मन उधाण वाऱ्याचे भाग - 22

All three are ready for journey to the Chadan gad

      गाडी निघण्याची वेळ झालेली होती . अचानक एक मुलगी किरणच्या बाजूला येऊन बसली . किरणला थोडं धक्का लागल्याने तो तिकडे पाहिला . श्रावणी आणि शिवानी यांचंही लक्ष तिकडे गेलं . ती गडबडीत गाडीमध्ये चढली होती . ती पिवळी सलवार कमीज मध्ये खूप  सुंदर दिसत होती . ती अजूनही थकलेली होती . ती किरणकडे पाहिली आणि म्हणाली . 

ती -" हि ट्रेन साताऱ्याला जाते ना ?"

किरण -" हो ..."

तो जरा लाजतच म्हणाला .

किरण -" तुम्ही साताऱ्याला जाणार आहे का ?"

ती -" नाही . कऱ्हाडला ."

किरण -" अच्छा ..."

श्रावणी आणि शिवानी त्या दोघांकडेच पाहत होते . 

ती -" हाय ... मी कीर्ती .."

ती हात पुढे करत म्हणाली .

किरण -" मी किरण ..."

तो हस्तांदोलन करत म्हणाला . 

कीर्ती -" एवढी मोठी बॅग ?"

किरण -" अरे हा ... आम्ही ट्रेकिंगला चालो आहोत ."

कीर्ती -" आम्ही ???"

किरण -" मी आणि ह्या दोघ्या ... हि श्रावणी आणि हि शिवानी ."

किरण ओळख करून देत म्हणाला .

कीर्ती -" हाय .."

     ती हात हलवत म्हणाली . त्या दोघीही हलकेसे स्मित केले  आणि हात हलवत प्रतिसाद दिले. 

कीर्ती -" ट्रेकिंगला कुठे जाणार तुम्ही ?"

किरण -" चंदन गडावर ."

कीर्ती -" कुठे आलं हे गड ?"

किरण -" साताऱ्याहून 20 किलोमीटर पुढे ?"

कीर्ती -" अच्छा ..."

      असेच प्रश्नोउत्तर वाढू लागले . त्याच रूपांतर गप्पांमध्ये झालं . दोघेही अगदी मनमोकळे गप्पा मारत होते . त्या दोघांच्या गप्पांमुळे हे दोघी अगदी शांत बसले होते . दोघींच्या मनात एक वेगळीच आग निर्माण झाली होती . किरणवर प्रेम असल्याने शिवानी जळत होती . पण , श्रावणी का जळत होती हा प्रश्न तिच्याच मनात निर्माण झालेलं होत . ती काहीही न बोलता खिडकीबाहेर पाहत होती . शिवानीही  त्या दोघांकडे लक्ष न देता शांत गाणे ऐकत बसली होती . 

     काही तास उलटून गेले होते . ट्रेनचा वेग कमी होत होता . प्लॅटफॉर्मवर कऱ्हाडची पाटी दिसली . ती पाटी बघताच कीर्ती उठली . 

कीर्ती -" चला ... मला निघावं लागेल ."

किरण -" अरे कऱ्हाड आलं . गप्पा मारताना लक्षातच आलं नाही ."

कीर्ती -" हो .."

ती जरा लाजतच म्हणाली . 

किरण -" मग ?"

कीर्ती -" मग बाय . एन्जॉय युअर ट्रेक . "

किरण -" थँक्स ... " 

कीर्ती -" बाय .."

    ती सामान घेतली आणि उतरली . किरण आता शांत बसला . इतक्यात कीर्ती खिडकीतून म्हणाली .

कीर्ती -" किरण ... तुझा नंबर दे ."

     किरण तर चकित झालाच ,पण श्रावणी आणि शिवानीही डोळे मोठे करून किरणला पाहू लागले . 

किरण -" 99********"

कीर्ती -" ओके ... आपण नंतर बोलू .बाय ."

    ती हलवत मागे फिरली . किरणही खिडकीकडे पाहत हात हलवला . इथे दोघींचे चेहरे मात्र फुगलेले होते . या पूर्ण प्रवासात तो या दोघींसोबत बोलणं तर सोडाच पाहतही नव्हता . 

किरण -" आता काही तासात साताऱ्याला असणार ."

     यावर दोघी गप्प होते . किरणला हे गोष्ट जरासं खटकलं . त्या दोघींकडे पाहिला तर दोघींचे चेहरे अजूनही फुगलेलं होत .

किरण -" काय झालं ?"

त्या दोघी अजूनही शांत होत्या .

किरण -" शिवानी ? काय झालं ?"

शिवानी श्रावणीकडे पाहत म्हणाली .

शिवानी -" कोणीतरी मला बोलवायला का गं ?"

श्रावणी -" नाही ग ... तुला भास होत असेल ."

ती मुद्दामहून असं म्हणाली . किरणला नवल वाटलं .

किरण -" अरे हॅलो ... काय झालं सांगा तरी ?"

शिवानी -" तू कोण आहेस ? तुला नाही ओळखत नाही मी .."

शिवानी जरा चेष्टेत म्हणाली .

किरण -" अरे यार .."

श्रावणी -" अरे दुसरी मुलगी भेटली तर आपल्याला कोण विचारताय शिवानी ?"

ती शिवानीकडे पाहत म्हणाली . 

शिवानी -" आपल्याला किंमतच नाहीये श्रावणी ."

किरणला त्याची चुक कळली होती .

