मन उधाण वाऱ्याचे भाग -10

Shravni make contact with her sister for some reason .

श्रावणी -" थँक यू यार ... मला नवीन जीवन दिल्याबद्दल ... तुम्हीच आता जग आहात माझ्यासाठी ..."

शिवानी -" वेडी आहेस का ?"

     असं म्हणत ती श्रावणीला मिठीत घेतली . किरणही मिठीत घेतला . श्रावणी दोघांच्या खांद्यावर हात घालत रडत होती . तिला आता कुठलीच चिंता नव्हती. 

शिवानी -" बर .. आता रडायचं नाही ."

ती श्रावणीचे डोळे पुसत म्हणाली . 

किरण -" हो ... आणि डॉक्युमेंट कस मागवणार पण ?"

शिवानी -" सरळ फोन करून मागवू ."

श्रावणी -" नको .. त्यांना जर कळालं कि मी इथे आहे . तर मला घेऊन जातील आणि मला तिथे जायचं नाहीये ."

किरण -" तुझं डॉक्युमेंट कुठे आहेत ? म्हणजे सासरी आहे का माहेरी ?"

श्रावणी -" तुला सांगितलं ना कि माझ्या माहेरीच डॉक्युमेंट आहेत आणि माझी बहीण श्रद्धा करेल मदत ."

शिवानी -" ती कुणाला सांगितली तर ?"

श्रावणी -" ती नाही सांगणार . तिला मला चांगली ओळखून आहे ."

किरण -" मग तिचा नंबर माहिती का ?"

तो खिशातून फोन काढत विचारला .

श्रावणी -" फोन नंबर माहिती नाही . माझा मोबाइल तर तिथेच राहिला ."

किरण -" मग आता कस सांगायचं ?"

    शिवनीला काहीतरी सुचलं आणि ती पळतच तिच्या खोलीत गेली आणि हातात लॅपटॉप घेऊन आली . 

शिवानी -" आता कॉन्टॅक्ट होईल ."

श्रावणी -" कस ?"

शिवानी लॅपटॉप चालू केली आणि त्यावर फेसबुक उघडली .

शिवानी -" तुझी बहीण फेसबुकवर असेल कि.."

श्रावणी -" हो आहे ना .."

किरणमध्येच म्हणाला .

किरण -" चला शोधूयात .."

शिवानी स्वतःच अकाउंट उघडली . 

शिवानी -" बहिणीचं पूर्ण नाव सांग ."

    श्रावणी पूर्ण सांगितल्यावर शिवानी लॅपटॉपवर टाईप करू लागली . थोड्यावेळाने लॅपटॉपच्या स्क्रीनवर कित्येक त्याच नावाचे अकाउंट दिसू लागले .

शिवानी -" यातला कुठला अकाउंट आहे ?"

   श्रावणी काळजीपूर्वक पाहू लागली . अकाउंट दिसताच ती स्क्रीनवर बोट ठेवत म्हणाली .

श्रावणी -" हा हीच आहे .... "

शिवानी -" ओके ... एक मिनिट ."

   शिवानी स्वतःच्या अकाऊंटवरून श्रद्धाला फ्रेंड रिकवेस्ट पाठवली . 

शिवानी -" आता लवकरात लवकर ती माझी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करायला हवी ." 

    तिघेही वाट पाहू लागले . वेळ खूप गेला होता . श्रावणी कंटाळून खुर्चीवरून उठली . 

श्रावणी -" रिक्वेस्ट एक्सेप्ट झालं तर सांग ."

     ती उठली आणि किचनमध्ये गेली . किरण आणि शिवानी लॅपटॉपसमोर अजून बसलेले होते . किरणही आता कंटाळला होता . त्यालाही ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत होता . तोही उठला .

किरण -" मला ऑफिसला जायचं आहे ."

शिवानी -" ह्म .."

     ती लॅपटॉपकडे पाहत म्हणाली . तीही कंटाळली होती . श्रावणी किचनमध्ये काम करत होती . किरण दाराजवळ पोहचला होता . 

    इतक्यात लॅपटॉपचा आवाज आला . आवाज येताच शिवानी लॅपटॉपकडे पाहिली आणि जोरात ओरडली .

शिवानी -" रिक्वेस्ट एक्सेप्ट झालं श्रावणी ...."

     आवाज येताच किचन मधली श्रावणी पळत बाहेर आली . किरणही दारातून परत फिरला आणि लॅपटॉपजवळ आला . 

किरण -" अग पाहतीस काय ? मेसेज कर तिला ."

श्रावणी -" हो कर . "

शिवानी -" हो ... हो ... करते .."

     तिने लॅपटॉपच्या किबोर्डवर टाईप करू लागली . तिने सर्वात आधी स्वतःच ओळख करून दिली . थोडा फार ओळख झाल्यावर शिवानीने सर्व काही मेसेज करून पाठवली . श्रावणी किरणला कशी भेटली ? तीच अवतार कस होत ? ती आता कुठे राहते हे सगळं तिने त्या मेसेज मध्ये लिहिलं होत .त्यांनतर श्रद्धाचा मेसेज आला .

श्रद्धा -" मला तुमचा नंबर मिळेल ?"

   शिवानी तिचा फोन नंबर मेसेजमध्ये पाठवली . थोड्यावेळाने शिवणीचा फोन वाजला . शिवनीने फोन उचलला .

शिवानी -" हॅलो .."

