तिला सावरताना भाग-१८ ( अंतिम भाग )

At the end , Arnav and Pooja getting married after long time of acceptance of their love to each other. But , one small twist is there....

              बघता बघता लग्न दोन दिवसावर येऊन थबकली. आता पूजाच्या मनात तर आत्महत्या सारखं विचार येत होती. असेच विचार करत ती तिच्या  बेडवर रडत होती. ????????????????....
            खूप सारे आठवणी ती आठवत अशीच बेडवर पडली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू मात्र तसेच चालू होती. असेच काही क्षण ती आठवणी मध्ये हरवून गेली. त्या नंतर तिचा डोळा लागला. कारण उद्याचा दिवस तिला खूप अवघड जाणार होता. उद्या हळदीचा कार्यक्रम होणार होता. खूप सारे पाहुणे येणार होते.

          सकाळच ते कोवळे ऊन पूजाच्या त्या पडलेल्या चेहऱ्यावर पडला होता. ऊन तिच्या चेहऱ्यावर पडताच ती उठली. थोडा वेळ ती बेडवर बसून राहिली. बाहेरून खूप काही आवाज ऐकू येत होते. पूजा उठून ती दरवाजा ओपन करून बघती तर काय???..रचना , रवी , जसीका आणि अर्णव पूर्ण घराच्या सजावटीत व्यस्त होते .

रवी -" अरे अर्णव ते मोठे फ्लॉवर दे ना???..."

          रवी मोठ्या स्टूल वर उभा होता आणि एका पोलच सजावट करत होता. त्याला मदत म्हणून अर्णव तिथे उभा होता. जसिका आणि रचना पाहुण्यांसाठी लागणारे वस्तूची लिस्ट करत बसले होते.
        
        पूजा रूमच्या बाहेर येऊन आजूबाजूला बघत होती. आता कुठ हे घर लग्नाचं वाटत होत . रचना तिला बघताच तिच्या जवळ येत म्हणाली.

रचना -" अरे पूजा ... उठलीस??... गूड मॉर्निंग डिअर... ????????"

एवढं बोलून रचना पूजाला हग केली.

रचना -" कॉनग्रेट्स फॉर युवर वेडिंग डिअर...????????"

      रचना एवढं बोलताच पूजाच्या चेहऱ्यावर मात्र खोटं अशी स्माईल पसरली होती. त्या स्माईल च्या मागे खूप सारा दुःख दडलेल होत.
    
     रचना च्या त्या आवाजाने सगळेजण तिच्याकडे बघत होते. अर्णव , रवी आणि जसिका सुद्धा तिच्या जवळ आले . रवी आणि जसिका तिला शुभेच्छा देत होते. पण तीच लक्ष फक्त अर्णवकडे होत. तो काय म्हणेल याचा विचार कदाचित ती करत असावी . सगळ्यांचं अभिनंदन देऊन झालं. सगळ्यात शेवटी अर्णव पुढे आला. अर्णव आणि पूजा दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते... अर्णव नी तीच हात हातात घेऊन होता... त्याला कळत नव्हतं की काय म्हणावं .... तेवढ्यात रवीचा आवाज आला.

रवी -" अरे अर्णव आटप लवकर ..."

तेंव्हा कुठे दोघांना जाग आली. दोघंही  इकडे तिकडे बघू लागले .

अर्णव -" पूजा ..."

पूजा नाव ऐकताच... "ह ????????..." म्हणाली...  

अर्णव -" विश यू मेनी हॅप्पी वेडींग लाईफ..... तू जिथे जाणार आहेस तिथे  खुशीत रहा... आणि हा अजुन एक विसरू नको आम्हाला..."

पूजा -" पण अजुन एक दिवस आहे ना??..."

अर्णव -" हो... पण सर्वात आधी आम्हीच तुला वीश करावं असं आम्हाला वाटलं... उद्या वेळ मिळेल का नाही माहिती नाही...????????"

पूजा -" अस का म्हणत आहेस ??.."

अर्णव -" काही नाही ग... असच..."

रवी अजुन एकदा आवाज देऊ लागला ..

रवी -" झालं का विश करून तुझ अर्णव... ????????"

अर्णव -" चल नंतर बोलतो... खूप काम आहेत..."

      एवढं बोलून तो तिच्या हातातून त्याचा हात काढत जाऊ लागला. तिला मात्र त्याचा हात सोडवत नव्हतं... जणू ती म्हणत असे की ,' जाऊ नकोस ना अर्णव प्लीज '.. ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभी होती.... तिच्या त्या सुजलेल्या डोळ्यातून परत एकदा अश्रू येत होते... ती डोळे पुसतच रूममध्ये गेली... तिची ही अवस्था रचना कडून लपवून राहिली नाही.... पूजा तिच्या रूम मध्ये जाताच ती सुद्धा उठून तिच्या रूम मध्ये जाऊ लागली... 

