मन उधाण वाऱ्याचे भाग - 26

Journey Is near to end

श्रावणी -" वाव ..."

     तिच्या तोंडून अचानक हे शब्द निघालं . पण जेंव्हा तीची  नजर गडाच्या खाली गेली तेंव्हा ती घाबरली . 

श्रावणी -" आपण काल एवढ्या वर चढलो ??"

किरण -" हो .."

    तो स्मित करत म्हणाला .तिला विश्वासच बसत नव्हता कि ती एवढ्या वर चढून आली होती . तिघे आता गड उतरण्याची तयारी करू लागले . काहीकेल्या श्रावणीच्या मनातून कालची गोष्ट जात नव्हती . तिच्या मनात विचारांचा वादळ आलेलं होत . 

     सकाळच्या त्या प्रसन्न वेळेत तिघे सामान घेऊन खाली उतरू लागले . उतरताना श्रावणीच्या मनात किरणचाच विचार चालू होता . उंचीला घाबरणारी श्रावणी आता भीती न बाळगता खाली उतरू लागत होती . 

      गडाच्या कडेला खूप सारे झाडे झुडपे होते .जे अंधारात दिसले नव्हते . सकाळचं दृश्य आणि रात्रीच अनुभव यात मेळ लागतं नव्हता . रात्री अंधारामुळे काही न दिसल्याने श्रावणी आणि शिवानीला भीती वाटली नव्हती . पण सकाळी मात्र उंचीमुळे त्या दोघींही भीत होत्या .

     अचानक पुढे असलेली श्रावणी किंचाळली .

किरण -" अगं काय झालं ?"

शिवानी तिच्या जवळ गेली . 

श्रावणी -" माकडं ."

    ती बोट दाखवत म्हणाली . पाच ते सहा लहानमोठे माकडं त्यांच्या पुढे बसले होते आणि सर्वांचं लक्ष या तिघांकडेच लागून होत . 

किरण -" तुमच्याकडील सामान सांभाळा . कधीही ते घेऊन जाऊ शकतात . मोबाइलला जपून ठेवा ."

      असं म्हणताच श्रावणी आणि शिवानी मोबाइलला जपून बॅगेमध्ये ठेवले . विना मोबाईल जीवन ते कल्पनातही जगू शकत नव्हते . माकडं त्या तिघांना अनोळखी नजरेने पाहत होते . त्यांना माणसांना पाहण्याची सवय नव्हती . 

     अचानक एक माकड त्या दोघींच्या अंगावर आला. तो माकड कदाचित त्या माकडांचा प्रमुख असावा आणि माणसांना पाहून आक्रमक झालेला होता . त्या माकडाला पाहून श्रावणी आणि शिवानी दोघी ओरडत गडावर पुन्हा जाऊ लागले . किरणही घाबरलेला होता . पण तो दोघींना दाखवू शकत नव्हता .

      किरण बॅग काढला आणि त्यातून बिस्किटचा पुडा काढला आणि  त्यातून बिस्कीट काढून त्या माकडाच्या समोर फेकला . आक्रमक झालेला माकड अचानक थांबला . त्या बिस्किटचा वास घेत तो धोका नसल्याचा अंदाज घेऊ लागला . जेंव्हा त्याला खात्री पडली . तो बिस्कीट उचलला आणि खाऊ लागला . त्या माकडाला खाताना पाहताच इतर माकडं ही बिस्कीट खायला पुढे आले . किरण सगळी बिस्कीट त्यांच्या समोर फेकला .

किरण - " हीच वेळ आहे आपल्याला वेळ न घालवता उतरावं लागेल . चला पटकन आणि आवाज करू नका."

     श्रावणी आणि शिवानी अगदी दबक्या पावलाने खाली उतरू लागले . पायऱ्या छोटी होत होती . पावलांना जपून ठेवावं लागणार होतं. श्रावणी आणि शिवानी एकमेकींचे हात धरून उतरत होत्या . किरण मकडांवर लक्ष ठेवत उतरत होता . आता छोटी दिसणारी गाव आता मोठी दिसू लागली .

