मन उधाण वाऱ्याचे भाग -11

Shravni should decide about her future .

    इतक्यात श्रावणीला एक वयस्कर महिला येताना दिसली . वय 57 एवढं असावं .ती बगीचा फिरून आली आणि श्रावणीच्या शेजारी बसली . तीही आजूबाजूचं निरीक्षण करत होती . तेवढ्यात ती श्रावणीला पाहली .

ती -" हाय .."

श्रावणी त्या महिलेला पाहून स्मित केली आणि ' हाय ' म्हणाली  .

ती -" तू इथे नवीन आहेस का ? तुला इथे कधी पाहिले नाही ."

श्रावणी -" हो ... परवाच आले मी इथे ..."

ती -" अच्छा ..."

    दोघांमध्ये आता शांतता पसरली . दोघेही त्या दुपार वेळच आनंद घेऊ लागले . 

ती -" अगदी शांत वाटत ना ?"

त्यांनी श्रावणीला हा प्रश्न विचारले .

श्रावणी -" हो ... मनाला हवी असणारी शांती .."

ती -" तुला कशाला हवी आहे शांती ?"

अचानक असला प्रश्न आला म्हणून श्रावणी थोडी गप्प झाली .

ती -" सांग .."

श्रावणी पुढे पाहत म्हणाली .

श्रावणी -"प्रत्येकाच्या जीवनात शांती हवीच असते ."

ती -" तेही आहेच .. शांतीसाठीच मी पण येते ."

श्रावणी -" खूप वेगळंच समाधान भेटत असल्या ठिकाणी आल्यावर ."

ती -" हो ... म्हणून दररोज मी इथे येते . पण तुला शांती हवी ? ते पण या वयात ? "

श्रावणी -" हो .."

ती -" असं काय झालं तुझ्या आयुष्यात ??"

श्रावणी एकटक पाहत सांगू लागली .

श्रावणी -" लहानपणापासून माझे वडील खूप कडक होते . आमच्यावर खूप बंधने होते . त्यातल्या त्यात मी मोठी मुलगी होते . माझी छोटी बहीण ' श्रद्धा ' आणि एक मैत्रीण होती . माझी आई .. माझ्या कोणत्याही चुकीला ती मला वाचवत होती . तिच्याशी आणि वृणालीशी सर्वकाही  शेअर करत होते . वृणाली शाळेतली मैत्रीण होती . खूप जिवलग मैत्रीण होती .माझं बारावीच वर्ष चालू होत . पण वडिलांचं बदली वेगळ्या शहरात झालं . माझ्या आयुष्य आता बदलू लागलं. कॉलेज जीवन मी मनोसक्त जगू लागले . पण माझ्या अभ्यासात काही फरक पडू दिले नाही . मग अचानक एक धक्का बसला ."

ती -" काय झालं ?"

श्रावणी -" माझी जिवलग मैत्रीण वृणाली कॅन्सरनी मेली ."

      हे सांगताना तिच्या गालावरून अश्रू वाहू लागले . हे बघून ती महिला श्रावणीच्या खांद्यावर हात ठेवली . ती पुढे बोलू लागली .

श्रावणी -" त्या घटनेनंतर माझ्या जीवनात खूप अंधार निर्माण झालं . मी मैत्रीण किंवा मित्र बनवत नव्हते . त्यानंतर मला किरण भेटला . अगदी चांगला मित्र . तो आणि मी अगदी जिवलग मित्र झालो . कॉलेज संपलं आणि तेंव्हाच माझे बाबा रिटायर झाले . माझ्यासाठी स्थळ बघण्यात आलं . कांदेपोहेचा कार्यक्रम झाला आणि मी पहिल्या भेटीतच  होकार दिले . तिथेच माझी चूक झाली . "

    श्रावणी तिची पुढील घटना सांगितली . 

श्रावणी -" म्हणून शांती हवी होती ."

ती -" माझंही कहाणी तशीच आहे ."

श्रावणी -" खरच ?"

ती -" माझं नाव सरिता ... लग्न 21 व्या वर्षी झालं . त्यांना लग्नाअगोदर मी नीट ओळखले नाही . लग्नाच्या 1 वर्षानंतर त्यांना दारूची लत लागली . पूर्ण पगार त्यातच जायचा . मग मी मुलांच ट्युशन घेऊ लागले . काहीवर्षे संसाराचं गाडा मीच ढकलून गेले . मग अचानक एक दिवस ते एका मुलीसोबत पळून गेले . मला एकटे सोडून ... तेंव्हा पासून आता पर्यंत शांती आणि समाधान याच्या शोधात मी इथे येते . "

श्रावणी -" तुम्हाला एकट नाही वाटत ?"

श्रावणी तिला बघून विचारली .

सरिता -" वाटत ना ."

श्रावणी -" मग तुम्ही परत लग्न का नाही केलात ?"

