मन उधाण वाऱ्याचे भाग -15

Three friends enjoying their day .

श्रावणी -" किरण ... आपण कृष्णा नदीकडे जाऊयात का ?"

किरण -" हो चला कि .."

शिवानी -" हो चला .."

     तिघेही उठले आणि मंदिराच्या बाहेर निघाले . बाहेर पडताच तिघे आपापल्या गाडीवर बसले आणि कृष्णाच्या किनाऱ्याच्या दिशेने निघाले . नदीच्या खूप आधी गाडी थांबवावं लागलं . गाडी लॉक करून तिघेही किनाऱ्याचे पायऱ्या उतरू लागले . वर्दळ तशी कमी होती . कृष्णा नदीचे  आवाज अगदी मधुर वाटत होत . मनाला एक वेगळीच शांतता देणारी वातावरण निर्माण झालं होत . लहान मूल पाण्यात जाण्यासाठी हट्ट करत होते , पण त्यांचे आईबाबा त्यांना काहीतरी कारणे सांगून धरून होते . किनाऱ्यावर भेळ पाणीपुरीचे ठेलेही होते . 

       तिघेही अगदी नदीच्या किनाऱ्यालगतच्या पायरीवर बसले . त्या मधुर पाण्याचा आवाजाने तिघेही अगदी शांत झालेले होते . अचानक शिवानी श्रावणीच्या चेहऱ्यावर पाणी उडवली . 

श्रावणी -" अग ..."

     शिवानी हसू लागली . तिला बघताच श्रावणीही पाणी तिच्यावर उडवू लागली . दोघींच्या त्या पाण्याचं युद्ध किरण लांबूनच पाहत होता आणि स्मित करत होता . दोघींचं नजर किरणकडे गेलं . त्याला स्मित करत असलेलं बघून दोघीही त्याच्यावर पाणी उडवू लागले .

किरण -" अग काय करायलात ?"

    तोही न थांबता पाणीमध्ये उतरला आणि दोघींवर पाणी उडवू लागला .थोड्यावेळाने पाण्यात भिजून तिघेही थकले . 

शिवानी -" आज तर पूर्ण भिजले ."

श्रावणी -" हो .."

किरण -" तुम्ही मला भिजवलात . आता भूकही लागलीय ."

शिवानी पाणीपुरीच्या ठेल्याकडे पाहत म्हणाली .

शिवानी -" चल मग भेळपुरी खाउयात ."

श्रावणी -" हो खरंच . चला ."

तिघेही पायऱ्या चढत ठेलेच्या जवळ गेले . तिघांनाही जोराची भूक लागली होती . 

किरण -" तीन प्लेट भेळ द्या ."

शिवानी -" मला तिखट बनवा ."

श्रावणी -" मला नको .."

किरण -" का ?"

श्रावणी -" मला आवडत नाही तिखट ."

किरण -" तिखट आवडत नाही ? का झेपत नाही ?"

श्रावणी -" सांगितलं ना . आवडत नाही ."

किरण -" अरे एक गंमत करूयात ."

श्रावणी -" काय ?"

किरण -" तिघेही तिखट भेळ खाउयात . जे पहिला खाल्ले त्यांनी पैसे द्यायचे ."

शिवानी -" मज्जा येईल ."

श्रावणी -" अग नको ."

किरण -" अरे करूयात ना ."

शिवानी -" अग करूयात . काही नाही होणार . भैया तीन तिखट भेळ द्या ."

    काहीही न ऐकता तिने ऑर्डर दिली . थोड्यावेळात तीनही प्लेट त्यांच्यासमोर आलेले होते .

किरण -" मी म्हणल्यावर सुरु करायच . 1 .. 2.. 3"

     तीन म्हणताच तिघेही भेळ खायला सुरुवात केले . थोड्यावेळाने श्रावणीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं . दोघांना कळून चुकलं कि श्रावणीला खूप तिखट लागलीय . त्यामुळे मुद्दामहून दोघे हळू खाऊ लागले . श्रावणी हळूच खात होती . श्रावणीलाही कळून चुकलं कि शिवानी आणि किरण हळू का खात होते ते ? काहीवेळाने तिघांचं एकाच वेळी खाणं झालं . 

किरण -" अरे यार . तिघांचं एकाच वेळीस संपलं ."

श्रावणी -" मला कळालं का एकाच वेळी संपलं ते ."

शिवानी स्मित करत म्हणाली .

शिवानी -" पण तू तिखट खाल्लीस . हेच पुरे .."

पैसे देऊन तिघेही ओल्या अंगाने गाडीजवळ आले . किरण अचानक म्हणाला .

किरण -" अरे बापट मळाला जाऊयात का ?"

शिवानी -" हो . चला जाऊयात ."

श्रावणी -" ते काय आहे ?"

शिवानी -" अग बगीचा आहे . चल ना जाऊयात ."

श्रावणी -" ओल्या अंगाने ?"

किरण -" त्यांनी काय होईल ?"

श्रावणी -" घाण होईल ना ."

शिवानी -" आधीच घाण आहेत . अजून किती घाण होईल ?"

श्रावणी -" ओके . चला मग ."

