पाऊस थांबला होता. पूजाला अजून भिजू वाटतं होत. मी तर पूर्णच भिजून गेलो होतो.
पूजा -" यार ..... लवकरच थांबला पाऊस शे..."
मी -" अरे अरे पाऊस आहे तो .. थांबणारच ना."
पूजा -" अजून थोडा वेळ असायला पाहिजे होता."
मी -" तुला पाऊस खूप आवडत वाटतं ?? "
पूजा -" हो... लहानपणा पासूनच ..."
एकतर पाऊस होऊन गेला होता आणि मला भजीचा वास आला .
मी -" हे.... इथ कुठ तर भजी तळत आहेत वाटतं. "
पूजा -" हो ... इथच एक टपरी आहे ..."
मी -" चल की जाऊ?"
पूजा -" आता ?"
मी -" मग कधी जायचं... अग सगळे पाऊस होत असताना भजिचा आस्वाद घेतात .. पण मी पावसात भिजून भजिचा आस्वाद घेतो . चल ना यार "
पूजा -" ओके ... चल मग ."
त्या टपरीवर खूप गर्दी होती . भजी जसा तळून बाहेर येणार तसा संपून ही जात होता.
पूजा - " भैय्या . इथ दोन प्लेट भजी द्या आणि गरम पाहिजे अह .... आणि सिगरेट आहे का? "
मी -" परत ..????????"
पूजा -" हो..????????... पाऊस पडला तर तलब लागली ."
मी -" ओके ... तुझी चॉइस ..."
पूजा -" सॉरी... बट आय नीड धीस वन ..."
दोघांचे ऑर्डर आली . तसे आम्ही भजीची मजा घेत होतो . नंतर चहाचा सुद्धा आस्वाद घेतला . दोघेही मग चालत निघालो .
मी -" तू कशी जाणार ? "
पूजा - " म्हणजे ?"
मी -" म्हणजे चालत का बस नी?"
पूजा -" सहजा मी चालत जात असते . जवळच राहते ना मी म्हणून. "
मी -" कोण कोण राहतात तुझ्यासोबत ?"
पूजा -" एकटी राहते मी."
मी -" मग आईबाबा कुठे राहतात ?"
पूजा -" आई तर लहानपणीच वारली . बाबा माहिती नाही कुठे आहेत... कॉन्टॅक्ट नाही माझं..."
मी -" का?"
पूजा -" काही नाही रे ... सोड ना तू हे सगळं...दुसर काहीतरी बोल ".
मी घड्याळ्यात बघितलो
मी -" अरे ७:०० वाजले .... उशीर होईल ..मला बस पकडायची आहे... चल बाय ...."
पूजा -" बाय... ????"
रूम वर येता येता ८ वाजून गेले होते . जेवणाचा डब्बा आला होता . पण काहीही खायची इच्छा नव्हती . माझं मनच लागत नव्हतं. जिकडे बघावे तिथे पूजाच दिसत होती . तीच ते बिंदासपणे भिजण, तिचे ते मधुर हसण , तिचे ओले झालेले केस, माझं हाथ घेऊन पावसात घेऊन जाणं, तसाच मी बेड वर झोपलो , वर पंखा फिरत होता . पण माझं लक्ष तर वेगळीकडच होता.
सकाळ झाली होती . पाऊस कधीचा थांबला होता. काल पूजाच्या आठवणीत कधी झोपलो कळालच नाही . मला अजून एक कन्फ्युजन होता की मला जो जाणवतोय ते प्रेम आहे का आकर्षण ??.... माझी एक सवय होती . कितीही लवकर उठलो तर मला बेड वरून १ तास तरी खाली उतरायला लागतच असतो . उठून मी फ्रेश झालो . कमरेला टावेल गुंडाळून बाथरूम मधून येत होतो तेवढ्यात फोन वाजला . रचना चा फोन आला .
रचना -" हॅलो .... अर्णव ऐक ना .....तू येशील ना लवकर ? "
मी -" लवकर म्हणजे किती लवकर येऊ ? "
रचना - " तू जितकं लवकर येऊ शकतो तितक्या लवकर ये? "
तेवढ्यात मला मोठ्यांनी शिंक आली .
रचना - " काय रे .. बरा आहेस ना तू?"
मी -" काही नाही ग... काल झोप झाली नाही .... आणि ???"
रचना -" आणि???? "
मी -" काल खूप भिजलो पावसात ..."
रचना - " काय??... अरे तुला तर पाऊस तर आवडत नाही ना ... म्हणून तर तू पाऊस संपल्यावर भजी खायचास ..."
मी - " काही नाही ग... काल ती पूजा आहे ना?"
रचना - " तीच काय?... "
मी -" ती काल भिजत होती पावसात ..."
रचना - " म्हणून तुला सर्दी झाली होय ????? ???????? "
मी - " नाही ग ... आम्ही ऑफिस सुटल्यावर फिरत गेलो होतो ग... तिथं पाऊस आला .. मी तर आसरा घेतला ... पण ती तर बिंदास पणे भिजत होती ... आणि मला सुद्धा ती ओडून घेऊन गेली ... म्हणून भिजलो खूप .."