      रचना तिच्या रूम मध्ये गेली . बघती तर काय पूजा तिच्या रूम मध्ये नव्हती...पण रचनाला मात्र  कुठून तरी रडण्याचा आवाज येत होता... ती इकडे तिकडे बघत होती तर आवाज तर बाथरूम मधून येत होता आणि त्यासोबत शॉवरचा सुद्धा आवाज येत होता... रचना दरवाजाला बडवत म्हणत होती.
 
रचना - " पूजा.... पूजा ... तू आत आहेस काय??..."

पूजाकडून कोणताच रिप्लाय आला नाही... रचना ची चिंता मात्र वाढू लागली... आज तीच हळदीचा कार्यक्रम होता आणि ही तर अजुन रडतच आहे...

रचना -" पूजा... शांत हो बघू... "

पूजा -" कसं शांत हू रचना... तूच सांग... इथे परिस्थती हातातून बाहेर निघून जात आहे... आणि तू शांत हो म्हणत आहेस...????????????????????... प्लीज रचना लिव्ह मी अलोन.... "

रचना -" कसं एकट सोडू तुला पूजा... आज तुझ हळदीचा कार्यक्रम आहे... आणि तू तर इथे रडत बसली आहेस... तुझ निर्णय पक्का असेल तर का रडत आहेस ???..."

पूजा -" अग मी हा निर्णय डोक्याने घेतलेला होता मनानी नाही...????????... एकेरी प्रेम करून बसले मी रचना..."

रचना शेवटी वैतागून म्हणाली...

रचना -" कोण म्हणाले की एकेरी प्रेम आहे म्हणून...????????"

पूजाला काहीच कळाल नाही. ती आता शांत होऊ लागली. न राहवून ती बाहेर आली.

पूजा -" व्हॉट डू यू मीन???..."

रचना -" म्हणजे पूजा तो तिला अगोदर पासूनच प्रेम करत होता... तो तुला हॉस्पिटल पासून ते ऑफिस पर्यंत तुझ्या विषयीच विचार करत होता... फक्त मूर्ख कधी तुला सांगितलाच नाही... "

पूजा -" होता म्हणजे ???..."

रचना -" आता त्याच्या लाईफ मध्ये प्रीती आली आहे... तो तिच्या घरीच असतो आता कित्येक दिवस ... "

हे वाक्य ऐकताच परत तिचा बांध तुटला... ती स्वतः च्या डोक्याला मारू लागली... रचना तिला थांबवत होती... तीच हात पकडून थांबवली..

रचना -" काय करत आहेस ???... "

पूजा -" माझं नशीबच फुटक आहे...  पहिला बाबांना गमावले होता आता माझ्या हृदयाला गमावत आहे...????????"

रचना -" पूजा .. तो मुव्ह झालेला आहे... तुला पण व्हावं लागेल... तुला हा लग्न करावच लागणार आहे... तू खुशीत रहा ..."

पूजा रडतच रचना च्या गळ्यात पडली. ती खूप रडु लागली... थोड्या वेळानी शांत झाल्यावर...

रचना -" चल पूजा तयार हो... आज महत्वाचं दिवस आहे तुझ्यासाठी... जा रेडी हो .."
    
      पूजा कसल्यातरी विचारांमध्ये हरवली होती. तसेच विचार करत करत ती स्वतः कधी रेडी झाली तिलाच कळाल नाही...  बाहेर सगळे आज रात्रीची तयारी करत होते... आज रात्रीचा हळदीचा कार्यक्रम त्यांच्याच बंगल्यात होणार होता... पूजा रेडी होऊन तिच्या रूम बाहेर आली ,तर काय सगळ्यांचं नजर तिलाच बघत होते... ती आज खूपच सुंदर दिसत होती... आज रात्रीतर मग खूपच सुंदर दिसणार होती... त्या सगळ्यांच्या नजरांमध्ये अर्णव ची सुद्धा नजर होती... 

      ती बाहेर येताच बाबा तिच्याकडे येत म्हणाले..

बाबा -" पूजा... रेडी झालीस बेटा... खूपच सुंदर दिसतच आहे अगदी तुझ्या ममा सारखी... "

बाबांच्या त्या ओल्या डोळ्यांनी तिचे ते रूप न्याहळ्यात होते... तेवढ्यात करण तिथे आला...

करण -"  यू आर लूकिंग वेरी गोर्जस...????????"

       एवढं बोलून तो तिला हग केला... त्याला बघून अर्णवला जेलस होत होती... पूजा करण ला हग करत असली तरी तिची नजर मात्र अर्णव ला बघत होती... तिला स्पष्ट दिसत होत की अर्णव जेलीस फील होत आहे ते... ती मुमेंट खूप एन्जॉय करत होती... तेवढ्यात तिला लक्षात  की अर्णवची ही नजर शेवटची असणार आहे ...

      सगळे पूजाच्या रूप न्हाळ्यात असताना तिकडून प्रीती आली...

प्रीती -" हॅलो एव्हरी वन... "

         सगळ्यांची नजर पूजा वरून प्रीती कडे वळली. तिला बघून  अस वाटत होत की लग्न पूजाच नाही तर प्रीतीच  आहे .. ती तर अप्सरा सारखी दिसत होती .. स्पेशली रवी आणि अर्णव ची नजर तिला बघत होते...

