Sep 25, 2020
प्रेरणादायक

सास-यांच मॉडर्न पित्र

Read Later
सास-यांच मॉडर्न पित्र

सास-यांच मॉडर्न पित्र

आता सध्या पित्राचा महिना आहे, आणि या महिन्यांत आपण पुर्वजांची पित्रे घालतो ,ही पुर्वापार चालत आलेली प्रथा आहे.

तिच्या जावेने तिला फोन करून सांगितले की ,आपल्या घरची सास-यांची पित्र गुरुवारी आहे ,तर घरातल्या घरात काही गोडाचा नैवेद्य करून घास ठेव,आता या वर्षी करोनामुळे एकत्र येणे शक्य नाही. दरवर्षी जाऊ बाईंच्या घरी सगळे जमून सगळ्या भाज्या,भजी ,पापड ,वरण ,भात कढी,गुलगुले असे खूप सारे प्रकार सकाळी चार वाजता ऊठून करायचो ,जवळ जवळ सत्तर ते ऐंशी लोक जेवायचे. आता मात्र करोनामुळे 

शक्य नाही.नेहा असाच विचार करत होती ,तितक्यात तिच्याकडे घरकाम करणा-या मावशींचा फोन आला . त्यांनी सांगितले, आम्ही गावावरून आलो आहे ,म्हणून सांगायला फोन केला.

नेहा-मग कामाला जायला सुरुवात केली का कुठे

मावशी-दोन तीन ठिकाणी फोन केला,तर सोसायटीत येऊ देत नाही असं सांगितलं,तुमच्या कडे कधी पासून येऊ 

नेहा-इथं येऊ देतात ,पण चोवीस तास राहणारी असेल तर, त्यात गणपती मध्ये सोसायटीत बत्तीस केस सापडल्या ,म्हणून सध्या तरी नको,बघू दोन महिन्यांनी ,वातावरण पाहून,पण तूम्ही लगेच का आले

मावशी-पैसे बरोबर नेले होते,ते संपले ,तिथं काही उत्पन्नाचं साधन नाही ,मग आलो ,बरं ठीक आहे असं म्हणून फोन ठेवला.

नेहा विचार करत होती आणि तिच्या डोक्यात एक कल्पना आली,तिने पटकन एक सामानाची यादी बनवली की ज्यात नेहमी घरात लागणा-या वस्तू होत्या ,तिने ती यादी ,ज्या दुकान दाराकडून सामान मागवायची त्याला व्हाट्सप वर पाठवली,हिने तिच्या मावशींच्या घराचा पत्ता आणि फोन नंबर पाठवला  आणि सांगितले,या पत्त्यावर सामान पाठवा.

दुकानदाराने बील पाठवले,ते नेहाने ऑनलाइन देऊन टाकले.

दुकानदाराचा मुलगा सामान घेऊन गेला ,त्याला पत्ता सापडत नव्हता ,मग त्याने फोन करून विचारले ,तो त्यांच्या घरी सामान पोहोचवून आला .

मावशी- ताई,कशाला पाठवलं एवढं सगळं ,मी नंतर थोडे थोडे करून पैसे देईल 

नेहा- तुम्हांला आठवतं ,मी दरवर्षी जाऊ बाईं कडे पित्राच जेवण बनवायला जायची ,तर सत्तर ते ऐंशी लोक जेवायचे ,एव्हढ्या लोकांना जेवायला घालण्यासाठी जो किराणा लागायचा तो मी तुमच्या घरी पाठवला ,कारण तुमच्या बोलण्यातून मला हे जाणवलं की ,त्याची तुम्हाला जास्त गरज आहे आणि आता पर्यंत ज्यांना जेवायला घालायचो ,त्यांना घरीही चांगलच जेवायला मिळायचं ,तरी बोलवायचो आणि सगळं करायचं ,पण तुमचा फोन येऊन गेल्यावर देवानेच मला ही बुध्दी दिली ,मी फक्त आमलात आणण्यासाठी एक माध्यम,त्यामुळे ठेवा सगळं,परत कशाची गरज भासली तर सांगा ,शक्य आहे तेवढं करीन आणि परत पैसे परत देण्याचा विचारही मनात आणू नका,आताची परिस्थितीवर मात करून सगळे निरोगी राहणे,जास्त गरजेचे आहे.

मावशी-तुम्हाला माहित नाही ,तुम्ही आज आम्हांला किती मोठी मदत केली आहे,यांना वॉचमनची नोकरी मिळाली आहे,पण एक महिन्याने पगार होणार होता ,जे होतं ते सगळं गावी खर्च झालं,त्यामुळे जेवणाची भ्रांत होती ,आता महिना अगदी आरामात जाईल ,देव तुम्हाला सुखात ठेवो.

नेहा-मी विचारलं असतं,तर तुम्ही नाही म्हटल्या असत्या,मला खरचं तुमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवायची नाही,पण पंधरा वर्षे झाली ,तुम्ही आमच्याकडे काम करता ,मग तुम्हाला उपाशी ठेवून मी आनंदात कसं राहू शकते,ह्या परिस्थितीत कसली गरज लागली, तर आपलं माणूस म्हणून सांगा ,जे शक्य आहे ते नक्कीच करेन ,चला ठेवते फोन.

दुस-या दिवशी गुरुवार होता ,तिने साधा वरण भात, भाजी ,पोळी आणि गोड म्हणून खीर केली ,सकाळी आठ वाजता ,छान सास-यांचा फोटो ठेवला ,त्याला प्लास्टीकच्या फुलांचा हार घातला ,अगरबत्ती लावली आणि फोटोची पुजा केली,पुजा करत असताना सासरे तिच्याकडे पाहून हसत आशिर्वाद देत असल्याचा भास झाला,नैवेद्य टेरेसमध्ये ठेवला ,पाया पडली आणि बाजुला झाली ,तसा एक कावळा आला ,त्याने त्याला काकस्पर्श करत तो या कृतीतून किती आनंदी आहे याचा जणू दाखलाच दिला.

नेहा मनातल्या मनात विचार करते ,खरचं देवाने मला चांगली बुद्धि दिली ,किती गरज होती त्यांना आणि एक वेगळाच आनंद मिळाला आहे ,जो त्या सत्तर ते ऐंशी लोकांना जेवायला घालून मिळत नव्हता. आता नेहाने ठरवलं,इथून पुढे दरवर्षी पित्राच जेवण ज्यांना गरज आहे,त्यांना जेवायला घालणार,खरंच मी करोनाची आभारी आहे की,त्याच्या प्रभावामुळे ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि नेहाच काय आपण सर्वांनीच हा चांगला बदल स्वीकारला पाहिजे ,मी तर स्वीकारला आहे ,काय मग मंडळी तुम्ही पण स्वीकारणार ना

तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर नावासहित शेअर करा,हसत रहा,वाचत रहा ,आनंदात रहा , थोडेसे चांगले बदल करण्याचा प्रयत्न करा आणि अभिप्राय अवश्य द्या .

रुपाली थोरात 

 

Circle Image

रूपाली रोहिदास थोरात

Assistant professor

I love to read and write , from my college time, I am writing poems, whenever thoughts come in mind ,I wrote it in words, but no platform to share with others . when I saw this site, I got a platform to share my thoughts and views with all, Thanks to Era creators to giving me such a wonderful platform as well inspiring new writers, Hope all of you will enjoy our journey of reading and writing and will give comments to encourage me . also suggestions are welcome by me so that I can improve because always we are learners at the end of our life. Rupali Thorat