मन उधाण वाऱ्याचे भाग -13

Shivani tell her feeling to Kiran .

ती गुलाबाचं फुल पुढे केली आणि डोळे मिटली . 

शिवानी -" किरण ... आय लव्ह यू .. मी तुझ्यावर खूप प्रेम करते . "

     किरण आश्चर्याने शिवानीला आणि नंतर गुलाबाकडे पाहत होता . अचानक किरणला हसू फुटलं . तो हसतच तिच्याकडे पाहत होता . तिने डोळे उघडले . 

शिवानी -" काय झालं ?"

किरण -" मस्करी छान करतेस ?"

शिवानी -" मी मस्करी करत नाहीये किरण .."

हे ऐकताच तोही गंभीर झाला .

किरण -" खरच ?"

शिवानी -" हो .. मी जेंव्हा तुला भेटले . मला एक नवीन मित्र भेटला . पण त्या मित्राबद्दल माझ्या हृदयात प्रेम कधी निर्माण झालं . हेच मला कळालं नाही . रात्रभर फक्त तुझाच विचार चालत असत. तुझ्याशिवाय माझं मन दुसऱ्या कुणामध्ये रमत नाही किरण .. आय लव्ह यू .."

ती परत गुलाब पुढे करत म्हणाली .

किरण -" मी फक्त तुला एक मैत्रीण म्हणून बघितलं शिवानी ... माझ्या मनात कधीच तुझ्याबद्दल प्रेम नाही जाणवलं ."

शिवानी -" पुढे जाणवू शकतो ना .."

किरण -" नाही ..."

शिवानी -" का ? तू कुणावर प्रेम करत आहेस का ?"

किरण गप्प झाला .

शिवानी -" सांग ना ... "

किरण -" शिवानी समझून घे ... आपण प्रेम करणारे जोडपं नाही बनू शकत ."

शिवानी -" का ?"

हे म्हणत ती स्वतःला खालून वर पाहू लागली .

शिवानी -" मी मॉडर्न ड्रेस घालते . मोकळया विचाराची आहे म्हणून ?"

    तो अजूनही गप्प होता . तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागत होते . 

शिवानी -" तू हा म्हण . मी स्वतःला पूर्ण बदलेन . नौकरी सोडेन . मी फक्त घरी राहीन आणि घर सांभाळेन ."

    ती रडत म्हणत होती . तिचे हात थरथरत होते . तिच्या हृदयाचे तुकडे झालेले होते . तरीपण ती किरणला पटवून सांगत होती . पण तो काहीच बोलत नव्हता .

शिवानी -" अरे काही तरी बोल ."

ती जरा जोरातच ओरडली .किरण खाली मान घालून म्हणाला .

किरण -" सॉरी शिवानी .."

    हे ऐकून ती पार तुटून गेली . त्याच मनस्थितीत ती उठली आणि रडत बाहेर गेली .किरण तिथेच बसला होता . ती पळतच गेली आणि गाडीवरून घरी आली . घरी येताच ती बेडवर पडली आणि मोठ्यांनी रडू लागली . तिच्या स्वप्नाचे तुकडे झालेले होते . किरणसोबत ती कित्येक स्वप्न रंगवली होती . आजचा  त्याचा बोलण्याचा तिला खूप त्रास झालेला होता .

    अचानक तिच डोकं दुखू लागलं . हळू हळू डोकं दुखणं वाढू लागलं . ती कशीतरी उठली . गाडी काढली आणि कशीबशी चालवत हॉस्पिटलला आली . तिच्या ओळखीच्या डॉक्टरकडे ती गेली होती . तीला उभसुद्धा राहवत नव्हत . डॉक्टरांनी लगेच तिला इंजेकशन दिले आणि थोड्यावेळाने तीच डोकं थोडस कमी झालं . डॉक्टर सिटीस्कॅन करण्याचा सल्ला दिले . शिवानी हॉस्पिटलमधील सगळी चेक अप पूर्ण केली .

   शिवानी डॉक्टरच्या कॅबिनमध्ये बसली होती . तेवढ्यात डॉक्टर आले . 