प्रीती -" कॉनग्रेट स पूजा..... "

        एवढं बोलून ती पूजाला हग केली... पूजा ला मात्र तिथे कंफर्टेबल वाटणार नव्हतं ... कारण तिथे अर्णव आता प्रीती ल न्याहळत होता... तिच्या नजरेत सुद्धा आता जेलिस दिसत होत...

प्रीती -" आय एम हॅप्पी फॉर यू..."

पूजा -" थंक्स बॉस..."

प्रीती -" बॉस नाही.... फक्त प्रीती म्हण... बर वाटेल मला..."

पूजा -" ह्म..."

करण -" पूजा ... ही कोण ??"

पूजा -" अरे ... ही माझी बॉस आहे...आणि प्रीती हा करण ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे....."

'लग्न होणार आहे '... हा वाक्य बोलताना ती अर्णव कडे बघत होती...

करण -" ओह.... यू आर अल्सो लूकींग वेरी ब्युटिफुल प्रीती..."

एवढं बोलून करण प्रीतीचा हात घेऊन तिला किस केला... सगळे जण त्याला बघत होते... प्रीती तिचा हात मागे घेत म्हणाली...

प्रीती -" थेंक्स... ????????"

       कदाचित हे वागणूक तिला सुद्धा आवडलं नव्हतं... एवढं बोलून ती सुद्धा तयारीत बिझी झाली... कारण अर्णव प्रीतीला बोलावून घेतला होता...

               बघता बघता संध्याकाळ कधी झालं हे कळालच नाही...सगळेजण हळदी साठी तयार झाले होते.. पाहुणे लोक आणि पूजाच्या ऑफिस मधले सगळे कलिग आणि त्यांच्या बाबांच्या ऑफिसमधले सुद्धा आले होते .. पूजा तर अगदी परीपेक्षा सुंदर दिसत होती... करण सुद्धा तितकाच देखणा दिसत होता...

           हळदीचा कार्यक्रम सुरू झाला... काहीवेळा नंतर पूजाला हळद लावायला सुरुवात झाली... पहिला बाबा तिला हळद लावले . हळद लावताना मात्र त्यांचे डोळे मात्र ओले होते... होणार पण कसं नाही शेवटी ऐकलूती एक मुलगी होती... पूजाच्या डोळ्यात पण अश्रू येऊ लागली... सगळे करण आणि पूजाला हळद लावू लागले ..

     त्यानंतर ऑफिस मध्ये पुढे आले... रचना अगोदर आली ती पूजाला हळद लावत म्हणाली...

रचना -" अभिनंदन... ????????"

        पूजा मात्र फक्त हसत तिला धन्यवाद देत होती... शेवटी अर्णव पुढे आला... तो पुढे येताच पूजाच हृदय मात्र वेगाने धावत होती.. पूजा अर्णव च्या डोळ्यात हरवून गेली... अर्णव सुद्धा खूप ओझ्या हातांनी तिला हळद लावू लागला... जेंव्हा तो हळदीचा हात तिच्या गालावरून फिरवत होता तेंव्हा पूजाच्या डोळ्यातून न कळत पाणी आलेलं होत... अर्णव न बोलताच मागे फिरला ... त्याच्या डोळ्यातली तिच्या बद्दलच प्रेम त्याला दाखवून द्याच नव्हतं...

     हळदीचा कार्यक्रम संपला... काही लोक अजुन सुद्धा पूजा आणि करण ला अभिनंदन देत होते... आणि काही लोक जेवून घेत होते... अर्णव त्याच दुःख विसरून जाण्यासाठी तो स्वतःला कामात व्यस्त करून घेत होता... तो काम करत असताना डोळे अजुन ओले होते... त्याची ही अवस्था प्रितीच्या नजरेतून सुटला नाही... प्रीती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली..

प्रीती -" अर्णव... जेवलास ???"

अर्णव -" नाही... मला अजुन काम आहेत..."

प्रीती -" मला तुझ्याशी बोलायचं आहे... "

अर्णव -" तुला दिसत नाही काय??... मी बिझी आहे ते..."

प्रीती त्याच हात धरून ओढतच घेऊन जाऊ लागली... ती आणि अर्णव जात असताना पूजा त्यांना बघत होती...  तिकडे प्रीती बंगल्याच्या पुढच्या गार्डन मध्ये घेऊन आली..

प्रीती -" तुझ काय चालयं अर्णव ??"

अर्णव -" काय नाही..."

प्रीती -" एकतर तू तुझ्या मनातलं काही सांगत नाहीस तिला .."

तिला मध्ये थांबवत अर्णव म्हणाला..

अर्णव -" तिला कुणाला???"

प्रीती -" पूजाला..."

अर्णव -" प्रीती ... तीच उद्या लग्न आहे आणि तुला वाटतंय की मी तिला सांगून टाकावं..."

प्रीती -" होय..."

अर्णव -" नको..."