रचना - " अरे अरे ... आमच्या मागे मागे खूप काही चाललय... ???? "
मी - " अग तस नाही ग.... पण तिला फिरायच होत मला नाही ..."
रचना - " आम्ही जेंव्हा बोलतो तेव्हा तर नाही म्हणतोस आणि झोप का नाही झाली तुझी ?? "
मी -" तुला खरं सांगू ... रात्रभर तिचाच विचार करत होतो ग... तिचे ते ओले केस तिचे ते वर बघून डोळे बंद करून बिंदास पणे भिजणे... पण मी खूप कन्फुस आहे ग माझं हे प्रेम आहे का आकर्षण ???..."
रचना - " मला माहिती नाही पण वेडा मात्र झालास ? "
मी -" का ग ?"
रचना - " तू आला होतास बाईकवरून पण विसरून गेलास ...????????????"
मी - " आई शपथ ... खरंच की ग... एक तर कामात बिझी आणि वरून पूजा चालत होती म्हणून मी पण बाईक विषयी विसरूनच गेलो ...????????"
रचना - " म्हणून म्हणाले लवकर ये ... बघूच कसा येतोस ते?...????????"
मी - " ऐक ना ... मला पिक कर ना आज प्लीज.... "
रचना - " आता आठवण आली होय माझी .... जा ...????????????"
मी - " प्लीज ये ना ग.... प्लीज प्लीज प्लीज...????????"
रचना - " बर मग आज मला लंच तुझ्याकडून पाहिजेल..."
मी - " ओके डण ....."
रचना - " आणि हो टॉवेल वर बसू नकोस ... तयार हो पटकन "
मी - " तुला कसं कळाल की मी टॉवेल मध्ये आहे म्हणून..."
रचना - " दारात उभा असलेला माणसासोबत फोन वर बोलतोस का तू ? .."
मी टॉवेल सावरत होतो ... ती हसतच होती ...
मी - " अग तू इथ लवकर... कसे?"
रचना - " अरे मी ऑफिसला निघणार होते .. पण वॉचमेनचा
फोन आला ... मग कळाल की तू बाईक ऑफिस लाच विसरला आहेस... म्हणून मग डायरेक्ट इथेच आले... "
मी -" थेंक गॉड .... तू आलीस ... मग माझं तर काय खैरच होती आज... मी तयार होतो ... तू बस ... तुला चहा पाहिजे काय???"
रचना - " नको बाबा ... अजून विष पीन , पण तुझा चहा नको ... ????????"
मी - " खूपच चांगला विनोद होता....????????."
रचना - " ???????? "
आम्ही दोघेही ऑफिसला निघालो. ज्या स्कूटीला मी शिव्या घालत होतो , त्याच स्कुटिवर मी आज ऑफिसला जात होतो .
रचना - " तुला एक विचारू ? ..."
मी -" हा ."
ती स्कूटी चालवत विचारत होती .
रचना -" तू खरच कन्फ्युज आहेस?"
मी -" हो ग ..."
रचना -" डोन्ट वरी ... टाइम आल्यावर कळेल तुलाच ..."
आम्ही ऑफिसला पोचलो. तिथं सगळे कामात होते. बाईकला काहीही झालं नव्हतं . ऋचा सुद्धा आली होती .
मी -" हाय ऋचा .. कशी आहेस ?"
ऋचा -" मस्त... तू?"
मी -" मी पण ... आज बहुतेक जसिका आली नाही वाटत ?"
ऋचा -" हो ..."
मग पूजा आली . सिगरेट चा धूर सोडत , हेडफोन्स वर गाणे ऐकत आली.
पूजा -" हाय ..."
मी -" हाय ..."
पूजा - " थंकस फॉर येस्टर्डे अर्णव ... आठवण राहील कालचा दिवस..."
मी -" वेलकम..."
रचना आमच्या दोघांकडे बघून हसत होती . रवी सुद्धा आला. आम्ही सारे कामात बिझी झालो . नवीन प्रोजेक्ट कंप्लीट करायचा होता. वेळ कमी होत. आम्ही सगळे कामाला लागलो . असच कामात १ महिना कसं गेलं कळालच नाही. त्यात मी आणि पूजा रात्री फोन वर बोलत होतो . आमचा प्रोजेक्ट संपला .
आम्ही सगळे बॉसला ती प्रोजेक्ट दाखवली . क्लाएंट आले . त्यांच्यासमोर मी प्रेझेंटेशन दिलं. मग बॉस आणि क्लाएंट मध्ये मीटिंग झाली .
जसिका तेवढ्यात बाहेर आली.
जसिका -" सगळयांना बॉस नी बोलावलंय ."
