मन उधाण वाऱ्याचे भाग -25

Shivani trying to set shrvni's and kiran’s Love

      रात्र बरीच झालेली होती . थंडीत श्रावणी आणि शिवानी अंग चोरून झोपलेले होते . श्रावणी डोळे उघडली . आग अजून जळत होती . ती उठली . पण तिला किरण कुठे दिसत नव्हता . ती घाबरली . त्या शांत रात्रीत किरण कुठेच दिसत नव्हता . ती शिवानीला उठवली . शिवानी डोळे चोळत म्हणाली .

शिवानी -" काय झालं ?"

श्रावणी -" अगं किरण कुठे दिसत नाहीये . "

हे ऐकताच ती उठली .

शिवानी -" काय ??"

ती आजूबाजूला पाहिली .

शिवानी -" कुठे गेलाय तो ?"

       त्या शांत रात्रीत त्या दोघी बिछान्यावर उठून बसल्या  होत्या . पण किरण कुठेच दिसत नव्हता . दोघेही आता घाबरले होते . किरणला कोणत प्राणी तर खाल्लं नाही ना ? त्याला कोणी घेऊन तर गेलं नाही ना ? असे कित्येक प्रश्न त्या दोघींच्या मनात येत होते . 

       बिछान्यावरून उठून ते किरणला शोधण्याच्या कामाला लागले . अंधारात त्यांना सहारा होता ते फक्त आगीचा . गडाच्या त्या कडेवर येऊन या दोघी किरणला शोधू लागले . मोठ्याने त्याच नाव ओरडू लागले . पण काहीच उपयोग होत नव्हता . श्रावणीला आता रडू येऊ लागलं होत . शिवानीचीही परिस्थिती काय वेगळी नव्हती . तीच पहिलं आणि शेवटचं प्रेम असलेला किरणला काय झालं असेल याच विचार ती करत होती . 

अचानक दोघींच्या कानात ओरडण्याचा आवाज पडला .

किरण -" भाऊऊ ...."

     दोघी एकदमच दचकल्या . किरण त्यांना पाहून हसत होता . तो या दोघींपुढे एक चेष्टेचा नाटक रचला होता . श्रावणी त्याला मारायला मागे पडली . किरण पण जोरात पळू लागला .

श्रावणी -" तुला कळतंय का नाही ? आम्ही किती घाबरलो होतो . तुला काय झालं म्हणजे ?"

      हे सगळं म्हणत ती पाठलाग करत होती . त्या दोघांना पाहत शिवानी उभी होती . तिच्या चेहऱ्यावर मोठीशी  स्मित पसरलेली होती . अखेर दोघे थकून थांबले . 

शिवानी -" काय यार किरण ... झोप मोडलंस ."

किरण -" अगं मी जरा चेष्टा करत होतो ."

शिवानी -" असली चेष्टा ?"

किरण -" हो ..."

     तो स्मित करत म्हणाला . श्रावणी मात्र शांत होती . तिला बघून किरण म्हणाला .

किरण -" अच्छा बाबा सॉरी ... परत नाही करणार ."

तरीही ती शांत होती .

किरण -" आता म्हणलो ना सॉरी .... तुम्ही झोपा आता . मी राहीन जागा ."

शिवानी -" बरं बाबा ..."

     असं म्हणत दोघीही बिछान्यावर आडवी झाल्या . दोघीनांही झोप येत नव्हतं . दोघी फक्त झोपायचं नाटक करत होत्या . किरण आगीकडे पाहत बसला होता . आग विजू न देता त्यात लाकडं टाकत होता . श्रावणी त्याला पाहिली आणि बिछान्यावरून उठली . त्याची नजर आगीकडून हलतच नव्हती . श्रावणी त्याच्या बाजूला येऊन बसली . किरण तिला पाहताच म्हणाला .

किरण -" अरे ... झोप लागली नाही काय ?"

श्रावणी -" नाही .." 

किरण -" असल्या थंडीत लागणार झोप लागणार कसं ?"

श्रावणी -" हो पण ... शिवानी तर झोपलीय ."

किरण -" ते मात्र आहे ."

     परत दोघांमध्ये शांतता पसरली . दोघेही शांत बसले होते . दोघांचं मन मात्र विचारात बुडून गेलं होते . मनाचं विचार मात्र ओठांपर्यंत येत नव्हते . 

श्रावणी -" एक विचारू ?"

अखेर शांतता भंग करत श्रावणी विचारली .

किरण -" हा विचार ."

श्रावणी -" तुला आयुष्यात कधी प्रेम झालं का ?

    त्यांचं हे बोलणं शिवानी ऐकत होती . तिला सुद्धा झोप लागत नव्हती . पण निपचित पडून ती या दोघांचं बोलणं ऐकत होती .

किरण दीर्घश्वास घेतला आणि म्हणाला .

किरण -" हो झालाय ."

श्रावणी -" कोण आहे ती ?"

      तिच्या मनातील शंका दूर करण्यासाठी ती विचारली . तिला कळून घ्यायचं होत कि शिवानी खरं बोलत होती का नाही .किरण आगीकडे पाहत म्हणाला .

किरण -" काय फायदा ? एकतर्फी प्रेम होत माझं ."