प्रीती -" मग किती दिवस अस तडपत राहशील ??"

अर्णव -" माहिती नाही... पण ती खुश आहे ना???"

प्रीती - " तुझ्या पुढे काही सांगावं म्हणजे डोकं फोडून घ्यावं लागतंय...????????.. चल मी जाते..."

अर्णव -" तू चालीस ???"

प्रीती -" का ... तू अजुन जेवला ही नाहीस..."

अर्णव - " नको... मला भूक नाहीये.."

प्रीती -" काही नाही सांगायचं... तिला जर यायचं असेल तर चल पहिला जेवून घे मग चल..."

अर्णव -" नको... प्रीती ... आपण जाऊयात.."

प्रीती -" पूजा सांगून जावूया मग आपण.."

एवढं बोलून ती अर्णव ला ओढतच सगळ्यांसमोर घेऊन जावू लागली...  पूजा खुर्चीवर, तर  रचना आणि रवी तिथेच  उभे होते..

प्रीती -" पूजा ... मी निघते उद्या लवकर येईन...????????"

पूजा तिला बघून फक्त स्माईल देत होती...जेंव्हा अर्णव पुढं आला तेंव्हा पूजा त्याच्या डोळ्यात सुद्धा बघण्याची हिम्मत होत नव्हती...

अर्णव -" पूजा ... मी सुद्धा जाईन.."

पूजा -" एवढ्या लवकर..?"

अर्णव -" हो... "

पूजा -" उद्या येशील ना..."

अर्णव काही न म्हणता फक्त मान हलवली.. तो जसा जाऊ लागला तस तस पूजाच्या डोळे ओले होत होते.. पण रडणार नव्हती... कित्येक जण तिथे होते..  अर्णव ला थांबवण्यासाठी तिची इच्छा तर खूप होती पण आवाज पण नाही निघत होता... इकडे मात्र आपल्या मनावर दगड ठेवत अर्णव सुद्धा जात होता... तिला आपले ओले डोळे दिसू नये म्हणून तिच्याकडे पाठ करून जात होता... ????????

????????????

अच्छा चलता हूँ
दुआओं में याद रखना
मेरे ज़िक्र का जुबां पे स्वाद रखना
दिल के संदूकों में
मेरे अच्छे काम रखना
चिट्ठी तारों में भी
मेरा तू सलाम रखना

अँधेरा तेरा मैंने ले लिया
मेरा उजला सितारा तेरे नाम किया
चन्ना मेरेया मेरेया
चन्ना मेरेया मेरेया
चन्ना मेरेया मेरेया
बलिया ओ पिया..

महफ़िल में तेरी
हम ना रहे जो
ग़म तो नहीं  है
ग़म तो नहीं है
किस्से हमारी नजदीकियों के
कम तो नहीं है
कम तो नहीं है
कितनी दफा सुबह को मेरी
तेरे आँगन में बैठे मैंने शाम किया
चन्ना मेरेया मेरेया
चन्ना मेरेया मेरेया
????????????

????????????

     कार मध्ये बसून अर्णव आणि प्रीती निघाले... कारच्या विंडोतून बाहेर बघत अर्णव च्या डोळ्यातून पाणी येत होत... थोड्यावेळाने प्रितीच्या घरी दोघेही पोहचले... घरी पोहचताच अर्णव प्रीतीला म्हणाला

अर्णव -" प्रीती... ड्रिंक्स आहेत का???"

प्रीती -" तू ड्रिंक घेणार???"

अर्णव -" हो..."

प्रीती एक बॉटल आणि दोन ग्लास घेऊन बाल्कनी मध्ये अर्णवकडे  एक ग्लास देऊन ,ती त्यात ड्रिंक्स दिली...
थोडा वेळ असेच शांतपणे गेला... एकदमच अर्णव रडु लागला...

प्रीती -" अर्णव... काय झालं??"

अर्णव -" प्रीती यार... खूप त्रास होतय ग..."

प्रीती तिला मिठीत घेऊन शांत करू लागली...

प्रीती -" श... "

अर्णव -" ती उद्या कुणाची तर होणार... आणि मी काही नाही करू शकत... ????????"

प्रीती -" अर्णव सगळं काही ठीक होईल..."

अर्णव -" कसं ठीक होईल .. प्रीती..."

एवढं बोलून तो अचानक झोपी गेला... आज खूप थकून गेला होता... तो प्रितीच्या मांडीवर झोपी गेला... प्रीती त्याच्याकडे बघत म्हणाली...

प्रीती -" उद्या सगळं काही ठीक होईल...अर्णव..."

उद्याच ते दिवस सगळं काही ठरवणार होत...

##############################

      सकाळची वेळ होती... प्रीती बाल्कनी मधेच झोपी गेली होती... तिच्या तोंडावर ऊनाचा प्रकाश पडल्यावर तिला जाग आली... ती उठल्यावर कळाल की अर्णव कधीचा गेला होता.... ती सुद्धा रेडी होऊन पूजाच्या घरी गेली .... तिथे खूप सारी तयारी चालली होती .. त्यांचा बंगला इतका मोठा होता की लग्न करण्यासाठी त्यांना कोणताही मंगल कार्यालय ची गरज नव्हती... खूप सारे लोक आताच येत होते.. रवी , रचना , अर्णव तर लग्नाच्या तयारीत मग्न होते ..

