फोबीया

' Fear ' is a disease which can diminish your ability to think sane . Don't be afraid and fight your fears !

आज खुप सुंदर आणि आवश्यक विषय घेतलाय !
' फोबिया '
' भीती ' कुणाला कशाची भीती वाटेल काही सांगता येत नाही ..
साहजिक आहे .. नेहमी पेक्षा वेगळ्या काही घटना घडल्या की मनुष्याच्या ह्रदयाचे ठोके वाढतात .. त्यालाच आपण घाबरलो किंवा भीती वाटली म्हणतो .
भीती वाटली की काही जणांना घाम यायला लागतो .. पोटात दुखायला लागतं आणि टाॅयलेटलाही जावसं वाटतं .. ह्रदयाचे ठोके वाढतात , चक्कर यायला लागते , घसा कोरडा पडतो म्हणून आवाजही खोल जातो .. चेहर्‍यावर भीतीच सावट पसरतं , कुठे कुणी काही बोललं .. दुरुन आवाज आलेत .. कुणी तिर्‍हाईताने बघीतलं .. फोनची रिंग वाजली , कुणी मोठ्यांने बोललं , काही पडण्याचा आवाज आला .. तरी सुद्धा भीती वाटायला लागते .
कुणाला पाण्याची भीती .. कुणाला बंद दाराची भीती .. कुणाला अंधाराची भीती .. कुणाला इंजेक्शनची भीती .. पोलीसांची , डाॅक्टरांची , साधुची भीती , भिकार्‍यांची भीती , तिसर्‍या जेंडरची भीती , परिक्षेची भीती .. सतत काही तरी वाईट होईल ह्या विचारांची भीती .. वादळाची , विजेची , उंचीची भीती , बोगद्याची भीती , प्लेनमधे बसायची भीती .. काॅकरोच ची आणि अन्य सरपटणार्‍या प्राण्यांची , हिंस्त्र प्राण्यांची भीती , जादूटोणाची भीती .... अहो भीतीचे खुप सारे प्रकार आहेत आपण इथे लिहू शकणार नाही एवढी मोठ्ठी यादी आहे भीतीची .
सध्य परिस्थितीत कोरोना ह्या महामारीची भीती ...!
सुरुवातीला भीती पोटीच बहुतेक लोकं गेलीत ...!
आता पुर्वी एवढे लोकं घाबरत नाहीयेत म्हणेन बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे .
अगदी बालगोपालांच घेऊया .. घरात थोडा जरी आवाज झाला की ते दचकणार .. परिणती लगेच रडायला लागणार .
त्या पेक्षा मोठे मुले .. कुणी रागावले , मोठ्यांने बोलले , चुकल्यावर .. आईवडीलांनी शिक्षा केल्यास .. लगेच घाबरुन शी .. शी .. सू .. सू .. करणार .
त्यापेक्षा मोठे .. समजदार बनत चाललेतं .. पण घरात एक शिकतायत .. शाळेत एक .. आणि इतर संपर्कात येण्यार्‍या मित्र , तर्‍हेवाईंकांच्या बोलण्याने वेगळचं काहीतरी गुळपीठ डोक्यात सुरु असत .... त्यातून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं तर ठिक .. नाहीतर अभ्यासाची .. नंतर नापास होण्याची .. आणि काही जण चुकीच्या लोकांच्या संपर्कात येऊन .. अनेक अनिष्ट प्रकाराला बळी पडतात .. घाबरुन .. अर्थात भीतीने .
दहावी , बारावी ची परिक्षा मोठ्या मुलांमधील भीतीचे मोठ्ठ कारण ! आईवडीलांची .. ही परिक्षा म्हणजे अपेक्षापुर्ती ....!
मुलांचे .. आईवडीलांनी आपल्या अपेक्षा सांगून एवढे कान भरलेले असतात .. की , काही मुलं .. नापास झालो तर ... नुसता हा विचार करुनच घाबरुन ... काही बरं वाईट करुन घेतात किंवा भीतीपोटी पाठ केलेलही आठवत नाही वेळेवर मुलांना ....!
त्यापेक्षा आईवडीलांनी ह्या वेळेस मुलांना मोकळेपणाने अभ्यास करण्यास मुभा द्यावी आणि त्याला झेपेल एवढेच कर म्हणून सांगून जास्त अपेक्षा दाखवू नये .... बघा जेव्हा तुम्ही मुलांना .. रिलॅक्स करालं .. तेव्हा तुमच्या मनात जो त्याच्या विषयीचा विश्वास आहे .. किंवा तुम्हाला हवे तेवढी टक्केवारी.. भीती मुक्त होऊन .. होऊ शकतं , तुमचे मुलं मिळवतील ....!
