तिला सावरताना भाग-१७

After Preeti's advice Arnav ready to accept his love to Pooja . But , there is wall in between them.

     दोघंही एकमेकांकडे बघत सुद्धा नव्हते .पण  एकमेकांची ओढ मात्र होती. 

    तेवढ्यात अर्णव चा फोन वाजला . स्क्रीनवर प्रीतीच नाव झळकत होत... रचना ते बघताच अजुन रागात आली. अर्णव कॉल रिसिव्ह केला..

अर्णव -" हॅलो..."

प्रीती -" हॅलो... अरे अर्णव...कुठ आहेस ????..... पटकन ऑफिसला ये ..."

अर्णव -" हॅलो प्रीती ... काही प्रॉब्लेम आहे का?"

प्रीती -" तू अगोदर ये बघू... इट्स अर्जंट..."

अर्णव -" बर... बर.. येतो लगेच..."

    अर्णव एकदा रवीला सांगून गेला. जाता जाता त्याची नजर पूजाच्या नजरेला भिडली . जणू तो सांगत असेल की मी तुझ्यापासून दूर जात आहे. तिची नजर मात्र नको म्हणून सांगत होती. पण दोघे मात्र एक शब्द सुद्धा बोलत नव्हते . अर्णव गाडी घेऊन ऑफिसला निघाला. रस्त्यात तो विचार करत होता की काय अर्जंट असेल प्रीतीला???... काम असेल का काही ????... गाडी वेगात घेत तो ऑफिसला पोहचला. 

       अगदी गडबडीत तो ऑफिस मध्ये शिरला. रिसेप्शन मध्ये असलेली जास्मिन म्हणाली. 

जसिका-" अरे अर्णव ... तू आलास??.."

अर्णव -" हो... प्रीती  कुठे आहे??"

जसिका-" प्रीती??"

अर्णव -" प्रीती मॅडम..."

जसिका-" आपल्या केबिनमध्ये आहेत .."

अर्णव -" ओके .... सी यू लेटर..."

          एवढं बोलून तो केबिनमध्ये गेला . केबिनमध्ये प्रीती टेबलावर मान ठेऊन बसलेली होती. केबिन अगदी शांत वाटत होतं. अर्णव तिच्या जवळच्या खुर्चीवर बसला. तिला उठवण्यासाठी हात उचलला , पण मध्येच तो थांबवला. त्याला खूपच अन्कंफटेबल वाटत होत. 

अर्णव -" प्रीती ..."

         प्रीती मान वर करून बघू लागली. तर तिचं त्या ओल्या डोळ्यांनी अर्णवकडे बघू लागली . त्याला बघताच तिच्या डोळ्यातील बांध तुटलं. ती अर्णवच्या मिठीत येऊन रडु लागली. अर्णव तिच्या डोक्याला थोपटवत म्हणाला.

अर्णव -" श श... काय झालं???. प्रीती .. शांत हो बघू आधी ... "
      प्रीती आता शांत होऊ लागली होती. अर्णव टेबलवर असलेला पाणीचा पेला तिला दिला. ती पाणी पिऊन थोडा वेळ शांत बसली. 

अर्णव -" आता सांग काय झालं??..."

प्रीती शून्यात बघून म्हणाली.

प्रीती -" अर्णव... रोहितचं लग्न ठरलय..."

अर्णव - " काय???..????????... तुला कधी कळाल??"

प्रीती -" आता माझी मैत्रीण च फोन आल होत... ती म्हणाली.."

अर्णव -" ओ... कधी आहे लग्न???"

प्रीती -" पुढच्या महिन्यात...????????"

अर्णव अचानक हसू लागला. प्रीती त्याच्याकडे बघू लागली. 

प्रीती -" व्हॉट हॅपेन ??... अस का हसत आहेस?? ????????"

अर्णव -" आपल नशीब किती मिळतजुळत आहे ना?"

प्रीती -" म्हणजे???"

अर्णव -" म्हणजे बघ की तुझ्या रोहीतचा लग्न आणि पूजाचा लग्न सुद्धा पुढच्या महिन्यात ठरलंय... दोघे कसे आता देवदास टाईप झालो आहोत...????????"

प्रीती -" तुझ आणि माझं वेगळं आहे अर्णव..."

अर्णव -" कसं???"

प्रीती -" तू अजूनसुद्धा तिला सांगू शकतोस की तुझा प्रेम आहे म्हणून, पण मी नाही ना सांगू शकत... तुझी अजुन वेळ गेलेली नाही आहे.."

