मन उधाण वाऱ्याचे भाग -16

Shivani and Kiran celebrates shravni’s birthday .

     रात्रीचे 12 वाजत आले होते .श्रावणीला झोपली होती . अचानक एका आवाजाने तिचे डोळे उघडले गेले . घरात कोणी असल्याचं जाणीव तिला होऊ लागलं . बेडवरुन ती उठली आणि हॉलकडे जाऊ लागली . अचानक दार उघडण्याचा आवाज झाला . तीच लक्ष दाराकडे गेलं . ती घाबरली . 

     तिच्या मागूनही आवाज येत होत . मागे वळून पाहिली तर तिथे कोणीच नव्हतं . अंधार खूप असल्याने तिला पुढचं काही दिसतही नव्हतं . आवाज अजून मोठं येऊ लागलं . ती दाराच्या अजून जवळ हलक्या पाउलांनी जाऊ लागली . अचानक दार उघडल्याचा आवाज येऊ लागला . श्रावणीला घाम फुटलं होत . 

    दार जस उघडू लागलं , तस ती डोळे बंद केली . दार पूर्ण उघडलं . ती एक डोळा उघडून पाहू लागली . अंधारामुळे तिला काहीच दिसलं नाही . अचानक खोलीतील दिवा पेटलं . अचानक दिवा पेटल्याने ती किंचाळली .

पुढून आणि मागून एकाच वेळीस आवाज आलं .

" सरप्राईज ..."

    हे ऐकताच श्रावणीने डोळे उघडले . किरण दारात केक घेऊन उभा होता . मागे शिवानीही अगदी खुश वाटत होती . किरण पुढे पाऊल टाकत म्हणाला .

किरण -" हैप्पी बर्थडे श्रावणी ..."

शिवानी -" हैप्पी बर्थडे श्रावणी डियर ."

     शिवानी मागून श्रावणीला मिठी मारत म्हणाली . श्रावणी चकित झालेली होती . तिचा वाढदिवस आहे हे तिलाही माहिती नव्हतं . ती या सरप्राईजने खूप खुश झाली . किरण त्याच्या हातातला केक टेबलवर ठेवला . शिवानी श्रावणीच्या डोक्यावर टोपी घातली . किरण वेळ न घालवता केकवर मेणबत्ती लावला आणि पेटवला . 

शिवानी -" श्रावणी केक काप ."

किरण -" हो . कट कर ."

    श्रावणी केक कापू लागली , तसे दोघे ' हैप्पी बर्थडे ' हे गाणं सुरात म्हणत शुभेच्छा देऊ लागले . केक कापून श्रावणी शिवानीला खाऊ घातली . त्यानंतर श्रावणी किरणलाही केक भरवली . किरण आणि शिवानी हे दोघे तर अर्धा केक श्रावणीच्या तोंडात कोंबले . 

शिवानी -" हैप्पी बर्थडे . डिअर ."

ती पुन्हा एकदा श्रावणीच्या मिठीत पडली .

श्रावणी -" थँक यू शिवानी . थँक यू किरण ."

    दोघांचं आभार म्हणत श्रावणी म्हणाली . पण अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले . 

शिवानी -" काय झालं श्रावणी ?"

किरण -" काय झालं ?"

श्रावणी -" आजच वृणाली मला सोडून गेली होती ."

तिच्या गालावरून अश्रू वाहू लागले .किरण लगेच ओळखला . 

शिवानी -" कोण वृणाली ?"

    किरण इशारेने शिवानीला गप्प बसायला सांगितला . ती गप्प झाली . किरण पुढे होत म्हणाला .

किरण -" वृणाली सदैव तुझ्या सोबतच आहे श्रावणी ."

तो तिला समजून सांगू लागला . श्रावणी डोळे पुसत मान हलवली . 

शिवानी एक भेट घेऊन आली . 

शिवानी -" हे घे तुझं गिफ्ट ."

श्रावणी -" अग गिफ्ट कशाला ?"

किरण -" अग वाढदिवसाला गिफ्ट नाही तर काय असत .उघड पाहू काय आहे त्यात ?"

    श्रावणी भेट दिलेली वस्तूला उघडू लागली . किरण आणि शिवानी दोघे मिळून तिला मोबाइल भेट दिले होते . हे बघून ती म्हणाली .

श्रावणी -" अग मोबाइल कशाला ?"

शिवानी -" तुझ्या जवळ मोबाइल नव्हता ना म्हणून ."

श्रावणी -" पण एवढं महागडं गिफ्ट ?"

शिवानी -" मी एकटीकडून नाही . आम्हा दोघांकडून हि गिफ्ट आहे ."

हे बघून ती पुन्हा भारावून गेली . 

शिवानी -" अग किती रडतेस ?"

     शिवानी तिचे डोळे पुसत म्हणाली . श्रावणी भारावून दोघांच्या मिठीत गेली . तिला नवीन आयुष्य जगण्यासाठी दोघे खूप मदत केले होते . 

किरण -" रात्र खूप झालीय . मला जावं लागेल ."

श्रावणी -" अरे असं कस ..आज थांब इथेच ."