      शेवटची पायरी उतरताच गाव लागलं . सकाळच्या प्रसन्न वातावरणात गाव अगदी सुंदर दिसत होती .जो कोणी कामाला जाण्यासाठी तयार होत होता. गावचे कोतवाल घरातून नुकतेच बाहेर पडले होते .तिघांना पाहून म्हणाले .

कोतवाल - " काय मग पावणे ...कशी गेली रात्र गडावर ?" 

     अंधारात भीती वाटत असली तरी रात्रीच्या खुल्या चांदण्याच्या आकाशाखाली जेवण करणे . त्या नंतर डिस्को लाइट मध्ये नाचणे , किरणनी केलेली चेष्टा . यात रात्र अगदी मस्त गेलेली होती. पण श्रावणीला किरण बद्दल खूप काही कळलं होतं . त्याच विचारात ती होती . शिवानीच काम अजून संपलेलं होत . तिच्याजवळ मोजून दहा दिवस शिल्लक होते . त्यातच तिला श्रावणी आणि किरणला एक करायचं होतं . त्याच विचारात होती . 

किरण - " अगदी मस्त गेली रात्र ..."

कोतवाल -" अरे व्वा ... छान . तुम्हांसनी थंडी तर वाजली नाही ना ?"

शिवानी -" अहो थंडी खूप होती . पण आगीमुळे काही जाणवलं नाही ." 

शिवानी अनुभवावरून म्हणाली . श्रावणी मात्र विचारात हरवली होती .

किरण - " बरं आता बस स्टँडला जाण्यासाठी बस कितीला येईल ."

कोतवाल - " अहो .. त्याला अजून २ तास आहे ." 

शिवानी -" अरे एवढं वेळ काय करायचं किरण ? " 

किरण विचार करत होता . 

कोतवाल - " अहो या की घरी ."

शिवानी - " तुम्हाला कशाला त्रास ?"

कोतवाल - " त्रास कसलं पाहूण  ... तुम्ही आमचे पाहुण आहात. या ..."

     थोडावेळ विचार करत किरण इशाराने श्रावणीला आणि शिवानीला कोतवालाच्या घरीच्या दिशेनी चालण्यास  सांगितला.घर तस लहान होत . पण गावामधल्या घरांपैकी हे घर मोठं होतं .

कोतवाल -" अगं पाहुणे आलेत . जरा अंघोळीची व्यवस्था करा. "

.

तिच्या बायकोला आवाज देत कोतवाल म्हणाला . " हो " घरांमधून आवाज आला . तिघेही घर पाहत खोलीतल्या पलंगावर बसले .

किरण -" तुम्ही दोघी फ्रेश होऊ शकता."

शिवानी -" इथे ???"

शिवानी शंकेने प्रश्न विचारली .

कोतवाल -" अहो काळजी नका करू . इथे सगळी व्यवस्था आहे . चला दाखवतो ."

      तो त्या दोघींना बाथरूम दाखवण्यासाठी पुढे झाला . श्रावणी आणि शिवानी उठले आणि कोतवालाच्या मागे जाऊ लागले . कोतवाल त्यांना बाथरूम दाखवला . गाव असलं तरी इथे सगळी व्यवस्था होती .

      दोघीही वेळ न घालवता बॅगमधील कपडे काढले आणि बारीबारीने फ्रेश झाले . फ्रेश झाल्यानंतर त्यांच्या शरीरात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली . किरणही फ्रेश होऊन बाथरूममधून बाहेर आला . बाहेर येताच पोहे आणि चहाचा वास इतरत्र घुमत होता. तिघांना जोराची भूक लागलेली होती . 

कोतवाल -" घ्या पाहुण.. चहा आणि पोहे ..."

श्रावणी -" याची काय गरज होती ?"