अर्णव -" आता ते शक्य नाही आहे प्रीती... "

प्रीती -" का???"

अर्णव -" कारण ती तिच्या बाबांची प्रॉमिस नाही तोडणार ...????????"

प्रीती -" पण तीच मन तुझ्यात अडकलेला असेल तर???.."

अर्णव -" तरी सुद्धा ती बाबांना दिलेला प्रॉमिस नाही मोडणार..."

प्रीती -" मग प्रॉब्लेम बाबा आहेत तर..."

अर्णव -" अग तस नाही... पण तिला तर माझ्या प्रेमाबद्दल कुठे माहिती आहे??..????????"

प्रीती -" तिला माहिती आहे अर्णव..."

अर्णव -" कसं??"

प्रीती -" तुझ्या डोळ्यात तीच्याबद्दलच प्रेम दिसत वेड्या.."

अर्णव -" मग ती अजून का नाही सांगितली?"

प्रीती -" ती तुझ्या कबुलीची वाट बघत असली म्हणजे??"

अर्णव -" मग मी आता काय करू???...????????"

प्रीती -" तुम्हा पोरांना ना सगळं काही सांगावं लागत...????????... जा आणि सांग बिंदासपणे की पूजा आय लव्ह यू..."

अर्णव -" नक्की???"

प्रीती -" अरे हा... "

     तिकडे मात्र पूजाला काही कळत नव्हतं. अचानक अर्णव कुठे गेला होता. पूजाची नजर अर्णव ला शोधत होती. शेवटी न राहून ती रवी जवळ आली. 

पूजा -" रवी.... अर्णव कुठे गेला रे??..."

रवी -" तो ऑफिसला गेलाय..."

पूजा -" काही अर्जंट काम होत का??"

रवी -" नाही माहिती... थोड्या वेळापूर्वी प्रीती मॅडम यांचं कॉल आलेला होता. तो म्हणाला की अर्जंट काम आहे ,जातो म्हणून..."

          प्रीतीच नाव ऐकताच पूजाच ते सुंदर चेहरा पडला. ही गोष्ट रचना कडून लपली नाही. तिला तर अर्णवचा खूप राग आलेला होता.  का नाही येणार... ऐकिकडे म्हणतो की पूजाशी प्रेम करतोय आणि दुसरीकडे मात्र तो प्रीतीसोबत मस्त टाईम स्पेंड करतोय...????????

      लग्नासाठी जे काही शॉपिंग करायचं होती ती मात्र झाली . सगळे बॅग्स घेऊन बाबा आणि पूजा निघू लागले. 

बाबा -" तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद ... तुमच्यामुळे मला ही शॉपिंग शक्य झालं... अर्णव कुठे गेलाय??"

      रचना मनातल्या मनात ,' तो काय... मस्त असेल प्रीती सोबत...????????'

रवी -" अंकल... तो ऑफिसला गेलाय.. काही अर्जंट काम होत म्हणून..."

बाबा -" ह्मम... चला मग आम्ही निघतो..."

       पूजा आणि बाबा दोघेही त्यांच्या कार मध्ये बसून निघाले. खिडकीतून पूजा बाहेर बघत असताना तिला अर्णवसोबत घालवलेले क्षण आठवले. त्याच आठवणींनी तिची डोळे ओले झाले. 

       इकडे अर्णवला  त्याच्या प्रेमाची कबुली देण्यासाठी लागलेली हुर हूर आणि तिकडे पूजाला अर्णव आयुष्यातून निघून जाईल या बाबतीत असलेले दुःख , या मध्ये अंतर फक्त एका वाक्याची होती ' आय लव्ह यू'. 

      पूजा आणि बाबा त्यांच्या घरी पोहचले. घरात मात्र जोरदार तयारी चालली होती. लग्नासाठी किती लोक येणार आणि त्यांचं नियोजन कसं करायचं हे सगळं प्लॅन बाबांचे नोकर लोक करत होते. पूजाला मात्र या मध्ये काडीचाही इंटरेस्ट नव्हता. तीच मन तर अर्णवच्या आठवणीत हरवून गेलेला होता. ती तिच्या रूम मध्ये आली. दरवाजा बंद केली आणि बेडवर रडतच पडली. तिचे अश्रू खूप काही सांगून जात होत , ऐकीकडे मन अर्णव सोबत आहे तर दुसरीकडे ती बाबांना दिलेली प्रॉमिस चा सुद्धा विचार करत होती. 

????????

