मन उधाण वाऱ्याचे भाग - 28

shivani reveal her illness infront of Kiran and shravni

    गाडी हॉस्पिटलकडे निघाली . गाडीतही तिचा आवाज कमी होत नव्हता . किरण जमेल तितक्या वेगाने गाडी चालवत होता. 

      काहीवेळाने गाडी हॉस्पिटलला पोहचली. श्रावणी वेळ न घालवता शिवानीला घेऊन डॉक्टरकडे नेऊ लागली. किरणही गाडी लावून पळतच त्यांच्याजवळ गेला . डॉक्टरला माहिती पडताच ते कॅबिनमधून बाहेर आले . शिवानीला घेऊन डॉक्टर आपत्कालीन कक्षात नेले. श्रावणी आणि किरण दोघे बाहेर उभे होते . आतून किंचाळण्याचा आवाज अजूनही येत होता. हळू हळू आवाज नाहीशी होऊ लागली . काहीवेळाने डॉक्टर बाहेर आले .

डॉक्टर खूप गंभीर होते . 

डॉक्टर -" आपण केबिनमध्ये जाऊन बोलूया." 

      असं म्हणताच श्रावणी आणि किरण त्यांच्या मागे जाऊ लागले. डॉक्टर कॅबिनमधील खुर्चीवर बसले. त्यांच्यापुढे हे दोघेही खुर्चीवर बसले. 

श्रावणी -" शिवानीला काय झालं डॉक्टर ??"

भीतीपोटी तिच्या तोंडून शब्द अढकळत निघत होते . 

डॉक्टर -" तिला शेवटच्या स्टेजची अटॅक येऊन गेला ."

किरण -" म्हणजे ?"

डॉक्टर -" म्हणजे या पुढील दिवस शिवानीला हॉस्पिटलमध्येच राहावं लागेल ."

श्रावणी -" डॉक्टर यावर काही इलाज नाही का ?"

डॉक्टर -" ऑपरेशन करावं लागेल . पण याने काही मिळणार नाही . तिचे दिवस फक्त २ आठवडे वाढतील ."

श्रावणी -" मग करा डॉक्टर. "

ती रडकुंडी आवाजात म्हणाली. 

डॉक्टर -" ऑपरेशन सक्सेस होण्याचे चान्स पण कमी आहे . माझं मत आहे की हे ऑपरेशन करून तुम्ही पैसे वाया घालवणार आहात आणि हा .. पर्मनंट इलाज नाही होणार ."

श्रावणी -" तरीही करा डॉक्टर ."

बोलताना श्रावणीच्या गालावरून अश्रू खाली वाहत होते . 

श्रावणी -" किरण .. सांग की ."

किरण -" हो डॉक्टर ... तुम्ही ऑपरेशन करा . "

डॉक्टर -" ठीक आहे . परत एकदा सांगतो . ऑपरेशन सक्सेस नाही झालं तर तीच आयुष्य नाही वाढणार ."

किरण - " हो डॉक्टर ..."

       अखेर डॉक्टर उठले आणि ऑपरेशनची तयारी करू लागले . डॉक्टर शिवानीला स्ट्रेचरवरून सोनोग्राफी करण्यासाठी घेऊन आले . पण त्याआधी शिवनीचे सगळे केस कापण्यात आले . श्रावणी आणि किरण बाहेरूनच तिला पाहत होते . सोनोग्राफी करण्यासाठी तिला मशीनमध्ये घालत होते . 

     काहीवेळाने डॉक्टरांकडे तिचे सगळे रिपोर्ट आले होते . केबिनमध्ये किरण आणि श्रावणीही उपस्थित होते . सगळे गंभीर होते .

डॉक्टर -" हम्म... रिपोर्ट बघून तर कळतंय की ऑपरेशन यशस्वी होण्याची शक्यता खूप कमी आहे ."

हे ऐकताच श्रावणी आणि किरण या दोघांच्या आशा भंगले .

श्रावणी -" कोणतीही इलाज नाही का डॉक्टर .."

श्रावणी ओल्या डोळ्यांनी डॉक्टरांना विचारली . 

डॉक्टर -" नाही ... म्हणजे एक ऑपरेशन करू शकतो . पण त्यांनी काही होणार नाही , असं माझं मत आहे ."

श्रावणी -" डॉक्टर ऑपरेशन करा .."

डॉक्टर -" ठीक आहे . तुम्ही म्हणत असाल, तर करूयात ऑपरेशन .."

     असं म्हणत डॉक्टर ऑपरेशनच्या तयारीला लागले . श्रावणी मनातल्या मनात देवाची पूजा करत होती.

     किरण पैसेची व्यवस्था करू लागला . डॉक्टर आणि नर्स ऑपरेशन थेटरमध्ये शिवानीला घेऊन गेले .श्रावणी आणि किरण ऑपरेशन थेटरच्या बाहेर बसले होते . ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी दोघे देवाला प्रार्थना करत होते . 

      दोन तासानंतर ऑपरेशन थेटरवरील लाल दिवा विजला. हे बघताच दोघे उभे झाले . 

     डॉक्टर तोंडावरील मास्क काढत बाहेर आले . श्रावणी त्यांच्याकडे खूप आशेने पाहत होती . 

