मन उधाण वाऱ्याचे भाग -12

shravni gives her interview and waits for her result

     अखेर सोमवारचा दिवस उजाडला . श्रावणी तयार झाली . अगदी फॉर्मल ड्रेस घालून , सगळी तयारी आटपून ती इंटरव्यूला निघण्यास तयार झाली . तिच्या आयुष्यातील हि एक महत्वाची वळण ठरणार होती . 

      थोडयावेळाने किरण गाडी घेऊन आला आणि खालूनच शिवानीला फोन लावला . शिवानी फोन उचलली . 

शिवानी -" श्रावणी ... किरण खाली आलाय . तयार हो लवकर .."

श्रावणी -" मी तयारच आहे ."

     थोडावेळ आरश्यासमोर उभी राहून दीर्घश्वास घेतली आणि मुलाखतीसाठी निघाली . 

शिवानी -" अग थांब . "

श्रावणी मागे वळत म्हणाली .

श्रावणी -" काय ?"

शिवानी -" हे दही साखर खाऊन जा ."

     ती एक वाटी हातात घेऊन उभी होती . वाटीत थोडीशी दही आणि त्यात साखर घातलेलं होत . शिवानी पुढे आली आणि दही साखर श्रावणीला खाऊ घातली .

शिवानी -" ऑल द बेस्ट ."

ती मिठी मारत म्हणाली .

श्रावणी -" थँक्स .."

अजून एकदा शिवानीचा फोन वाजला . 

शिवानी -" किरणचा असेल .."

श्रावणी -" चल बाय ... जाते मी .. उशीर होईल परत .."

शिवानी -" बाय आणि ऑल द बेस्ट .."

श्रावणी -" थँक यू ."

     श्रावणी पायऱ्या वरून खाली आली . किरण गाडीवर बसला . श्रावणी वेळ न घालवता मागच्या सीटवर बसली. तिला मुलाखतीला उशीर पोहचायचं नव्हतं . 

     काहीवेळाने एका आलिशान इमारतीच्या खाली किरणने गाडी थांबवली . श्रावणी त्या इमारतीकडे पाहत गाडीवरून खाली उतरली .

किरण -" दुसऱ्या मजल्यावर तुझं इंटरव्हिव्ह आहे . "

श्रावणी -" हो .."

किरण -" ऑल द बेस्ट . मी इंटरव्हिव्ह झाल्यावर तुला घ्यायला येईन ."

श्रावणी -" थँक्स ..."

      किरण गाडी वळवला आणि ऑफिसच्या दिशेनी निघाला .श्रावणी वेळ न घालवता लिफ्टमध्ये गेली आणि दुसऱ्या मजल्यावर गेली . तिथे खुपजण मुलाखतीला आलेले होते . श्रावणी ते बघून थोडी घाबरली . तिला नौकरी मिळेल का नाही याची चिंता तिला वाटू लागली . 

     मुलाखतीसाठी नाव पुकारले जात होते . श्रावणी एका बाकावर बसली होती . थोड्यावेळाने तीच नाव पुकारलं गेलं .श्रावणी बाकावरून उठली आणि मुलाखतीच्या रूमकडे जाऊ लागली . दाराजवळ येऊन डोळे मिटली आणि दीर्घश्वास घेतली . दार उघडली आणि आत वाकून म्हणाली .

श्रावणी -" मे आय कम इन ?"

आतमध्ये तिघांपैकी एकजण म्हणाला .

तो -" येस .. कम इन "

श्रावणी परवानगी मिळताच आतमध्ये गेली आणि त्यांच्यासमोर उभी राहिली .

श्रावणी -" हॅलो सर ... मायसेल्फ श्रावणी ."

तो -" प्लिज सीट डाउन ."

     श्रावणी त्यांच्यासमोर डॉक्युमेंट्सची फाईल ठेवली आणि खुर्चीवर बसली .पुढे बसलेले तिच्या डॉक्युमेंट्स कडे पाहत होते . तिला पहिल्यापासून चांगले मार्क होते . हे पाहून त्यांना नवल वाटलं . अखेर ते फाईल बंद केले आणि श्रावणीला प्रश्न विचारू लागले . श्रावणी प्रत्येक प्रश्नाच जमेल तस उत्तर देत होती . तिच्या काही उत्तरांना ते समाधानी होते आणि काही उत्तरांना समाधानी नव्हते . अखेर त्यांनी शेवटचा प्रश्न विचारला .

तो -" व्हाय डू यु नीड धिस जॉब ?"

श्रावणी -" फॉर माय सर्वायवल .( मला जगण्यासाठी )"

तिच्या या अनपेक्षित उत्तरामुळे पुढचे तिला आश्चर्याने पाहू लागले .

तो -" ओके ... यु कॅन गो नाऊ ."

     हे ऐकताच तिने फाईल घेतली आणि स्मित करत बाहेर आली . तिच्या मुलाखतीचा निकाल दुपार चार वाजता लागणार होता . त्यासाठी तिला अजून थांबावं लागणार होत . फक्त तिलाच नाही तर बाकीच्यांनाही थांबावं लागणार होत .

-------------------------------------------------------

     शिवानी बेडवर बसली होती . तिच्या पुढे लॅपटॉप उघडा होता . पण ती मात्र विचारात हरवली होती .