त्यापुढील वयातील मुलं , अगदी स्वतः काही ही करु शकणार असा आत्मविश्वास असणारी .. त्यात त्यांना वागण्या बोलण्याचे .. बाकी जगरहाटीचे जे ज्ञान .. आपण आईवडील पाजतो .. आणि त्यावर शिक्षा ही मुकर्रर करतो .. म्हणून काही मुलं .. मनातून आपल्याला थोडी घाबरलेलीच असतात .. काही बेफिकीर असतात .. आणि परतावा मुजोरीने देतात .. जी घाबरलेली असतात .. मग ती मुलं वाक्या गणिक खोटी बोलायला लागतात .. आणि होऊ शकतं .. चुकीच्या संगतीत पडून आयुष्य खराब करुन घेतील .. खरे तर , ती वेळ आईवडीलांच्या परिक्षेचीच असते ..मुलांची मनं सांभाळता सांभाळता .. त्यांचीच मानसीक अवस्था बिघडायला लागते .. अर्थात , आता काहीतरी वाईट करतील मुलं ही भीतीचं .
येनकेन प्रकारे इथ पर्यंत जरी सहीसलामत असलं तरी पुढे काहींना इंटव्ह्युची भीती .. मग आलेत अथक प्रयत्न .. आत्मविश्वास वाढी साठी वर्ग लावणे .. किंवा मानसोपचार तज्ञां कडून कौन्सलिंग ....!
प्रेमभंग झाला की मुलं आत्मविश्वास गमावतात .. पुन्हा सुरुवात करायला घाबरतात .. अर्थात ही पण भीतीच .
लग्नानंतर , संसार थाटताना वाटणारी चिंता .. मुलं जन्माला घालताना वाटणारी चिंता .. हळुहळु भीतीचे रुप धारण करते .
रिटायरमेंटनंतर काय ....?
ही एक अजुन वाढणारी भीती काही जणांमधे .. पद जाणार .. अधिकार जाणार .. घरात चोवीस तास वावरायची सवय नसलेले .. जणू नवीनच गृहस्थाश्रमात नोकरदार मनुष्य पडल्या सारखा वाटतो .. मग चिंता सतावते ..
कसं होणार ....? घरातल्यांनी सांभाळुन घेतल तर बरं .. नाहीतर तेच .. आपण दुरावलोतर नाही कुटुंबापासून .... एकप्रकारची चिंता .. भीती .
लेकीन अपुन बोलता है भाई .. क्यो डरना बंद जगहसे ....?
अपनी माँ का पेट एक बंद सुरक्षित कमरा ही तो था ।
नौ महीने नौ दिन उसमें सहीसलामत रहें हैं .. तों ....
बंद जगह क्या चिज हैं ।
ज्या गोष्टींची भीती वाटते .. तिच गोष्ट वारंवार करा !
लिफ्टची भीती वाटते , हवं असल्यास कुणालातरी सोबत ठेवायचं .. एकच दिवस लागेल तुम्हाला भीती नष्ट करायसाठी .. तुमची भीती जाई स्तोवर .. लिफ्टमधे बसून वर खाली राईड मारा .. आधी मित्रा सोबतं .. मग एकट्याने ....! आणि समजा लाईट गेली किंवा काही बिघाड झाला .. तरी जवळपास वाॅचमन असतो .. त्याच्याजवळ अश्यावेळेस लिफ्ट उघडायसाठी चावी असते .. आजकाल बॅकअप पण असतं .. वीज गेली की लगेच बॅटरीवर लिफ्ट सुरु होते .. आणि समजा हे ही नसलं .. तरी आपल्याला अर्धा तास तरी काही होणार नाही .. तिथे दिलेल्या नंबर वर संपर्क करुन लिफ्टमनला बोलवायचे .. एकंदरीत तुम्ही श्वासावर नियंत्रण मिळवले तर तुमची भीती बघा पळते की नाही ....! भीती वाटली ना की ते love पिक्चरमधला सलमान रेवथी आठवायची .. त्याला राग आला की एक ते दहा पाढे म्हणायला तिने सांगीतले .. आणि जादू ... त्याचा राग गायब व्हायचा .. तसेच आपली भीती ही गडप होऊ शकते ....!