श्रद्धा -" हॅलो ... शिवानी ना ?"

शिवानी -" हो .. मी शिवानी बोलते."

श्रद्धा -" तुम्ही फेसबुकवर जे सांगितलं ते खर आहे का ?"

शिवानी -" हो ... अगदी खर आहे ."

श्रद्धा -" दीदी तिथे आहे का ?"

शिवानी -" हा आहे .. बोल तिच्याशी .."

शिवानी फोन श्रावणीला दिली . 

श्रावणी -" हॅलो श्रद्धा ..."

श्रद्धा -" दीदी .."

    दोघांच्या डोळ्यातून अश्रू गालावरून खाली येत होते . रडतच ते एकमेकांशी बोलत होते .

श्रद्धा -" अग दीदी .... मला एका शब्दांनी नाही सांगितलीस . तू कुठे आहेस ? कसल्या परिस्थितीमध्ये आहेस ? मला एक फोन हि केली नाहीस ."

ती रडत म्हणाली .

श्रावणी -" कस सांगू ? परिस्तिथीच तशी होती . "

श्रद्धा -" मला एक फोन लावायचा . तुला माहिती का ? पप्पा आणि मम्मी किती टेन्शन मध्ये आहेत ? तुला शोधून खूप दमले ते ... तू ये बघू इकडे .."

श्रावणी -" नको श्रद्धे .... तिथे आल्यावर ते मला समझवतील आणि परत त्या नर्कात पाठवतील आणि मला तिथे जायचं नाहीये ."

श्रद्धा -" मग काय करणार आहेस ?"

श्रावणी -" मी इथेच राहणार आहे . "

श्रद्धा -" तिथे राहून काय करणार आहेस ?"

श्रावणी -" इथेच एक जॉब शोधेन . तू फक्त एक काम कर ."

श्रद्धा -" काय ?"

श्रावणी -" घरातले असलेले माझे डॉक्युमेंट्स पाठवून दे आणि हा ... मम्मी आणि पप्पाला काही सांगू नको . "

श्रद्धा -" प्लिज दीदी ... ये इकडे ."

श्रावणी -" तू माझं करणार आहेस का नाही ?"

ती थोडावेळ विचार केली .

श्रद्धा -" हा ... फक्त एकाच अटीवर .."

श्रावणी -" कोणती अट ?"

श्रद्धा -" तू माझ्याशी कधीच संपर्क तोडायचा नाहीस .."

श्रावणी -" मी तुझ्याशी न बोलता कधी राहू शकते का श्रद्धे ? "

श्रद्धा -" ह्म .."

श्रावणी -" शिवानी तुला ऍड्रेस पाठवेल . तू डॉक्युमेंट पाठवून दे ."

श्रद्धा -" ठीक आहे दीदी ... काळजी घे ..."

श्रावणी -" नको काळजी करुस ... काळजी घेणारे मला इथे भेटले आहेत ... "

ती शिवानी आणि किरणला पाहत म्हणाली . 

श्रावणी -" तू पण काळजी घे . बाय ठेवते ." 

    श्रावणीला आता समाधान वाटत होत . शिवानी तो पर्यंत ऍड्रेस पाठवली होती .

किरण -" आता समाधान वाटत असेल ना ?"

श्रावणी -" हो खूप ... थँक यू सो मच ..."

शिवानी -" किती वेळा थँक्स म्हणणार आहेस ."

किरण हसतच म्हणाला .

किरण -" मला आता ऑफिसला जायला हवं ."

श्रावणी -" संध्याकाळ येऊन जा ."

किरण -" हो ..."

    किरण  खांद्यावर बॅग अडकवला आणि निघून गेला . श्रावणीही किचनमध्ये गेली . शिवानी तिच्या कामाला लागली .

     काहीवेळाने श्रावणी स्वयंपाक करून बाहेर आली . शिवानी बेडवर बसून लपटॉपवर काहीतरी करत असताना तिला दिसली .

श्रावणी -" तू ऑफिसला नाही जाणार ?"

शिवानी -" नाही ... माझं वर्क फ्रॉम होम आहे ."

हे ऐकून ती शिवानी जवळ बसली . काहीवेळ बसल्यावर  ती कंटाळली . 

श्रावणी -" मी जरा खालच्या गार्डन मध्ये जातेय . भूक लागली तर मला बोलावं ."

शिवानी कामात व्यस्त होती . म्हणून ती फक्त ' हा ' म्हणाली .

     श्रावणी खालच्या बगीचेकडे निघाली . दुपारचा वेळ होता . बगीचेत तशी वर्दळ नव्हती . आजूबाजूच्या हिरवळ बघून कुणालाही प्रसन्न वाटे . श्रावणी बगिचेत आली आणि झाडाखालच्या बाकावर बसली . त्या शांततेत तिला खूप शांत वाटत होत . आजूबाजूला बोटावर मोजता येईल इतकेच लोक होते . 

      इतक्यात श्रावणीला एक वयस्कर महिला येताना दिसली . ती बगीचा फिरून आली आणि श्रावणीच्या शेजारी बसली . तीही आजूबाजूचं निरीक्षण करत होती . तेवढ्यात ती श्रावणीला पाहली .

ती -" हाय .."

********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच . हा भाग कसा वाटला नक्की सांगा . कंमेंट करा . आवडल्यास शेअर करा .धन्यवाद 

🎭 Series Post

View all