श्रावणी -" काय झालं डॉक्टर ?"

डॉक्टर -" सॉरी ... ऑपरेशन यशस्वी झाला नाही ."

    हे ऐकताच श्रावणीचा बांध फुटला . ती रडत बेंचवर बसली . किरण तिला सावरण्याचा प्रयत्न करू लागला . ती मोठ्याने रडत होती .

    किरणला सुद्धा वाईट वाटत होतं . शेवटची आशाही मावळली होती . ऑपरेशन थेटर मधून शिवानीला स्ट्रेचर वरून जनरल वार्ड मध्ये नेऊ लागले .

     तिला जाताना पाहताच श्रावणी आणि किरण त्या स्ट्रेचरच्या मागे जाऊ लागले . जनरल वार्डात एका पलंगावर शिवानीला हलवले . तिच्या डोक्यावर एकही केस उरले नव्हते. सगळे तपासणी करताना केस न ठेवण्याची अट होती. एकही केस नसल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरची तेज नाहीशी झाली होती.

      तिच्या त्या चेहऱ्याला पाहून श्रावणीला अजून रडू कोसळत होत . ती अजून झोपलेली होती . तिच्या बेडजवळच्या खुर्चीवर बसताच श्रावणीला रडू कोसळलं. तीच हात हातात घेऊन ती रडत होती.

श्रावणीच्या डोक्यावर हात ठेवत किरण समजवत होता .

किरण -" श्रावणी ... आवर स्वतःला ."

श्रावणी -" कसं आवरू किरण ??"

ती हुंदके आवरत म्हणाली .

श्रावणी -" हिला असं पाहून कस आवरू मी स्वतःला ? कोणी सोबत नसताना हिने मला आसरा दिली. सोबत कोणीही नव्हतं तेंव्हा हि माझी आधार झाली . आणि आता हिला माझी गरज असताना मी काहीच करू शकत नाही ."

किरण -" आता नशीबालाच हे पसंद नाही . त्याला आपण काय करू शकतो ?"

      काहीवेळानंतर श्रावणी गप्प झाली. पण ती हातात धरलेली शिवानीच हात सोडली नाही . एक तास उलटून गेला , तरीही ती शुद्धीवर आलेली नव्हती . किरण आणि श्रावणी ती शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते.

      दुपार होत आलेली होती .शिवानी हळूच डोळे उघडली. तिला प्रथम पंखा फिरत असलेली दिसली . न उठताच ती आजूबाजूला पाहू लागली. श्रावणी तिच्या जवळ झोपली होती . तीच हात घेऊन ती बेडवर डोकं ठेवून झोपली होती.

     दुसऱ्या हाताने ती श्रावणीला उठवत म्हणाली .

शिवानी -" श्रावणी ..."

आवाज ऐकताच ती पटकन उठली . 

श्रावणी -" शिवानी .... आता कसं वाटतंय ?"

शिवानी स्मित करत म्हणाली .

शिवानी -" मस्त .."

     यांचं आवाज ऐकताच किरण पण बेडजवळ आला . शिवानी त्यालाही पाहत स्मित केली . श्रावणी डोळ्यातील अश्रूंची मार्ग मोकळी करत म्हणाली .

श्रावणी -" तू का नाही सांगितलीस आम्हाला तुझ्या आजाराबद्दल ??"

शिवानी -" अगं सांगून काही उपयोग होत का ? तुम्ही अजून दुःखी झाला असता , म्हणून नाही सांगितलं ."

      ती स्मित करत म्हणाली . तिच्या अचानक लक्षात आलं कि तिच्या डोक्यावर एकही केस नाहीत . हि परिस्थिती कधीना कधी येणार हे तिला माहिती होतं . म्हणून ती स्मित करत म्हणाली .

शिवानी -" हे बघ आता एकपण केस उरले नाही ."

    ती श्रावणीला हसवण्यासाठी एक निष्फळ प्रयत्न करून पाहिली . पण ती अजूनही रडतच होती . शिवानीही आतून तुटली होती , पण ती दाखवत नव्हती . ती श्रावणीची  डोळे पुसत म्हणाली .

शिवानी -" अगं किती रडतेस ? हे बघ माणसाला एकदा ना एकदा मारायचं आहे . फक्त मला ती वेळ माहिती आहे . "

श्रावणी -" प्लिज ... तू मला सोडून जाऊ नकोस ??"

      ती अजून मोठ्याने रडत म्हणाली . हे बघताच शिवानी तिला मिठीत घेतली . न कळत तिच्याही डोळ्यातून अश्रू येऊ लागले . तिला तिच्या मारण्याचं दुःख नव्हतं , तिला श्रावणीला एकटी सोडून जाण्याचं दुःख होत . श्रावणी तशीच रडत होती . किरण शब्द न काढता त्या दोघींजवळ उभा होता . त्यालाही खूप वाईट वाटत होतं .

*******************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच येईल . कामात अडकल्यामुळे हा भाग खूप खूप उशिरा आलेला आहे . त्याबद्दल क्षमा मागतो . पुढील भाग लवकर टाकण्याचा मी प्रयत्न करीन . धन्यवाद 

🎭 Series Post

View all