एखाद्या गोष्टीचा नको तितका विचार .... चिंतेच रुप घेत .... मग आपल्या मनाची जी अवस्था होते तिला म्हणतात भीती ....!
का करायचा एखाद्या गोष्टीबद्दल सखोल विचार ...?
उदा. तिने मला असे का म्हंटले ..? त्याने का बघीतले .. त्याने नाही म्हंटले .. कुणी खराब वागले .. वाईट बोलले .. अपघात झाला गाडीचा .. बीमार झालो .. रोग झाला .. काम फत्ते नाही झाले .... लिस्ट मोठी आहे .. मग , माझ्याच सोबत असे का .. मीच का .. मलाच का ...? एक ना अनेक प्रश्न डोक्याला सतावतात .. सोल्युशन काही निघत नाही .. मग आपण त्या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहायचा प्रयत्न करतो ... म्हणजे जास्त चिंता .. चिंतनाचे .. जपाचे .. प्रयत्न .. हे आपल्याला घाबरवतात .. परिणाम .. मनात भीती कुंडली घालून बसते .
मग काय ....?
भीतीला उडवुन लावायचे ....!
बिंधास्त राहायचे , ज्या गोष्टींची भीती .. त्या गोष्टीला अजिबात डोक्यात थारा द्यायचा नाही ....!
आपआपल्या देवाची अश्यावेळेस प्रार्थना करायची .. बघाच करुनं .. बाकी सगळेच विचार बाजुला ठेवुनं .. जे होईल पाहील्या जाईल ... परिस्थितीनुसार .. होऊन होऊन , काय होणार ....?
प्रसंगानुरुप एखाद्या ठिकाणी अपमान होईल .. तर ....!
झाला तर झाला ना ! कुठेतरी चुकलो म्हणून झाला .. कुणी ऊलट बोलेल .. तर ....!
समोरच्याला बोलण्याचा सोसच नाही .. संस्कारच नाही .. म्हणून ....! नापास झालो .. तर ....!
अरे तुला सुधारायची संधी मिळतेय .. लाग अभ्यासाला .. त्यात काय ..! पास ची यादी असते तशी नापासांची पण हवीच ना ..! कोणतेही प्रसंग आपल्यावरच का ..?
हा प्रश्न सोडाच .... आणि तेव्हाचं ही भीती पळेल ....!
सदा सकारात्मक विचार करा .. कोणत्याही अडचणीत ....!
व्वा व्वा व्वा बाई भल्लचं पारायण ऐकवलस गं !
सोताच सांग न आता ... कोनाले भीत .. कायची भीती वाट्टे .. तुया पोटात काऊन गोळा येतो .. मंग कुट चकरा मारत .. का सांगू मी ....? अरे अरे सुरसुरी झाली का सुरु .. तरीच म्हंटले गुपचुप कशी काय ....?
मंग बोलू का वं ..सांग मंग ....
अगं हो हो हो ..! सांगते सगळं , मी पण हाडामांसाचीच ....!
सर्वात आधीतर मला चारचौघात बोलताच येईना .. चिडीचुप !
फक्त ऐकायच काम करायच .. विचार करायचा ह्या बाया एवढ्या बोलतात कश्या ...? ह्यांच्या कडे एवढे किस्से कहाणी कश्या ....?
आपण बोललो तर त्यांच्यापुढे कमजोर दिसणार .. त्या हसतील म्हणून मग चुपचाप .. कुणाच पटलं नाही .. तरी बोलायच नाही ...!
