तिला सावरताना भाग-९

Upps... There is one trouble between Arnav and Pooja...

                  मी माझ्या खिशातून गुलाब काढल. हीच योग्य वेळ होती माझं प्रेमाची कबुली देण्यासाठी.

मी -" पूजा तुला मला काहीतरी बोलायचं आहे ."

तीच लक्ष अजुन समुद्रकडेच होत.

पूजा -" बोल ना.."

मी -"खूप दिवसापासून तुला एक सांगायचं होत... आय आय  लव ...."

तेवढ्यात तीच फोन रिंग झालं. ती तिच्या पर्स मधून फोन काढली.

पूजा -" हॅलो... बाबा... काय झाल?ं...????????????????"

पूजा शॉक झाली होती.

पूजा -" कुठ ?.... ओके... मी येते येते..."????????

मी -" पूजा ... इज एवरीथिंग ओके ?"
   
   ती अजुन शॉक मधेच होती. माझ्या बोलण्यावर तीच लक्ष नव्हतं. मी तिला हलवत विचारल.

मी -" पूजा .. आर यू ओके ?"

ती शून्यात बघत होती. ती गप्प होती. न कळत तिच्या गालावर अर्श्रू वाहू लागले. माझ्याकडं बघून ती म्हणाली

पूजा -" अर्णव... बाबाला..."

मी -" काय झालं बाबांना ?"

तिला आता रडु कोसळलं. ती माझ्या मिठीत रडु लागली. तेवढ्यात रवी आणि रचना आले. मी त्यांना डोळ्यांनीच शांत बसायला सांगितलं. पूजा आता शांत होत होती.

मी -" पूजा ... डोन्ट क्राय ना... हे बघ काय झालं सांग ?"

ती शून्यात बघू लागली.

रचना -" पूजा ... काय झालं?"

पूजा -" बाबा..... बाबांना अटॅक आलंय.. मला दिल्ली ला जावं लागेल... ????????????"

मी -" काय???????????"

पूजा -" मला जावं लागेल... "

रवी -" तुला नाही आपल्याला जावं लागेल."

मी -" हो... आम्ही सुद्धा येतो... "

रचना -" डोन्ट वरी पूजा ...  सगळं काही ठीक होईल."

        आम्ही लगेचच दिल्लीला निघायची तयारी  केली . रवी सगळी व्यवस्था केली आणि लवकरच निघालो. पूजा आता कुठ शांत झाली होती. आम्हाला शहराच्या बाहेर पडायला रात्र झाली. हायवे आता शांत वाटत होता. सगळीकडे अंधार पसरलेला होता. रात्र खूप झाल्याने आम्ही रात्री एका हॉटेल मध्ये थांबायचा निर्णय घेतला. हॉटेल मध्ये एक रात्र काढून आम्ही सकाळी लवकर परत निघालो .

     शेवटी आम्ही दिल्लीला पोहचलो. खूप मोठं शहर सगळीकडे मोठी मोठी इमारत , सगळीकडे वर्दळ , सगळ्यांना कुठनं कुठ जायचं होत. आम्ही पूजाचे बाबा जिथे अडमीट होते त्या हॉस्पिटल ला पोचलो. 

      ते आता आय सी यू मध्ये होते. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले.

पूजा -" डॉक्टर काय झाल बाबांना ?"

डॉक्टर - " तू पूजा ना?"

पूजा -" हो..."

डॉक्टर -" नथिंग टू वरी .... ते आता सध्यातरी आऊट ऑफ डेंजर आहेत. पण त्यांना सध्या काही स्ट्रेस देऊ नका ... नाही तर ..."

मी -" नाहीतर???..."

डॉक्टर -" त्यांचा हे तिसरा अटॅक होता. आय होप यू अंडरस्टँड ... काळजी घ्या त्यांची.."

पूजा च्या गालावरून पुनः एकदा अश्रू वाहू लागले. ती रडत रडत खाली बसली. रचना त्याला सांभाळू लागली.

रचना - " डोन्ट वरी यार... सगळं काही ठीक होईल..."

रवी -" हो... नको काही काळजी करुस..."

      डॉक्टरांनी काही मेडिसिन लिहून दिलेले रचना आणि रवी आणायला मेडिकल मध्ये गेले. मी आणि पूजा एका बाकावर आय सी यू च्या त्या वॉर्डासमोर  एक शब्दही  न बोलता बसलो होतो. तिचे त्या डोळ्यावरचे पापण्या अजूनही ओलेच होते. तिचे गुलाबी ओठ आता देवाला प्रार्थना करत होती. कधीही देवाला न मानणारी ती आता अक्षरशः देवाला साकडे घालत होती. का भोगत आहे ती एवढं ??... ????????... तिच्या त्या परिस्थितीला बघून देवाला तर काय वाटतं असेल कुणास ठाऊक??... दोन दिवस झाले ती काहीही न खाता तसच त्या बाकावर बसलेली. जेंव्हा जेंव्हा डॉक्टर चेक अप ला यायचे तेंव्हा मात्र झटकन उठून त्यांच्याकडे जात असत .

     सकाळची वेळ होती. पूजा त्या लहानशा बाकावर झोपलेली होती. कधी नाही ते तिला आता झोप लागलेली होती. तेवढ्यात डॉक्टर सकाळची चेक अप करून वॉर्डाबाहेर आले.

मी -" डॉक्टर ... काय झालं?"

डॉक्टर -" ते आता शुध्दीवर वर आलेले आहेत . तुम्ही त्यांना भेटू शकता..."

मी -" थँकस डॉक्टर.... पूजा पूजा ... अग बाबांना शुद्ध आलंय... चल लवकर.."

बाबा हे शब्द ऐकताच ती पटकन उठली. आम्ही सगळे आत गेलो तर ते आता शुध्दीवर आले होते.

पूजा -" बाबा.... ????????????"

पूजा रडत रडत त्यांच्या पायापाशी येऊन बसली. बाबा तिच्याकडे बघून रागात म्हणाले.

बाबा -" पूजा ... तू इथ काय करत आहे.... गेट आउट..????????????"

पूजा -" प्लीज बाबा ऐका ना... माफ करा ना मला..."

बाबा -" बावळट ... तुला कळत नाही का???... जस्ट गेट आउट ऑफ हीअर..."

        पूजा त्यांच्या पाय घट्ट पकडून तीच कपाळ पायावर टेकवून बोलली

पूजा -" प्लीज प्लीज बाबा... माझं कोणीच नाही इथ... प्लीज..."

         आम्हाला सगळ्यांना तिची कीव येऊ लागली. का भोगत आहे  ती हे सगळं... ????????
बाबा -" तुला एकदा सांगितलेलं कळत नाही... माझी पोरगी तर माझ्यासाठी कधीच मेली...????????"

       एवढं ऐकुन पूजा रडतच बाहेर पळत गेली. रचना आणि रवी तिच्या मागे पळत गेले. मला मात्र त्यांचा खूप राग आला. म्हणून मी बोलू लागलो...........

********************************
क्रमशः

ऋषिकेश मठपती

( पुढचा भाग लवकरच..आवडल्यास नक्की कमेंट करा... धन्यवाद...????????????)

🎭 Series Post

View all