तिला सावरताना भाग-१४

Arnav and Preeti having their time on beach . In this time , they will learn about past life of Preeti.

        लेफ्ट ला वळताच... अर्णव गाडीला थांबवला. तो ते ठिकाण बघून कार मधून उतरला... तो तेच ठिकाण होता जिथे तो पूजाला प्रपोज करणार होता , आपल्या प्रेमाची कबुली देणार होता. पण घडल मात्र वेगळच होत. 

प्रीती -" चल... "

अर्णव -" इथे???"

प्रीती -" चल तर चल..."

      एवढं बोलत प्रीती अर्णवचा हाथ धरून ओढतच घेऊन जाऊ लागली. त्या शांत अश्या संध्याकाळी त्या समुद्राच्या ठिकाणी फक्त प्रीती आणि अर्णव दोघेच होते. 

प्रीती -" चल बूट काढ ?"

अर्णव -" मॅडम???"

आधीच तो हे ठिकाण बघून नर्व्हस झालेला होता.

प्रीती -" बूट काढ म्हणले ना तर काढायचं... "

अर्णव -" ओके .... "

       अर्णव बूट काढत होता आणि प्रीती हिल्स काढून त्या दोन्ही हील्सना खांद्यावर घेऊन थांबली. अर्णव सुद्धा बूट काढून तयार झाला.

प्रीती -" चल .... या ठिकाणी मोकळ्या पायांनी फिरायची मजाच वेगळी असते.."

अर्णव-" ह्म्म्.."

      पाच मिनिटे दोघंही शांतपणे चालत होते. कोणी कोणाशी काहीच बोलत नव्हते. दोघंही त्या बीच वरची येणारी मंद झुळूक अनुभवत होते. जणूकाही ती हवा त्यांना काहीतरी सांगत होते. कोणीतरी ही शांतता मोडायची होती म्हणून अर्णव म्हणाला

अर्णव -"तुम्ही कधी पासून इथे येत आहात?"

प्रीती -" काय म्हणालास तू?"

अर्णव -" मी म्हणालो की तुम्ही कधी पासून इथे येत आहात?"

प्रीती -" तू   तुम्ही , आपण म्हणत जाऊ नको बर.."

अर्णव -" पण तुम्ही माझे बॉस आहात?"

प्रीती -" ते ऑफिस मध्ये बाहेर तू मला प्रीती म्हणू शकतोस .."

अर्णव -" ह्म्..."

काही मिनिटे असेच शांतपणे गेले .

अर्णव -" सांग ना..."

प्रीती -" काय?"

अर्णव -" तू कधी पासून इथे येत आहेस..."

प्रीती -" खर सांगू का खोटं ???...????????"

अर्णव -" खोटं...????"

प्रीती -" आताच फर्स्ट टाइम मी इथे आले..."

अर्णव -" आता खर...????"

प्रीती - " पहिल्यांदा ... मी लहानपणी इथे बाबा सोबत आले होते... "

      एवढं बोलून ती गप्प बसली . अचानक ती शून्यात बघू लागली. 

अर्णव -" मग????"

प्रीती -" मग इथ एक टपरी होती. त्याठिकाणी मस्त चहा मिळत असे. त्या टपरीवर एक काका होते. ते रोज मला चहा सोबत बिस्कीट द्यायचे. पण ..."

अर्णव -" पण????..."

प्रीती -" पण .... माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जेंव्हा मी इथ परत आले . तेंव्हा ती टपरी बंद होती. का बंद होती ???... काय झालं?... माहिती नाही... पण मला अस वाटत होत की माझं लहानपणाची एक आठवणच या समुद्रात वाहून गेलंय ... "

प्रीती समुद्राकडे बघत होती. 

अर्णव -" ह्मम् ... मग त्या आठवणीत इथ येतीस ???"

प्रीती -" हा पण नाही पण ..."

अर्णव -" म्हणजे ???" 

प्रीती -" म्हणजे एका आठवणी साठी मी इथ येत नाही .."

अर्णव -" मग अजुन कसले आठवण आहेत इथले ?"

प्रीती -" काही आठवणी न आठवलेले बर... "

अर्णव -" पण तेच आठवणी घेऊन तू इथ येत असतीस ."

प्रीती -" ह्ममम.."

अर्णव -" मग सांग कसले आठवणी आहेत इथले ?"

प्रीती - " मी जेंव्हा दहावीला होते तेंव्हा माझं शिक्षण इथल्या जवळच्याच शाळेत झालं . माझ्या क्लास मध्ये एक मुलगा होता .. रोहित नाव होत त्याच ... "

प्रीती पुन्हा शांतपणे समुद्राकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य पसरलेली होती . 

