मन उधाण वाऱ्याचे भाग -14

All three are going to visit temple.

ती मूळ कारण सांगणार नव्हती . 

शिवानी -" मला फक्त झोपावं लागेल ."

श्रावणी -" हो .. तू झोप ... "

     शिवानी झोपली आणि श्रावणी तिच्यावर चादर ओढवली . ती काय त्रास सहन करत होती . हे फक्त तिलाच माहिती होत. 

एक तासाने शिवानी डोळे उघडली . बेडच्या बाजूच्या खुर्चीवर किरण फोनमध्ये पाहत होता . किचनमधून मस्त वास सुटला होता .शिवानी डोक्यावर हात ठेवून उठली .किरणच लक्ष तिच्याकडं गेलं .

किरण -" आता कस वाटतंय ?"

शिवानी -" छान वाटतंय ."

   बाहेरून आवाज ऐकू आल्याने श्रावणी किचनमधून बाहेर आली .

श्रावणी -" आता कस वाटतंय ?"

शिवानी -" मस्त वाटतंय . उगाच काळजी करताय तुम्ही .."

ती हसत म्हणाली .

श्रावणी -" खरच ना ?"

शिवानी -" अग हो ."

श्रावणी -" बर .."

   साधं डोकं दुखी असेल म्हणून किरण आणि श्रावणी जास्त लक्ष दिले नाही.

किरण -" आता बर झालीस तर , चला पार्टी करूयात ."

किरण उत्सुकतेने म्हणाला .

शिवानी -" हो ... चला पार्टी करूयात ."

श्रावणी -" थांबा मी बनवलेलं आणते ."

     श्रावणी किचनमध्ये गेली आणि हातात एक ट्रे घेऊन आली .ती ट्रे टेबलवर ठेवली . त्यात गरमागरम भाजी , वडा पाव आणि टोमॅटो स्वास आणलेली होती . खमंग वास घेत शिवानी म्हणाली .

शिवानी -" व्वा ... याला म्हणतात खरी पार्टी ."

किरण -" अरे ... याला पार्टी म्हणायचं ?"

श्रावणी -" अरे माहिती आहे . पगार झाल्यावर मोठी पार्टी करूयात ."

किरण -" बर .."

     तिघेही भाजी आणि वडापाव यावर ताव मारू लागले . त्यात गप्पांचे पंगत हि वाढून ठेवलेली होती . बघता बघता संध्याकाळ होत आली . 

किरण -" मला आता जावं लागेल ."

श्रावणी -" ठीक आहे ."

शिवानी -" आज थांबू नाही शकत का ?"

     तिचा हा प्रश्न दोघांना चकित करणार होत . तिच्या आजच्या डोकं दुःखीमुळे तिच्याकडं कमी दिवस उरले आहेत असं तिला वाटू लागलं . तिला दोघांसोबत जास्तीतजास्त वेळ घालवायचं होत .

किरण -" मला खरच जावं लागणार आहे शिवानी . मी उद्या येईन कि .."

शिवानीला तिच्या स्वतःच्याच विचारलेल्या प्रश्नाच नवल वाटलं .

शिवानी -" बर ... गुड नाईट ."

       किरण दोघींचा निरोप घेऊन घरी निघाला . श्रावणी शिवानीच्या जवळ बसली .

श्रावणी -" तू आता बरी आहेस ना ?"

शिवानी -" अग हो ... कितीवेळा विचारणार आहेस ?"

श्रावणी -" नाही ... किरणला थांबायला सांगत होतीस ना ? म्हणून विचारलं.”

    ती शिवानीला चिढवत म्हणाली . शिवानी थोडीशी लाजली. पण तिला कळू दिली नाही .

शिवानी -" अग सहज म्हणले . तू पण काय सिरिअस झालीस ."

श्रावणी -" खरच ?"

ती पुन्हा चिढवत म्हणाली . 

शिवानी -" हो ग .."

    दोघ्याही रात्री उशिरा पर्यंत गप्पा मारत बसले आणि झोपी गेले .

    दुसऱ्या दिवशी श्रावणीचा खरा दिवस सुरु झाला . सकाळी उठून ती सगळी तयारी केली . स्वयंपाक करून ती ऑफिससाठी निघाली . ऑफिसमध्ये पहिलाच दिवस असल्याने तिला फक्त काम जाणून घ्यायचं होत . सगळ्या ऑफिसच्या कलीग सोबत तिची ओळख झाली .पहिला दिवस तिच्यासाठी चांगला गेला . त्यानंतर तीच रोजच दिनक्रम ठरलं . सकाळी उठून नाश्ता तयार करणे , नाश्ता करणे ,शिवानीसाठी स्वयंपाक तयार करणे , ऑफिसला जाणे , काम संपल्यावर परत घरी येणे , परत रात्रीच्या जेवणाचं तयारी करणे , रात्री जेवून गप्पा मारत बसणे व झोपी जाणे .

     असेच बघता बघता एक महिना संपून गेला . श्रावणीचा पहिला पगार झाला आणि योगायोगाने तेंव्हा शनिवारही होता . शनिवार आणि रविवार दोन्हीही दिवस तिला सुट्टी होती . सकाळी नाश्ता करताच श्रावणी आणि शिवानी गप्पा मारत बसले होते . इतक्यात किरण घरी आला .

