तिला सावरताना भाग-१५

Pooja notices the close relation between Preeti & Arnav ... She feels very sad ... She want to accept the situation , but she didn't .... Can Pooja accepts her love infront of Arnav ?

          अर्णव एवढं ऐकूनच खाली बसला. 

पूजा -" हॅलो ... हॅलो अर्णव... हॅलो... काय झालं???.. अर्णव बोल ना... "

तो मोबाईल मात्र खाली पडला होता... आणि त्याच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं होत... ???????????????????????? 

      सकाळ होत आली होती. पण ते सकाळ अर्णव साठी काही चांगल होणार नव्हतं. सूर्याची किरणे आकाशाची भेट घेत होती. पण अर्णव च्या आयुष्यात मात्र अंधारच पसरलेला होता. एकच प्रश्न त्याच्या मनात येत असे की ' का??... का माझ्यासोबत अस होत आहे.??' त्याच उत्तर मात्र त्याला मिळत नव्हत. 

    प्रीतीला आता जाग येत होती. अर्णव मात्र बेडच्या खाली एकटक बघत बसलेला होता. प्रीती बेडवर बसलेली होती. 

प्रीती -" अर्णव... "

अर्णव मात्र तिच्या हाकेला उत्तर देत नव्हता. प्रीतीला जरा वेगळच वाटत होत . 

प्रीती -" अर्णव ... आर यू अलराईट???"

अर्णव तरी सुद्धा लक्ष देत नव्हता. प्रीती त्याच्या खांद्याला हलवत म्हणाली. 

प्रीती - " अर्णव... "

अर्णव जरासा दचकून जागा झाला. तो प्रीती कडे बघत म्हणाला. 

अर्णव - " संपल...????????"

प्रीती -" काय???...????????"

अर्णव -" सगळच..."

एवढं बोलून तो प्रितीच्या गळ्यात पडून रडु लागला. प्रीती तिला सावरत म्हणाली.

प्रीती -" शश... शांत हो बघू... काही संपणार नाही..."

प्रीती त्याला दिलासा देत म्हणाली. अर्णव आता शांत होत होता. त्याला कळून चुकलं की तो प्रितीच्या मिठीत होता. तो लगेच मागे झाला. 

प्रीती -" आर यू ओके..."

अर्णव अजूनसुद्धा गप्प होता. प्रीती त्याला बघून म्हणाली.

प्रीती -" वेट.. मी कॉफी आणते... मग आपण बोलू..."

प्रीती किचन मध्ये गेली. तो मात्र तसाच बसलेला होता. काही मिनिटांत प्रीती ट्रे मध्ये दोन कप घेऊन आली. अर्णव आता बऱ्यापैकी बरा दिसत होता.

प्रीती -" घे... स्ट्रोंग कॉफी..."

दोघंही आता कॉफीचा आस्वाद घेत होते. काही मिनिटे शांतपणे गेला. 

प्रीती -" आता सांग ... काय झालं?"

अर्णव -" ????????????... काय सांगू तुला आता???"

प्रीती -" मी नाही का सांगितले तुला सगळं... तस तू पण सांग... अंड बाय द वे .. थंक यु... काल मला इथ घेऊन आला त्यासाठी..."

अर्णव च्या चेहऱ्यावर खूप वेळानंतर स्मित आली होती. 

प्रीती -" बर आता सांगतोस ना.. काय झालंय ते ?"

अर्णव दीर्घ श्वास घेऊन पहिल्यापासून सांगू लागला. त्याच्या ऑफिस मध्ये पूजाच्या एन्ट्री पासून ते तिच्या व्यसन सोडवण्या पर्यंत . तिच्या वाढदिवसाच्या त्या रात्री पासून ते तिच्या बाबांना मणवण्या पर्यंत आणि तिच्या अचानक घेतलेला बाबांच्या इच्छेनुसार लग्न करण्याचा निर्णय पर्यंत... प्रीती सर्व काही शांतपणे ऐकुन घेतली . 

प्रीती -" ह्म म् म... तर तिला तुझ्या प्रेमाची जाणीव नाही तर.."

अर्णव -" कधी अशी वेळच आलेलीच नाही की मी व्यक्त होऊ...????????????... आता सगळं संपलं..."

प्रीती त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाली.

प्रीती -" सर्व काही ठीक होईल... प्रेम जर खर असेल तर तुला नक्कीच मिळेल. "

अर्णव गप्प बसलेला होता. तो सगळे अपेक्षा सोडलेला होता. पण पुढे काय होणार होत हे त्याला तर कुठ माहिती होत. 

प्रीती -" ते राहुदे... चल मी रेडी होते ऑफिस साठी..."

अर्णव -" हो..."

प्रीती उठून बाथरूम कडे गेली. नंतर मागे वळून म्हणाली . 

प्रीती -" तिला हरकत नसेल तर तू सुध्दा इथेच रेडी होऊ शकतो... जर तुला हरकत नसेल तर...."

अर्णव - " ओके... पण कपडे नाही माझ्याकडे... "

प्रीती -" डोन्ट वरी.. लहान भाऊचे कपडे तुला येतील..."

अर्णव -" तुला भाऊ पण आहे???"

प्रीती -" हो... पण तो इथे नसतो... कधी तरीच तो इथ येतो.... त्याचेच कपडे इथे आहे. ????????"

अर्णव फक्त एक स्मित हास्य करत होता. प्रीती बाथरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी गेली . अर्णव मात्र वेगळ्याच दूनियात हरवला होता. प्रीती कधी रेडी झाली याची सुद्धा त्याला भान नव्हता. प्रीती दोन तीन वेळा हाक मारून सुद्धा तो गप्पच बेसलेला होता. प्रीती त्याला हलवून बघितली. तो अचानक दचकून म्हणाला.

अर्णव -" तू रेडी झालीस?"

प्रीती -" हो... तू पण हो... आणि तुझ्याजवळ फक्त अर्धा तास आहे... आणि मला ऑफिसला लेट झालेला आवडत नाही..."

अर्णव -" हो..."

प्रीती हसून म्हणाली...

प्रीती -" डोन्ट वरी यार... निवांत रेडी हो...????????"

अर्णव न हसताच तो बाथरूम कडे गेला. प्रीती काहीच वाटल नाही... कारण तिला कदाचित माहिती असेल की तो कोणत्या कंडीशन मध्ये आहे. ..

अर्णव रेडी होऊन बाहेर आला. बाहेर येताच तो बघतो तर काय प्रीती डायनिंग टेबलवर बसलेली होती. 

प्रीती -" अर्णव... डू यूर् ब्रेकफास्ट..."

अर्णव -" नको मला..."

प्रीती - " अरे यार...ये बघू "

अर्णव -" नको म्हणलो ना मी..????????????"

प्रीती -" बर बर... बसून घे... मी नाष्टा करून घेते. मग आपण जाऊयात."

सगळ काही आटपल्यावर प्रीती आणि अर्णव दोघंही ऑफिसला निघाले. 

तिकडे ऑफिसमध्ये रचना आणि रवी दोघंही अर्णवचे वाट पाहत होते. 

रचना -" कुठे असेल हा??? " 

रवी -" एवढं का टेन्शन मध्ये आहेस... येईल तो.. नको काळजी करू.."

रचना - " अरे काल रात्रीपासून त्याचा फोन बंद लागत आहे.????????????"

रवी -" चार्जिंग नसेल ..."

तेवढ्यात पूजा कित्येक दिवसातून ऑफिसला आली. ती खुशीत तर होती पण जरा टेन्शन मध्ये पण होती. कारण ऑफिसला तेवढं लेट च आली होती. 

पूजा - " हे रचना...????????"

रचना -" हे पूजा...कसं काय मग... किती दिवसातून आली आहेस??"

पूजा -" मी मस्त ... तू कशी आहेस???"

रचना -" मस्तच...."

पूजा -" आणि रवी ... कसा आहेस??"

रवी -" ऑल गूड.. ????????"

पूजा -" ऐका ना तुम्हाला एक बातमी द्यायची आहे..."

दोघंही एकदमच म्हणाले -" कुठली?"

पूजा -" अग यू डोन्ट बिलिव... माझं लग्न ठरलय..."

दोघांना आता कळून चुकल की का अर्णवचा फोन बंद लागत आहे ... 

पूजा -" अग अर्णव आला आहे का ऑफिस का?"

तेवढं म्हणताच ऑफिस मध्ये प्रीती आणि अर्णव दोघंही एकदमच आले. त्या दोघांकडे तिघेही बघतच उभे राहिले. प्रीती अर्णवला घेऊन ऑफिसच्या तिच्या केबिनमध्ये घेऊन गेली. 