डॉक्टर -" हॅलो शिवानी ."

शिवानी -" हॅलो डॉक्टर ."

डॉक्टर -" तुझा रिपोर्ट आला आहे . बघुयात ."

     डॉक्टर रिपोर्ट पाहू लागले . तिच्या मेंदूचा सिटीस्कॅन त्यांच्या हातात होत . डॉक्टर गंभीर दिसत होते . 

शिवानी -" डॉक्टर ... काय झालाय ?"

डॉक्टर -" या आधीही तुझं डोकं दुखत होत का ?"

शिवानी -" हा दुखत होत . पण कमी दुखत होत ."

डॉक्टर -" तेंव्हा काय करायचीस ?"

शिवानी -" पैनकिलरची गोळी घेत होते ."

डॉक्टर -" तुझे आईवडील कोणी आहेत का ?"

शिवानी -" नाही डॉक्टर . मी अनाथ आहे . काय झालाय डॉक्टर ?"

एक दीर्घश्वास घेत डॉक्टर म्हणाले .

डॉक्टर -" शिवानी ... तुझ्या मेंदूत एक गाठ आहे . तुला ब्रेन ट्युमर आहे ."

    हे ऐकून शिवानीला धक्काच बसला . आताच ती प्रेमामध्ये हारलेली होती . तीच हृदय आधीच तुटलेलं होत आणि त्यात अजून भर पडलं होत . ती स्वतःला सावरून म्हणाली .

शिवानी -" मग आता डॉक्टर ?"

डॉक्टर -" तुझ्याकडे 2 वर्ष आहेत ."

   हे ऐकून तिला अजून मोठा धक्का बसला . इकडे तीच प्रेम हारलेलं होत आणि आता आयुष्यात ही ती हारणार होती . 

डॉक्टर -" तरीही आपण ट्रीटमेंट चालू करू . हे काही गोळ्या देतोय . ते घेत जा ."

शिवानी -" त्यानी माझं आयुष्य वाढणार आहे का ?"

     तीच हे वाक्य धक्का बसल्याने बाहेर आलं होत . हे ऐकल्यावर डॉक्टर दीर्घश्वास घेतले आणि म्हणाले .

डॉक्टर -" नाही ... डोकं दुखणं कमी होईल ."

    ती खुर्चीवरून उठली आणि डॉक्टरकडून स्लिप घेऊन बाहेर पडली . तीच मन अगदी सुन्न पडलं होत . गोळ्या घेऊन अगदी जड मनाने गाडी काढली आणि घराच्या दिशेनी निघाली .

   रात्रीचे 9 वाजत होते .  काहीवेळाने ती घरी पोहचली . तिच्या फोनवर किरणचे कित्येक मिस कॉल आलेले होते . बेडवर पडताच ती रडू लागली . तिच्या जीवनात फक्त 2 वर्ष उरलेले होते . प्रेमात हारलेली आणि जीवनात हि हारलेली शिवानी आता मोठ्याने रडत होती . रडतच ती झोपी गेली . 

     सकाळ झाली . ती उठली आणि फोन पाहिली , तर किरणचे खूप सारे मेसेज आलेले होते . ती तयार झाली . आज ती महत्वाचं काम करणार होती . तिने एक निर्णय घेतली होती . गाडी काढून ती ऑफिसला निघाली . ऑफिसमध्ये आधीच किरण आलेला होता . किरण तिला पाहताच तिला थांबवण्याचा प्रयत्न केला . पण ती थेट बॉसच्या कॅबिन मध्ये गेली . 

बॉस -" अरे शिवानी ... काय झालं ?"

शिवानी -" मी नौकरी सोडत आहे ."

बॉस -" का ?"

शिवानी -" सर माझं वैयक्तिक कारण आहे . हे माझं राजीनामाच पत्र ..."