शिवानी -" हो ... थांब आणि श्रावणीच बर्थडे हि आहे आणि त्यावरून रविवार आहे . "

किरण -" चालेल तुम्हाला ?"

शिवानी -" हो . पण सोफ्यावर झोपावं लागेल ."

किरण -" त्या पेक्षा घरीच जातो ."

किरण जरा नाराजीने म्हणाला .

श्रावणी -" अरे नको ... मी झोपते सोफयावर . तू माझ्या बेडवर झोप .."

किरण -" अग नको ... मी झोपतो सोफयावर . मी चेष्टेत म्हणालो होतो ."

श्रावणी -" ठीक आहे . गुड नाईट ."

किरण -" गुड नाईट ."

शिवानी -" गुड नाइट किरण ."

किरण -" गुड नाइट शिवानी ."

    रात्र खूप झालेली होती . त्यामुळे वेळ न घालवता सगळे झोपी गेले .

    सकाळ झालेली होती . वातावरण प्रसन्न झालेलं होत . श्रावणी जागी झाली . डोळे चोळत ती बेडवर बसली . झोपायला उशीर झाला होता , म्हणून तिला उठायला उशीर झाला . तेवढ्यात शिवानी हातात एक कप घेऊन श्रावणीकडे आली .

शिवानी -" गुड मॉर्निंग बर्थडे गर्ल . "

श्रावणी -" गुड मॉर्निंग . "

किरण -" गुड मॉर्निंग ."

श्रावणी -" गुड मॉर्निंग ."

शिवानी -" हे घे बेड कॉफी ."

श्रावणी -" अग तू कशाला त्रास घेतलीस . मी केले असते ना ?"

शिवानी -" दररोज तर तू करत असतेस . आज मी केले . सांग कस झालाय ?"

ती कप तोंडाला लावून एक घोट घेतली .

श्रावणी -" अगदी मस्त झालाय शिवानी ."

शिवानी -" थँक्स . आता उठ आणि फ्रेश हो . मी आणि किरण स्वयंपाक करणार आहे ."

श्रावणी -" काय ?"

किरण -" हो . आम्ही दोघे करणार आहे ."

श्रावणी -" चांगलं होईल ना ?"

किरण -" विश्वास ठेव श्रावणी . होईल चांगलं ."

शिवानी -" हो ."

श्रावणी -" होप सो ."

     असं म्हणत ती उठली आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली . इकडे दोघे स्वयंपाकाच्या तयारीला लागले . किरण पीठ मळू लागला आणि शिवानी भाजी करण्याची रेसिपी बघू लागली . 

    श्रावणी तयार झाली आणि नवीन ड्रेस घातली . ती आधीच सुंदर होती , पण नवीन ड्रेस घातल्यावर अजून सुंदर दिसत होती. सर्वात आधी अपार्टमेंटच्या खालच्या मंदिर मध्ये गेली आणि देवाचं दर्शन घेतली . परत घरी जायला निघाली .

   इकडे शिवानी आणि किरण स्वयंपाक तयार केले होते . हे करताना त्यांना दुपार झालेली होती . जेवायची वेळ ही झालेली होती . श्रावणी येताच तिला सर्वात आधी जेवण्यासाठी बसवण्यात आलं . वास तर छान सुटला होता . पुरी , भाजी , आमटी , श्रीखन्ड सर्वकाही अगदी मस्त ताटात मांडलं होत . श्रावणी खाण्यासाठी थोडी घाबरत होती . पण तिला खावं तर लागणार होत . तिने एक घास तोंडात घातली . 

श्रावणी -" खूप मस्त झालाय शिवानी ."

किरण -" अरे मी पण केलाय सोबत ."

श्रावणी -" हो ."

असं म्हणत तिने अजून एक घास तोंडात घातली .

श्रावणी -" अरे तुम्हीही जेवायला बसा कि .."

     दोघेही जेवायला बसले . त्यानंतर दुपारचा वेळ कसा घालवावा असं विचार करत असताना ते ठरवले कि एक भुताचा फिल्म बघावे . सगळीकडे अंधार करून सोफ्यावर बसून फिल्म बघू लागले . फिल्म भीतीदायक असल्याने शिवानी आणि श्रावणी खूप घाबरत होते . किरणही घाबरत होता , पण तो दाखवत नव्हता .

     अचानक शिवणीचा मोबाईल वाजला .स्क्रीनवर श्रद्धा नाव झळकत होत .

शिवानी -" श्रावणी तुझ्या बहिणीचं फोन आहे . तुझं नवीन सिम चालू झालं नाही म्हणून माझ्या मोबाइलवर केली असेल ."

श्रावणी अगदी खुशीत मोबाइल घेतली आणि उचलली .

श्रावणी -" हॅलो . श्रद्धा ."

पुढून एक पुरुषाचा आवाज आला . 

तो -" हॅलो .."

********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच येईल . हा भाग कसा वाटला नक्की सांगा . कंमेंट करा . तुमच्या कंमेंटमुळे मला लिहिण्यास स्फूर्ती मिळते. आवडल्यास शेअर करा.धन्यवाद 

तुम्हाला आणि तुमच्या परिवारातील सदस्यांना दसऱ्याच्या  हार्दिक शुभेच्छा .