जिंदगी जिंदाबाद

Life Is All About Satisfaction
राधिकाची नाईट शिफ्ट होती पण दिवसभराच्या पळापली मुळे ती थकली होती . patient चा राऊंड घेऊन ती फाइल्स लिहायला बसली जाम थकली असल्यामुळे तिला चिडचिड होऊ लागली होती तितक्यात स्टाफ ने आवाज दिला मॅडम 7 no चा patient बोलावतोय ,थकलेली ती चिडून patient कडे गेली (मनात बडबडत patient च काही ना काही सुरूच असत जरा नीट बसू देत नाहीत ) मॅडम मला सुट्टी कधी मिळेल 15 दिवस झाले आता ,26 वर्षाची patient तिचा आवाज ऐकून ती शांत झाली तिची चिडचिड थकवा कुठं गेला तिलाच कळलं नाहीं ,26 वर्षाची patient गेल्या 15 दिवसापासून icu मध्ये ऍडमिट होती आणि अजून किती दिवस लागतील याचा अंदाज डॉक्टरांना सुद्धा नव्हता , तुला थोडं बर वाटू लागलं कि पाठवू लगेच तुला घरी बाळा , ती patient ला प्रेमाने समजावून फाईल वर्क   
करण्यासाठी परत आली पण आता ती त्या patient च्या विचारात होती , आपल्या कडे सगळं असताना आपण लहान लहान गोष्टी च्या मागे लागून या सुखाचा आनंद घेऊ शकत नाहीं व दुःखी होत राहतो ,समाधानी नसतो ,15 दिवसापासून एकच बेड वर बाहेर दिवस होतंय कि रात्र हे सुद्धा कळत नाहीं ,जेवताना जे पाहिजे ते खाऊ शकत नाहीं एवढंच काय तर पाहिजे तेवढं पाणी देखील पिऊ शकत नाहीं कारण तिला ckd म्हणेज किडनी चा मोठा disease आहे ,मनातल्या भावना व्यक्त करायला नातेवाईक देखील जवळ नाहीं असे विचार करत ती आपल काम करत राहिली.