मन उधाण वाऱ्याचे भाग -24

Three people enjoying their trip in the night .

       हे ऐकून श्रावणी गोंधळात पडली . शिवानी या दोघांना एक करू पाहत होती . तिच्याजवळ खूप कमी आयुष्य राहिलेलं होत . निदान यात ती किरणला प्रेम मिळवण्यात मदत करणार होती . स्पीकर वर गाणे अजून सुरूच होतं . इतक्यात किरण लाकडं घेऊन आला . 

किरण -" अरे तुम्ही तिथे काय करताय ? इकडे या ."

      श्रावणीच्या डोक्यातून किरणच्या प्रेमाचं विषय जात नव्हतं . शिवानी उठली आणि श्रावणीला हात देत म्हणाली .

शिवानी -" चल ..."

    श्रावणी वर पाहिली आणि तिचं हात पुढे केली . शिवानी तिला हाताने उठवली . 

शिवानी -" एवढे लाकडं ?? शोधायला वेळ लागला असेल ."

किरण -" हो .."

       तो लाकडांचे छोटे तुकडे करत म्हणाला . श्रावणी मात्र अजून शांत होती . किरण लाकडं व्यवस्थित मांडला. त्यावर काही वाळलेल गावात ठेवला आणि काडेपेटीमधील काडी काढून आग लावला . त्या आगीच्या एका ठिणगीतून आग मोठी होत गेली आणि लाकडं जळू लागले . तिघे आता आगीच्या सभोवताली बसले . 

शिवानी -" मला भूक लागलीय ."

शिवानी चेहरा लहान मुलींसारखं करत म्हणाली .

किरण -" मला माहिती आहे ."

श्रावणी -" पण आता काय करायचं ?"

शांत बसलेली श्रावणी अखेर बोलली .

किरण -" मी सगळी व्यवस्था केलेली आहे ."

     असं म्हणत तो बॅग उघडला आणि दोन पातेला बाहेर काढला . त्यानंतर प्लास्टिकची बॅग शोधून बाहेर काढला . त्यात तांदूळ , दाळ , भाजी , तिखट मीठ याची बांधणी करून ठेवलेली होती . 

शिवानी -" अरे हे काय ?"

किरण -" जेवणाची व्यवस्था .."

शिवानी -" वाह ... किती मस्त ... या उघड्या आकाशाखाली मस्तपैकी जेवण करूयात . होय ना गं श्रावणी ?"

श्रावणी -" हो .."

      श्रावणी आता कुठे खुलत होती . कार्तिक चुलीसाठी काही दगड घेतला आणि नीट लावून घेतला . त्यानंतर त्या चुलीत थोडीशी वाळलेली गवत टाकला आणि आग लावला .आग मोठी झाली . लाकडं आता जळू लागलं होत . किरण त्यावर पाण्यानी भरलेल पातेलं ठेवला . त्यात मीठ आणि तांदूळ प्रमाणाने घातला . श्रावणी आणि शिवानी त्यालाच पाहत बसले होते . किरण आता भाजी चिरायला घेतला . त्यांनी सगळी तयारी केलेली होती . हे पाहून श्रावणी आणि शिवानी दंगच झाले होते . किरण भाजीला चिरत होता पण तो व्यवस्थित चिरत नव्हता . त्याला असं पाहून श्रावणी म्हणाली .

श्रावणी -" अरे किरण असं कसं चिरतोयस ?"

किरण -" अरे आपल्या पोटात गेल्यावर सगळं एकत्रच होणार आहे . मग कशाला व्यवस्थित चिरायचं ?"

श्रावणी -" शिस्त नावाची गोष्ट असते . दे बघू मला . मी चिरते ."

किरण -" अरे मी करतो ..."

श्रावणी -" अरे करते मी ..."

किरण -" अगं दररोज तर तूच करत असतीस . आज मला करुदेत ."

श्रावणी -" मी करते ना ..

     त्यांच्या या चाकूच्या ओढाताणी बघत शिवानी बसली होती . या दोघांचं हे प्रेमळ भांडण पाहून तिला समाधान वाटत होत . राहिलेल्या दिवसात या दोघांना एकत्र करण्याचं निश्चय ती मनातल्या मनात केली . 

शिवानी -" अरे कोणीतरी चिरा . मला भूक लागलीय ."

श्रावणी -" बघ तिला भूक लागलीय . मला करुदेत ."

किरण -" ठीक आहे बाबा . कर तूच ."

      तो तिला चाकू देत म्हणाला . किरण बाजूला होत शिवानीच्या शेजारी बसला . श्रावणी भाजी चिरायला बसली . त्या चुलीच्या उजेडात तिचा अर्धवट दिसणारा चेहरा खूपच सुंदर दिसत होत . तिच्या डोळे प्रकाशामुळे चमकणे , भाजी चिरताना ओठांची होणारी हालचाल हे पाहून किरण स्तब्ध झाला होता . शिवानीला हि गोष्ट समजली होती म्हणून मुद्दामहून ती म्हणाली .

शिवानी -" अरे जरा इधर भी देख ले ."

ती हळू आवाजात बोलल्याने किरणला काही ऐकू आलं नाही .

किरण -" काय ??"

शिवानी -" काय नाही ."

किरण -" बरं अजून एक ."