किरण -" तुम्ही कीर्ती बद्दल बोलताय का ? अगं ती माझ्याजवळ येऊन त्याला मी काय करणार ? ती बोलायला चालू केली आणि थांबलीच नाही . मग मलाही बोलावं लागलं ."

किरण स्पष्टीकरण देत म्हणाला .

श्रावणी -" राहूंदेत ... "

    दोघीही त्याच्यावर नाराज होत्या . किरण दोघींशी माफी मागू लागला . पण त्याचा काही उपयोग होत नव्हता . दोघींचं रागही चेष्टेचा होता . त्यांना फक्त किरणला त्रास द्यायचा होता . म्हणून चेष्टा करत होते.

      ट्रेन कित्येक तासानंतर साताऱ्याच्या रेल्वे स्टेशनला पोहचली . बराचसा अंधार पडलेला होता . तिघेही रेल्वेतून उतरले आणि स्टेशनच्या बाहेर आले . रेल्वे स्टेशन शहराच्या बाहेर असल्याने स्टेशनच्याबाहेर गर्दी नव्हतीच . बाहेर फक्त दोन किंवा तीन रिक्षा थांबलेले होते . तिघे एका रिक्षात बसले आणि शहराकडे निघाले . 

      काहीवेळात ते बस स्टँडला पोहचले . किरण चौकशी कक्षाकडे गेला . चौकशी करून तो परत दोघींजवळ आला . 

किरण -" आता एक बस येईल . त्यातून आपल्याला जायचं आहे ."

शिवानी -" कधी येईल ?"

किरण -" थोड्यावेळात .."

     तिघेही बसची वाट पाहू लागले . बघता बघता अंधाराचं साम्राज्य पसरू लागलं . इतक्यात बस स्टॅण्डवर थांबली .

किरण -" त्या बसमध्ये जायचं आहे . चला पटकन ."

     तिघेही अगदी पळतच बसच्याजवळ गेले आणि चढले  . श्रावणी आणि शिवानी सीट पकडले . गर्दी जरा जास्तच असल्याने किरण दोघींजवळ उभा होता . 

      बस निघण्यास तयार झाली . कंडक्टर गाडीत आला आणि बस स्टँडवरून निघाली . खिडकीतून थंड हवा आत येत होती म्हणून श्रावणी आणि शिवानी बॅगेतून स्वेटर , हातमोजे काढले.

किरण -" एवढ्याश्या थंडीत स्वेटर ? गडावर गेल्यावर मग तर बर्फच होणार तुम्ही ..."

किरण त्यांना पाहत म्हणाला . 

श्रावणी -" राहूंदेत .."

    ती जरा रागातच म्हणाली . अंधार असल्याने बसमधील लाईट तेवढी जळत होती. त्याच प्रकाशात ते बघू शकत होते . काहीवेळात बस गावाच्या बाहेर थांबली .

किरण -" चला ... उतरायचं आहे ."

श्रावणी -" हो ... "

     श्रावणी आणि शिवानी दोघीही बॅग घेतले आणि उतरण्यास तयार झाले . श्रावणी , शिवानी आधी उतरले आणि शेवटी किरण बसमधून उतरला . थंडी जास्त असल्याने श्रावणी आणि शिवानी डोक्यावर टोपी घातले . गाव अजून एक किलोमीटर अंतरावर होत . किरण बॅटरीच्या साहाय्याने मार्ग काढत होता आणि त्याच्या मागे श्रावणी आणि शिवानी जात होते .

     काही अंतरावर काही लाईट जळत असलेलं त्यांना दिसू लागलं . चालत चालत ते गावामध्ये आले .हे गाव गडाच्या पायथ्याशी वसलेलं होत . काही मोजकेच घरं दिसत होते . ते चालत गावातून गडाकडे निघाले . त्यांना एक व्यक्ती अडवलं .

तो -" कुठं चालात तुम्ही लोक ?"

किरण पुढे होऊन म्हणाला .

किरण -" गडावर .."

तो -" एवढ्या रातच ?"

किरण -" हो ... नाइट ट्रेक करायला ."

तो -" अरे ... तुम्हाला कोतवालाशी भेटावं लागेल ."

     तो व्यक्ती तिथूनच कोतवाल असलेल्या व्यक्तीला हाक मारला . ती व्यक्ती त्या तिघांजवळ आला .

कोतवाल -" तुम्ही रातच गडावर जाणार ?"

किरण -" हो .."

श्रावणी -" का ?  गडावर जाणं मनाई आहे का ?"

कोतवाल -" नाही ... आमच्या गडावर मोजकेच लोक येतात . पण एकदा रातच्याला 6 जण गडावर गेले आणि येताना 5 जण आले . नंतर पाहिल्यावर गडावर एक मड सापडलं . म्हणून आम्हाला जाताना मोजावं लागत ."

त्यांचं हे बोलणं ऐकून शिवानी आणि श्रावणी घाबरले .

किरण -" म्हणजे आम्ही जाऊ शकतो ना ?"

कोतवाल -" हो ... जावा कि . काही लागलं तर वरून फोन करा ."

      तो त्याचा फोन नंबर दिला . किरण नंबर घेतला आणि गडाच्या पायथ्याशी आला . त्याच्या सोबत श्रावणी आणि शिवानीही आले . 

किरण -" चालायचं ."

शिवानी -" हो ..."

श्रावणी -" हो .."

श्रावणी घाबरतच म्हणाली . ते गड चढण्यास सुरुवात केले .

*******************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच . हा भाग उशिरा आला त्याबद्दल क्षमा असावी . हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा . आवडल्यास शेअर करा . धन्यवाद 

🎭 Series Post

View all