सहजच एका ग्रुपमधे गेले , तिथे मैत्रिणी मिळाल्या .. कळी खुलली .. हळुहळू .. फुलात .. म्हणजेच , बडबड्या बाईत रुपांतर झाले .. तासनं तास मैत्रिणींसोबत बोलू शकते आता ...! बोलण्याची भीती गायब .. गाडी चालवायची भीती .. लुना आणि सायकल चालवायची लग्नाआधी .. मुलीच्या मैत्रिणीने टुव्हीलर शिकविली आणि भीती गायब .. चारचाकी चालवावेसे वाटत होते .. पण तेच मनात भीती .. नवर्‍या शेजारी बसून समोरुन वाहने आलीत की माझेच पाय टाईट व्हायचे .. म्हणजे भीतीने मी ब्रेक मारायची .. ती अवस्था आजही आहे , समोर बसायला मी नाही म्हणते .. पण माझे बदमाश पोट्टे मला समोरच जबरदस्तीने बसवतात .. मुलगा तर मम्मी तो बघ ट्रक आला .. डोळे उघड म्हणून मागून टोकत असतो सदा .. आणि हसत असतात .. तरी ही , अचानक भेटीला आलेल्या मैत्रिणीला खंत बोलून दाखविली .... मला चारचाकी चालवावीशी वाटते .. लगेच , चला वहीनी आताच ड्रायव्हींग स्कुलमधे जाऊ .. मी घेऊन चलते ... अरे तुम्ही आरामात चालवाल गाडी .. मुलगीच आहे शिकवायला ... मग काय लगेच तिच्याबरोबर गेले ... दुसर्‍या दिवशीपासुन क्लास सुरु ... गेले अठरा वर्ष मी गाडी चालवत आहे ... थोडी घाबरुन .. पण चालवते .. प्राण्यांना घाबरतो आपण , पण मुलांसाठी मी माझी भीती बाजुला ठेऊन एका छोट्या सापाला सुद्धा मारले होते .. आणि माझ ठाम मत होतं आणि आहे ... आईवडीलच घाबरतील तर मुलं कशी निपजतील .....!
पण आधीही आणि आजही माझी मुलं बाहेर गेलीत आणि सांगीतल्या वेळेवर आले नाहीत , फोन ऊचलला नाही .. तर माझ्या पोटात गोळा येतो , कळ उठते पोटात ... घाम यायला लागतो ... टाॅयलेटला जाव लागतं .. हा .. हा .. हा
पण हे पाच दहा मिनीट होतं मग मी कामाला लागते .. जेवढे नंबर असतील तिथे काॅलकरुन विचारपुस करुन माहीती मिळविते ... आणि एकंदरीत पंधराव्या मिनीटाला मी भीतीमुक्त असते ....!
{ मला मनातुन असं वाटत .. जर मदतीची गरज असेल तर आपण लगेच मदतीला हजर राहू शकू ... म्हणुन , फोनाफोनीचा प्रयत्न .. पोलीस खात्यात नवरा .. त्यामुळे जरा विचार येतात जास्त } खरेच .... मी माझ्या जवळच्यांची पुर्ण माहीती घेतल्याशिवाय स्वस्थ बसत नाही ... त्यासाठी माझ्याकडे आधी पासुनच खुप जणांचे म्हणजेच मुलांच्या मित्रांच्या घरचे , मित्रांचे फोन नंबर आणि जवळपास कुठे राहतात वगैरे पत्ता घेऊन ठेवते ... पण सहसा माझी ही अवस्था मुलांना माहीत आहे , म्हणुन ते मला आधी माहीती देतात .. म्हणुन ही भीती जरा मलाच भीते की काय असं वाटायला लागलय ..हा .. हा .. हा
फ्रेंड्स .. विनाकारण कुणालाही भीती घालू नका .. खरेच सगळे मनानी पक्के नसतात .. कधी कधी तुम्ही सहजतेने एखादी गोष्ट बोलता पण समोरचा जर हळवा असेल तर तो त्याच्या टाईपने ती गोष्ट घेईल .. पण मग भीतीने कुंडली मारली डोक्यातं .. की फार जड जात दुसर्‍याला ....!
कुणालाही भीती वाटत असेल . तर बोलाव समजदार व्यक्तींसोबत .... पण खरेच भीती घालवायची तर स्वतःच खंबीर व्हावे ....!
मेडीटेशन हा सर्वात चांगला उपचार आहे .. दिवसातून दोन वेळा तरी मेडीटेशन करावे .. यु ट्युब वर तुम्हाला मेडीटेशनच्या आॅडीओ विडीओ मिळतील .. नागपुरचे हिप्नोटिस्ट मुने सरांचेही खुप छान आॅडीओ विडीओ मिळतील युट्युबवर .. भीतीचे प्रमाण जास्त असेल तर ....!
नाहीतर खाने का , पिने का { शरबत } , मस्त बिनधास्त जीने का ....! बस कोरोना में थोडा ख़याल रखने का ....!
अजुन खुप लिहायच राहीलय माझं ! बाकी नंतर कधीतरी....!

संगीता अनंत थोरात
08/05/2021

🎭 Series Post

View all