पल भर ठहर जाओ
दिल ये संभल  जाए 
कैसे तुम्हें रोका करू
मेरी तरफ आता 
हर ग़म फिसल जाए 
आँखों में तुम को भरूं 
बिन बोले बातें तुमसे करूँ 
गर तुम साथ हो 
अगर तुम साथ हो 
तेरी नज़रों में है तेरे सपने 
तेरे सपनों में है नाराज़ी 
मुझे लगता है के बातें दिल की 
होती लफ़्ज़ों की धोखेबाज़ी 
तुम साथ हो या ना हो क्या फर्क है 
बेदर्द थी ज़िन्दगी बेदर्द है
गर तुम साथ होअगर तुम साथ हो...
????????????????
????????

       रडता रडता पूजा कधी झोपी गेली हे तिला सुद्धा नाही कळाल. सकाळी जेंव्हा तिला जाग आली तेंव्हा तिचे डोळे सुजलेले होते . तिचे बाबा तिला बघताच तिला विचारले की काही झालाय का??.. ती जागरण झाल्याचं कारण सांगून वेळ मारून नेली. 
       तिकडे अर्णव पूजाला कसे सांगावं की तो तिच्यावर किती प्रेम करतो ते.... त्यात त्याला आयडिया आली की सरळ तिच्या घरी जावं आणि सरळ सरळ तिला विचारावं. म्हणून तो सकाळी सकाळी एकदम फर्स्ट क्लास रेडी होत होता. रेडी होता होता तो प्रीतीला कॉल केला.

प्रीती -" हॅलो अर्णव..."

अर्णव -" हॅलो प्रीती ... गूड मॉर्निंग.."

प्रीती -" क्या बात है ... जनाब आज ज्यादा खुश लग रहे हैं.."

अर्णव -" कारण कामच तसलं करायला चालोय.."

प्रीती - " कसल काम???"

अर्णव -" आज पूजाच्या डायरेक्ट घरी जातो आणि डायरेक्ट तिला विचारतो की लग्न करणार का माझ्याशी???"

प्रीती - " ओह..."

प्रीती काहीशी लटकत्या आवाजात म्हणाली..

अर्णव -" काय झालं??"

प्रीती -" काही नाही... ऑल द बेस्ट...????????"

अर्णव -" ओके ओके... आज ऑफिसला जरा लेट होईल ..????????"

प्रीती -" डोन्ट वरी .. तू ये निवांत.."

    अर्णव आज जाम खुश होता. गाडी काढून तो पूजाच्या घरी निघाला. थोड्या वेळात तो तिच्या घरी पोहचला. घराच्या बाहेर तो गाडी पार्क करताना तो आरशात बघून थोडा केस नीट केला आणि घरात शिरला. तो आत शिरताच त्याला कळाल की घरी पाहुणे आलेले आहेत. बाबा अर्णवला बघताच म्हणाले.

बाबा -" अरे अर्णव ... तू आणि इथ???"

      अर्णव स्मित करून त्यांना काहीतरी बोलायचा तेवढ्यात बाबा म्हणाले. 

बाबा -" बर आलाच आहेस तर यांना भेट.. हे आहेत करण पूजाचा होणारा नवरा. "

     अर्णव त्याला बघताच त्याची खुशी गम मध्ये रुपांतर झाली. करण त्याला हात पुढे करत म्हणाला.

करण -" हाय आय एम करण..."

अर्णव सुद्धा त्याचा हात पुढे करत म्हणाला.

अर्णव -" आय एम अर्णव..."

      तेवढ्यात तिथून पूजा आली. तिच्या हातात ट्रे आणि त्यात चहा आणि काही बिस्कटे सुद्धा होती. ती अर्णवला बघताच स्तब्द थांबली. करण तिला बघताच म्हणाला.

करण -" देर शी इस... "

      एवढं म्हणत तो तिच्याजवळ जाऊन तिला हग केला. त्याच्या घरचे खूप ओपन होते त्यामुळे हे सगळं काही वाटलं नाही. पण एकाला खूप काही वाटलं तो म्हणजे अर्णव... त्याच्या हृदयाचं तर पार तुकडे तुकडे झाले होते. तेवढ्यात बाबा त्याला म्हणाले.

बाबा -" अर्णव बाळा... आमच्या घरात खूप नोकर आहेत पण आमचे म्हणून कोणीही नाही... मग बाळा तू येशील ना आम्हाला मदत करायला ?"

अर्णव -" अहो ... अस का म्हणताय येणार की आणि हो रवी आणि रचना तुमचेच बाळ आहेत हा..."