    श्रावणी आणि शिवानी दोघी एकदमच ' काय ?' म्हणाल्या  . असं म्हणताच किरण बॅगेत हात घातला .

शिवानी -" काय काढतोयस ?"

किरण बॅगेतून डिस्को लाइटची बॅटरी काढला . 

शिवानी -" ए ... डिस्को लाइट ."

श्रावणी -" काय ???"

श्रावणी आश्चर्याने किरणकडे पाहू लागली . 

किरण -" तुला काय झालं ?"

श्रावणी -" काय नाही ."

     श्रावणीला डिस्को आणि डाँसिन्ग हे सगळं न्यूनगंडाच भाग होत . ती फक्त एकांतात नाचत असत . ती परत भाजी चिरायला सुरुवात केली . तिने सगळी तयारी केली . भात शिजल्यावर तिने दुसरी पातेलं घेऊन त्यात आमटीसाठी फोडणी देऊ लागली . त्यात चिरलेली भाजी , तिखट मीठ चवीनुसार घातली आणि पाणी घालून शिजायला सोडली . तेवढ्यात शिवानी आणि किरण डिस्को लाइट लावले आणि स्पीकरवर वाजत असलेल्या गाण्यावर नाचू लागले . अगदी मनोसक्त होऊन , कोणतीही चिंता न करता दोघे नाचत होते . शिवानी श्रावणीला नजरेनेच नाचायला बोलवली . पण तिने नजरेने नकार दिली . शिवानी ऐकणाऱ्या पैकी नव्हती . तिने मुद्दामहून तिला खेचून नाचण्यासाठी भाग पाडली . सुरुवातीला ती फक्त हातवारे करत नाचत होती . पण काहीवेळाने ती मनसोक्त नाचू लागली . 

    

    मोबाईलमध्ये गाणे वाजत गेले आणि हे तिघे नाचत होते . मोबाइलमध्ये ' ऊफ्फ तेरी अदा ' हे गाणं वाजू लागलं . किरणच लक्ष श्रावणीकडे गेलं . ती अगदी उद्या मारत नाचत होती . त्या गाण्याची बोल तिच्या नाचण्यावर हुबेहूब शोभत होत . किरणच लक्ष तिच्यावरून हटतच नव्हतं . हे शिवानीच्या लक्षात आलं . तीही नाचत किरणकडे बघू लागली . तीच प्रेम असलेला किरण त्याच्या समोरच दुसरीच्या प्रेमात पडत होता . ती मनातून जळत होती , पण तिच्या राहिलेल्या जीवनात तिला या दोघांना एकत्र करायचं होत . म्हणून ती शांत होती . श्रावणी मोकळी केस सोडून अगदी मजेत नाचत होती . शिवानी अचानक मोबाइल बंद केली . श्रावणी नाचायचं थांबली . 

श्रावणी -" काय झालं ?"

शिवानी -" बस आता .. जेवून घेऊ नंतर परत नाचूयात ."

किरण -" हो ... मला पण भूक लागलीय ."

 श्रावणी -" बर ..."

         तिघेही जेवायला बसले . त्या मोकळ्या आकाशाखाली भात आमटीची चव अजून छान लागत होती . गप्पा मारत ते जेवण आटपू लागले . थंडी अजून वाढू लागली होती . गड चढून तिघेही खूप थकले होते . त्यामुळे जेवल्यावर त्यांना झोप येऊ लागली . 

शिवानी -" मला झोप लागलीय ."

श्रावणी -" मला पण ..."

किरण -" बर एक काम करा मग ... तुम्ही झोपा मी जागा राहतो ."

श्रावणी -" का ?"

किरण -" रात्री इथे काहीही येऊ शकत . रानडुक्कर , कोल्हा वैगरे त्यामुळे एकाच जाग राहणं गरजेचं आहे . तुम्ही झोप मला याची सवय आहे ."

शिवानी -" श्युअर ?"

किरण - " हो बाबा ... तुम्ही झोपा ."

श्रावणी -" बर ..."

      दोघी खाली एक मोठीशी आणलेली बिछाना घातल्या आणि त्यावर झोपी गेल्या . किरण आगीला वाढवला आणि पाहारा देऊ लागला .

    रात्र बरीच झालेली होती . थंडीत श्रावणी आणि शिवानी अंग चोरून झोपलेले होते . श्रावणीचे डोळे उघडले . आग जळत होती . ती उठली . पण तिला किरण कुठे दिसत नव्हता . ती घाबरली . त्या शांत रात्रीत किरण कुठेच दिसत नव्हता . ती  शिवानीला उठवली . शिवानी डोळे चोळत म्हणाली .

शिवानी -" काय झालं ?"

श्रावणी -" अगं किरण कुठे दिसत नाहीये . "

हे ऐकताच ती उठली .

शिवानी -" काय ??"

ती आजूबाजूला पाहिली .

शिवानी -" कुठे गेलाय तो ?"

     त्या शांत रात्रीत त्या दोघी बिछान्यावर बसलेल्या होत्या . पण किरण कुठेच दिसत नव्हता .

*********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच . हा भाग कसा वाटला नक्की कळवा . कंमेंट करा तुमच्या कंमेंटवरून मला लिहिण्यास स्फूर्ती भेटते . आवडल्यास नक्की शेअर करा . धन्यवाद .

🎭 Series Post

View all