मन उधाण वाऱ्याचे भाग -1

Meeting of Shravni aani Kiran is like destinable .

       सूर्याची कोवळी ऊन अख्ख्या शहरावर पसरलेली होती . किरणला लवकर उठण्याची सवय होती . लवकर उठून तो अंघोळी आटपला . रूमच्या बाहेर येऊन त्याची गाडी पुसू लागला . बाजूच्या घरातील रेडिओचा आवाज येत होता . त्यावर भक्तिगीते वाजत  होती . त्या गाण्यांनी वातावरण अगदी प्रसन्न झालेलं होत . त्याचाच रूममध्ये राहणारा अनिकेत अजून झोपलेला होता .गाडी पुसत असताना बाजूचे जोशी काका त्याच्याजवळ आले .

काका -" गुड मॉर्निंग ."

त्यांना बघून तो बसलेला उठला . चेहऱ्यावर स्मित पसरवत म्हणाला .

किरण -" अरे काका ... गुड मॉर्निंग .कसे आहात ?"

काका -" म्हातारपणात काय असेल अजून ?"

किरण -" कोण म्हणले तुम्ही म्हातारा आहात म्हणून . अजून 100 वर्ष जगाल तुम्ही ."

काका -" 100 वर्ष जगून काय करायचं आहे ? बर ते जाऊदेत तू कसा आहेस ?"

किरण -" मस्त .."

काका -" तू ऑफिसला जाणार आहेस ना ?"

किरण -" हो काका . पण अजून वेळ आहे .काही काम होत का ?"

काका -" अरे मी आणि तुझी काकू उद्या पुण्याला जावं म्हणतोय . मग तू स्टेशनला जाऊन तिकीट काढशील ."

किरण -" नक्की काढीन कि . पण कुठल्या कोचचा काढू ?"

काका -" जनरल डब्याचा काढ आणि हे घे पैसे ."

किरण -" अहो काका . असं का करताय ? नंतर द्याकी पैसे . मी कुठं पळून जाणार आहे का ?"

काका -" बर बाबा . मग घरी आणून देशील ?"

किरण -" ऑफिसवरून येताना दिल तर चालेल ना ?"

काका -" चालेल ना .बर येऊ मग ?"

किरण -" हो या."

      किरण सॉफ्टवेअर इंजिनिअर होता . आईबाबांचा एकलुता एक मुलगा , पण त्याचे आईबाबा गावी राहत होते . किरण शहरात रूम घेऊन राहत होता. त्याच्यासोबत अनिकेत हि राहत होता . तो मात्र विद्यार्थी होता  . किरण तसा फक्त ऑफिस आणि रूम एवढंच करत होता . पण गरजुंना मदत करणारा मुलगा होता . तो कुठेही गेला तर तो तिथल्या लोकांशी मिळून मिसळून राहत होता . एकूण काय ? तर किरण हा चांगला आणि गुणी मुलगा होता . 

     गाडी पुसताच तो रूममध्ये आला . अनिकेत अजून झोपलेला पाहून तो म्हणाला . 

किरण -" अन्या . उठ कि ."

   तो अनिकेतला ' अन्या ' या टोपण नावानी बोलवत असत .

अनिकेत त्याच्या भरगस्त आवाज ऐकून कूस बदलला .एकदम आळशी आवाजात तो म्हणाला .

अनिकेत -" काय रे ?"

किरण -" अरे किती वेळ झोपणार आहेस ?"

अनिकेत -" पाच मिनिट."

किरण -" तुझं पाच मिनिट कधी संपतंय तुलाच माहिती ."

     जो कोणी अनिकेतला उठवायचा प्रयत्न करायचा  ,तो प्रत्येक वेळेस 'पाच मिनिट' असा उत्तर द्यायचा . त्याच्या या वागणुकीबाबत किरणला ठाऊक होत . तो अनिकेतच्या मोबाइलवर एक नजर टाकला . त्याचा मोबाइल चार्जिंगला लावलेली होती . तो मोबाइल चालू करून बघितला . तर त्याला कळाल कि त्याचा मोबाइल सायलेंट मध्ये आहे . मग त्याला अनिकेतला उठवण्याची कल्पना सुचली . 

किरण -" अरे अनिकेत उठ . नेहाचा कॉल आलाय ."

     हे वाक्य ऐकताच अनिकेत झटक्यात उठला आणि मोबाइलजवळ गेला . मोबाइल बघितला तर त्यावर कोणाचाही फोन आलेला नव्हता . त्याची आता झोप मोड झालेली होती .

 अनिकेत -" काय यार . किती मस्त झोप लागली होती ."

       नेहा अनिकेतच्या कॉलेजमध्ये त्याच्याच वर्गात शिकत होती . ती अनिकेतला फक्त मित्र मानत होती . पण याच्या मनात मात्र प्रेम उत्पन्न झालेलं होत . तिच्या कोणत्याही कामाला हा नाही म्हणणारा नव्हता . म्हणून किरणला  ही कल्पना सुचली होती .

