तिला सावरताना भाग - १२

Effect of love can see in Arnav's heart.

          रचना आणि रवी माझ्याकडे बघत होते.... बाबा तर अगदी खुशीत होते.... पण दुखी होता फक्त एक माणूस .. तो म्हणजे मी....

              खूप दिवसांनी पूजाच्या त्या चेहऱ्यावर हसू उमटलं होत. खूप वर्षांनी तिला तिचा वडील मिळणार होते. सगळ काही ठीक होणार होत..... खरच सगळ ठीक होणार होत???.... मग माझ्या त्या प्रेमाच काय ???.... पण काहीही असो ती खुश आहे ना मग मी पण खुश...

              न कळत माझ्या डोळयातून अश्रू येऊ लागले. का ???... माहिती नाही... कदाचित ती दुसऱ्या कोणाचं पूजा होणार होती. हृदयात अचानक पोकळी जाणवू लागली.

मी - " चला .... मी जातो..."

पूजा -" कुठ चालास?"

मी -" मला ऑफिस च काही काम आहे .... तिथं जावं लागणार..."

रवी -" अरे पण..."

रचना मधेच त्याला तोडत म्हणाली.

रचना -" अर्णव .... खरच तू जा... काम असेल तुला..."

रवी आणि पूजा तिच्याकडे बघत होते. कदाचित रचना ला माझ्या मनातील भावना समजली असावी. मी लगेचच तिथून निघालो. खोटं बोलून तर निघालो पण जाणार कुठ.... या हृदयाच्या वेदनांना  घेऊन?......

___________________________________________

      काय होणार अर्णव आणि पूजा या दोघांच्या त्या प्रेमाच????.... अर्णव तर आपल्या प्रेमापोटी तिला आधार दिला.... पण तिला कदाचित ते आधार प्रेमाच न वाटता एका मित्राची मैत्री वाटली. ती तिच्या जागी बरोबर होती, तिला अर्णवाच्या त्या प्रेमाची जान कदाचित जाणवली नसेल... त्यात तिचीही चूक नव्हती. कोणतीही व्यक्ती दुःखात असताना त्याला फक्त एका आधाराची गरज असते. त्या आधाराला प्रेम समजणं हे खूप अवघड असत, कारण तो आपल्या दुःखाची अंत पहात असतो.

     काय होणार या दोघांचं ..... let's see

____________________________________________

            संध्याकाळ होत आली होती. रवी आणि रचना अजुन हॉस्पिटल मध्ये होते. पूजा तिच्या बाबांसोबत गप्पा मारत होती. कित्येक दिवसांनी दोघं एकत्र गप्पा मारत होते.

बाबा -" बघच पूजा तू ...तुझ लग्न खूप मोठ्यांनी करू...  पूर्ण शहरातील मोठे लोक तुझ्या लग्नात येणार..."

पूजा -" अरे हो बाबा.... पण पहिला मुलगा तर मिळू देत..."

दोघंही हसू लागले. रवी हळू आवाजात रचना ला म्हणाला.

रवी -" मुलगा तर गेलंय ऑफिस ला..."

पूजा -" काय???.... काय म्हणालास??..."

रवी -" काही नाही..... अर्णव ऑफिस ला गेलंय अस म्हणालो..."

बाबा -" अरे हो.... खूप उशीर झाला ना त्याला जाऊन..."

पूजा -" हो ....  थांब त्याला कॉल करते..."

पूजा त्याला कॉल करू पाहते पण स्विच ऑफ लागत होता. परत एकदा ट्राय केल्यावर सुद्धा स्विच ऑफ लागत होता.

पूजा - " अग रचना ... त्याचा फोन स्विच ऑफ लागत आहे... "

रचना -" कामात असेल ग..."

पूजा -" अग पण एवढं उशिरापर्यंत काम कुठ असत आपल्या ऑफिस मध्ये..."

रवी -" वेगळं काम असेल..."

पूजा -" नाही रे.... खरच खूप लेट झाला आहे... "

रवी -" ओके ओके.... डोन्ट वरी..... आम्ही जाऊन बघतो..."

रचना -" हो.... तू अन्कलची काळजी घे... आम्ही बघून येतो... काही कळाल तर कळवते."

