मन उधाण वाऱ्याचे भाग -17

shravni going to home with Kiran in train

श्रावणी अगदी खुशीत मोबाइल घेतली आणि उचलली .

श्रावणी -" हॅलो . श्रद्धा ."

पुढून एका पुरुषाचा आवाज आला . 

तो -" हॅलो .."

श्रावणी आवाज लगेच ओळखली . 

श्रावणी -" बाबा ..."

बाबा -" हैप्पी बर्थडे बेटा ."

     श्रावणी चकित झालेली होती . तिला हि अपेक्षा नव्हती . तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . खूप दिवस ती सगळ्यांपासून दूर होती . अचानक बाबांचा आवाज ऐकल्याने तिला अश्रू अनावर आले .

श्रावणी -" बाबा ..."

ती फक्त एवढच म्हणाली .

बाबा -" तू कधी येणार बेटा घरी ?"

    बाबांचा आवाजही रडकुंडीचा वाटत होता . श्रावणी शांत झाली .

बाबा -" अग बोल ना ."

श्रावणी -" मी नाही येणार बाबा ."

बाबा -" श्रद्धेने सगळं सांगितलंय . मी नाही पाठवणार तुला त्या नराधमाकडे .. तू फक्त ये ."

श्रावणी -" नको ."

    डोळ्यात अश्रू घेऊन ती म्हणाली . बाबा तिला खूप विनवणी करत होते . 

श्रावणी -" ठीक आहे बाबा . मी येईन . पण एका अटीवर ."

बाबा -" कोणती अट ?"

श्रावणी -" मी फक्त एका दिवसासाठी येणार आणि परत सांगलीला येणार ."

बाबा -" अग पण .."

वाक्य पूर्ण होण्याआधी ती म्हणाली .

श्रावणी -" मान्य आहे का नाही ?"

खूप विचार करून बाबा म्हणाले .

बाबा -" ठीक आहे . तू ये ."

   श्रावणी खुश तर होतीच , पण ती घाबरलीही होती . जर तिला परत तिच्या नवऱ्याकडे पाठवले तर तीच आयुष्य पूर्ण उध्वस्त होणार . 

किरण -" काय झालं श्रावणी ?"

श्रावणी सर्वकाही किरण आणि शिवानीला सांगितली . 

किरण -" मग आता ?"

श्रावणी -" आज रात्रीच निघावं लागेल . पण ..."

शिवानी -" पण काय ?"

श्रावणी -" ते पुन्हा मला सासुरवाडीला पाठवले तर ?"

    काहीवेळासाठी सगळे गप्प झाले . अचानक शिवानीला काहीतर सुचलं .

शिवानी -" तू किरणला सोबत का घेऊन जात नाहीस ? तो सर्वांना समजावून सांगेल . "

श्रावणी -" हो . तू येशील ना सोबत किरण ?"

किरण थोडावेळ विचार केला आणि म्हणाला .

किरण -" ठीक आहे . रात्रीच्या ट्रेनने जाऊयात ."

श्रावणी -" थँक्स किरण ..."

     सगळे आता शांत झालेले होते . श्रावणी जाण्याची तयारी करत होती . तिच्या डोक्यात खूप सारे विचार चालत होते . शिवानी तिला बॅग भरण्यात मदत करत होती .

थोड्यावेळाने किरण बॅग भरून नुकताच आला होता . 

किरण -" आज रात्रीची ट्रेन आहे . मी तिकीट काढलो ."

श्रावणी -" ह्म ."

ती फक्त तेवढीच उत्तरली . 

शिवानी -" टेन्शन नको घेऊस . सगळं चांगलं होईल ."

     श्रावणी गप्प होती . तिला बघून दोघेही शांत बसून राहिले .रात्रीची ट्रेन होती म्हणून श्रावणी व्यवस्थित सगळी तयारी करून घेतलेली होती . 

    अखेर संध्याकाळ झाली . श्रावणी आणि किरण स्टेशनला जाण्यासाठी निघाले .

शिवानी -" बाय .. श्रावणी .. सगळं चांगलं होईल ."

श्रावणी तिच्या मिठीत गेली आणि पाठ थोपटली .

श्रावणी -" कदाचित मी परत नाही भेटणार ."

शिवानी -" असं का म्हणतेस ? तू येशील नक्की."

     श्रावणीला वेगळीच भीती वाटत होती . घरी गेल्यावर सगळे जण तिची समजूत घालणार अशी शंका तिला होती . तिला काहीही करून सासरी जायचं नव्हतं .

     अखेर ते दोघे स्टेशनला पोहचले . स्टेशनला गाडी नुकतीच लागलेली होती . दोघेही खिडकीच्या शेजारी असलेली सीट पकडले . दोघे आता एकमेकांना पाहू शकत होते . ट्रेन अखेर सुरु झाली . 

     सांगलीहून पुणेकडे जाणारे ट्रेनमध्ये बसणं म्हणजे निसर्गाचं दर्शनच म्हणायचं . पण ट्रेन रात्रीची असल्याने बाहेरच बघणं कठीणच होत . खिडकीतून थंडगार हवा श्रावणीच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्पर्श करत होते . तिचे डोळे हळूहळू मिटू लागले . किरण तिच्याकडेच पाहत होता . तिच्या समाधानकारक चेहऱ्याकडे पाहत तोही समाधान झाला होता . तिच्या घरचे आता तिला सांभाळून घेतील अशी खात्री त्याला वाटत होती .त्याच विचार वेगळाच होता .