पूजा -" ही कोण???"

रचना -" ही आपली नवीन एच. आर ... म्हणजे काल रात्र भर तो तिच्यासोबत होती..."

रवी -" डोन्ट नॉ... मे बी..."

पूजा -" तो तिच्यासोबत का होता??"

रवी - " म्हणजे ??"

पूजा -" म्हणजे का ??"

रवी -" का राहू नये???"

ती गप्प राहणंच पसंत केलं. तिचे डोळे खूप काही सांगून गेली. तरी सुद्धा तोंडातून एक शब्द काढत नव्हती. रवी तिला बघून रचना ला इशारा केला. रचना सुद्धा नोटीस करत होती. 

रचना -" बाय द वे ...  अभिनंदन..."

पूजाच मात्र तीच्याकड लक्ष नव्हतं.

रचना -" पूजा..."

पूजा जरा दचकून म्हणाली.

पूजा -" ह... "

रचना -" मी म्हणाले अभिनंदन..."

पूजा -" ओ... थॅन्क्स..."

रवी -" एक विचारू पूजा ?"

पूजा -" विचार ना..."

रवी -" तुझ लग्न होत आहे...  पण तू खुश आहेस ना???"

पूजा -"  पप्पा खुशीत आहेत ना... मला अजुन काहीही नकोय.."

रचना -" अग मग तुझ्या सुखाच काय??"

पूजा -" पप्पा निर्णय घेतलाय म्हणजे माझ्या चांगल्यासाठीच असेल.."

रवी -" ओह.."

पूजा -" अर्णव एच. आर च्या एवढं जवळ कसा काय??"

रवी -" म्हणजे ??"

पूजा -" म्हणजे एवढे जवळ कसं काय ... की तो रात्र तिच्यासोबत राहतो..."

रवी फक्त खांदा उडवतो.

तेवढ्यात अर्णव केबिन च्या बाहेर आला. तो पूजाला समोर बघून तिथंच थांबला. पूजा आणि अर्णवची एक क्षण नजरेला नजर भिडलं गेलं. तो क्षण खूप काही सांगून जात होत.. पण ते मात्र कुणाला काही सांगत नव्हते. 

पूजा त्याच्या जवळ जाऊन त्याला परत एकदा गोड बातमी दिली. 

अर्णव -" ओह्... अभिनंदन.."

एवढं बोलून तो त्याचा हात पुढं केला. ती त्याला शेक हांड करत म्हणाली.

पूजा -" थॅन्क्स... आणि मग कसा आहेस??"

अर्णव -" बघत आहेस ना... बरा आहे..."

अर्णव तिला इग्नोर करू पाहत होता. 

पूजा -" ओह... ओके ... "

अर्णव - " मग कसं चालय लग्नाचं तयारी???..."

पूजा -" चालू आहे... तू कसा आहेस."

अर्णव फक्त एक खोटं स्मित तोंडावर ठेवत तो म्हणाला. 

अर्णव -" अग मस्तच आहे मी..."

पूजा -" ह्म म.... तू आणि......"

ती जस वाक्य पूर्ण करील तेवढ्यात प्रीती केबिनच्या बाहेर येऊन म्हणाली. 

प्रीती -" अर्णव... एक अर्जंट काम आहे... केबिनमध्ये ये..."

अर्णव -" ओके... मॅडम... पूजा प्लीज नंतर बोलू का??..."

पूजा फक्त आपली मान हलवली. अर्णव प्रितीच्या केबिनमध्ये काम निम्मित गेला. 

पूजाच्या मनात खूप काही विचार एकदमच चालू झाल होत. पण का तिच्या मनात अस होत आहे हे सुध्दा तिला माहिती नव्हतं.. ती स्वतः खूप काही कन्फ्युजन मध्ये होती.. का कोण जाणे अचानक तिला वेगळं वाटू लागलं. ... न कळत तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागलं... अचानक ती रडत रडत ऑफिस च्या बाहेर पळतच गेली ????????????????... तिला रवी आणि रचना दोघेही बघत होते... या कथेत अजुन खूप काही बाकी होत....

********************************
क्रमशः

ऋषिकेश मठपती

पुढचा भाग लवकरच... तुम्हाला हे भाग आवडला असेल तर नक्की कमेंट करा... शेअर करा... धन्यवाद...????????????

🎭 Series Post

View all