   हे म्हणताच ती फिरली आणि केबिनमधून बाहेर आली . बॉस रोखू पाहत होता . पण ती मागे पाहिली नाही . किरणकडे न पाहताच ती ऑफिसमधून बाहेर आली . किरणला वाटू लागलं कि ती ऑफिस त्याच्यामुळे सोडत आहे .ती त्या ऑफिसमध्ये राहू शकणार नव्हती , ज्या ऑफिसमध्ये तीच प्रेम आहे आणि ती प्रेमात हारलेली होती . ती तिथेच जर  राहिली तर तिला अजून त्रास होणार होत . ती कधीच परत किरणला भेटणार नव्हती . ती दुसऱ्या ऑफिसमध्ये जॉब करू लागली . ती तीच उरलेलं जीवन एकांतात घालवणार होती . 

-------------------------------------------------------

वर्तमानकाळ -

      ती भूतकाळात हरवून गेलेली होती . ते आठवताना तिच्या डोळे भरून आलेले होते . पुढे तिचा लॅपटॉप तसाच उघडा होता . ती सावरत पुन्हा काम करू लागली . 

      इतक्यात दाराची बेल वाजली . ते ऐकताच बेडवरुन उठली आणि दाराजवळ गेली . दार उघडताच श्रावणी शिवानीच्या गळ्यात पडली आणि मोठ्यांनी म्हणाली .

श्रावणी -" मला जॉब मिळालं .."

शिवानी -" काय ?"

ती परत म्हणाली .

श्रावणी -" हो ... मला जॉब मिळालं ."

दोघेही गळ्यात पडूनच नाचू लागले . मागे किरणही होता .

किरण -" अरे दारात काय उड्या मारताय ? आत चला ."

शिवानी -" हो ... आत या .."

    श्रावणी आणि किरण आत आले . श्रावणी लगेचच बॅगमधून मिठाईचा डब्बा काढली आणि त्यातलं एक उचलून शिवानीच्या तोंडात घातली . शिवानीच तोंड पूर्ण मिठाईने भरून गेलं . नंतर तिने किरणलाही मिठाई खाऊ घेतली . सगळे खूप खुश होते .

शिवानी -" मी म्हणले होते ना सगळं काही चांगलं होईल ."

श्रावणी -" हो ग ... थँक्स यार .तुमच्यामुळे मी हे जीवन जगत आहे ."

तिचे डोळे भरून आले होते .

शिवानी -" अग बास यार ... किती रडशील ?"

श्रावणीचे डोळे पुसत ती म्हणाली . 

शिवानी -" चला पार्टी करूयात ."

किरण -" हो ... "

श्रावणी -" हो ... काय खाणार सांगा ."

    इतक्यात शिवानी डोक्याला हात लावत ओरडली आणि बेडवर बसली . किरण आणि श्रावणी तिच्याजवळ आले .

किरण - " शिवानी ... शिवानी .. काय झालं ?"

श्रावणी - " शिवानी ... काय झालं ?"

शिवानी -" डोकं दुखत आहे ."

ती कशीबशी म्हणाली .

श्रावणी -" अग ... थांब मी बाम आणते ."

शिवानी -" नको ... त्या ड्रॉवर मधलं एक गोळी दे ."

   श्रावणी वेळ न घालवता ड्रॉव्हरमधलं गोळी घेतली आणि पाण्याचा ग्लास घेऊन आली . 

श्रावणी -" हे घे .."

शिवानी गोळी घेतली आणि पाणी पिली . 

किरण -" आता कस वाटतंय ?"

शिवानी -" दुखणं आहे थोडस .."

किरण -" अग असं अचानक कस ?"

शिवानी -" होत असं कधीतरी ."

ती मूळ कारण सांगणार नव्हती . 

शिवानी -" मला फक्त झोपावं लागेल ."

श्रावणी -" हो .. तू झोप ... "

   शिवानी झोपली आणि श्रावणी तिच्यावर चादर ओढवली . ती काय त्रास सहन करत होती . हे फक्त तिलाच माहिती होत . 

*********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकर येईल . हा भाग कसा वाटला नक्की सांगा . कंमेंट करा . तुमच्या कंमेंट मुळे मला स्फूर्ती मिळते . आवडल्यास शेअर करा . धन्यवाद 

   

🎭 Series Post

View all