कोतवाल -" तुम्ही आम्हा घरचे पाहुण... त्यांना उपाशी कसे ठेवणार. घ्या घ्या ... "

     असे म्हणताच तिघे पोहेवर ताव मारू लागले . चहा पिऊन तिघेही अगदी ताजेतवाने झालेले होते . काही वेळ गप्पा मारत ते सगळे बसले . बघता बघता दोन तास कधी निघून गेल हे कळलंच नाही . श्रावणी वेळ पाहताच म्हणाली .

श्रावणी -" अरे बस यायची वेळ झाली . चला." 

किरण -" हो चला .."

तिघेही उठले . 

किरण -" चला आम्ही निघतो कोतवाल साहेब ..."

कोतवाल -" अजून एक दिस थांबा की ..."

किरण -" नाही ... काम आहे साहेब ."

कोतवाल -" बरं... परत ये कधीतरी वेळ काढून .."

किरण -" हो नक्की ... "

       तिघेही निरोप घेऊन गावाच्या स्टँडवर पोहचले . काहीवेळ वाट पाहिल्यानंतर बस आली . सकाळची वेळ असल्याने बसमध्ये गर्दी नव्हती . बस जाताना आजूबाजूच्या निसर्गाचे दृश्य त्यांना मनाला प्रसन्न देणारी होती . रात्रीच्या वेळी अंधार असल्याने त्यांना हे दृश्य पाहण्यासाठी लाभल नव्हतं . दृश्य पाहण्यात तिघ इतके हरवून गेले की कोणी एक शब्द एकमेकांना बोलले नाही.

    काहीवेळाने मुख्य बस स्टँडवर बस आली . हळू हळू सगळे उतरले . स्टँडवरून रेल्वे स्टेशन लांब असल्याने त्या तिघांना रिक्षा करावी लागली . रिक्षात तिघेही शांत होते . श्रावणीच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झालेले होते . शिवानी जे म्हणाली ते खरं आहे का? किरण काहीतरी लपावतोय का? किरणच्या मनात शिवानीच्या उरलेल्या आयुष्याबद्दल विचार चालू होत. शिवानी मानातल्यामनात श्रावणी आणि किरण या दोघांबद्दल विचार करत होती . काहीवेळाने स्टेशनच्या समोर रिक्षा थांबली. तिघे सामानासहित स्टेशनमध्ये शिरले . सांगलीची गाडी नुकतीच प्लॅटफॉर्मवर थांबलेली होती. तिघे वेळ न घालवता तिकीट काढले आणि गाडीत जाऊन बसले . शिवानी खिडकीच्या बाजूला असलेल्या सीटवर बसली. किरण त्या दोघींच्या समोर असलेल्या सीटवर बसला .

    वातावरण अगदी शांत होत. प्लेटफॉर्ममधून गाडी सुटली तशी थंड हवा खिडकीतून आत येऊ लागली होती . काहीवेळाने शिवानी मोठमोठ्या जांभया देऊ लागली. थकलेल शरीर आणि अर्धवट झोप झालेली होती म्हणून तिला झोप येत होतं.

    

     श्रावणी शिवानीच्या डोक्याला हळुवारपणे तिच्या मांडीवर झोपवली.

श्रावणी -" झोप ..."

    ती स्मित करत म्हणाली. खूप झोप लागल्याने शिवानी डोळे बंद केली . श्रावणी हळुवारपणे तिच्या डोक्यावर थोपटत होती. आयुष्यात कधीही आईची माया शिवानी अनुभवली नव्हती. ती आता आईची माया अनुभवत होती.

*****************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच . हा भाग कसा वाटला नक्की सांगा . कंमेंट करा . तुमच्या कंमेंटमुळे मला लिहिण्यास स्फूर्ती भेटते . आवडल्यास नक्की शेअर करा . अजून प्रोत्साहन देण्यासाठी सब्स्क्रिप्शन घ्या .

🎭 Series Post

View all