    रवी आणि रचना गाडी मध्ये बसून ऑफिस निघाले.

रचना -" कुठ चालोय ?"

रवी -" ऑफिस ला.... तिथेच गेला ना तो??"

रचना -" तो तिथे गेला नाही..."

रवी -" मग गेला कुठे तो ?"

रचना -" मला माहिती नाही.... पण आपल्या मनातलं दुःख लपवायला कुठ तर एकांतात कुठ तरी गेला असेल..."

रवी -" गेला कुठ असेल तो?"

       संध्याकाळची त्या वर्दळ मध्ये अर्णव कुठ असेल याचं शोधाशोध रवी आणि रचना करत होते. अर्णवच्या घरी जाताच त्यांना कळाल की अर्णव तिथे आलेलाच नव्हता.

रचना -" कुठ गेला असेल हा बावळट ?"

रवी -" फोन ट्राय कर एकदा..."

रचना एकदा फोन ट्राय करून पाहते पण फोन स्विच ऑफ सांगत होता.

रवी -" काय झालं?"

रचना -" स्विच ऑफ सांगतोय ..."

रवी -" अरे यार..."

रचना -" का ???.... का करतात प्रेम लोक ... जर प्रेम केल्यावर अशी स्थिती होत असेल तर या प्रेमाची मला गरज नाही. पहिला दोस्त व्हा ... मग कोणी एक तुम्हाला प्रपोज करणार ... जर त्या प्रेमाला कबुली दाखवली तर ठीक नाहीतर तो देवदास बनणार ..."

रवीला काहीतरी क्लिक झाल्यासारखं झाल.

रवी -" प्रपोज..... चल..."

रचना -" काय???... कुठ??"

रवी -" मला माहिती आहे रवी कुठ आहे ते..."

रचना -" कुठ?"

रवी -" तू गाडीत बस तर..."

   रचना गाडीत बसताच रवी गाडी यू टर्न मध्ये वळवली . अर्धा एक तासात ते बीच वर पोचले. तिथेच जिथे अर्णव पूजाला प्रपोज मारणार होता. पण त्यावेळी तिच्या कॉल आल्याने त्याला त्याच्या प्रेमाची कबुली देता आली नव्हती. बीच तर अगदी शांत झाली होती . फक्त बोटावर मोजण्याइतके लोक तिथं होते. रचना आणि रवी दोघंही तिथे अर्णवला शोधू लागले. थोडे पुढे जाताच त्यांना त्याच हॉटेल मध्ये एक पार्टी चालू असताना दिसली. तिथे गेल्यास तिथे अर्णव नव्हता. त्या हॉटेल मधून बाहेर येताच त्यांना समुद्राच्या वाळूत कोणीतरी पडलेला लांबूनच दिसल. रचना आणि रवी पळतच त्याच्या जवळ पोहचले. तो व्यक्ती पोटाच्या बळावर झोपलेला होता. त्याच्या जवळ २ ते ३ दारूचे बॉटल पडलेले होते.
      रवी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला . तो खूप नशेत होता. त्याला पलटल्यावर कळाल की हा तर अर्णव आहे. रचना त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागली.

रवी -" मला माहिती होत ... तो इथेच सापडेल. "

रचना -" अर्णव .... अरे अर्णव ... उठ .."

    रचना त्याच्या गालावर मारत उठवू लागली. अर्णव डोळे उघडून दोघांना पाहिलं आणि हसत म्हणाला.

अर्णव -"अरे .... तुम्ही दोघं इथ काय करताय ??"

रचना -" तुला घ्यायला आलोय... "

अर्णव -" अरे .... तुम्ही पण बसा इथ... अे रवी एक बॉटल व्हिस्की आण .... सगळे सेलिब्रेट करूयात..."

रवी -" कसला सेलिब्रेट ?"

अर्णव -" अरे अस का म्हणतोस???... माझं प्रेम मला मिळत नसलेलं सेलिब्रेशन... कित्येक लोक प्रेम मिळाल्यावर सेलिब्रेट करतात... पण मी प्रेम न मिळाल्याने सेलिब्रेट करतोय...."