श्रावणी -" कॉलेजपासून तुझ्यासोबत आहे मी किरण . तू मला नाही सांगणार ?"

किरण -" जाऊदेत ना ."

श्रावणी -" सांग ना . बरं एक सांग तू अजूनही  तिच्यावर प्रेम करतोस . "

किरण -" हो .."

तो आगीकडे कटाक्ष टाकत म्हणाला .

श्रावणी -" तू तिला तिच्यावर असलेल्या प्रेमाबद्दल सांगितलं नाहीस का ?"

किरण -" नाही ..."

श्रावणी -" का ?"

किरण -" जेंव्हा सांगावं असं वाटलं तेंव्हा खूप उशीर झाला होता ."

     श्रावणीला अजूनही कळत नव्हतं कि तो तिच्यावरच्या प्रेमाबद्दल बोलतोय का नाही . 

श्रावणी -" तू अजूनही तिच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आहेस का ?"

किरण -" हो .... दररोज असतो ."

     त्याच्या तोंडून न कळत हे वाक्य आलेलं होत . हे ऐकून श्रावणी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिली . 

किरण -" म्हणजे मला म्हणायचं आहे कि स्वप्नात आणि आठवणीत तिच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये असतो ."

     तो वेळ मारून नेण्यासाठी असं म्हणाला . पण श्रावणीला कळून चुकलं होत कि तो तिच्यावरच प्रेम करत आहे . तिला आता शिवानीच म्हणणं पटलं . शिवानी त्या दोघांचं बोलणं ऐकत होती . किरण स्वतःच अप्रत्यक्षपणे श्रावणीवर प्रेम आहे असं सांगितला होता .ती मनातून खुश झाली होती . तिला फक्त श्रावणीच्या मनातलं जाणून घ्यायचं होत . 

   श्रावणी मात्र गप्प झाली होती . किरण तिला शांत पाहताच म्हणाला .

किरण -" तुझं तुझ्या नवऱ्यावर प्रेम होत का ?"

    हे प्रश्न ऐकून ती विचारातून बाहेर आली . तिला किरणला कळू द्यायचं नव्हतं . म्हणून ती शांतपणे उत्तर दिली .

श्रावणी -" तस काहींनाही ... सुरुवातीला अरेंज मॅरेज मुळे प्रेम करावं लागत होत . पण नंतर त्याच्या वागण्यामुळे सगळं काही बिगडून गेलं . माझ्या नशिबात प्रेम कधीच नाहीये ."

     शेवटचं वाक्य ती किरणला उद्देशून म्हणाली . ' तुझ्या नशिबात मी प्रेम घेऊन येते श्रावणी ' शिवानी मनातल्या मनात म्हणाली .

   

     पहाटेची वेळ होती . श्रावणी आणि किरण यांना बसल्याच ठिकाणी डोळा लागला होता . ते शांतपणे झोपले होते . शिवानी नुकतीच उठली होती . त्या दोघांना झोपलेलं पाहिली . त्या दोघांवरून तीच नजर हटतच नव्हतं . त्या दोघांची गोड जोडी वाटत होती . पण नाईलाजाने ती दोघांना उठवली .

श्रावणी -" काय झालं ? " 

डोळे चोळत श्रावणी विचारली . किरणही तसाच उठला होता .

शिवानी -" अगं तिकडे बघ ."

     बोट दाखवत ती म्हणाली . दोघेही बोटाच्या दिशेने पाहिले . त्या गडाच्या कड्यातून सूर्य बाहेर येत होता . धुकेच्या चादरीला भेदून सूर्य त्याच्या किरणांचे हात पसरू पाहत होता . सूर्याच्या त्या किरणांमुळे आकाशात लाल , नारंगी छटा पडू लागलं होत . तिघांचे डोळे त्या सूर्याच्या किरणांमुळे चमकत होते . त्या सूर्याच्या दर्शनाने तिघे अगदी ताजेतवाने झाले होते . किरण वेळ न घालवता त्या उगवत्या सूर्याचं चित्र कॅमेरामध्ये कैद केला . 

श्रावणी -" वाव ..."

    तिच्या तोंडून अचानक हे शब्द निघालं . पण जेंव्हा तीच नजर गडाच्या खाली गेलं तेंव्हा ती घाबरली . 

श्रावणी -" आपण काल एवढ्या वर चढलो ??"

किरण -" हो .."

     तो स्मित करत म्हणाला .तिला विश्वासच बसत नव्हता कि ती एवढ्या वर चढून आली होती . तिघे आता गड उतरण्याची तयारी करू लागले . काहीकेल्या श्रावणीच्या मनातून कालची गोष्ट जातच नव्हती . तिच्या मनात विचारांचा वादळ आलेलं होत . 

**********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच . मला माहिती आहे हा भाग लहान वाटणार आणि खूप जणांचं म्हणणं आहे कि भाग उशिरा येत आहे . आयुष्यात सगळे दिवस सारखेच नसतात . चढ उतार असतात . त्यामुळे लिहिण्यात वेळ काढणं अवघड होत आहे . हा भाग कसा वाटला नक्की सांगा . कंमेंट करा . तुमच्या कंमेंटमुळे मला लिहिण्यास स्फूर्ती भेटते . आवडल्यास नक्की शेअर करा . धन्यवाद .

🎭 Series Post

View all