मन उधाण वाऱ्याचे भाग -19

Kiran and shravni will know about shivani’s disease.

     दोघांनाही नवल वाटलं . दोघेही आत गेले आणि शिवानीला शोधू लागले . शिवानी आतमध्ये कुठेच नव्हती . त्यांना काळजी वाटू लागली . शेवटी ते शिवानीच्या फोनवर फोन लावले . फोन उचलण्यात आलं .

किरण -" हॅलो शिवानी .."

ती -" हॅलो .."

आवाज वेगळाच ऐकू आल्याने किरण म्हणाला .

किरण -" कोण बोलत आहे ."

ती -" मी केर हॉस्पिटलमधून नर्स बोलत आहे . त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आण्यात आलाय आणि ते आय . सि . यु मध्ये आहेत ."

किरण -" काय ????"

    किरण थक्क झाला होता . श्रावणीला काही कळत नव्हतं . किरणला स्तब्ध पाहून ती म्हणाली .

श्रावणी -" किरण .... काय झालं ? शिवानी कुठेय ?"

    किरण अजून स्तब्ध उभा होता . श्रावणी तिला हलवत म्हणाली .

श्रावणी -" किरण ....काय झालं ? शिवानी कुठं आहे ?"

किरण -" ती केर हॉस्पिटलमध्ये आहे ..."

तो अडखळत म्हणाला .

श्रावणी -" हॉस्पिटल ?? का ??"

किरण - " माहिती नाही . ती आय . सि . यु मध्ये आहे . आपल्याला जावं लागेल ."

श्रावणी -" हो .. चल ."

किरण -" तू इथेच थांब . मी ..."

त्याच वाक्य पूर्ण होण्याआधी श्रावणी म्हणाली .

श्रावणी -" नाही ... मीही येणार ."

किरण -" अगं पूर्ण तर ऐक . तू इथे थांब मी गाडी घेऊन येतो . मग जाऊयात . "

श्रावणी -" हो .. जा पटकन ."

       किरण गडबडीतच घराच्या बाहेर पडला . तो धावतच पायऱ्या उतरू लागला . श्रावणीला आता चिंता वाटू लागली होती . अचानक असं कसं झालं हेच विचार ती करत होती .

काहीवेळात किरण घरी आला .

किरण -" श्रावणी ... चल पटकन ."

श्रावणी -" हो चल ."

    दार बंद करून दोघेही पायऱ्या उतरू लागले . त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहचायचं होत .

        

      सकाळची पिवळी उन्हाची किरणे किरणच्या चेहऱ्यावर पडत होते . किरण गाडी जलदगतीने चालवत होता. मागे श्रावणी बसलेली होती. तिला चिंता वाटत होत. 'पुण्याला जाताना तर चांगली होती , अचानक काय झाल असेल ?' या विचारात ती मग्न झालेली होती. केर हॉस्पिटलच्या आवारात ते आले . किरण गाडी पार्किंगमध्ये आणला . गाडी थांबताच श्रावणी गाडीवरून उतरली. किरण वेळ न घालवता गाडी लावला आणि हॉस्पिटलमध्ये जाऊ लागला. त्याच्या मागे श्रावणीही जाऊ लागली. हॉस्पिटलमध्ये वर्दळ कमी होती. सकाळच वेळ असल्याने सर्वकाही निवांत चाललं होत. 
       

          दोघे रिस्पेशनजवळ आले आणि आय. सि . यु.च दिशा विचारले. दिशा कळताच ते धावत त्या दिशेनी जाऊ लागले. आय. सि . यु चा दार बंद होता. आत जाण्याचा प्रयत्न करत असताना बाजूला उभी असलेली नर्स थांबण्याचा इशारा दिली. दोघेही बाहेरच थांबले. बाहेरून ते शिवानीला पाहू लागले. ती बेडवर झोपलेली होती.

नर्स -" तुम्ही कोण ?"