सरिता -" एकदा लग्न झालं ना , महिलेने लग्न करायचा नाही असा समज या समाजाचा आहे . भलेही तुमचा नवरा दुसऱ्या सोबत पळून जावो . तुम्ही एकटेच राहायचं ."

श्रावणी -" तुम्हाला लग्न करावं वाटलं असेल ना ?"

सरिता -" सुरुवातीला वाटलं . पण नंतर एकटे पणाची सवय लागली . पण समाधान , शांती कधी भेटली नाही ."

श्रावणी हे ऐकून शांत झाली . सरिता उठली आणि श्रावणीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली .

सरिता -" पण आयुष्यात कोणी सोबत असलं ना . आयुष्य खूप सुंदर होऊन जात . "

श्रावणी तिच्याकडे पाहिली .

सरिता -" चल मी जाते . उद्या परत भेटू ."

     सरिता हळू चालत गेली . श्रावणी मात्र विचार करत एकटक पाहत होती . मागून कुणाचा तरी हात तिच्या खांद्यावर आला . ती मागे पाहिली तर शिवानी तिच्या खांद्यावर हात ठेवली होती

 .

शिवानी -" अग तुझं लक्ष कुठं आहे ? किती हाक मारले मी .."

श्रावणी -" काही नाही ग . सहज विचार करत होते ."

शिवानी -" बर चल ... भूक लागलीय मला .."

     श्रावणी बाकावरून उठली आणि शिवानी सोबत घरी जाऊ लागली . घरी पोहचताच दोघे जेवायला बसले . श्रावणी जेवतानाही सरिताच्या बोलण्याचा विचार करत होती . आयुष्यात कोणाचा तरी  सोबती हवी असते , नाहीतर एकटेपणात पूर्ण आयुष्य घालावं लागेल . ती गोंधळली होती . जर परत गेली तर तिचा नवरा परत दारू पिलं आणि मारायला सुरुवात करेल . नवीन आयुष्य जगण्यासाठी दुसरं लग्न करावं लागणार , पण समाज स्वीकारेल का ? या विचारात ती पार बुडून गेली होती . शिवानी इतक्यात आवाज दिली .

शिवानी -" अग लक्ष कुठाय तुझं ?"

श्रावणी विचारातून बाहेर पडली .

श्रावणी -" काही नाही .."

शिवानी -" मग नीट जेव ना .."

श्रावणी फक्त मान हलवली .

    जेवण आटपल्यावर ती कामाला लागली . पूर्ण दिवस ती विचारात हरवून गेली होती . तिला पुढच्या आयुष्याकरिता काहीतरी निर्णय घ्यावं लागणार होत . नाहीतर पूर्ण आयुष्य एकटेपणात घालावं लागणार होत .

     असेच काही दिवस गेले . ती लवकर उठायची , शिवानीला कॉफी बनवून द्यायची , नाश्ता करायची , स्वयंपाक करायची , दुपारी बगीचेत जाऊन बसायची , सरिता सोबत गप्पा मारायची , जेवणाचं वेळ झालं तर शिवानी आणि ती दोघी मिळून जेवायचे , परत संद्याकाळी स्वयंपाक करायची . सगळे दिवस विचारात हरवून ती मनातल्या मनात गोंधळून  जायची .

     संद्याकाळ होत आलेली होती . शिवानी आणि श्रावणी गप्पा मारत होते . इतक्यात एक पोस्टमन आला . शिवानी दारेजवळ गेली . तिने आलेला पार्सल घेतली आणि उघडली . 

शिवानी  -" श्रावणी ... अग श्रावणी . "

श्रावणी  दारेजवळ  आली .

श्रावणी - " काय ?"

शिवानी -" तुझे डॉक्युमेंट्स आले आहेत ."

श्रावणी -" खरच ?"

शिवानी -" हो .. हे बघ ."

     ती डॉक्युमेंट पाहिली .त्यात सगळे डॉक्युमेंट होते . श्रावणीने श्रद्धाला फोन लावून ' थँक्स ' म्हणाली . शिवनी हि बातमी किरणला कळवली . किरणही खुश झाला  . 

     किरण दुसऱ्या दिवशी शिवानीच्या घरी आला . श्रावणीला सोमवार मुलाखत असल्याचं कळवलं . शिवानी श्रावणीची तयारी करवून घ्यायला तयार झाली . 

     अखेर सोमवारचा दिवस उजाडला . श्रावणी तयार झाली . अगदी फॉर्मल ड्रेस घालून , सगळी तयारी आटपून  करून ती इंटरव्यूला  निघण्यास तयार झाली . तिच्या आयुष्यातील हि एक महत्वाची वळण ठरणार होती .

******************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच . हा भाग कसा वाटला नक्की सांगा . कंमेंट करा . आवडल्यास शेअर करा . धन्यवाद .

🎭 Series Post

View all