रवी -" का?? "
जसिका -" डोन्ट नॉ डिअर... "
आम्ही सारे खूप टेन्शन मध्ये होतो शिवाय पूजाला सोडून , ती मस्त गाणे ऐकत बसली होती . आम्ही सगळे आत जाऊ लागलो . तेवढ्यात ती सुद्धा आली .
बॉस -" सो... अभिनंदन सगळ्यांचं आपल प्रोजेक्ट क्लाएंट ला आवडला आहे आणि आपला प्रोजेक्ट लवकरच चालू होणार आहे . "
आम्ही सगळे खूप खुश झालो.
बॉस -" तर याच संदर्भात मी पार्टी ठेवली आहे . माझ्या फार्म हाऊसवर सगळे यायचं बर का?... पार्टी उद्या आहे .... लेट्स पार्टी ..."
आम्ही सगळे एकदमच हो म्हणालो.
रवी -" सर तिथे चांगलं देशी मिळत ना? ????????"
आम्ही सगळे हसू लागलो . सगळे बाहेर आल्यावर खूप खुश होते पण पूजाच्या चेहऱ्यावर ना खुश दिसत होती, ना दुखी होती. एकदम वेगळेच नमुना होती ती .
मी -" पूजा आज तुला मी सोडू?"
पूजा -" रिअली??"
मी -" हो ".
पूजा -" ओके... "
ती मागे बसली . तिचा न कळता लागलेला स्पर्श मला आनंद देत होता. तिचे ते कर्ली केस . बहुतेक ती नुकताच पार्लर ला गेली असणार आहे . पहिला तिचे केस तसे नव्हते आणि केसाच्या खालच्या बाजूला केलेल लाल रंग माझं मनच घेऊन गेलं .
पूजा -" स्टॉप हिअर "
मी -" का काय झालं?"
पूजा -" माझं अपार्टमेंट आल."
मी -" तू इथ राहतेस?"
पूजा -" हो... तिसऱ्या मजल्यावर ... येणार का?"
मी -" नाही नको .... उशीर होईल ... बाय "
पूजा -" ओके बाय .????????"
दुसऱ्यादिवशी ऑफिस मध्ये आलो . सगळे आले होते. माझी नजर फक्त तिला शोधत होती . रचना तेवढ्यात मागून आली .
रचना -" तिला शोधत आहात वाटतं ?...."
मी -" हो.. तुला काय करायचंय ?"
रचना -" काही नाही ... पण तुमच्या माहिती साठी ... ती आली नाही ... "
मी -" का?"
रचना -" माहिती नाही... फोन करून तूच विचार ना?"
मी फोन ट्राय केला. उचलत नव्हती.
मी -" उचलत नाही आहे? "
रचना -" नको काळजी करू ... येईल ती आज पार्टीला ..."
मी फक्त रात्रीची वाट पाहत होतो . माझं दिवस आज खूपच वाईट जात होता. कामात मनच लागत नव्हतं. लंच सुद्धा नाही केला. आता मी कन्फर्म होतो . आय एम इन लव .... येस ... मी प्रेमात पडलो होतो.... कधी एकदा तिला सांगावं असं वाटतं होत... वाट पाहत होतो आजच्या रात्र ची ....
मी खूप नटूनथटून तयार झालो. आज कसल्याही परिस्थितीत तिला माझ्या प्रमाची कबुली द्यायची म्हणजे द्यायची . जाताना गुलाब घेतला . फार्महाऊसवर पोचलो. तिथं सगळे आले होते. सगळे खूपच मस्त दिसत होते . पण माझं नजर तर तिलाच शोधत होती . पण ती तिथं दिसतच नव्हती.
मी -" अरे रवी ... पूजा आली का?"
रवी -" नाही रे ..."
रचना नुकताच दारात आली होती . रचना मला बघून हाथ हलवत होती. ती खूपच सुंदर दिसत होती.
रचना -" अरे वा... खूपच मस्त दिसत आहेत आपण ...आणि गुलाब मला का? "
माझ्या हातून ती गुलाब हिसकावून घेत होती .
मी -" तुला नाहीये ते...अग पूजाच्या कॉल आला होता का?"
रचना -" नाही ... का?"
मी -" मी ५० वेळा ट्राय केला पण उचलत नाहीये ती."
रचना -" थांब मी ट्राय करते ."
रचना कॉल लावत होती.
रचना -" उचलत नाहीये ती ...."
मी -" अग... आज मी तिला प्रपोज करणार होतो.... "
रचना -" खरंच ... मस्तच की ????????"
मी -" काय मस्त ... ती आलीच नाहीये अजून... "
रचना -" डोन्ट वरी ... येईल ती..."
तिला काय झालं असेल ... का उचलत नाहीये कॉल ती ... काही झालं तर नसेल ना?... मला प्रेमाची कबुली द्याची होती तिला आज ... बर असेल ना ती?... असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होत्या . मी वाट पाहत बसलो होतो ... तेवढ्यात ..............
**********************************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
पुढील भाग लवकरच.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा