुष्याच प्रश्न आहे . एवढं लवकर निर्णय घेऊ नकोस ."

श्रावणी पुढे बोलू लागली .

श्रावणी -" त्यानंतर साखरपुडाच तारीख ठरलं . आमच्या दोघात कॉल आणि मेसेज वर बोलणं चालू होत . साखरपुडा पार पडला . त्यानंतर तो त्याचा रंग दाखवू लागला . मला माझ्या मोबाइल मधील सगळ्या मुलांचे नंबर डिलीट करायला लावला आणि म्हणाला कोणत्याही मुलासोबत संपर्कात राहायचं नाही . मुलासोबतच नाही तर मुलींसोबतही संपर्कात राहायचं नाही असं म्हणाला . माझ्या सगळ्या सोशल मीडियाचे अकाउंटही डिलीट करायला लावला आणि मला म्हणाला लग्नानंतर माझं नावही बदलणार आहे . जेणेकरून मला कोणीही शोधू नये . मी आईलाही सांगून पाहिले , पण ती म्हणाली आता  साखरपुडा झालाय . आता साखरपुडा मोडलं तर लोक काय म्हणतील . म्हणून मी गप्प झाले . त्याचा रोज संध्याकाळी कॉल येत होता . मी जीवावर त्याला बोलायचे .मग सोशिअल मीडिया वर नसल्याने तुला कळाल कि काहीतरी घडलाय . मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्नही तू केलास , पण फोन बंद होता . त्यामुळे सगळ्यांपासून लपून तुला फोन केले ."

-----------------------------------------------

भूतकाळात

     संद्याकाळची वेळ होती . किरण नुकताच बाहेरून आला होता . फ्रेश होऊन  तो नुकताच बसला होता . तेवढ्यात त्याच्या मोबाइलवर फोन आला . स्क्रीनवर अनोळखी नंबर दर्शवत होता . 

किरण -" हॅलो ."

पलीकडून ओळखीचा आवाज त्याला ऐकू आल.

किरण -" श्रावणी ?"

श्रावणी -" हा मीच आहे ."

तिचा रडकुंडीचा आवाज तो ओळखला .

किरण -" श्रावणी . तू रडत आहेस ?"

श्रावणी -" नाही ."

किरण -" हे सुद्धा तू रडतच सांगत आहेस ."

श्रावणी -" माझं लग्न ठरलाय . येत्या 3 दिवसात लग्न होणार आहे ."

किरण -" मग रडायलीस कशाला ?"

श्रावणी -" मला लग्न नको वाटलंय ."

किरण -" का ?"

श्रावणी -" माझ्यावर खूप बंधने लादले गेले .किरण ."

किरण -" अग पण अचानक लग्न ठरलं आणि तू मला असं सांगायलीस ?" 

ती शांत होती .

किरण -" लग्न नको असेल तर घरच्यांना सांग ना ."

श्रावणी -" तेच तर सांगू शकत नाही ना ."

किरण -" का पण ?"

श्रावणी -" बाकीचे लोक काय म्हणतील ."

किरण -" बाकीच्या लोंकांचं विचार करून तू स्वतःच्या आयुष्याचा वाटोळ करणार आहेस का ?"

श्रावणी -" ते मला माहिती नाही . पण एवढं समझ कि हा माझा तुझ्यासोबत शेवटचं बोलणं चालू आहे आणि तू विसर कि श्रावणी नावाची कोणी तुझी काय लागत होती ."

     एवढं बोलून ती फोन ठेवली . कदाचित रडत असेल . किरणला काळजी वाटू लागली . तो परत फोन लावला . पण स्विच ऑफ लागत होता . त्याला आता वाईट वाटू लागलं होत . पण तो काहीही करू शकत नव्हता . तो सांगलीला होता आणि ती पुण्यात होती . मदत करण्यासाठी पण त्याला दुसऱ्या शहरात जावं लागणार होत . 

-------------------------------------------------------

आजचा दिवस

     बगीचामध्ये तशी वर्दळ कमी होती . पण किरण आता श्रावणीच म्हणणं लक्ष देऊन ऐकत होता .

किरण -" म्हणून तू मला तस म्हणत होतीस ."

श्रावणीने मान हलवली .

किरण -" मग पुढे काय झालं ?"

श्रावणी -" लग्न पार पडल्यानंतर थोडे दिवस चांगले गेले . नंतर आम्ही वेगळे राहू लागलो . त्याच्या ऑफिसजवळ घर घेण्यात आलं होत .पण माझं मन लागत नव्हतं . लग्नाआधी आम्हाला सांगण्यात आल होत कि तो दारू पीत नाही . पण काही दिवसांनी तो पियुनही येऊ लागला . घरी आल्यावर मला त्रास देऊ लागला . माझं शिक्षण एवढं झाल्यावरही मला नौकरी करू देत नव्हता ."

किरण -" मग एवढं जखमा कस काय झाल्या ?"

श्रावणी -" संद्याकाळ होत आलेली होती . त्याचा ऑफिसवरून यायचा वेळ झाला होता . मी वाट पाहत बसले होते . काहीवेळाने तो आला , पण तो पूर्ण नशेत होता . येताच मला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि माझ्यावर तुटून पडला . त्याला नको म्हणत असतानाही एखाद्या जनावरासारखं जबरदस्ती करत होता . अचानक मी त्याला जोराचा धक्का मारला . तो मागे जाऊन पडला . नशेत असल्याने त्याला उठायला वेळ लागला . उठताच मला घाण शिव्या देऊ लागला . त्याचा पुरुषी इगो हर्ट झाला होता .तो मला भिंतीवर फेकून दिला आणि बेल्ट काढून मारू लागला . मी खाली पडून ओरडत होते . पण त्याला काडीचाही फरक पडत नव्हता . शेवटी तो थकून झोपी गेला . मला खूप वेदना होत होत्या . पूर्ण अंग दुखत होत ."

   तिचे अश्रू थांबत नव्हते . किरण तिच्या खांद्यावर हात ठेवून धीर देत होता .

श्रावणी -" मग मी ठरवले . आता खूप झालं . खूप सहन करून घेतले . आता बस . मी तशीच उठले आणि निघाले . स्टेशनला पोहचताच पहिल्याच गाडीमध्ये बसले . "

एवढं बोलून ती शांत झाली . किरण दीर्घश्वास घेऊन सोडला .

किरण -" मग आता काय ठरवलीस ?"

श्रावणी -" मी परत नाही जाणार आणि माहेरही नाही जाणार . ते पुन्हा समजूत काढून त्या नर्कात पाठवतील ."

किरण -" ह्म ..."

श्रावणी -" किरण मला इथं नौकरी शोधून दे . मी इथेच राहीन ."

किरण -" पण तुझ्याकडे डॉक्युमेंट कुठे आहेत ?"

श्रावणी -" मी मागवून घेईन ."

किरण -" कस ?"

श्रावणी -" माझ्या बहिणी कडून ."

किरण -" ती कुणालाही न कळताच पाठवील ?"

श्रावणी -" माझ्या प्रत्येक परिस्तिथीच भान तिला होत . ती करेल मदत ."

किरण -" ते जाऊदेत . तुझं आधी राहण्याचं व्यवस्था करायला हवं . तुला माझ्या रूमवर घेऊन जाऊ शकत नाही . जर घेऊन गेलो तर गल्लीमध्ये ना ना प्रकारचे अफवा उडतील ."

     तो विचार करू लागला . मग काहीतरी आठवताच फोन काढला आणि फोन लावला . पण ती मदत करेल का याची मात्र त्याला शंका होती . ती याच्याच ऑफिसमध्ये काम करत होती .ती एकदा किरण जवळ तीच प्रेम व्यक्त केली होती , पण किरणच उत्तर तिला आवडलं नव्हतं . त्यामुळे ती ऑफिस सोडली होती .

किरण -" हॅलो ... शिवानी "

शिवानी -" हॅलो .."

********************************

क्रमशः

ऋषिकेश मठपती

पुढील भाग लवकरच . तुम्हाला काय वाटत ? श्रावणीने घेतलेला निर्णय बरोबर आहे का ? हा भाग कसा वाटला नक्की सांगा . आवडल्यास शेअर करा . धन्यवाद 

🎭 Series Post

View all