किरण -" अरे यार ... सुट्टीच्या दिवशीपण घरीच बसायचं ?"

शिवानी -" मग काय करायचं ?"

किरण -" अरे बाहेर फिरू चला .तसही श्रावणीचा पगार झालेला आहे . मस्त पार्टी करूयात ."

श्रावणी -" हो ग . चल कि . किती दिवस झाले बाहेरच गेलो नाही ."

शिवानी -" बर ... प्लॅन काय मग ?"

किरण -" प्लॅनच नंतर बघू . आधी घरून निघू तरी .."

श्रावणी -" मी ऐकलंय इथे सांगलीचा गणपती मंदिर खूप प्रसिद्ध आहे . आधी तिथे जाऊयात ."

किरण -" हो जाऊयात . आधी तयार तर व्हा ."

श्रावणी -" चल शिवानी आज तुला मी तयार करते ."

शिवानी -" अग नको .. याच कपड्यात बरी आहे मी .."

श्रावणी -" तू चल तरी ... "

   श्रावणी तीच हात खेचतच बेडरूममध्ये घेऊन गेली .काहीवेळाने श्रावणी बाहेर आली . ती बाहेर येताच किरणच लक्ष तिच्याकडं गेलं .

किरण -" शिवानी कुठं आहे ?"

श्रावणी -" शिवानी ... बाहेर ये ."

     शिवानी हळूच बाहेर येऊ लागली . ती जशी बाहेर आली किरणच लक्ष तिच्याकडे गेलं . तिला खालून वर तो पाहत होता .ती  गुलाबी पायजमा आणि गुलाबी चुडीदार घातलेली होती . कपाळयावर छोटीशी टिकली , केस सिल्की आणि मोकळे सोडलेली , पायात पैंजणच आवाज येत होत . ती खूप सुंदर दिसत होती . पहिल्यांदा ती अशी तयार झालेली होती . किरणच लक्ष तिच्यावरून हटतच नव्हतं . हे बघून श्रावणी शिवानीच्या जवळ गेली आणि डोळ्यातील काजळ काढून तिच्या गालावर लावली .

श्रावणी -" नजर लागू नये . "

किरण हे पाहताच म्हणाला .

किरण -" माझी नजर लागते होय ."

श्रावणी -" मग ? तसल्या नजरेने तू तिला पहात होतास ."

किरण -" बर बर ... चला आता ."

   तो विषय टाळण्यासाठी म्हणाला . तिघेही खाली आले . शिवानी आणि श्रावणी एका स्कुटीवर बसले आणि किरण गाडीवर बसला व तिघेही निघाले . तिघेही सांगलीच्या गणपतीच्या मंदिराजवळ पोहचले . 

   मंदिराच्या आत खूप प्रसन्न करणार वातावरण होत . आतमध्ये खूपकाही गर्दी नव्हती . श्रावणी फुल आणि नारळ घेतली आणि मंदीराच्या आत तिघेही जाऊ लागले . घंटेच्या आवाजाने पूर्ण वातावरण प्रसन्न होऊ लागलं होत . अगरबत्तीच्या वासाने तर श्रद्धेत अजून भर घालत होती . तिघ काही न बोलता मंदिराच्या आत जाऊ लागले . 

   पुढे जाताच गणपतीचा दर्शन या तिघांना झालं . गणपतीला अगदी सुंदर सजवलेलं होत . किरण मंदिराचा घंटा वाजवला आणि आपोआप तिघांचं हात नमस्कारासाठी जुळले . तिघेही डोळे मिटून उभे होते . देवाला मागणी घालत होते . 

    ' श्रावणी आणि शिवानी खूप चांगले आहेत देवा . त्यांना सुखी जीवन दे . श्रावणीला आणखी दुःख देऊ नकोस . ' किरण मनातल्यामनात मागणी घालत होता .

    ' शिवानी एकटी आहे देवा . तिला जीवनात एकटी सोडू नकोस . किरणही खूप चांगला मुलगा आहे . तू फक्त एक कर या दोघांना एक कर . त्यांचं लग्न होऊदेत देवा .' श्रावणीच्या मनात विचार चालू होते .

  ' माझ्या पदरी अजून एक वर्ष शिल्लक आहे देवा . असं कर कि मी उरलेलं जीवन या दोघांसोबत जावं . या दोघांना एकमेकांचे सोबती बनव देवा . मी तर तुझ्याकडे येणारच आहे . यांना तू एक केलंस तर मी यांच्याच पोटी जन्माला येईन ' शिवानी गणपतीकडे आपली भावना प्रकट करत होती . तिघेही एकमेकांसाठी मागणी घालत होते .

    

    तिघेही डोळे उघडले आणि मंदिराला प्रदिक्षणा घालू लागले . काहीवेळ तिथेच बसले.

श्रावणी -" किरण ... आपण कृष्णा नदीकडे जाऊयात का ?"

किरण -" हो चला कि .."

शिवानी -" हो चला .."

    तिघेही उठले आणि मंदिराच्या बाहेर निघाले .

********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच येईल . हा भाग कसा वाटला नक्की सांगा . कंमेंट करा . मला त्यांनी लिहिण्यासाठी स्फूर्ती मिळते . आवडल्यास शेअर करा . धन्यवाद 

🎭 Series Post

View all