     अर्णव तर स्टेजला सजवत होता... खूप सुंदर स्टेज दिसत होता... स्टेज वर दोन खुर्ची ठेवलेली होती... खुर्ची कसली एक प्रकारचं सिंहासन च होत... अर्णव आणि रवी दोघेही स्टेज  डेकोरेशन  करत होते.. आता लोकांची गर्दी सुद्धा वाढत होती..खूप सारे लोक जसे मोठे बिज्नेस मेन लग्नासाठी आलेले होते.... प्रीती मात्र अर्णव आणि रवी करत असलेले तयारी बघत होती, तिला पुजाशी भेटायचं होत... त्यासाठी पूजा कुठ आहे ,ते शोधत होती...  शेवटी विचारपूस केल्यावर तिला कळाल की पूजा रेडी होण्यासाठी तिच्या रूम मध्ये आहे...  प्रीती वेळ न घालवता पूजाच्या रूम मध्ये गेली. तिथे खूप सारे मुली पूजाला रेडी करत होते. पूजाच मेक अप आणि फायनल टच अप करत होते....

        प्रीतीला बघताच पूजा तिला स्माइल देऊ लागली आणि म्हणाली...

पूजा -" प्रीती... तू कधी आलीस??"

प्रीती - " आताच आले..."

पूजा -" मग मी कशी दिसतेय???."

प्रीती -" खूप सुंदर दिसत आहेस पूजा... तुला कोणाची नजर न लागो... "

               एवढं म्हणत प्रीती तिला काजळाची एक टीका लावली.

प्रीती -" पूजा... तुझ्याशी मला काहीतरी बोलायचं आहे.."

पूजा -" बोल की..."

प्रीती -" नाही म्हणजे... मला तुझ्याशी पर्सनल मध्ये बोलायचं आहे.."

पूजाला कदाचित काय बोलणार आहे याची जाणीव होती. तरी ती सर्वांना बाहेर जाण्यासाठी सांगून प्रीतीला म्हणाली...

पूजा - " आता बोल.. काय बोलायचं आहे??"

प्रीती -" पूजा... तू खरच खुश आहेस??"

पूजा नॉर्मल मध्ये बोलू लागली.

पूजा - " हो ग... का??"

प्रीती - " तुला खरच वाटतंय की तू खुश आहेस...."

पूजाला आता कळून चुकलं की प्रीती काय म्हणत आहे ते...

पूजाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. प्रीती तिला शांत करत तिला हग करत म्हणाली..

प्रीती - " मला माहिती आहे की तुझ मन अर्णव मध्ये गुंतला आहे ... "

पूजा तिच्यापासून दूर जात म्हणाली..

पूजा - " तुला कसं माहिती ?"

प्रीती - " तुझ्या डोळ्यात त्याच्याबद्दल असलेलं प्रेम दिसत वेडी...????????"

पूजा -" तुला माहिती असून तू अर्णव सोबत का असतीस ??"

पूजा प्रीतीला डायरेक्ट पणे विचारात होती... तेवढ्यात रचना तिथे आली...

प्रीती -" म्हणजे ??"

पूजा -" म्हणजे तुझ्यात आणि अर्णव मध्ये काय चालू आहे??"

प्रीती पूजाच्या ती अवस्था बघून हसत होती...

प्रीती - " काही नाही...  तुला कोणी सांगितल.."

पूजा रचनेकडे बघत होती.. रचणाला कळतच नव्हत की काय चालू आहे.प्रीती रचना कडे बघत हसू लागली.

प्रीती -" पूजा पूजा ... ????????.. अग तुला काहीतरी गैरसमज झालेला आहे..."

पूजा -" अस कस... रचना तर म्हणत होती की अर्णव तुझ्या घरी एक दिवस रात्री राहिला.."

प्रीती -" एक दिवस रात्री कसं राहतात??"

पूजा -" म्हणजे तो एक रात्री तुझ्याकडे होता म्हणून..."

प्रीती - " अग हो... तेंव्हा तो माझ्यासाठी आला होता.. म्हणजे मी जरा जास्त ड्रिंक केले होते .  तेंव्हा  मला तो घरी सोडण्यासाठी आला होता आणि तो तिथेच राहिला.. आमच्यात अस काहीही झालं नव्हतं.."

तीच हे ऐकुन रचना पुढे येऊन म्हणाली...

रचना -" मग तेंव्हा तो शॉपिंग का आल्यावर तेंव्हा का बोलवत होतीस ??..."

