फॅशन फक्त दिखाव्यासाठी

फॅशनच्या नावाखाली नको त्या गोष्टी करणे म्हणजे केवळ दिखावाच

लेख:-3) फॅशन फक्त दिखाव्यासाठीच.
विषय:- फॅशन सोयीसाठी की दिखाव्यासाठी
वाद विवाद स्पर्धा फेरी

भारत देश हा विविध जाती-धर्माचा देश आहे.त्यामुळे त्या त्या प्रदेशानुसार वेशभूषा ही वेगवेगळी आहे.विविधतेने नटलेल्या आपल्या देशात फॅशन साठी अनेक पर्याय उपलब्ध असताना सुद्धा आपण केवळ दिखाव्यासाठी पाश्चिमात्य संस्कृतीअंगीकारत आहोत ही नक्कीच चुकीची गोष्ट आहे.मुळात कपडे हे आपण अंग झाकण्यासाठी आणि लज्जा रक्षणासाठीच घालतो ना.मग आपण घातलेल्या.कपड्यामुळे अंग झाकण्याऐवजी उघडे ठेवणे म्हणजे दिखावाच नाही का?
साडीमध्ये स्त्री सुंदर दिसतेच यामध्ये वाद नाही परंतु, नऊवारी ते सहावारी आणि सहावारी ते सलवार सूट आणि हल्ली तर जीन्स टॉप वनपीस ही समाजाने सहज स्वीकारलाच की.परंतु आजकाल फॅशन च्या नावाखाली नको तितक्या फाटलेल्या जीन्स घालणे, शरीराचा नको तो भाग उघडा दाखवणे हा किती घाणेरडा प्रकार आहे.नाही?
मान्य आहे फॅशनचा संस्कृतीशी काही संबंध नव्हता आणि नाही. परंतु,पूर्वी कुठे जर फाटलेला कपडा असेल तर लोक लपवण्यासाठी शिवून घ्यायचे,रफू करायचे,प्रसंगी ठिगळ जोडायचे.असलेले कपडे म्हणजे दारिद्री पणाचे लक्षण समजले जायचे पण हल्ली आता मात्र फॅशनच्या नावाखाली फाटके, मळके कपडे घालणे ही कसली दळभद्री फॅशन म्हणायची?आज कालचे तरुण-तरुणी पिक्चर मधील हिरो हिरोईन ला आपले आयडॉल मानतात.ते करतील तसं करण्याचा प्रयत्न करतातआणि मग उत येतो फॅशन च्या नावाखाली नको तो उद्योग करण्याचा.
काय ते बॅकलेस फोटोशूट
काय ते टॉपलेस फोटोशूट
काय ते न्यूड फोटोशूट
सगळं कसं फक्त दिखाव्यासाठी.

तुम्ही साधी वेशभूषा केल्याने कोणी सुधा मूर्ती किंवा रतन टाटा बनू शकत नाही म्हणता पण साधेपणाचा ही हल्ली तर साधेपणाचा ही दिखावा केला जातो.मंत्र्यांची खादी असो की साधुची भगवी वस्त्र सगळा दिखावा.नाहीतर भगवे वस्त्र घालून अध्यात्मिक सांगणारे  आसाराम बाबा आज तुरुंगात नसते
लग्न आणि रिसेप्शन ह्या गोष्टी बाजूलाच राहू देत.पण हल्ली प्री-वेडिंग फोटोशूटच जे वेड आलंय ना. ते सुरुवातीला बरं होतं पण आत्ता तर नको तितक्या छोट्या कपड्यांमध्ये नवऱ्या मुलीचे मुलासोबत फोटो काढायचे आणि ते लग्नामध्ये वऱ्हाडी मंडळींना दाखवायचे.किती तो दिखावेपणा?
गंमत अजून पुढेच आहे पूर्वी स्त्री गरोदर राहिली की डोहाळे जेवण केलं जायचं. आई सासू मामी मावशी काकी आत्या नंदा जावा मैत्रिणी.सगळ्या जमायच्या गर्भवतीला हिरवा शालू नेसवला जायचा फुलांच्या दागिन्याने सजवल जायचं.कोडकौतुकात न्हाऊन निघालेल्या गर्भवतीचा चेहरा गर्भारपणाच्या तेजाने खुलुन यायचा.पण हल्ली प्रेगनेंसी फोटोशूटच्या नावाखाली गरोदरपणाच जे प्रदर्शन मांडलं जातं ते खूपच घाणेरड्या पद्धतीने केलेलं असतं.म्हणजे ज्या उबदार उदरामध्ये माऊली एका जीवाला 9महिने सांभाळते त्याला उघड करून दाखवणे ही कसली आलीय फॅशन?