किरण -" मी तिचा मित्र आहे. '"

नर्स -'" नातेवाईक कोण नाहीत का तिचे ?"

किरण -" नाही.. ती अनाथ आहे . पण आम्ही आहोत ना ."

नर्स -" बर .. तुम्ही डॉक्टरांना भेट द्या."

श्रावणी -" त्यांचा केबिन कुठे आहे ?"

नर्स -" त्या तिकडे ."

ती केबिनकडे बोट दाखवत म्हणाली .

श्रावणी -" थँक यु .."

दोघेही त्या दिशेनी गेले व  दार उघडले .

किरण -" आम्ही आत येऊ का ?"

डॉक्टर -" येस .. कम इन ."

दोघेही केबिनमध्ये आले .

डॉक्टर -" बसा .. "

दोघेही समोरच्या दोन खुर्चीवर बसले .

डॉक्टर -" तुम्ही कोण ?"

किरण -" आम्ही शिवानीला पाहायला आलो आहोत ."

डॉक्टर -" ओह."

श्रावणी -" डॉक्टर .. शिवानीला काय झालाय ?"

डॉक्टर -" तुम्हाला शिवानीने सांगितलं नाही का ?" 

श्रावणी -" नाही ." 

किरणही मान हलवत नाही म्हणाला .

डॉक्टर दीर्घश्वास घेत म्हणाले . 

डॉक्टर -" शिवानीला ब्रेन कॅन्सर आह आहे. लास्ट स्टेज .." 

हे ऐकून दोघेही चकित झाले . 

किरण -" काय ???" 

श्रावणी -" हे कसं शक्य आहे?" 

डॉक्टर -" शिवानीने तुम्हाला का सांगितलं नाही ? हे मला माहिती नाही .पण सत्य तर हेच आहे ." 

      

      श्रावणीला मोठा धक्काच बसला होता. तिला कळत नव्हतं कि अचानक शिवानीला असं कसं झालं . 

श्रावणी -" अचानक असं कस झाल ?" 

डॉक्टर -" अचानक नाही . गेले एक वर्ष ती माझ्याकडून ट्रीटमेंट घेतीय ." 

किरण -" काय ??" 

श्रावणी -" ती आपल्याला का नाही सांगितली ? गेले एक कित्येक दिवस आपण तिच्यासोबत राहतोय ." 

डॉक्टर -" आणि आणखी एक ."

किरण -" काय ?" 

दोघेही डॉक्टरांकडे पाहू लागले. 

डॉक्टर -" तिच्याकडे फक्त दोन आठवडे आहेत ." 

श्रावणी -" काय ??" 

     श्रावणीसाठी हा धक्का आधीच्या धक्केपेक्षा मोठा होता . किरणलाही धक्का बसला होता. तो शिवानीला आधीपासून ओळखून होता तरीही त्याला तिच्या आजाराबद्दल माहिती नव्हतं .

श्रावणी -" डॉक्टर .. आता काही होऊ शकत नाही का ?" 

श्रावणी धक्केतून प्रश्न विचारली. 

डॉक्टर -" आता काहीही होऊ शकतं नाही . मी फक्त एवढंच म्हणू शकतो कि हे दोन आठवडे तिला खुशीत ठेवा. तिला कोणी नाहीये . मग तुम्हीच हे काम करू शकता ." 

     इतक्या वेळापासून रोखून ठेवलेली अश्रू श्रावणीच्या गालावरून वाहू लागले. तिला हे सगळं पचवण्यात वेळ लागणार होत. तिला स्वतःला गरज असताना शिवानीने आसरा दिली होती. पण आता शिवानीला गरज असताना ती काहीही करू शकत नव्हती . याच तिला खूप वाईट वाटत होत . 