प्रीती -" तेंव्हा तो फक्त मला आधार देण्यासाठी आला होता... त्याच्यापुढे काहीच नाही रचना...आणि हा जेंव्हा जेंव्हा तो मला भेटायचा तेंव्हा तेंव्हा तो तुझ्याबद्दल बोलत होता..तू म्हणजे त्याला जीव की प्राण आहे ... मी पण किती वेडी आहे तेंव्हाच तुला सांगायला पाहिजे होत.. आता खूप वेळ निघून गेलाय..."

    तीच हे बोलणं ऐकून पूजाला हुंदके येऊ लागले..तेवढ्यात पुजाचे बाबा तिथे आले... त्यांना काय झालं ते कळलच नाही.. प्रीती त्यांना नंतर येते म्हणून सांगून तिथून निघून आली... ती मागे बघून सुद्धा पाहिली नाही... ती बाहेर येऊन अर्णव ला शोधू लागली..तिला या लोकांच्या गर्दीत तो सापडतच नव्हता .. तो कुठेच दिसत नव्हता... ती जसिका ला विचारली...

जसिका -" काय माहिती नाही .. त्याच्या डोळ्यात काहीतरी पडलाय म्हणून सांगत होता... त्याच्या डोळ्यातून पानी येत होतं.. तो जरा जाऊन येतो म्हणून सांगून गेला पण तो आला नाही अजुन... "

प्रीती ला कळाल की त्याला सहन नाही झालं म्हणून रडतच बाहेर गेलाय... ती त्याला कॉल लावत होती पण त्याचा फोन स्विच ऑफ दाखवत होता... तिला काळजी वाटतं होत म्हणून ती परत पूजाच्या रूम मध्ये  गेलीं.. तिथे तर पूजा अजुन रडत होती . त्यांचे बाबा तिला विचारत होते..

बाबा -" अग आज तुझ लग्न आहे ... काय झालं आहे ते तरी सांग..."

पूजा मात्र अजुन रडतच होती...

बाबा -" अग ... मुहर्त चा टाईम येऊ लागलं आहे ... काय झालं ते तरी सांग..."

अचानक प्रीती म्हणाली..

प्रीती -" अंकल... तिला हे लग्न नकोय.."

बाबांना धक्काच बसला...

बाबा -" नकोय म्हणजे...????????"

प्रीती -" म्हणजे तिला दुसरा मुलगा आवडत आहे..."

बाबा -" कोण??"

प्रीती -" अर्णव..."

अर्णव चा नाव ऐकताच बाबा म्हणाले..

बाबा -" अग तुझ लग्न ठरलं होत ना... मग हे अस का केलीस??"

रचना -" ते खूप अगोदर पासूनच चालू आहे अंकल... "

बाबा -" मग मला तेव्हाच का नाही सांगितली.."

रचना -" कारण तेंव्हा तुम्ही तिच्याकडून प्रॉमिस घेतला होता... की तुमच्या आवडीचा मुलाशी लग्न करणार म्हणून... तुमच्या प्रेमापोटी टी तिच्याच प्रेमाची त्याग देत होती.."

इकडे मुहर्ताच टाईम गेला होता... बाहेर करण आणि बाकीचे लोक वाट पाहत होते... शेवटी न राहवून करण पूजाच्या रूम मध्ये आला .. तिथं पोहचताच तो म्हणाला

करण -" अंकल .. काय चाललंय इथ... तिथे सगळे वाट बघत आहेत..."

बाबा -" अरे करण मला हे लग्न नकोय..."

हे ऐकताच रूममधले सगळे जण शांत झाले... कुणाला काहीच कळाल नाही की काय झालं आहे ते...

करण -" नकोय म्हणजे??"

तेवढ्यात करणचे आईवडील सुद्धा तिथे आलेले होते..

बाबा -" माझ्या पोरीला हे लग्न नकोय... मग मला पण नको आहे.."

करण -" का??"

बाबा -" तिला दुसरा मुलावर प्रेम करत आहे..."

करण चे आईवडील त्यांना शिव्या घालू लागले... बाबा मात्र त्यांना शांत करू पाहत होते..शेवटी करण म्हणाला

करण -" मम्मी पप्पा... शांत व्हा... जर पूजाला लग्न नको असेल तर मला पण नको आहे...????????...आणि हा जे कोणता मुलगा आहे ज्याच्यावर तू प्रेम करत आहेस त्याला इथ बोलून घे... "

बाबा आणि सगळ्यांना कळून चुकल की करण तर खूप चांगला मुलगा आहे... खूप समजूतदार पण आहे...लोकांना आतापर्यंत सगळं काही समझल होत... रवी सुद्धा पूजाच्या रूम च्या बाहेर येऊन थांबला होता...

बाबा पूजाला बघून म्हणाले..

बाबा -" पूजा... अर्णव कुठ आहे त्याला बोलावं त्याच्याशीच तुझ लग्न होणार ते पण याच मंडपात... आणि याच लोकांसमोर होणार..."

ते ऐकताच पूजा बाबांशी बिलगली... त्यांच्या मिठीत जाऊन रडु लागली...तेवढ्यात प्रीती म्हणाली..

प्रीती - " पण अंकल... अर्णव कुठंही दिसत नाहीये..."