खरं तर फॅशनचा अर्थ लोक आपल्या सोयीनुसार लावून घेतात. आपल्या चैनीसाठी आणि विकृत मानसिकतेचे प्रदर्शन घडवण्यासाठी फॅशन या शब्दाचा वापर सर्रास केला जातो.बदलत्या काळानुसार बदलणे ही काळाची गरजच आहे पण आधुनिकतेच्या नावाखाली प्रदर्शनाचा बाजार मांडणे केवळ दिखावाच असू शकतो.
©®खुशी कांबळे
पालघर जिल्हालेख:-3) फॅशन फक्त दिखाव्यासाठीच.
विषय:- फॅशन सोयीसाठी की दिखाव्यासाठी
वाद विवाद स्पर्धा फेरी

भारत देश हा विविध जाती-धर्माचा देश आहे.त्यामुळे त्या त्या प्रदेशानुसार वेशभूषा ही वेगवेगळी आहे.विविधतेने नटलेल्या आपल्या देशात फॅशन साठी अनेक पर्याय उपलब्ध असताना सुद्धा आपण केवळ दिखाव्यासाठी पाश्चिमात्य संस्कृतीअंगीकारत आहोत ही नक्कीच चुकीची गोष्ट आहे.मुळात कपडे हे आपण अंग झाकण्यासाठी आणि लज्जा रक्षणासाठीच घालतो ना.मग आपण घातलेल्या.कपड्यामुळे अंग झाकण्याऐवजी उघडे ठेवणे म्हणजे दिखावाच नाही का?
साडीमध्ये स्त्री सुंदर दिसतेच यामध्ये वाद नाही परंतु, नऊवारी ते सहावारी आणि सहावारी ते सलवार सूट आणि हल्ली तर जीन्स टॉप वनपीस ही समाजाने सहज स्वीकारलाच की.परंतु आजकाल फॅशन च्या नावाखाली नको तितक्या फाटलेल्या जीन्स घालणे, शरीराचा नको तो भाग उघडा दाखवणे हा किती घाणेरडा प्रकार आहे.नाही?
मान्य आहे फॅशनचा संस्कृतीशी काही संबंध नव्हता आणि नाही. परंतु,पूर्वी कुठे जर फाटलेला कपडा असेल तर लोक लपवण्यासाठी शिवून घ्यायचे,रफू करायचे,प्रसंगी ठिगळ जोडायचे.असलेले कपडे म्हणजे दारिद्री पणाचे लक्षण समजले जायचे पण हल्ली आता मात्र फॅशनच्या नावाखाली फाटके, मळके कपडे घालणे ही कसली दळभद्री फॅशन म्हणायची?आज कालचे तरुण-तरुणी पिक्चर मधील हिरो हिरोईन ला आपले आयडॉल मानतात.ते करतील तसं करण्याचा प्रयत्न करतातआणि मग उत येतो फॅशन च्या नावाखाली नको तो उद्योग करण्याचा.
काय ते बॅकलेस फोटोशूट
काय ते टॉपलेस फोटोशूट
काय ते न्यूड फोटोशूट
सगळं कसं फक्त दिखाव्यासाठी.

तुम्ही साधी वेशभूषा केल्याने कोणी सुधा मूर्ती किंवा रतन टाटा बनू शकत नाही म्हणता पण साधेपणाचा ही हल्ली तर साधेपणाचा ही दिखावा केला जातो.मंत्र्यांची खादी असो की साधुची भगवी वस्त्र सगळा दिखावा.नाहीतर भगवे वस्त्र घालून अध्यात्मिक सांगणारे रामदेव बाबाआज तुरुंगात नसते

पालघर जिल्हा