     तिघेही त्यांच्या गाडीवर बसले आणि बापट माळाच्या दिशेनी जाऊ लागले . काहीवेळाने ते बापट माळेच्या बाहेर गाडी थांबवले व तिघेही आत जाऊ लागले . सगळीकडे हिरवीगार झाडे होती . त्यात मुलांचं खेळणं , प्रेमी जोड्यांचे भेटणं , काही वयस्कर हि बगिचात फिरत होते . 

     तिघांचं अंग ओले असले तरी तेवढं काही ओळखून येत नव्हतं . काहीवेळाने ते एका ठिकाणी गवतावर बसले . गवत अगदी थंड वाटत होत . तिघेही गप्पा मारत बसले होते . इतक्यात शिवानीला कुठूनतरी बॉल लागला . ती बॉल उचलली आणि मागे फिरली . तिथे एक लहानशी मुलगी उभी होती .

शिवानी -" बॉल कोणी मारला ?"

     तिने तिची छोटीशी बोट एका मुलाकडे वळवली . तो हि घाबरलेला होता . तिथे आणखी मुलंमुली होते व खाली काही फरश्यांचे तुकडे पडलेले होते . बघताच शिवानीला कळालं कि हे मुलं लगोरी खेळत आहेत .

ती -" दीदी .. बॉल द्या ना ."

शिवानी थोडी विचार करत म्हणाली .

शिवानी -" एकाच अटीवर देईन ."

ती लहानशी मुलगी प्रश्नार्थक भावनेने पाहत होती .

शिवानी -" आम्ही तिघेही तुमच्यासोबत खेळणार ."

ती -" हो चालेल ."

श्रावणी -" अग काय बोलत आहेस ?"

शिवानी -" अग यांच्यासोबत खेळू कि ."

श्रावणी -" लहान आहेस का ?"

शिवानी -" अग सगळेच मनानी लहान असतात . होय का नाही किरण ?"

किरण -" हो ... श्रावणी चल खेळू ."

     दोघेही श्रावणीला ओढतच खेळायला नेले . तिघेही लहान मुलांसोबत खेळू लागले . कधी शिवानी किरणला बॉल मारायची  , कधी श्रावणी लगोरी लावत होती , कधी शिवानी श्रावणीला बॉल मारायची . तिघेही अगदी लहान मुलं झालेले होते . बघता बघता संद्याकाळ होत आलेली होती आणि हे तिघे पार थकले होते . बाकीचे मुलं निघून गेले . तिघांची अवस्था अगदी लहान मुलांसारखी झालेली होती . मळलेले कपडे , चेहऱ्यावर मातीचे डाग , ओले केस .. 

श्रावणी -" आता घरी जायचं ?"

शिवानी -" हो ."

किरण -" मला काय म्हणायचंय . आता थोड्यावेळात रात्र होणारच आहे . तर आपण जेवूनच जाऊयात ना ?"

शिवानी -" हो . घरी गेल्यावर परत नाही बनवता येणार ."

श्रावणी -" ठीक आहे . चला मग . "

     तिघेही बगीच्या बाहेर लावलेली गाडी काढले आणि एका छानश्या हॉटेल खाली थांबवले . हॉटेल अगदी प्रशस्त होत . सर्वात आधी तिघे फ्रेश झाले आणि जेवायला बसले . वेटर आला आणि ऑर्डर घेतला . 

     थोड्यावेळाने त्यांची ऑर्डर टेबलवर आलेली होती . तिघांना भूकही लागलेली होती . गप्पा मारत जेवू लागले . रस्त्यावरचे दिवे लागलेली होती . जेवताना त्यांना उशीर झालेला होता . तिघे पैसे देऊन हॉटेलमधून बाहेर आले आणि वेळ न घालवता घरच्या दिशेनी निघाले . 

    

    काहीवेळात ते अपार्टमेंटच्या खाली आले . गाडी लावून अगदी कसेबसे पायऱ्या चालून घरात आले . आल्या आल्या शिवानी बेडवर आडवी झाली . 

श्रावणी -" शिवानी .. कपडे मळले आहेत . पहिला फ्रेश हो नंतर झोप ."

शिवानी -" मला कंटाळा आलाय ."

श्रावणी -" उठ ग .."

नाईलाजाने ती उठली आणि बाथरूमकडे निघाली .

किरण -" आता मलाही जावं लागेल ."

श्रावणी -" ठीक आहे . हळू जा ."

    तो हात हलवत घराकडे निघाला . शिवानी कपडे बदलून थेट बेडवर पडली .श्रावणीही कपडे बदलली आणि फ्रेश होऊन झोपायला बेडवर आडवी झाली .

   रात्रीचे 12 वाजत आले . श्रावणीला झोप लागलेली होती . अचानक एका आवाजाने तिचे डोळे उघडले गेले . घरात कोणी असल्याचं जाणीव तिला होऊ लागलं . बेडवरुन ती उठली आणि हॉलकडे जाऊ लागली . अचानक दार उघडण्याचा आवाज झाला . तीच लक्ष दाराकडे गेलं . ती घाबरली .

*******************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच . हा भाग कसा वाटला नक्की सांगा . कंमेंट करा . तुमच्या कंमेंट मुळे मला स्फूर्ती भेटते . आवडल्यास शेअर करा . धन्यवाद 

🎭 Series Post

View all