भूतकाळात -

     ती एका अनाथ आश्रम मध्ये वाढलेली होती . पण अभ्यासात मात्र हुशार होती . ती तिथल्याच शाळेत शिकली आणि पुढे कॉलेज करायला सांगलीला आली . इंजिनीरिंग संपल्यावर तिला नौकरी हि भेटली . ती मोकळी मनाची होती . अगदी मॉडर्न ड्रेस घालणारी , मोकळे केस ठेवणारी , हलकासा मेक अप करणारी , त्यात ती खूप आकर्षित दिसत होती . हेच तीच रोजच नटन होत .

      ऑफिसमध्ये किरण आणि श्रावणी एकत्र कामाला होते . सुरुवातीला फक्त कामा निमित्ताने बोलणं व्हायचं . नंतर मग एकमेकांचे फोन नंबरांचे देवाणघेवाण झाले . आता रात्रीही बोलणं होऊ लागलं . शिवानीच्या मनात प्रेमाचे स्पंदने उडू लागले . दोघे आता जिवलग मित्र होते खरं पण ते फक्त किरणच्या दृष्टीने .. 

     हळू हळू फेब्रुवारीचा महिना आला . शिवानी किरणला तिच्यासोबत थिएटरला घेऊन गेली . प्रेमावरचे फिल्म बघताना तीच लक्ष किरणकडेच दडून होती . किरण मात्र फिल्म पाहण्यात मग्न होता . त्यानंतर ती त्याला कॅफेमध्ये खाण्यासाठी घेऊन गेली आणि दोघेही गप्पा मारत तिथल्या पदार्थाचे आस्वाद घेऊ लागले . शिवानीला फक्त किरणसोबत प्रेमाचे क्षण अनुभवायचे होते .

     अखेर 14 फेब्रुवारीचा दिवस उगवला . ' वॅलेंटाईन डे ' चा दिवस . असं म्हणतात या दिवशी जर तुम्ही कुणासमोर प्रेमाची कबुली दिली , तर तुमच प्रेमाचा स्वीकार नक्की होणार . याच कारणामुळे ती सकाळी किरणला फोन लावली .

शिवानी -" हॅलो किरण ."

किरण -" हॅलो .... सकाळी कशी काय आठवण आली ?"

शिवानी -" काही नाही रे .. आजच काय प्लॅन ?"

किरण -" कसलं प्लॅन ? ऑफिसला जायचं आणि काम करायचं . बस "

शिवानी -" आज आपण ऑफिस सुटल्यावर बाहेर जाऊयात ?"

किरण -" अग ऑफिसनंतर थकलेलो असतो ग मी .."

शिवानी -" प्लिज किरण ... जाऊयात ना ?"

    ती इतकी विनंती करत होती . म्हणून किरण तयार झाला . शिवानी छानशी तयार झाली आणि ऑफिसला निघाली . ऑफिसला पोहचताच सगळ्यांची नजर तिच्यामागे फिरू लागली होती. पण ज्याच्यासाठी तयार झाली होती . तोच पाहत नव्हता . शिवानीला कधी एकदा ऑफिसमधून बाहेर जाऊ असं झालं होत . 

     अखेर पाच वाजले आणि सगळे काम आटपून घरी निघू लागले . शिवानीही काम आटपली आणि किरणला ओढतच बाहेर नेली . दोघेही गाडीवर बसून एका कॅफेमध्ये गेले . तिथे व्हॅलेंटाईन डे साठी खूप सुंदर सजवलेलं होत . तिथे खुपशे प्रेम करणारे जोडपे आलेले होते . शिवानी आधीच एक टेबल बुक केली होती आणि ते टेबल चारीबाजूने बंद होती . जेणेकरून कोणीही त्यांचं बोलणं ऐकू नये . शिवानी आणि किरण दोघेही एकमेकांकडे तोंड करून बसले होते . 

शिवानी -" किरण तुला माहिती का ? मी तुला इथे का आणले ?"

किरण -" सांगितल्या शिवाय कस कळणार ?"

     शिवानी एका वेटरला बोलवली . तो वेटर आला आणि शिवानीला गुलाबाचं फुल दिला . किरण त्यांना पाहताच होता . शिवानी ते गुलाबाचं फुल हातात फिरवत होती . तिच्या मनाचे ठोके वाढत होते . 

शिवानी -" तुला माहिती आहे . मी सरळ काय ते बोलते ."

किरण अजून त्या गुलाबाकडे पाहत म्हणाला .

किरण -" हो ... "

ती गुलाबाचं फुल पुढे केली आणि डोळे मिटली . 

शिवानी -" किरण ... आय लव्ह यू .. मी तुझ्यावर खूप प्रेम करते . "

किरण आश्चर्याने शिवानीला आणि नंतर गुलाबाकडे पाहत होता .

********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती

पुढील भाग लवकरच येईल . हा भाग कसा वाटला नक्की सांगा . तुमच्या कंमेंटमुळे मला लिहिण्यासाठी स्फूर्ती भेटते .आवडल्यास शेअर करा आणि सपोर्ट करा . धन्यवाद 

🎭 Series Post

View all