      ती झोपली होती . तिच्या सुंदरश्या चेहऱ्याला तो पाहत होता . तिचे केस हवेने तिच्या चेहऱ्यावर येत होते . पण ती अगदी शांत पणे झोपली होती . 

     सकाळ झाली होती . ट्रेनमध्ये चायवाल्यांचे फेरे सुरु झाले . कोणत्यातरी स्टेशनला ट्रेन थांबली होती . पुढच्या ट्रेनची घोषणा स्पीकरवर होत होती . श्रावणी जागी झाली . तिच्यावर शाल पांघरलेलं होत . ती उठली आणि आळस देत बाहेर पाहू लागली . किरण सीटवर नव्हता . ती आजूबाजूला पाहतच होती कि किरण दोन कप घेऊन आला .

किरण -" गुड मॉर्निंग ."

श्रावणी -" गुड मॉर्निंग ."

किरण -" हे घे चहा ."

श्रावणी -" नको .."

किरण -" अग घे . फ्रेश वाटेल ."

      तो आग्रहाने तिच्या हातात कप दिला . ती नाईलाजाने चहा पियू लागली . ट्रैनही सुरु झाली होती आणि प्लॅटफॉर्मला सोडू लागली . श्रावणी चहाच्या कपमधून घोट घेत खिडकीबाहेर पाहत होती . सकाळचं ते प्रसन्न वातावरण श्रावणीला वेगळीच समाधानाची भावना देत होती . 

      काहीवेळाने ट्रेन पुण्याच्या स्टेशनला पोहचलं . नेहमीसारखी वर्दळ जास्त होती . ट्रेन थांबताच श्रावणी आणि किरण उतरले . बाहेर येऊन रिक्षा पकडले . श्रावणीच हृदय जोरात धडधडत होत . ती खूप घाबरलेली होती . तिला असं बघताच किरण तिच्या हातावर हात ठेवून आधार देऊ पाहत होता . 

      रिक्षा एका घरासमोर थांबली . किरण बॅग खांद्यावर घेऊन बाहेर आला . श्रावणीही बाहेर आली . पुढील घराकडे पाहत तिने एक मोठासा दीर्घश्वास घेतली . किरण पैसे देऊन रिक्षाला पाठवला . श्रावणी गेटसमोर उभी होती . किरण तिच्या खांद्यावर हात ठेवला .

किरण -" चल ... सगळं काही ठीक होईल ."

     ती फक्त मान हलवली . किरण गेट उघडला आणि श्रावणीसाठी वाट केला . गेट उघडण्याच्या आवाजाने आत बसलेली श्रद्धा बाहेर आली . श्रावणीला पाहता क्षणीच ती मोठ्याने म्हणाली .

श्रद्धा -" मम्मी , पप्पा .. दीदी आली ."

ती धावतच श्रावणीकडे गेली आणि तिच्या मिठीत गेली .

श्रद्धा -" मिस यू दीदी ."

श्रावणी -" मिस यू टू ..."

श्रद्धा -" चल आत . सगळे वाट पाहत आहेत ."

ती मिठीतुन बाहेर येत म्हणाली .

श्रावणी -" हा .. चल .."

   तिघे आतमध्ये जाऊ लागले . किरण आत जाताच बॅग खाली ठेवला . 

श्रद्धा -" आई ... "

श्रद्धा हाक मारली . आई किचनमधून बाहेर आली . 

आई -" श्रावणी ..."

श्रावणी -" आई ..."

      दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते . दोघे एकमेकांच्या मिठीत जाऊन रडू लागले . इतक्यात तिचे बाबाही आले . श्रावणी त्यांना पाहून आईच्या मिठीतुन बाहेर आली आणि बाबांच्या मिठीत गेली . 

श्रावणी -" मला माफ करा बाबा . मी तुम्हाला काही सांगितली नाही . "

बाबा -" शांत हो बेटा . " 

    तिच्या पाठीवर थोपटत ते म्हणाले . सगळे शांत झाल्यावर श्रावणी म्हणाली .

श्रावणी -" बाबा ... हा किरण ."

बाबा -" हो माहिती आहे . श्रद्धाने सर्वकाही सांगितलं . थँक यू किरण ."

किरण -" अहो असं नका म्हणू ."

     सर्वकाही ठीक झालेलं होत . जेवायची वेळ झालेली होती म्हणून दोघे फ्रेश झाले आणि जेवायला बसले . आज श्रावणीच्या आवडीचे पदार्थ बनलेले होते . सगळे अगदी मजेत जेवण केले . श्रावणीच्या चेहरा आता खुलला होता . 

     दुपारची वेळ होती . सगळे गप्पा मारत सोफ्यावर बसलेले होते . इतक्यात बाहेरचा गेट वाजल्याचा आवाज आला . काहीवेळाने दारात एक जण आल्याचं जाणीव झालं . श्रावणीचे बाबा उठले आणि पाहिले .

बाबा -" जावईबापू ... तुम्ही ?"

    हे ऐकताच सगळ्यांच लक्ष तिकडं गेलं . श्रावणी चकित झालेली होती .

*******************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

मी आजारी असल्याने हा भाग उशिरा आला या बद्दल माफी मागतो . या पुढे लवकर भाग येईल . हा भाग कसा वाटला नक्की सांगा . कंमेंट करा . तुमच्या कंमेंटमुळे मला लिहिण्यास स्फूर्ती मिळते . आवडल्यास नक्की शेअर करा . धन्यवाद 

🎭 Series Post

View all