पूजा -" दिसत नाही म्हणजे??"

प्रीती -" त्याला खूप शोधले पण तो कुठेच नाही सापडत आहे... त्याचा फोन सुद्धा स्विच ऑफ दाखवत आहे..."

बाबा -" पूजा... तो कुठेही असो त्याला शोधून आण.."

पूजा अर्णव ला कॉल लावू लागली... अजुन स्विच अप सांगत होता... तेवढ्यात पूजाला काहीतरी आठवलं... ती जसिकाला म्हणाली..

पूजा -" जसिका मला तुझी स्कूटी मिळेल का??"

जसिका -" हो घेऊन जा ना..."

पूजा त्या स्कुटीची चावी घेऊन तिथून पळतच सुटली... ती बाहेर जाताना पाहून रवी म्हणाला..

रवी -" अग थांब पूजा आम्हीही येतो..."

पूजा तेवढ्यात स्कूटी काढून गेली पण होती...

रचना -" अरे रवी थांब आम्हीही आलो..."

     रचना आणि प्रीती मागून पळतच रवीच्या मागे गेले... रवी कार काढला... कारमध्ये रचना आणि प्रीती बसले.. तो पूजाच्या मागे कर चालवत होता... पूजा मात्र खूप वेगाने जाऊ लागली... अर्णव कुठे असेल ही तिला माहिती होत... ती खूप वेगाने चालवत होती... ती एवढ्या वेगात चालवत होती की रविला ती दिसिनासे झाली... ती खूप पुढे गेली होती...
      रवीला कळतच नव्हत की ती कुठे आहे ते... पूजा मात्र दुसरा रस्ता धरून जाऊ लागली... तेवढ्यात तिची स्कूटी खूप हलू लागली... तिला कळतच नव्हतं की काय होत आहे... ती स्कूटी थांबवली आणि बघितली तर कळाल की स्कुटी च्या मागचा चाकातून पूर्ण हवाच गेलेला होता... तिला कळत नव्हतं की आता काय करू...

      ती विचार करू लागली... तीच मन तिला म्हणत होत की..' पूजा उठ... जा ... नाहीतर अर्णव तुझ्या आयुष्यातून गेलाच म्हणून समझ... उठ आणि जा त्याच्याकडे... नाहीतर परत एकदा त्याला गमवावा लागेल .. उठ ... उठ.. ' ती उठली आणि पळत सुटली... इतक्या जड साडीतून ती पळत सुटली. तिला बकीच्यांच काही एक पर्वा नव्हती... ती पळत सुटली तिच्या एकलूता एक प्रेमासाठी... तिला कुणाचही पर्वा नव्हती...ती पळत सुटली तिच्या अर्णव साठी जो तिला सावरला होता त्या ड्रग्स आणि दारूच्या व्यसनेतून ... ती पळत सुटली तिच्या अर्णव साठी जो तिला तिची आई नसताना तिला आईसारख सांभाळलं होत... तिला खूप दम लागत होत , पण ती मात्र थांबत नव्हती... ती थोड्या वेळासाठी गुढग्यावर हात ठेवून उभी राहिली.. पण मन म्हणाला ' पळ पूजा... शेवटचा पळ ... तुझ प्रेम तुला मिळवण्यासाठी ... पळ.."

     ती परत धावू लागली... शेवटी ती पोहचली.... चौपाटीवर... जिथे अर्णव पूजाचं वाढदिवस साजरा केलेला होता... जिथे तो त्याच्या प्रेमाची कबुली देणार होता... तो तिथेच होता... समुद्राकडे तोंड करून बसला होता... एकटाच त्या समुद्राच्या दिशेनी दगड फकत बसला होता... तो रडतच होता... पूजा त्याच्याजवळ पळतच सुटली...

.       तेवढ्यात  रवीचा कार सुद्धा तिथे आल...पूजा अर्णव च्या मागे येऊन थांबली... ती खूप थकली होती...

पूजा -" अर्णव.."

अर्णव मागे वळला तर तिथे पूजा अगदी लग्नाच्या साडीमध्ये उभी होती... त्याला काहीच कळत नव्हतं... तो उभा राहिला... पूजा त्याच्याजवळ आली आणि त्याला चार गालावर थोबाडीत मारली... आणि रडु लागली...

अर्णव -" आवूच.... ????????????.. मी काय केलंय???....आणि  अग तू इथ काय करत आहेस ???... "

पूजा -" तुला आधीच सांगता येत नव्हतं... की तू माझ्यावरच प्रेम करत आहेस ते..."

अर्णव - " मला वाटलं तुला कळेल...????????"

पूजा आणखीन एक थोबाडीत मारली...आणि त्याच्या मिठीत गेली...

पूजा -" आय लव्ह यू ... अर्णव... आय रिअली लव्ह यू.."

अर्णव सुद्धा तिला मिठीत घेऊन म्हणाला...
अर्णव -" आय लव्ह यू टू .."

