मन उधाण वाऱ्याचे भाग -18

shivani located in hospital

      दुपारची वेळ होती . सगळे गप्पा मारत सोफ्यावर बसलेले होते . इतक्यात बाहेरचा गेट वाजण्याचा आवाज आला . काहीवेळाने दारात एक जण आल्याचं जाणीव झालं . श्रावणीचे बाबा उठले आणि पाहिले .

बाबा -" जावईबापू ... तुम्ही ?"

    हे ऐकताच सगळ्यांच लक्ष तिकडं गेलं . श्रावणी चकित झालेली होती . किरणही स्तब्ध झालेला होता . दारातील व्यक्ती आत आला . श्रावणीची आई पुढे आली आणि म्हणाली .

आई -" बसा ना . "

श्रावणीला आता राग येऊ लागल होत .

श्रावणी -" बाबा ... "

    ती ओरडली . तिच्या ओरडण्याने सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं .तिच्या ओरडण्याने तिचा नवरा बसलेला उठून बसला .

श्रावणी -" हे इथे काय करत आहेत ?"

बाबा -" माहिती नाही बेटा . मी नाही बोलावलं ."

श्रावणी -" मग कोण बोलवलं ? श्रद्धा ?"

ती श्रद्धाकडे वळली .

श्रद्धा -" मी पण नाही बोलवले ."

तिचा वाक्य संपणारच होता तेवढ्यात आई म्हणाली .

आई -" मी बोलावले ."

श्रावणी -" आई ... तू बोलावलीस ?"

आई -" हो ."

श्रावणी -" मला यांना बघायचं सुद्धा नाहीये ."

    ती रागात पाय आपटत बाहेर जाऊ लागली . किरण आणि श्रद्धा तिच्या मागे जाऊ लागले . श्रावणी बाहेर येऊन बगीचेकडे गेली आणि तिथल्या झोपाळ्यावर बसली . किरण आणि श्रद्धा तिच्याजवळ गेले .

किरण -" अग श्रावणी . काय झालं ?"

श्रावणी -" काय झालं ???? बघितलास ना काय झालाय ते ? आई का बोलावली त्यांना ?"

ती रागातच बोलत होती .

किरण - " अगं काहीतरी कारण असेल ना ? तू न विचारताच आलीस ."

श्रावणी -" कसलं कारण ? आई त्यांच्यासोबत पाठवणार . मी चांगलं जगत असलेलं बघवत नाही वाटत ."

ती रागात बडबडत होती . इतक्यात मागून आवाज आला .

आई -" असं कस बघवणार नाही ."

सगळे मागे पाहिले तर श्रावणीची आई थांबली होती . 

श्रावणी -" तू माझ्याशी बोलू नकोस आई ?"

आई -" अग ऐकून तर घे माझं ."

श्रावणी -" नाही ऐकून घ्यायचं आहे मला काहीही ..."

किरण - " अगं आई काय म्हणते ऐक तरी .."

    श्रावणी शांत झाली . शांत झाली असली तरी तिचा राग अजून आहे तसाच होता . 

आई -" लग्न म्हणल तिथे भांडण आलंच . म्हणून काय सोडून द्यायचं नसतं . आमच्यातही भांडण व्हायचे . म्हणून मी काय रागावले नाही किंवा सोडले नाही . संसार चालवायचा असेल तर कुणालातरी माघार घ्यावंच लागेल . त्याशिवाय संसार चालणार नाही . "

श्रावणी -" का म्हणून सहन करायचं सगळं ? फक्त संसारासाठी ? म्हणजे मला मारून टाकलं तरी सहन करायचं ? "

आई -" जीवन जगताना कोणीतरी  सोबत असावं म्हणून .."

आई समजूतदारपणे म्हणाली .

श्रावणी -" नवऱ्यामुळेच जीवनात सोबती मिळते असं काही नाही आई . मित्र असतात , मैत्रीण असतात , आईबाबा असतात . या सगळ्यांमुळे सोबती मिळते ."

ती अजूनही रागात म्हणाली .

आई -" पण नवरा आयुष्यभर सोबत असतो ."

किरण -" बरोबर. अगं शांतपणे विचार कर श्रावणी ."

   तो तस म्हणत असला तरी त्याच मन तिच्या प्रेमासाठी तडपडत होत . 

श्रावणी -" किरण ... तू पण ? तू माझी परिस्तिथी पाहिला होतास ना ? कसं झालं ते ? "

श्रद्धा फक्त बघायची भूमिका करत होती .

श्रावणी -" तुम्हाला बोलून फायदा नाही ."

    असं म्हणत ती पाय आपटत घराच्या आत मध्ये आली .तिथे तिचे बाबा आणि तिचा नवरा शांतपणे बसले होते . श्रावणीला येताना पाहताच दोघांचं लक्ष तिच्याकडं गेलं . 

श्रावणी -" बाबा ... यांना येण्याचं कारण विचारा ."

ती राहुलकडे ( तिचा नवरा ) लक्ष न देता म्हणाली .

बाबा -" ऐकलं ना जावईबापू ."