अर्णव -" ओह  गूड ... मग ?"

प्रीती -"  आम्हाला दिवाळीची सुट्टी सुरू होणार होती . शाळेत शेवटचा पेपर होता. मी या बीच वरून जात होते. तो माझ्या मागून सायकलवरून येत होता. अचानक तो मला थांबवून घेतला. मला अचानक काय झालं कळालच नाही. तो म्हणाला ' मला तुला काहीतरी सांगायचं आहे .' मी बोल म्हणण्याचा अगोदरच तो म्हणाला ' प्रीती .... आय लाईक यू... तुझे ते घारे डोळे मला खूपच घायाळ करत असतात ... तुझी ती गोड स्माइल माझ्या हृदयाच्या अगदी खोलवर जात असते . प्लीज .. माझं प्रेम स्वीकार कड ... ' एवढं बोलून तो गुढग्यावर बसला आणि मला गुलाब  देऊ लागला. मी खूप घाबरले होते. काय करू काय नको अस झाल होत... परत माझी ही स्थिती बघून तो पुन्हा म्हणाला '  घाबरु नकोस... तुझ उत्तर मला दिवाळी संपल्यावर सांग.. पण नक्की सांग. ' एवढं बोलून तो माझ्या हातात गुलाब देऊन गेला. मी त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत होते. "

अर्णव -" इंटरेस्टिंग... मग नेक्स्ट ??.. तू काय उत्तर दिलीस .."

प्रीती -" मी त्या दिवसापासूनच त्याचेच झाले होते. रात्री झोप येत नसे. माझी दिवाळी कशी गेली हे सुद्धा मला कळाल नाही. मी अक्षरशः आरश्यात बघून लाजत होते. ती वेळच तशी होती किंवा ते वय तसच होत माहिती नाही, पण मस्त वाटत होती ती फिलिंग.... मी कधी एकदा त्याला भेटते आणि त्याला होकार देत अस झालं होत. जेंव्हा मात्र माझी शाळा सुरू झाली . तेंव्हा मी त्याला इथेच भेटून होकार दिली होते. तो तर पारच वेडा झाला होता . मग आम्ही एकत्र शाळेत जायचो . कधी कधी तर आम्ही शाळा बंक करून फिरायला जायचो. मग असेच दिवस जात होते. तर बोर्डाची परीक्षा सुरू होणार होती. "

अर्णव - " मग?"

प्रीती -" मग काय ... लागले सगळे अभ्यासाला आणि शाळेत सगळे सीरियस झाले, त्या सगळ्यात आम्ही पण होतो. परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर काही दिवस रोहित शाळेला आला नाही. मला वाटल अभ्यास करत असेल. मी रोज शाळेत यायचे . पण तो मात्र काही येत नव्हता. मग मला खूप भीती वाटू लागली. काही झाल नसेल ना???...  त्या टेन्शन माझं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. एक्झाम सुरू होण्यासाठी अजुन दोन दिवस होते.  अचानक माझी मैत्रीण मला एक लेटर दिली. त्यात तोच लिहिला होता की ' प्लीज आज मला बीच वर येऊन भेटशील काय?' .... मग मी अचानक खूप खुश झाले.  कित्येक दिवस त्याला बघितले नव्हते. आज त्याला परस्पर भेटणार होते. माझ्या मनात कित्येक प्रश्न होते. "

अर्णव -" कदाचित तो सॉरी म्हणायला बोलावलं असेल.."

प्रीती फक्त एक स्मित देऊन पुढे बोलू लागली. 

प्रीती -" मला सुध्दा असच वाटत होत. पण जेंव्हा तिथं गेले तेंव्हा वेगळच घडल."

अर्णव -" काय घडल?"

प्रीती -" तो माझ्याकडे पाठ करून उभा होता.  मी त्याला हाक मारली. तो मागे वळला. मी त्याला कित्येक दिवसापासून बघण्यासाठी तरसले होते. तो म्हणाला ' तू आलीस. मला वाटल नव्हतं तू येशील. हे बघ... मला वाटतं तुझी आणि माझी साथ फक्त इथ पर्यंतच होत . मी आता दुसऱ्या शहरात जात आहे. कदाचित मी कधीच नाही भेटणार तुला... '.. ????????.. तो जेंव्हा हे बोलत होता. माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. काय झालं... कसं झालं... काहीच माहिती नव्हतं... मी त्याला विचारलं... ' माझं काही चुकलं का??... प्लिज सांग ना... काही चुकल असेल तर सॉरी... प्लीज प्लीज यार नको सोडून जाऊस मला.... ????????????... ' मी त्याच हाथ पकडून विनंती करत होते... तो म्हणाला  ' प्लीज.. मला विचारू नकोस.. काय झालं... कसं झालं... फक्त मी तुला आता भेटू शकणार नाही..' एवढं बोलून तो जाऊ लागला. तो एकदाही मागे वळुन सुद्धा नाही बघितला. मी याच बीच वर रडत बसले होते. ????????"