अर्णव जोरजोराने हसू लागला. हसत हसत तो रडु लागला.

अर्णव -" यार रचना .... हृदयात कसं तर होत आहे ग... का जगतोय मी असा.... का केलं मी प्रेम.... खरच यार दुसरासोबत तिला बघणं नाही सहन होणार ग.... माझं नशीबच खराब आहे.. "

तो डोळे पुसत म्हणाला.

अर्णव -" काही पण असुदेत... ती खुशीत राहिली पाहिजे.... ती खुशीत राहिली पाहिजे ... ती खुशीत राहिली पाहिजे..."

अस म्हणत म्हणत तो खाली कोसळला. रचना आणि रवी त्याला पकडल.

रवी -" यार.... अस का झालं... चल रचना घेऊन जाऊ आपण याला..."

रवी लगेच कार कडे जाऊन बीच वर गाडी आणला. दोघंही अर्णवला उचलून गाडीत बसवलं. तो नशेत बडबडत होता " ती खुशीत राहिली पाहिजे..."

रवी गाडी चालवू लागला. रचना अर्णव सोबत मागच्या सीटवर बसली होती.

घर आल्यावर रवी गाडी थांबवली. दोघंही अर्णवला घेऊन घरात गेले. बेडरूम ला जाण्यासाठी त्यांना जिना चढाव लागत होतं . ते दोघंही अर्णव चा हात खांद्यावर घेऊन वर जाऊ लागले. बेडरूम जाऊन ते दोघंही अर्णव ला झोपवले.

      दोघांना अर्णवची दया येऊ लागली. रचना अर्णवच्या पायातले बूट काढली आणि फॅन ऑन केली. रचना आणि रवी दोघंही आता दमले होते . पण दोघांना याची काडीमात्रची पर्वा नव्हती. तेवढ्यात रचना ला कॉल आला. ती स्क्रीन बघतच कळाल की पूजा तिला कॉल करत होती. रचना कॉल रिसिव्ह केलं.

रचना -" हॅलो..."

पूजा -" हॅलो रचना.... अर्णव बाबतीत कळाल का??.."

रचना -" अरे हो.... तो ओव्हरटाईम करत होता ऑफिस मध्ये आणि फोनची बॅटरी लो झाली म्हणून स्विच ऑफ दाखवत होता."

पूजा -" ओ.... थॅन्क् गॉड... मी खूप घाबरली होते... त्याला फोन दे की..."

रचना -" अग तो खूप थकला होता... म्हणून लवकरच झोपी गेला.... "

पूजा -" ओ.... रेअली??... झोपू देत.."

रचना -" ह्म्म... अंकल कसे आहेत ??.."

पूजा -" बरे आहेत आता... चल बाय...उद्या ऑफिस मध्ये भेटू... गूड नाईट..."

रचना -" गूड नाईट..."

  फोन कट करून ती रवी कडे बघत म्हणाली.

रचना -" पूजाचा कॉल होता... "

रवी -" मग तिला खोटं का सांगितली.."

रचना -" मग काय सांगू तिला... की अर्णव तिच्यामुळे दारू पिला आहे म्हणून... "

रवी खाली बघू लागला. रचना परत म्हणाली.

रचना -" हा बघ.... कोणतीही अपेक्षा न ठेवता तो सगळं काही तिला केला पण त्याला काय मिळालं. दुःख????... का??.. का सहन करत आहे तो???"

रवी -" प्रेम तसच असतो... कधी कुणाला काय करेल सांगता येत नाही... "

रचना -" पण होणार काय याचा?"

रवी -" माहिती नाही... पण ते डायलॉग आहे ना की... किसी चीज को तुम दिलं से चाहो तो पुरी कायनात उस्से तुम्हे मिलानेकी कोशिश मै लग जाती है.... जर तो खरा प्रेम करत असेल तर तो त्याला नक्की मिळेल..."

दोघंही अर्णव कडे बघू लागले...
********************************

क्रमशः

ऋषिकेश मठपती

. हा भाग आवडल्यास नक्की कमेंट करा... शेअर करा... आणि कळवा... धन्यवाद... ????????????...

🎭 Series Post

View all