किरण -" अरे किती वेळ झोपशील अजून तू ? वेळ होईल तुला कॉलेजला जायला ."

अनिकेत -" अजून खूप वेळ आहे ."

तो आळशी आवाजामध्ये म्हणाला .

    तेवढ्यात अनिकेतचा फोन व्हायब्रेट होत असलेल जाणवलं . अनिकेत फोन बघितला तर त्यावर नेहाच नाव झळकत होत . एक सेकंद हि वाया न घालवता तो फोन उचलला . 

अनिकेत -" हॅलो नेहा ."

नेहा -" गुड मॉर्निंग अनिकेत ."

अनिकेत -" गुड मॉर्निंग . बोल कि ."

नेहा -" तू कुठे आहेस ?"

अनिकेत -" रूमवर . का ग ?"

नेहा -" तू विसरलास ना ?"

अनिकेत -" काय ?"

नेहा -" प्रोजेक्टसाठी आपण आज लवकर कॉलेजमध्ये भेटणार होतो ."

अनिकेत जीभ चावला . त्याला हि गोष्ट लक्षात नव्हती .

अनिकेत -" अरे आहे कि लक्षात . आता रूममधून निघतच होतो कि तुझा कॉल आला ."

नेहा -" ये मग वाट पाहत आहे ."

अनिकेत -" आलोच 10 मिनिटात ."

तो फोन ठेवला .

अनिकेत -" किरण भावा . मला कॉलेजला सोडशील ?"

किरण -" का ? तू पाच मिनिट झोपणार होतास ना ."

अनिकेत -" अरे यार . सोड ना प्लीज ."

किरण -" ठीक आहे . चल तयार हो . मला पण काम आहे स्टेशनला ."

अनिकेत -" आता तयार होतो ."

      किरण ऑफिससाठी तयार होऊ लागला . त्याला आज लवकर निघावं लागणार होत . स्टेशनला जाऊन पहिला तिकीट घेऊन तो ऑफिसला जाणार होता .

      अनिकेत लवकरच तयार झाला . दोघेही रूममधून बाहेर पडले . अनिकेत मागच्या सीटवर बसला. किरण गाडी चालवू लागला . स्टेशनच्या आधी अनिकेतच कॉलेज येत होत . म्हणून तो आधी त्याला कॉलेजवर सोडला .

अनिकेत -" बाय भावा . संध्याकाळी भेटू ."

एवढं बोलून तो पळतच कॉलेजमध्ये गेला . 

किरण -" चला आता स्टेशनला . "

तो स्वतःशीच म्हणाला आणि गाडी स्टेशनच्या दिशेनी वळवला .

   थोड्याच वेळात तो स्टेशनच्या पार्किंगमध्ये होता . तिथे गाडी पार्क करून तो स्टेशनमध्ये शिरला . वेळ जरी सकाळची असली तरीही स्टेशनमध्ये चांगलीच वर्दळ होती . स्पीकरमधून येणाऱ्या रेल्वेची वेळ सांगितल जात होत . सगळे आपापल्या ट्रेनची वाट पाहत होते .

     किरण थेट तिकिटाच्या कॉउंटरला गेला . तिथून तो पुण्याला जाणारी ट्रेनची दोन तिकीट खरेदी केला आणि ट्रेन बाबतीत चौकशी केला . ट्रेनची वेळ कळाल्यावर तो स्टेशनच्या बाहेर जाण्याच्या दिशेनी चालू लागला .

     इतक्यात त्याला बसण्याच्या बाकावर लक्ष गेलं . तिथे तीन बाकावर एक मुलगी झोपलेली होती . तिच्या अर्ध्या चेहऱ्यावर ओढणी होती . पण अर्धा चेहरा उघडा होता . किरणला चेहरा ओळखीचा वाटत होता . तिच्या हाताच्या कोपऱ्याला जखम झालेली होती . त्या जखमेच्या आजूबाजूला रक्त वाळलेलं होत . तिच्या कपाळावर हि जखम होती . किरण तिच्याजवळ गेला . तिच्या अर्ध्या चेहऱ्यावरून ओढणी बाजूला केला . गोरा चेहरा पण त्या कपाळाच्या जखमेनी तिच्या चेहऱ्यावरची सुंदरता कमी करत होती . त्या चेहऱ्याला बघून किरण स्तब्ध उभा होता . हि तीच ' श्रावणी ' होती , जी किरणला कॉलेजमध्ये घायाळ करत होती . किरण असाच स्तब्ध उभा होता .

*****************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच येईल . हा भाग कस वाटलं हे नक्की सांगा आणि शेअर करा . धन्यवाद 

🎭 Series Post

View all