    

     अनाथ असल्याने ती लहानपणीपासून एकटी वाढली होती . अगदी मेहनतीने अनाथाश्रमात शाळा शिकून नौकरी करत होती . आयुष्यात पहिल्यांदाच तिला प्रेम झालं होत . त्यातल्या त्यात ती किरणच्या प्रेमात पडली होती . त्यातही तिला अपयश मिळालं आणि आता मात्र ती आयुष्याच्या शर्यतीमधून बाहेर पडणार होती. हे सगळं आठवताना किरणला तिच्याबद्दल वाईट वाटत होत. इतक्यात नर्स केबिनमध्ये आली.

नर्स -" सर .. आय . सि . यु मधील पॅशिएंटला शुद्ध आलं ." 

डॉक्टर -" ठीक आहे. चला . "

हे ऐकून किरण आणि श्रावणीही उठू लागले . 

डॉक्टर -" तुम्ही येऊ नका . पॅशिएंटला जनरल वॉर्डमध्ये आणल्यावर या आणि हा तिच्याजवळ १४ दिवस आहेत हे तुम्हाला माहिती आहे . हे तिला कळू देऊ नका . "

दोघेही होकारार्थी अर्थाने मान हलवले. 

    डॉक्टर केबिनच्या बाहेर गेले . हे दोघेही बाहेर आले . दुरूनच ते शिवानीला पहात होते. डॉक्टर शिवानीला स्ट्रेचर वरून जनरल वॉर्डात घेऊन आले. 

डॉक्टर दोघांजवळ आले आणि म्हणाले.

डॉक्टर -" थोड्यावेळाने तुम्ही जाऊ शकता ." 

किरण -" हो . थँक यु डॉक्टर ."

    थोड्यावेळाने ते दोघे जनरल वॉर्डमध्ये गेले . शिवानी डोळे बंद करून पडली होती. श्रावणी अक्षर पुसत तिच्याजवळच्या खुर्चीवर बसली . किरण तिच्या बेडजवळ उभा होता . दोघेही त्यांचे चेहरे हसरा आणि सामान्य ठेवलं.

श्रावणी -" शिवानी ."

शिवानी डोळे उघडली. ती त्या दोघांना पाहून चकित झाली. 

शिवानी -" तुम्ही इथे ? उद्या येणार होतात ना ?'

किरण -" हो ... अचानक आधीच यायच ठरलं ."

श्रावणी -" पण तू इथे ? तुला काय झालाय ?"

शिवानी -" काही नाही ग ... अचानक रात्री खूप डोकं दुखू लागलं होत . हॉस्पिटलला येता येत नव्हतं म्हणून ऍम्बुलन्सला बोलावले . ते येताच ऍडमिट करून घेतले . तुला माहितीच आहे . बिल जास्त बनवण्यासाठी हॉस्पिटल काय करते ते ... मी आज जाणार होतेच . पण तुम्ही इथे आलात . तुम्हाल कसं कळालं कि मी इथे आहे ते ?"

   ती बोलताना अडखळत होती . या दोघांना ठाऊक होत कि ती खोट बोलतीय .

किरण -" घरचा दार उघडा होता . तू दिसत नव्हतीस म्हणून कॉल केलं तर नर्स उचलली आणि ती सांगितली ."

शिवानी -" गडबडीत दार उघडाच राहिला वाटत."

श्रावणी हसरा चेहरा ठेवू शकत नव्हती .

श्रावणी -" वॉशरूम कुठं आहे ?"

    शिवानी बोट दाखवली . ती वेळ न घालवता उठली आणि वॉशरूममध्ये गेली . तिला अश्रू अनावर आले होते . तिला खूप वाईट वाटत होत . तिची लहानपणाची मैत्रीण वृणाली सुद्धा अशीच सोडून गेली होती आणि आता शिवानीही सोडून जाणार होती.

*************************************************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच येईल . हा भाग कसा वाटला सांगा . कंमेंट करा . तुमच्या कंमेंटमुळे मला लिहिण्यास स्फूर्ती मिळते . आवडल्यास नक्की शेअर करा . धन्यवाद 


 

🎭 Series Post

View all