राहुल -" हिला घ्यायला आलोय ."

त्याच्या वाक्यात वेगळीच पुरुषवृत्तीची भावना होती .

श्रावणी -" पण मी नाही जाणार बाबा .."

तेवढ्यात किरण , आई आणि श्रद्धा घरात आले . 

श्रावणी -" किरण चल आपण जाऊयात ." 

बाबा -" अगं असं का म्हणतेस ?"

श्रावणी -" मी एकाच अटीवर इथे आले होते कि एकाच दिवसासाठी येणार आणि परत सांगलीला जाणार ."

बाबा -" हो बेटा . पण ,..."

वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच ती म्हणाली . 

श्रावणी -" ते काही नाही . मी चालले ."

ती बॅग घेतली आणि बाहेर जाण्यास तयार झाली . 

श्रावणी -" किरण चल .."

किरण -" अगं जरा समझून घे ."

श्रावणी -" तू येणार आहेस का मी जाऊ ?"

किरण -" ठीक आहे ."

     हे ऐकताच ती बॅग घेतली आणि घराच्या बाहेर पडली . तिची आई थांबवण्याचा प्रयत्न केली , पण ती उपयोगाला आली नाही . किरण अजून तिथेच थांबला होता . तो सर्वांकडे पाहिला आणि म्हणाला .

किरण -" तुम्ही काळजी करू नका . मी आहे . मी समझवतो तिला . मी फोन करेन . "

एवढ्यात बाहेरून श्रावणी ' किरण ' म्हणण्याचा मोठा आवाज आला . किरण बाहेर पाहिला ."

किरण -" ठीक आहे . मी जातो बाय .."

   तो गडबडीतच बाहेर आला . बाहेर पडताच दोघेही रिक्षामध्ये बसले आणि स्टेशनच्या दिशेनी निघाले . 

       वाटेत श्रावणी अजून रागातच होती . ती रंगात बडबडत होती . किरणला गप्प बसण्याच्या पलीकडे पर्याय नव्हताच . स्टेशनला पोहचताच त्यांना कळालं कि ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलीय . ते गडबड करत तिकीट काढले आणि त्यांच्या सीटवर बसले . 

किरण -" तुला वाटत नाही का तू राग जरा जास्तच दाखवली ?"

श्रावणी -" राग येणारच ना . मी कस काय शांत बसू . जेंव्हा तो मला इतकं त्रास देऊन निर्लजासारखं बसला होता. राग तर येणारच ना ."

किरण -" हो पण बाबांचा विचार करायला हवं होत ."

श्रावणी -" त्यांना पण कळू देत कि राहुल कसा आहे ते ?"

किरण -" काही पण काय बोलतेस ?"

श्रावणी -" खरंच बोलतेय मी .. आई मला अजून सहन घे म्हणाली . "

किरण -" बरं बाबा ... तू चांगलं केलस ."

    ती रागात काहीही बडबडत होती . हे पाहून किरण शांत झाला . अखेर ट्रेन सुटलं . संध्याकाळच्या वातावरण ट्रेन अगदी मोकळी होती . 

      रात्रीची थंड हवा पून्हा एकदा श्रावणीच्या चेहऱ्याला स्पर्श करत होते . पण तिच्या चेहऱ्यावर आता रंगाची भावना होती  . काहीवेळाने ती झोपी गेली . किरण तिच्या चेहऱ्याकडे पाहत विचार करू लागला कि कस श्रावणीला समझून सांगावं . स्वतःच्या प्रेमाला किंमत न देता तो फक्त तिच्या सुखांबाबत विचार करत होता .

    अखेर पहाटे ट्रेन सांगलीला पोहचली . श्रावणीला उठवून किरण स्टेशनच्या बाहेर पडला . पहाटेच्या वेळी अगदी वर्दळ कमी होती . दोघेही रिक्षा करून अपार्टमेंटच्या खाली आले . हळू हळू ते वर जाऊ लागले . त्यांच्या घरासमोर आले . दोघेही खूप थकले होते . किरण दार उघडून पाहू लागला तर दार आधीच उघडा असलेल आढळलं .

किरण -" दार उघडाच आहे ."

    दोघांनाही नवल वाटलं  . दोघेही आत गेले आणि शिवानीला शोधू लागले . शिवानी आतमध्ये कुठेच नव्हती . त्यांना काळजी वाटू लागली . शेवटी ते शिवनीच्या फोनवर फोन लावले . फोन उचलण्यात आलं .

किरण -" हॅलो शिवानी .."

ती -" हॅलो .."

आवाज वेगळाच ऐकू आल्याने किरण म्हणाला .

किरण -" कोण बोलत आहे ."

ती -" मी केर हॉस्पिटलमधून नर्स बोलत आहे . त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आण्यात आलाय आणि ते आय . सि . यु मध्ये आहेत ."

किरण -" काय ????"

किरण थक्क झाला होता .

**********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच . आजारी असल्याने उशिरा भाग आला आहे . कस वाटल ते नक्की सांगा . आवडल्यास शेअर करा . धन्यवाद .

🎭 Series Post

View all