अर्णव -" ह्म मम...मग एवढं घडल तर??"

प्रीती -" हो... "

काही मिनिट दोघंही शांत चालत होते. नंतर अचानक प्रीती म्हणाली. 

प्रीती - " हे तिथं बघ एक बार आहे...????????... चल तिथं जाऊ... "

अर्णव -" नको नको... रात्र खूप होत आहे.. आपल्याला जावं लागणार.. "

प्रीती -" तू मुलगा आहेस ना..चल की जाऊ.."

प्रीती अर्नवचा हाथ पकडून त्या बार मध्ये घेऊन जाऊ लागली. 
तो बार खूप गजबजलेला होता. प्रीती आणि अर्णव खुर्ची वर बसून घेतले. प्रीती लगेचच व्हिस्की ची ऑर्डर दिली. ती अर्णवला विचारली की काय घेणार. 

अर्णव -" मला काही नको..."

प्रीती - " अरे घे रे... काही नाही होत.."

अर्णव - " नको नको ... तूच पी मी फक्त कॉल्ड ड्रिंक घेणार."

       दोघांची ऑर्डर आली. दोघे सुद्धा पित होते.. प्रीती मात्र एका मागे एक ग्लास पित होती. अर्णव मात्र तिलाच बघत बसला. त्याचा मात्र एक ग्लास सुद्धा संपला नव्हता. सात ग्लास झाल्यावर ती एकदमच टेबलवर आदळली. 

अर्णव एकदम दचकला. 

अर्णव -" अरे यार... हो पोरगी आहे का कोण आहे... आता कोण घेऊन जाणार हिला... आणि हीच घर कुठ आहे माहितीच नाही... "

अर्णव तिचा पर्स बघितला. त्यात तीच कार्ड होत.. त्यावर तिच्या घराची अॅड्रस होत. तो तिला खांद्यावर घेऊन जाऊ लागला. घेऊन जाताना ती काहीतरी बडबडत होती . " रोहित तू का गेलास... कशाला गेलास??..." अर्णव तिला कार मध्ये बसून तिच्या घरी घेऊन जाऊ लागला. अधून मधून तो तिला बघत असे. ती आता झोपली होती. 

     कार आता तिच्या घराच्या समोर उभी होती. तो तिला घेऊन बाहेर आला. तिच्या पर्समधून चावी काढली. 

अर्णव - " नशीब चावी तर सापडली. "

प्रीतीला घेऊन अर्णव तिच्या बेडरूम मध्ये गेला. तिला तिच्या बेडवर झोपवला. तिच्या पायातले हिल्स काढले आणि फॅन ऑन केला. तो बेडवर बसून म्हणू लागला. 

अर्णव -" बहुतेक ही सुद्धा एकटीच राहत असेल . "

तो उठला तेवढ्यात प्रीती हाथ पकडली. 

प्रीती -  " प्लीज ना... रोहित... जाऊ नको ना सोडुन.."

ती झोपेतच बडबडत होती. तो तिचा हाथ हळुवार पणे सोडवू लागला. मग तो तिच्याकडे बघत मनात म्हणू लागला. ' कदाचित सगळ्यांचं अवस्था माझ्यासारखीच झाली आहे.'

तेवढ्यात अर्णव चा कॉल रिंग झाला. स्क्रीनवर पूजा च नाव दाखवत होत. 

अर्णव -" हॅलो... पूजा एवढ्या रात्री ... "

पूजा -" काही नाही रे..... तुला एक बातमी द्यायची होती. "

अर्णव -" बोल की..."

पूजा -" माझं लग्न ठरलं अर्णव... आय एम वेरी  हॅप्पी.."

अर्णव एवढं ऐकूनच खाली बसला. 

पूजा -" हॅलो ... हॅलो अर्णव... हॅलो... काय झालं???.. अर्णव बोल ना... "

तो मोबाईल मात्र खाली पडला होता... आणि त्याच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं होत... ????????????????????????

********************************
क्रमशः

ऋषिकेश मठपती

पुढील भाग लवकरच... हा भाग आवडला असेल तर नकीच कमेंट करा..... धन्यवाद...????????????...

🎭 Series Post

View all