   ती बाहेरून चांगला दिसत असला तरी आतून तुटलेला होता. 

बाबा -" हो तर .."

   सगळ्यांचे नाष्टा पाणी झालं. अर्णव सगळ्यांचं निरोप घेऊन ऑफिसला निघाला पण त्याच्या मनात खूप काही होत होतं . काहीही असो शेवटी ती त्याची खर प्रेम होती . काहीही अपेक्षा न ठेवता तो तिच्यावर प्रेम करत होता. पण त्याला ठाऊक नव्हतं की ती पण तिच्यावर तेवढच प्रेम करत आहे ... ऑफिस मध्ये सुद्धा तो कुणाला काहीही बोलला नाही. रवी आणि रचना सुद्धा त्याला विचारल तर तो काहीही बोलला नाही.
    आपल काम आटपून तो निघतच होता तर प्रीती तिला हाक मारली तर तो इग्नोर करून घरी गेला. घरी जाता जाता त्याच्या मनात खूप काही विचार येत होत. 
 .      घरी पोहचताच तो सर्वात प्रथम शॉवर च्या खाली गेला. शॉवरचे पाणी त्याच्यावर पडताच त्याच्या डोळ्यातून ही पाणी येऊ लागले. त्याच्या मनातील दुःख तो आता बाहेर काढत होता. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली . तो अंघोळ आटपून दार उघडलं तर तिथे प्रीती होती. 

    ती आत येताच त्याला विचारली की काय झालाय ??.. अर्णव तिला बघताच तिच्या मिठीत जाऊन रडु लागला. ती त्याला शांत बसवत त्याला थोपटत होती. 

प्रीती -" काय झालाय अर्णव ??"

         अर्णव शांत होऊन आज घडलेलं सगळं काही सांगितला. प्रीती सगळ काही ऐकुन घेत होती. काही मिनिटे शांतपणे गेली. अर्णव त्याच डोकं प्रितीच्या खांद्यावर ठेऊन बसलेला होता आणि प्रीती त्याच्या डोक्याला थोपटत होती. 

   तेवढ्यात त्याच्या दारावर पूजा आली . ती अर्णव आणि प्रीतीला अस बघताच दराजवळच  थांबली. ती त्या दोघांना तस बघताच तिच्या डोळ्यातून अश्रू तिच्या गालावरून खाली येऊ लागले. ती आली तशीच मागे फिरली आणि घरी निघाली. घरी जाता जाता तिच्या मनात खूप काही विचार येऊ लागले होते. 

   अर्णव आता झोपी गेला होता. प्रीती त्याला बेडवर झोपवून निघणार तेवढ्यात अर्णव तीच हात पकडत म्हणाला ," पूजा ... आय लव्ह यू...".  हे ऐकताच का कुणास ठाऊक ?? प्रितीच्या ही डोळ्यातून पाणी आल. ती त्याचा हात सोडवून घरी निघून गेली. 

    सकाळी होताच तो तयार झाला आणि थेट पूजाच्या घरी गेला आणि बाबांना मदत करू लागला. त्यांना काही काम असेल तर तो करत होता . अगदी मंडप पासून ते गॅस सिलिंडर पर्यंत तो सगळं काही काम करू लागला. पण त्याच्या मनात खूप मोठा पोकळी निर्माण झाली होती. 

    पूजा बाल्कनी मधून अर्णवला बघत होती. तिच्या सुद्धा मनात दुःखाचं समुद्रच निर्माण झालेला होता. असेच दिवस जात होते. तिच्या लग्नाची तारीख जवळ येत होती. तशी तशी पूजाच्या मनात नको ते विचार येत होते . एकीकडे बाबांना दिलेलं वचन आणि दुसरीकडे तीच प्रेम ... रवी आणि रचना सुद्धा आता बाबांना मदत करायला आलेले होते. 
      बघता बघता लग्न दोन दिवसावर येऊन थबकली. आता पूजाच्या मनात तर आत्महत्या सारखं विचार येत होती. असेच विचार करत ती तिच्या रूम मध्ये बेडवर रडत होती. ????????????????
********************************
क्रमशः

ऋषिकेश मठपती

पुढील भाग कदाचित शेवटचा असेल ... धन्यवाद... आवडल्यास कमेंट जरूर करा.....  मला कळत नाहीय की कथा तुम्हाला कसं वाटतं आहे ते .. त्यामुळं प्लीज कसं वाटलं हे नक्कीच कळवा... शेअर करा .. धन्यवाद ????????

🎭 Series Post

View all