     थोडा वेळ ते एकमेकाच्या मिठीत होते... लांबून रवी , रचना आणि प्रीती पाहत होते... त्यांना खूप समाधान वाटत होत... पूजा अर्णव पासून दूर झाली आणि तिच्या हातातून अंगठी काढली आणि ती गुडघ्यावर बसली...

पूजा -" विल यू मेरी मी... अर्णव..."

रचना तेवढ्यात हळूच म्हणाली," हाऊ रोमँटिक...????????"

अर्णव -" नो.... ऑफ कोर्स आय विल डेम इट..."

पूजा त्याच्या बोटात अंगठी घातली... आणि म्हणाली...

पूजा -" चल... लग्न करूया.."

अर्णव -" एवढं लवकर... अग घरी तर कळवू देत..."

पूजा -" काही गरज नाही... खूप सतावलास मला... चल.."

एवढं म्हणत ती त्याच हात घेऊन ... त्याला ओढतच रवीच्या कारमध्ये बसवली... रवी थेट गाडी पूजाच्या बंगल्यात घेऊन आला... पूजा अर्नवचा हात घेऊनच तिच्या बाबांजवळ घेऊन आली... बाब त्यांना हसतच बघत होते...

बाबा -" बहुतेक उचलून घेऊन आले ... अर्णव तू आधीच सांगितला असता तर ही वेळ आली नसती... जाऊ देत ... चल रेडी हो मंडप तुझी वाट बघत आहे..."

     पूजा आणि अर्णव दोघेही रेडी झाले... दोघेही आता स्टेजवर आले...

बाबा -" वाटतात ना एकदम राम आणि सीतेची जोडी..."

करण , रवी , रचना , प्रीती , जसिका आणि बाकीचे लोक सुद्धा खुश होते... त्यांना पूजाच्या वडिलांबद्दल आदर अजुन वाढेलेला होता... ते स्वतः च्या मुली साठी एवढं केलेले होते..अक्षता वाटण्यात आल... शेवटी त्या दोघांवर अक्षता पडत होती... दोघेही खूप खुश होते...

अक्षता टाकत असताना रवी प्रीतीला म्हणू लागला...

रवी -" Thanks a lot ...  प्रीती ... तू नसली असती तर पूजाला तिच्या प्रेमाची जाणीव झाली नसती आणि हो तिच्या मनात प्रेम सुद्धा निर्माण झालं नसत..."

प्रीती -" मेंशन नॉट... ????????"

रचना -" म्हणजे??"

रचना ला काहीच कळत नव्हतं...

रवी -" रचना... तुला म्हणालो होतो ना की किसी चीज को तुम चाहो तो पुरी कायनात उस्से तुम्हे मिलानी की साजिश मे लग जाती है... ते साजीश मी केलो होतो... प्रीती दुसरी तिसरी कोणी नसुन ती आपल्या कंपनीच्या मालकाची एकलुती एक मुलगी आहे... आणि हो ती माझी शाळेतली मैत्रीण सुद्धा ... तिला मी अर्णव बद्दल सर्व काही सांगितलं... ती स्वतःची बदली आपल्या ब्रांच मध्ये करून घेतली... आणि अर्णव च्या सोबत राहवून पूजाच्या मनात प्रेम निर्माण केलं... म्हणजे आधीपासून तिच्या मनात होताच पण तिला जाणीव ही करून दिली... कारण जेलीसी पेक्षा कोणताही फिलिंग प्रेमाची जाणीव करून देत नाही... त्यामुळे धन्यवाद प्रीती..."

प्रीती - " बस कर पगले अब रुलायेगा क्या??...????????.. मित्रासाठी एवढं सुद्धा करू शकत नाही का आता???"

रचना -" तू मला नाही सांगितला रवी..."

रवी -" मी म्हणलो... सस्पेन्स ठेवावं आणि नंतर सांगावं... शेवटी अर्णवच लव्ह स्टोरी सक्सेस झाल्याशी मतलब होती ना..."

रचना -" खरच रवी... मित्र असावा तर तुझ्यासारखा...माझं सुद्धा सेटिंग तूच करून द्यायचं... ????????????"

सगळे हसू लागले... आणि स्टेज कडे बघू लागले... पूजा आणि अर्णव एकमेकांकडे बघत होते... जणू अख्ख जन्म एकसात जाण्याचं वचन देत असावेत...????????????????????????????????????????????????????????
********************************
समाप्त

ऋषिकेश मठपती

धन्यवाद... तुम्ही या कथेला भरभरून साथ दिलात त्याच्याबद्दल... जर तुम्हाला या कथेचा पुढचा पर्व पाहिजे असेल तर नक्की कळवा ... कमेंट करा... या पुढे मी माझं बाकीचे कथा राजार्जुन , सीक्रेट ऑफ सोल आणि आयुष्याची परिक्रमा पूर्ण करणार... तुम्ही हे कथा वाचला नसेल तर वाचा... तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कळवा .... आणि हा आजकाल वातावरण तुम्हाला माहिती आहेच... तर घरीच रहा , सुरक्षित रहा... धन्यवाद...????????????????????????????

🎭 Series Post

View all